Amazon India चा करियर डे! 8000 हून अधिक पदांसाठी भरती!

 Amazon Jobs 2021

Amazon will provide more than 8,000 direct job opportunities in 35 cities. These include Bengaluru, Hyderabad, Chennai, Gurgaon, Mumbai, Kolkata, Noida, Amritsar, Ahmedabad, Bhopal, Coimbatore, Jaipur, Kanpur, Ludhiana, Pune, Surat. These job opportunities will be in corporate, technology, customer service and operations roles. On September 16 and 17, Amazon is hosting one-on-one free career coaching sessions with recruiters.

ऑनलाईन रिटेल जायंट अॅमेझॉनने जाहीर केले आहे की ते भारतात १६ आणि १७ सप्टेंबर रोजी पहिल्यांदाच करिअर डे आयोजित करणार आहे. करिअर डेमध्ये अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जॅसी यांच्याशी फायरसाइड चॅटसह मनोरंजक आणि माहितीपूर्ण सत्रे असतील, जे स्वतःचा करिअरचा अनुभव आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठी सल्ला सामायिक करतील. अॅमेझॉन इंडियाचे ग्लोबल सीनियर व्हाईस प्रेसिडेंट आणि कंट्री हेड अमित अग्रवाल ओपनिंग इंडिया कीनोट देतील, त्यानंतर अॅमेझॉन नेते आणि कर्मचाऱ्यांशी पॅनल चर्चा होईल.

१६ आणि १७ सप्टेंबर या दोन दिवसांमध्ये अॅमेझॉनने भरती करणाऱ्यांसोबत वन ऑण वन विनामूल्य करिअर कोचिंग सत्र आयोजित केले आहे. अॅमेझॉन करिअर डे १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.कार्यक्रमाचा भाग म्हणून, कंपन्या जॉब सर्च प्रक्रियेला प्रभावीपणे कसे सामोरे जायचे, रिझ्युमे-बिल्डिंग कौशल्ये आणि मुलाखतीसाठी सल्ला देतील जे उमेदवारांना त्यांच्या योग्य नोकरीच्या शोधात मदत करतील.

थेट नोकरीची संधी

अॅमेझॉनने हे देखील जाहीर केले आहे की ते सध्या देशातील ३५ शहरांमध्ये ८,००० पेक्षा जास्त थेट नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत. ज्यात बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, गुडगाव, मुंबई, कोलकाता, नोएडा, अमृतसर, अहमदाबाद, भोपाळ, कोईमतूर, जयपूर, कानपूर,लुधियाना, पुणे, सूरत या शहरांचा समावेश आहे. या नोकरीच्या संधी कॉर्पोरेट, तंत्रज्ञान, ग्राहक सेवा आणि ऑपरेशन्स रोलमधल्या असतील.

अनेकांना मिळतोय रोजगार- Career in Amazon 

सध्या, अॅमेझॉन अभियांत्रिकी, उपयोजित विज्ञान, व्यवसाय व्यवस्थापन, पुरवठा साखळी, ऑपरेशन्स, वित्त, एचआर ते विश्लेषणे, सामग्री निर्मिती आणि अधिग्रहण, विपणन, रिअल इस्टेट, कॉर्पोरेट सुरक्षा, व्हिडिओ, संगीत आणि बरेच काही यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये १ लाख व्यावसायिकांना रोजगार देते . अॅमेझॉनसाठी भारत हे दुसऱ्या क्रमांकाचे तंत्रज्ञान केंद्र आहे.


Amazon, the world’s largest e-commerce company, will offer bumper jobs in the coming months. Amazon plans to hire 55,000 people globally for corporate and technology roles. Amazon’s annual job fair kicks off on September 16. Amazon will hire more than 40,000 of the more than 55,000 jobs in the United States.

जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन येत्या काही महिन्यांत बंपर नोकऱ्या देणार आहे. जागतिक पातळीवर कॉर्पोरेट आणि तंत्रज्ञानाच्या भूमिकांसाठी अॅमेझॉनने 55,000 लोकांना कामावर घेण्याची योजना आखलीय. अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अँडी जेसी यांनी रॉयटर्सला ही माहिती दिली. जेसीने सांगितले की, अॅमेझॉनचा वार्षिक रोजगार मेळा 16 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. अॅमेझॉन अमेरिकेत 55,000 पेक्षा जास्त नोकऱ्यांपैकी 40,000 हून अधिक भरती करेल. भारत, जर्मनी आणि जपान यांसारखे उर्वरित देश त्यांच्या जॉब फेअर अॅमेझॉन करिअर डेद्वारे भरती होतील. हे 30 जूनपर्यंत गुगलच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त आहे आणि फेसबुकच्या जवळ आहे.

जेसी म्हणाले, ‘करिअर डे’ https://www.amazoncareerday.com खूप समयोचित आणि खूप उपयुक्त आहे. कंपनीने म्हटले आहे की, नवीन नियुक्त्या अॅमेझॉनच्या तांत्रिक आणि कॉर्पोरेट कामगारांच्या संख्येत 20 टक्के वाढ दर्शवतील, जे सध्या जागतिक स्तरावर सुमारे 275,000 आहे.

रोजगार मेळावा कधी सुरू होईल?- Amazon Job Fair

अॅमेझॉन करिअर डे गुरुवारी 16 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. कंपनी म्हणते की, हा संवादात्मक अनुभव सर्व नोकरी शोधणाऱ्यांसाठी आहे. तुमचा अनुभव कितीही असो, व्यावसायिक क्षेत्र किंवा पार्श्वभूमी कोणतीही असो, तुम्हाला अॅमेझॉन किंवा इतरत्र काम करण्यास स्वारस्य असल्यास तुम्हीही अर्ज करू शकता.

अशा प्रकारे नोंदणी करा?- Amazon Registrations 2021

अॅमेझॉन करिअर डेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. सर्वप्रथम https://www.amazoncareerday.com वर जा. तुमचा देश येथे निवडा. यानंतर ‘आता नोंदणी करा’ वर क्लिक करा आणि पुढे तुमच्या तपशीलांसह फॉर्म भरा. कंपनी अधिक गोदाम तयार करण्यासाठी आणि कामगारांना आकर्षित करण्यासाठी वेतन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करीत आहे. खरेदीदारांकडून त्यांच्या घरी पोहोचवल्या जाणाऱ्या उत्पादनांची जोरदार मागणी पूर्ण करण्यासाठी अॅमेझॉन खूप स्पर्धात्मक काम करत असल्याचंही जेसी यांनी सांगितले.

पगार किती असेल?

ज्यांना अमेझॉन जॉब फेअरमध्ये नोकऱ्या मिळतात, त्यांना किमान 1,100 रुपये प्रति तास म्हणजे 15 $ डॉलर मिळतील. काही राज्यांसाठी सुरुवातीचा पगार 1240 रुपये प्रति तास (17 डॉलर) असेल. अॅमेझॉनचा जॉब फेअर जागतिक स्तरावर आयोजित केला जाईल. याचा अर्थ जगभरातील लोक त्यात सहभागी होऊ शकतात.


 Flipkart, Amazon मध्ये बंपर भरती! फेस्टिव्ह सीजनमध्ये ई-कॉमर्स कंपन्या ३ लाख लोकांना नोकर्‍या देणार

 ई-कॉमर्स कंपन्या येत्या फेस्टिव्हल सीजनमध्ये आपली विक्री वाढविण्यासाठी बंपर नोकर भरती करणार आहेत. <a फ्लिपकार्ट  आणि अॅमेझॉन सारख्या अनेक ई-कॉमर्स कंपन्या देशातील जवळपास ३ लाख लोकांना नोकऱ्या देणार आहेत.

Flipkart मध्ये मेगा भरती; 70 हजार लोकांना उपलब्ध होणार रोजगार

RedSeer च्या अहवालानुसार, फेस्टिव्ह सीजन पाहता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे बहुतेक नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपात केल्या जातील. एवढेच नव्हे तर ई-कॉमर्स कंपन्यांकडून वस्तू वितरित करणार्‍या लॉजिस्टिक कंपनी ईकॉम एक्स्प्रेसनेही ३० हजार नवीन नोकऱ्यांची घोषणा केली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या कंपन्यांमध्ये नोकर भरती अपेक्षित आहे.

बेरोजगारांना रोजगाराची संधीः ईकॉम एक्स्प्रेस 30,000 लोकांना देणार नोकरी

 २० टक्के कामगारांची कपात नाही

RedSeer च्या म्हणण्यानुसार, फेस्टिव्ह सीजन संपल्यानंतर तात्पुरत्या कामगारांपैकी २० टक्के कामगारांची कपात केली जाणार नाही. अलिकडच्या काळात लोकांमध्ये ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड वाढला आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन भारतात एक लाख लोकांची भरती करणार आहे. नवीन कर्मचारी ऑर्डर पॅकिंग, शिपिंग किंवा क्रमवारी लावण्यात मदत करतील. या कामरागांची नियुक्ती अर्धवेळ व पूर्णवेळ तत्त्वावर केली जाणार आहे .

 याचबरोबर, अहवालात म्हटले आहे की, अंदाजे ३ लाख नोकऱ्यांपैकी ७० टक्के या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टद्वारे देण्यात येतील अशी अपेक्षा आहे, तर उर्वरित ईकॉम एक्स्प्रेस इत्यादी लॉजिस्टिक कंपन्या देतील. या नोकऱ्यांपैकी ६० टक्के लॉजिस्टिक्स कार्यात असल्याचा अंदाज आहे. उर्वरितपैकी २० टक्के वेअर हॉसिंग म्हणजेच गोदामात आणि २० टक्के ग्राहक सेवा कार्यात असू शकतात.

 Flipkart मध्ये अशी असणार भरती

महिन्याच्या सुरूवातीला फ्लिपकार्टने म्हटले होते की, या फेस्टिव्हल सीजनमध्ये ७०,००० लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या नोकरी मिळण्यास मदत होईल. फ्लिपकार्टमध्ये थेट नोकर्‍या पुरवठा साखळी विभागात (supply chain department) &nbsp;देण्यात येतील. त्याअंतर्गत कंपनी डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह, पिकर्स, पॅकर्स आणि शॉटर्सची भरती करणार आहे. याशिवाय, कंपनी फ्लिपकार्टच्या सेलर पार्टनर लोकेशन आणि किराणा दुकानांमध्ये अप्रत्यक्षरित्या लोकांना नोकरी देईल.

सोर्स: लोकमत


Amazon कंपनी देणार 1 लाख नोकऱ्या; 12 वी पास असणाऱ्यांना मोठी संधी

अमेझॉन कंपनीने या वर्षीच्या सुरुवातीला देखील जगभरात 1 लाख 75हजार लोकांना कामावर घेतलं होतं.

जगातील सर्वात मोठी e-commerce कंपनी एक लाख लोकांना नोकरी देणार आहे. सोमवारी अमेझॉनने याविषयी घोषणा केली. Amazon.com ने याविषयी माहिती देताना सांगितलं की, लवकरच ऑनलाईन ऑर्डरच्या वितरणावर कंपनी नव्याने काम करणार असून 1 लाख लोकांसाठी रोजगार देखील निर्माण करणार आहे.’

Amazon ने जाहीर केलेल्या माहितीनुसार, ‘या वितरणाच्या कामासाठी बारावी उत्तीर्ण असणं एवढीच पात्रता पुरेशी आहे. यामध्ये पार्ट टाइम आणि फुल टाइम कामासाठी भरती होणार असून पॅकिंग, शिपिंग आणि सॉर्टिंग विभागात ही नोकरभरती केली जाणार आहे.’ अमेझॉन कंपनीने या वर्षीच्या सुरुवातीला देखील 1 लाख 75हजार लोकांना कामावर घेतलं होतं.

बेरोजगारांना रोजगाराची संधीः ईकॉम एक्स्प्रेस 30,000 लोकांना देणार नोकरी

याविषयी अधिक माहिती देताना कंपनीने सांगितलं की, त्यांना 100 नवीन वेअरहाऊस आणि अन्य कामांसाठी माणसांची गरज आहे. या वेअर हाऊसचं काम पाहणाऱ्या एलिसिया बोलर डेविस यांनी याविषयी सांगितले कि, अमेझॉन काही शहरांमध्ये 1,000 डॉलर साइन इन बोनस देखील देत आहे. त्यांच्या मते डेट्रॉइट, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया आणि लुइविले, केंटकीमध्ये कामगार मिळणं खूप अवघड आहे. अमेझॉनमध्ये सुरुवाती वेतन हे 15 डॉलर प्रतितास इतकं आहे. मागील आठवड्यातच अमेझॉनने घोषणा केली होती की, त्यांना कॉर्पोरेट आणि तांत्रिक कामांसाठी 33,000 कामगारांची गरज आहे. अमेझॉनने एप्रिल ते जूनच्या दरम्यान विक्रमी कमाई केली असून कोरोनाच्या या संकटात अनेकांनी ऑनलाईन किराणा ऑर्डर केल्यामुळे त्यांना याचा मोठा फायदा झाला आहे.

अमेझॉनच्या वेअरहाऊसमध्ये अनेक गोष्टी या अस्तव्यस्त पडलेल्या असतात. त्यामुळे हे सामान व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि त्याचे योग्य नियोजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामगारांची गरज आहे. हॉलिडे शॉपिंग आणि सेलच्या दिवसांमध्ये अमेझॉनच्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळतात. त्यामुळे या दिवशी कोणतीही गडबड न होण्यासाठी त्यांनी आधीपासूनच तयारी सुरु केली आहे. त्यामुळेच नवीन 1 लाख लोकांची भरती करण्याची तयारी अमेझॉनने सुरु केली आहे.


ऍमेझॉन येत्या पाच वर्षात भारतात दहा लाख रोजगार निर्माण करणार

Good News for Freshers : Amazon will create one million jobs in India in the next five years. As per the latest news Amazon, the leading commerce company, aims to provide jobs to one million people in this country by investing in technology, infrastructure, and logistic networks in India over the next five years. In the last seven years, Amazon has provided jobs to seven million people in the country through Indian investment. In addition to this there will be a million new jobs. Read the more details below :

amazon

Amazon Recruitment 2020

नवी दिल्ली – ई कॉमर्स क्षेत्रातील अग्रगण्य ऍमेझॉन कंपनीने भारतात पुढील पाच वर्षात तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, आणि लॉजिस्टीक नेटवर्क मध्ये गुंतवणूक करून या देशातील दहा लाख लोकांना रोजगार पुरवण्याचे उद्दीष्ठ ठरवले आहे. गेल्या सात वर्षात ऍमेझॉनने भारतातील गुंतवणुकीद्वारे देशात सात लाख लोकांना नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. त्या व्यतिरिक्त या नवीन दहा लाख नोकऱ्या असणार आहेत.

कंपनीच्यावतीने जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. त्यांनी म्हटले आहे की आमच्या या पुढाकारामुळे आणि गुंतवणुकीमुळे माहिती तंत्रज्ञान, स्कील डेव्लपमेंट, कंटेन्ट क्रिएशन, रिटेल, लॉजिस्टीक आणि मॅन्यु फॅक्‍चरींग क्षेत्रात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सन 2025 पर्यंत किमान दहा लाख नवीन रोजगार निर्माण होतील.या कंपनीचे प्रमुख जेफ बेझोस यांनी बुधवारी ऍमेझॉन कंपनी तर्फे भारतात सुमारे सात हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. भारताने स्कील डेव्हलपमेंटला प्राधान्य देऊन विविध उद्योग क्षेत्रात येत्या दोन वर्षात 400 दशलक्ष लोकांना रोजगार देण्याची योजना आखली आहे. त्यांच्या या योंजनेला आम्ही यानिमीत्त हातभार लावत आहोत असेही कंपनीने आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

सौर्स : प्रभात वृत्तपत्र
17 Comments
 1. Shivani says

  I want to apply I have the experience

 2. Amar ahire says

  Job riqvayrment

 3. Shinde nitin ankush says

  A/p_pimpalgaon pisa
  Tal_shrigonda dist_ahmedangar

 4. Shaikh mohammed arif says

  I am also interested

 5. Chetan patil says

  Ma interested hu job ke liye

 6. Maroti Manghate says

  Maharashtra ki sarkar kya kar rhi hai es lokdawan ki wajah se kitane log berojgar pade hai kya kar raha hai sarkar kuch nahi kohi dhang se bharti nhi

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!