Adivasi School Bharti-आदिवासी आश्रम शाळेत १४ हजार पदांची भरती लवकरच

Adivasi Ashram School Bharti 2022

 ‘या’ शिक्षकांनाही आता ‘टीईटी’ अनिवार्य 

Adivasi Ashram School Bharti 2022: Teachers and non-teaching staff in tribal ashram schools will be regularly recruited on government basis. They are required to pass the Teacher Eligibility Test (TET) within a period of five years from the date of regularization. Read More details regarding Adivasi Ashram School Recruitment 2022 are given below

 आदिवासी आश्रमशाळांमधील रोजंदारी, तासिका तत्वावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शासनसेवेत नियमित सामावून घेण्यात येणार आहे. त्यांचे नियमितीकरण केल्याच्या दिनांकापासून पाच वर्षांच्या कालावधीत त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. अन्यथा शासनाकडून त्यांच्या सेवा समाप्त करण्यात येणार आहेत .

 आदिवासी विकास विभागाअंतर्गत 499 आश्रमशाळा आहेत. सध्या शिक्षक संवर्गातील 6 हजार 209 पदे मंजूर असून 4 हजार 6 पदे भरलेली, तर उर्वरित रिक्‍त आहेत. वर्ग 4 च्या 6 हजार 100 मंजूर पदांपैकी 3,237 पदे भरलेली, उर्वरित 2,863 पदे रिक्त आहेत.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विषयनिहाय आवश्‍यकतेप्रमाणे तासिका तत्त्वाने मानधनावर 3 हजार 833 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी नियुक्त आहेत. यातील 365 कर्मचाऱ्यांनी 46 याचिका विविध न्यायालयांत दाखल केल्या होत्या. दरम्यान, दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या याचिकाकर्त्यांच्या सेवा नियमित करण्याबाबतचे आदेश न्यायालयाना दिले होते.


Adivasi Ashram School Bharti 2022 News – As per the latest news, 14,000 vacancies in various Adivasi (MahaTribal) Ashram Schools in the Maharashtra State will be filled soon. Various guards and other posts are vacant in Adivasi (MahaTribal) Ashram Schools in the state. These posts will be filled with the approval of the Finance Department after the regular commencement of the Ashram School. Read the More details are as given below:

Adivasi (Tribal) Ashram School Recruitment 2022

Tribal Ashram School Bharti 2022

राज्यातील आदिवासी आश्रम शाळेतील 14 हजार पदे लवकरच भरणार

Adiwasi School – Tribal Ashram School Bharti 2022- राज्यातील आदिवासी आश्रमशाळातील (Tribal Ashram School) विविध पहारेकरी आदी रिक्त असलेली १४ हजार पदे भरण्यासाठी लवकरच कार्यवाही केली जाईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी  यांनी आज विधान परिषदेत दिली. राज्यातील आदिवासी विभागाच्या अनुदानित आश्रमशाळांना मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या भोजन आणि शैक्षणिक सुविधा आदींवर होणाऱ्या परिणामासंदर्भात विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे  डॉ. रणजित पाटील आदींनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

  • आदिवासी विकास मंत्री पाडवी यांनी याबाबत सांगितले की, आदिवासी आश्रमशाळातील पदभरतीबाबत २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षात आश्रमशाळा नियमित सुरू झाल्यानंतर ही पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल.
  • तसेच अनुदानित आश्रमशाळातील शिक्षकांचे मानधन ९०० रुपयांवरुन १५०० रुपये करण्यात आल्याचे ते म्हणाले.
  • आदिवासी विकास विभागातील शिक्षणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. नाशिक आयुक्त कार्यालयांतर्गत एकूण २१० अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत.
  • सद्यस्थितीत प्राप्त प्रस्तावांपैकी सर्व आश्रमशाळांचे २०१९-२०२० (अंतिम) अनुदान निर्धारण झालेले आहे. सद्यस्थितीत अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BDS) परिक्षण अनुदानासाठी तरतूद उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
1 Comment
  1. Swati says

    I won’t a job

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!