Anganwadi Bharti-अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या तब्बल 581 जागा रिक्त

Anganwadi Bharti 2022

Maharashtra Anganwadi Sevika Bharti 2022

Solapur Anaganwadi Bharti 2022 for 581 posts: Anganwadi workers have not been recruited in Solapur district for the last three years. Due to this, the working Anganwadi workers and helpers have increased their workload. There are as many as 581 vacancies of Anganwadi Sevika and Madatnis were vacant in Solapur District. Taluka wise Vacancy Details chart are given below. Candidates read the given details carefully and keep visit us for further details.

नोकरीची संधी- या जिल्यात सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिकाची ५२ पदे रिक्त

सोलापूर जिल्हाभरात अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या तब्बल 581 जागा रिक्त आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ही पदे रिक्त आहेत. रिक्त जागा अद्याप भरण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर कामाचा अतिरिक्‍त भार वाढला आहे. अंगणवाडीकडे पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पाया म्हणून पाहिले जाते. बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी शासन त्यांच्या आहारासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करत आहे.

Maharashtra Anganwadi Bharti 2022

 • रिक्त जागामुळे अंगणवाडीतील बालकांचे भवितव्य अंधारात सापडण्याची चिन्हे आहेत. अनेक नजीकच्या अंगणवाडी सेविकांना रिक्त पदावरील अंगणवाडीचा प्रभारी चार्ज देण्यात आला आहे, मात्र त्याकडे त्यांना पूर्ण वेळ देता येत नसल्याने येथील अनेक बालकेही दुर्लक्षित ठरत आहेत.
 • सहा महिन्यांपूर्वी महिला व बालकल्याण विभागाच्या आयुक्तांकडून रिक्त जागांच्या 50 टक्के जागा भरण्याचा आदेश आला. या आदेशात 31 डिसेंबर 2019 पूर्वी रिक्त झालेल्या जागाना प्राधान्य देण्याचे सांगण्यात आले होते.
 • त्यानुसार 50 टक्के जागा भरुनदेखील गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात आजपर्यंत 581 कर्मचार्‍यांच्या जागा या रिक्त आहेत. येत्या काळात लवकर या जागा न भरल्यास अंगणवाडीतील मुलांच्या शिक्षणाचा दर्जा ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 • फक्त सोलापुरात ही परिस्थिती नसून अशी परिस्थिती संपूर्ण राज्यभरात आहे. अंगणवाडीत काम करणारे कर्मचारी कमी मानधनावर प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न करतात.
 • त्यामुळे त्यांचे नेहमीच कौतुक होत असते. असे असतानाही कमी मानधनासाठी कर्मचार्‍यांची नियुक्‍ती राज्य शासनाकडून होत नसल्याने पालकांत शासनाच्या विरोधात रोष बळावत आहे.

Vacancy Details of Maharashtra Anganwadi Bharti 2022

 1. अक्कलकोट तालुक्यात सेविका 16, मिनी सेविका 3, मदतनीस 55,
 2. बार्शी तालुक्यात सेविका 12, मिनी सेविका 1, मदतनीस 30,
 3. वैराग सेविका 8, मदतनीस 20,
 4. करमाळा तालुक्यात सेविका 17, मिनी सेविका 1, मदतनीस 25.
 5. माढा तालुक्यात सेविका 2, मिनी सेविका 1, मदतनीस 22,
 6. कुर्डूवाडी आणि टेंभुर्णी येथे सेविका 6, मदतनीस 11,
 7. माळशिरस तालुक्यात सेविका 18, मिनी सेविका 1, मदतनीस 19,
 8. अकलूज येथे सेविका 17, मदतनीस 31.
 9. मंगळवेढा तालुक्यात सेविका 1, मिनी सेविका 1, मदतनीस 26,
 10. मोहोळ तालुक्यात सेविका 13, मिनी सेविका 5, मदतनीस 29,
 11. उत्तर सोलापूर सेविका 13, मदतनीस 20,
 12. पंढरपूर 1 सेविका 9, मदतनीस 36,
 13. पंढरपूर क्र. 2 येथे सेविका 9, मदतनीस 24,
 14. सांगोला तालुक्यात सेविका 3, मिनी सेविका 1, मदतनीस 10,
 15. कोळा येथे सेविका 11, मिनी सेविका 2, मदतनीस 9,
 16. दक्षिण सोलापूर येथे 9, मदतनीस 34 अशा जागा रिक्त आहेत.

Solapur Anganwadi Bharti – 581 Vacancy Details

anganwadi solapur


There are vacancies for Anganwadi Sevika and Anganwadi Madatnis Bharti in Chiplun, Ratnagiri District. The Ekatmik Balvikas Vibhag Appeal to apply for the post of Anganwadi Sevika and helper in Chiplun candidatse. In Integrated Child Development Services Scheme Projects 1 and 2, vacancies are to be filled for the above post. Applications are invited from aspiring and required qualified candidates with local residents in the respective Gram Panchayat area. Complete details are given below, Read the details carefully and apply as soon as possible.

चिपळुणात अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प १ व २ मध्ये अंगणवाडी सेविका पदासाठी व मदतनीस पदासाठी रिक्त जागा भरावयाच्या आहेत. यासाठी इच्छुक व आवश्यक अर्हताधारक संबंधित ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील स्थानिक रहीवाशी असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदरचे अर्ज २२ जून ते ४ जुलैपर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी परकार कॉम्पलेक्स दुसरा मजला २१८ येथे सादर करावे.

 1. तालुक्यातील अंगणवाडी सेविका पदासाठी रिक्त जागा प्रकल्प १ व २ मध्ये जाहीर झाले असून यासाठी विविध नमुन्यांमध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत.
 2. अंगणवाडी सेविका पदासाठी वयोमर्यादा २१ ते ३० वर्ष असे राहील. सदर पदांसाठी यापुर्वी जाहीरातीनुसार अर्ज केले असल्यास पुन्हा अर्ज करणे बंधनकारक आहे.
 3. प्रकल्प १ मध्ये अंगणवाडीका सेविका पदासाठी धामेली गायकर व निरबाडे लाल या ठिकाणी अंगणवाडी सेविका पद रिक्त आहे. सदर पदासाठी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील स्थानिक उमेदवारांनी अर्ज करावेत.
 4. त्याप्रमाणे प्रकल्प २ मध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी रिक्त जागा भरावयाच्या आहेत. यासाठी गाव मजरेकाशी अंगणवाडी मजरेकाशी व गाव मिरजोळीमध्ये अंगणवाडी कोलेखाजन या ठिकाणी अंगणवाडी सेविका पद भरावयाचे आहेत.
  अंगणवाडी मदतनीस रिक्त जागेसाठी कामथेमधील अंगणवाडी कामथे टेपवाडी येथे मदतनीस पद भरावयाचे आहे.
 5. सदर पदासाठी दि. २२ जून ते १ जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. सदरचे अर्ज परकार कॉम्पलेक्स गाळा नं. २२६ या कार्यालयामध्ये सादर करावे.
 6. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी १मध्ये शिवानी शिंदे आणि प्रकल्प २ मध्ये अधिकारी एस.एस. नार्वेकर यांच्याशी संपर्क साधावा.

 1. Anganwadi Bharti 2022- A meeting of Anganwadi workers and helpers was held at Sitra Bhavan. Sitaram Thombre, District President of CITU was in the chair Person. On this occasion, Vice President of All India CITU and President of Maharashtra CITU Dr. D. L. Guided by Karad. Anganwadi workers and helpers should be recognized as government employees. Until then, they should get a minimum salary of Rs 26,000, pension and graduation, was demanded in the meeting.

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता मिळावी. तोपर्यंत त्यांना २६ हजार रुपये किमान वेतन मिळावे, पेन्शन आणि ग्रॅज्युटी मिळावी, अशी मागणी मेळाव्यात करण्यात आली.

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सिट्र भवन येथे मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सिटूचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे होते. यावेळी अखिल भारतीय सीटूचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र सिटूचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी मार्गदर्शन केले. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता मिळावी. 

तोपर्यंत त्यांना २६ हजार रुपये किमान वेतन मिळावे, पेन्शन आणि ग्रॅज्युटी मिळावी, अशी मागणी मेळाव्यात करण्यात आली. अंगणवाडी सेविकांच्या जिल्हाध्यक्ष सुलक्षणा ठोंबरे, सरचिटणीस कल्पना शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सुनीता मोगल, लता लावले, सुरेखा पवार, गौरी वैद्य, अंबाबाई गुंबाडे, कुसुम खोकरे, सुनीता कांबळी, लीला भोये, वैशाली घुमरे, आदींसह अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 


Nandurbar Anganwadi Bharti 2022: Integrated Child Development Services Scheme Project is invited application form for the Anganwadi Sevika, Mini Anganwadi Sevika and Helper Posts. There is a total of 17 vacancies to be Filled under Nandurbar Anganwadi Recruitment 2022. Interested candidates may submit their application form to the given address before the last date. The last date for submission of application form is 25th and 31st May 2022

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा 


Approved today to disburse funds of Rs.  100 crores for For a lump sum benefit plan after termination of service or death Anganwadi workers, Mini Anganwadi workers and helpers in the state. Read More details are given below.

राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवा समाप्ती किंवा मृत्युनंतर एकरकमी लाभ देण्याच्या योजनेकरिता १०० कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली.

यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्ती, राजीनामा, सेवेतून काढून टाकणे, किंवा मृत्युनंतर द्यावयाच्या विमा योजनेंतर्गत एकरकमी लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. या निर्णयाचा लाभ हजारो अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना होणार आहे.

अशा एकरकमी लाभाचे प्रस्ताव निकाली काढण्याकरिता भारतीय आयुर्विमा महामंडळास हा हप्ता देण्याकरिता निधी मिळावा असा प्रस्ताव महिला व बालविकास विभागाने सादर केला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत मान्यता दिली.

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे असे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्याची जबाबदारी महिला व बाल विकास विभागाची राहणार आहे.


Anganwadi Sevika Bharti 2022– As per the order of the state government, the process of filling up the vacancies of Anganwadi workers and helpers has been started in Ramtek taluka. Applications for these posts were to be handed over to Gram Sevaks by Monday (21st). However, Gramsevak from Pusada Rehabilitation No. 1 (Tal. Ramtek) has not come to the office for six days. Therefore, this recruitment process is not complete.

राज्य सरकारच्या आदेशान्वये रामटेक तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पदांसाठी करावयाचे अर्ज सोमवार (दि. २१) पर्यंत ग्रामसेवकांकडे सोपवायचे होते. मात्र, पुसदा पुनर्वसन क्रमांक-१ (ता. रामटेक) येथील ग्रामसेवक सहा दिवसांपासून कार्यालयात आले नाही. त्यामुळे अर्ज सोपवायचे कुणाकडे असा प्रश्न इच्छुकांसमोर निर्माण झालेल्याने येथील भरती प्रक्रिया वांध्यात आली. 


अंगणवाडी सेविकाची पगारवाढ होणार…..

Maharashtra Anganwadi Sevika Recruitment 2022

As per the news published in the news paper that the Angawadi Sevika and Asha Sevika will be get Salary increment. As well as Health Insurance and Pension Scheme for Anganwadi Sevika and Ashasevikas will be launches soon. Minister for Women and Child Welfare Yashomati Thakur said that the Mahavikas Aghadi government is working for the empowerment of women and it will be done very soon. 

अंगणवाडी सेविका आणि आशासेविका याची पगारवाढ होणार आहे, तसेच अंगणवाडी सेविका आणि आशासेविका यांच्या साठी विमायोजना आणि पेन्शन योजना याचेही नियोजन करण्यात येत आहे. महिला सबलीकरण यासाठी महाविकास आघाडी सरकार काम करत असल्याचे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले

Anganwadi Sevika Bharti updates


अंगणवाडी सेविका, मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या…

As the latest news regarding the Anganwadi Bharti is that Anganwadi Sevika and Anganwadi Helper needs to be treated as a government employees. According to the latest information about Anganwadi Sevika Recruitment 2022, there is some demand among the candidates – As per their demand, they have demanded recognition of Anganwadi worker and Anganwadi helper as government employees. Read the more details given below:

अंगणवाडी सेविका भरती 2022 बद्दलच्या ताज्या माहितीनुसार, ज्या उमेदवारांना अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदासाठी इच्छुक आहेत त्यांची काही मागणी आहे. त्यांच्या मागणीनुसार त्यांना अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता देण्यात यावी अशी मागणी केली आहे

Anganwadi Sevika Bharti updates

Anganwadi Sevika Bharti 2022- The government has given the green light to fill the vacancies of supervisors in urban projects. Approval will soon be given by the Rural Development Department to fill the posts in rural areas. This will provide better manpower in this department in future. Read More details as given below.

Anganwadi Bharti 2022- Latest Updates- शहरी प्रकल्पातील पर्यवेक्षकाची रिक्त पदे भरण्यास शासनाने हिरवा कंदील दर्शविला आहे. ग्रामीण भागातील पदे भरण्यासाठी ग्रामविकास विभागाकडून लवकरच मान्यता मिळेल. यामुळे आगामी काळात या विभागात चांगले मनुष्यबळ उपलब्ध होतील. 

महिला व बालकल्याण विभागाच्या सचिव श्रीमती कुंदन यांनी कर्मचारी सभेच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, मोबाइल खर्चासाठी चार वर्षांकरिता १० हजार रुपये भत्ता देण्याचा शासनाचा विचार आहे.

सखी पेन्शन योजना राबविण्याचा शासनाचा विचार

परुळेकर म्हणाल्या की, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी सखी पेन्शन योजना राबविण्याचा विचार शासन करत आहे. मानधनात थोडीफार वाढ केली जाईल, व त्यातूनच पेन्शनसाठीचा हप्ता वळता केला जाईल अशी शक्यता आहे. पण हप्ता घेण्यास आमचा विरोध आहे. पेन्शनची पूर्ण जबाबदारी सरकारने घ्यायला हवी. निवृत्तीवेळच्या मानधनाच्या निम्मी रक्कम दरमहा निवृत्तीवेतन म्हणून सरकारने द्यावी अशी मागणी आहे.


Anganwadi Sevika Bharti 2022: The state government has now given permission to fill the vacancies of Anganwadi Sevika and Helper Posts in the state. This has paved the way for filling these vacancies after a gap of about three years.

Anganwadi Sevika Recruitment 2022-राज्यातील अंगणवाडीसेविका आणि मदतनिसांची रिक्त पदे भरण्यास राज्य सरकारने आता परवानगी दिली आहे. यामुळे सुमारे तीन वर्षांच्या खंडानंतर ही रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता पुण्यासह अन्य जिल्ह्यांतील निम्मीच रिक्त पदे भरण्याचा आदेश सरकारने जिल्हा परिषदांना दिला आहे. या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या १८९ रिक्त जागांपैकी केवळ ९५ जागा भरता येणार आहेत.

याशिवाय जिल्ह्यातील मदतनिसांच्या ५० जागा रिक्त असून, त्यापैकी २५ जागा भरण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. सद्यःस्थितीत राज्यात ३ हजार ४३६ पदे रिक्त आहेत. मिनी अंगणवाडीसेविकांची १ हजार ११७ तर मदतनिसांची १ हजार ८३१ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांपैकी नंदूरबार, गडचिरोली, उस्मानाबाद, वाशीम, आणि गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, पालघर व अमरावती या जिल्ह्यांमधील काही तालुक्यांतील सर्व रिक्त पदे भरली जाणार आहेत. या जिल्ह्यांव्यतिरिक्त अन्य सर्व जिल्ह्यांमधील ५० टक्के पदे भरली जाणार आहेत.

पुणे जिल्ह्यात एकूण ४ हजार २४६ अंगणवाड्या आणि ४५२ मिनी अंगणवाड्या आहेत. या दोन्ही अंगणवाड्यांसाठी मिळून अंगणवाडीसेविकांची एकूण ४ हजार ६९८ पदे आहेत. जिल्ह्यातील मदतनिसांची एकूण पदे ही सुमारे चार हजारांच्या आसपास आहेत.


Anganwadi Sevika Bharti 2021: Applications are invited for the vacant honorarium posts in the Anganwadi Center under the Integrated Child Development Services Scheme. The last date for submission of application form is 2nd March 2021. Under the Integrated Child Yojana Project, the posts of Anganwadi Sevaks, Mini Anganwadi Sevaks, which are vacant in various areas of the village, will be filled, said Child Development Project Officer Arun Chavan.

 एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प कार्यालय, देवगड अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील रिक्त असलेल्या मानधनी पदांसाठी दिनांक 2 मार्च 2021 रोजी पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

रिक्त असणारी पदे पुढील प्रमाणे आहेत. ग्रामपंचायत, अंगणवाडी केंद्र व रिक्त पद यांची माहिती अनुक्रमे दिली आहे. लिंगडाळ – लिंगडाळ – अंगणवाडी सेविका, शिरगाव – बैद्धवाडी – अंगणवाडी सेविका, गढिताम्हाणे – गढिताम्हाणे – अंगणवाडी सेविका, रहाटेश्वर – रहाटेश्वर – अंगणवाडी सेविका. गिर्ये – बांदेवाडी – अंगणवाडी सेविका, किंजवडे – ठाकूरवाडी – अंगणवाडी सेविका, फणसे- फणसे – अंगणवाडी सेविका, पडवणे – पडवणे – अंगणवाडी सेविका, मिठबाव – भंडारवाडा – अंगणवाडी सेविका, गिर्ये – जांभुळवाडी – अंगणवाडी सेविका, मुटाट – बौद्धवाडी – मिनी अंगणवाडी सेविका. या प्रमाणे पदे भरण्यात येणार आहेत.

सदर पदांसाठी अर्ज करणाताना अर्जदार हा संबंधित ग्रामपंचायत महसुली गावातील असणे अवश्यक आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कार्यालय, देवगड येथे समक्ष सादर करावेत. अर्जा सोबत लहान कुटुंबाबातचे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे. सदर पदांसाठीची वयोमर्यादा ही 21 ते 30 वर्ष आहे. तसेच शैक्षणिक पात्रता, रहिवासी दाखला, वयाचा दाखला, अनुभव या विषयीची कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत.

 शासकीय संस्थेत राहल असलेली विधवा व अनाथ मुली यांना भरतीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, देवगड यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अरूण चव्हाण बाल विकास प्रकल्प अधिकारी, देवगड यांनी केले आहे.

 सोर्स:सिंधुदुर्ग 24 तास


Anganwadi Sevika bharti: There are 1,328 vacancies for Anganwadisevaka, Helper and Mini Anganwadisevaka in the district. There are 241 vacancies for Anganwadi workers, 964 vacancies for Anganwadi helpers and 23 vacancies for mini Anganwadi workers. The government has given permission to implement the recruitment process. Accordingly, Mrs. Aher also directed the Child Development Project Officer to immediately start the recruitment process for Anganwadisevaka-helper.

अंगणवाडी सेविकांची १,३२८ रिक्त पदे भरणार

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अंगणवाडी बांधकामासाठी दहा कोटी रुपये मंजूर झाले असून, जिल्ह्यात लवकरच नव्याने २२५ अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अश्‍विनी आहेर यांनी ही माहिती दिली.

Anganwadi Sevika Bharti 2021

जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीमध्ये नवीन २२५ अंगणवाड्यांना मंजुरी-Anganwadi Workers Bharti 2021

जिल्ह्यात आदिवासी व बिगरआदिवासी क्षेत्रात पाच हजारांहून अधिक अंगणवाड्या आहेत. मात्र यातील अनेक अंगणवाड्या उघड्यावर किंवा समाजमंदिरात भरतात. अशा अंगणवाड्यांना हक्काची इमारत मिळावी म्हणून जिल्हा नियोजन समितीत अंगणवाडी बांधकामासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

त्यानंतर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीमध्ये जिल्ह्यात २२५ नवीन अंगणवाडी केंद्र इमारत बांधकामांना मंजुरी देण्यात आB2ी. त्यानुसार आदिवासी क्षेत्रामध्ये नवीन १५९, तर बिगरअदिवासी क्षेत्रात ६६ अंगणवाडी केंद्राच्या बांधकामांना मंजुरी देण्यात आली. गणेश अहिरे, कविता धाकराव, रेखा पवार, स%5नीता सानप, कमल आहेर, गितांजली पवार-गोळे, शोभा बरके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे या वेळी उपस्थित होते.

अंगणवाडीत १,३२८ पदे रिक्त (Anganwadi Sevika Recruitment 2021)

जिल्ह्यात अंगणवाडीसेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडीसेविका मिळून एक हजार ३२८ पदे रिक्त आहेत.

 1. अंगणवाडी सेविकांची २४१
 2. अंगणवाडी मदतनीस- ९६४ व
 3. मिनी अंगणवाडी सेविकांची २३ रिक्त पदे आहेत

भरतीप्रक्रिया राबविण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. त्यानुसार अंगणवाडीसेविका- मदतनीस भरतीप्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे आदेशही श्रीमती आहेर यांनी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
36 Comments
 1. Sujata dudhabhate says

  Hi I am Sujata dudhabhate
  My education is diploma completed so l am interested in this job please encourage me ….

 2. Yashoda somnath dhangar says

  Very very good.

 3. priya band says

  Mala anganwadi sevika, paryveshika sathi form bharaycha ahe…. BA complete ahe.. 6 month anganwadi sevika govt cha course complete kela ahe..navi Mumbai madhe ahe ka vacancy…. Plzzz asel tr kalva….

 4. Karishma mane says

  Hii .. mam,sir I am interest my name is karishma mane
  I am 26 old and b.com 1st year complit.
  Mobile no 9689321237

 5. Karishma mane says

  Hii .. mam,sir I am interestmy name is karishma mane
  I am 26 old and b.com 1st year complit.
  Mobile no 9689321237

 6. Aarti pawar says

  Hii, am interstate,
  Age 23 and BA graduate

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!