गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त 

Arogya Vibhag Gondia Bharti 2021

आरोग्य विभागातील पाच संवर्गातील 10 हजार 127 पदांची होणार भरती

Corona infection is increasing the stress on the health department. In such a situation, it has been suggested that the health department should fill all the sanctioned posts. However, many important posts are vacant due to non-availability of qualified candidates even after conducting recruitment process for the posts sanctioned by Gondia District Health Administration. Given by Nitin Kapase .. 6 Physician Doctors have been sanctioned for Gondia District Health Department. The posts of two anesthesiologists and 10 MBBS qualified doctors have been sanctioned.

गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त 

कोरोना संसर्गामुळे आरोग्य विभागावरील ताण वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाला सर्व मंजूर पदे भरण्यात यावीत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, गोंदिया जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून मंजूर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवूनही योग्यतेचे उमेदवार उपलब्ध होत नसल्याने अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी दिली.

गोंदिया जिल्ह्यात संसर्गामुळे आरोग्य विभागावरील ताण वाढत चालला आहे. त्यातच आरोग्य विभागात मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे आरोग्यसेवेवर परिणाम होत आहे. गोंदिया जिल्हा आरोग्य विभागासाठी ६ फिजिशियन डॉक्टरांची मंजुरी आहे. दोन भूलतज्ज्ञ डॉक्टर व १० MBBS अर्हताधारक डॉक्टरांची पदे मंजूर आहेत.

यासाठी दोन वेळा पद भरती प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, फिजिशियन व भूलतज्ज्ञ डॉक्टरच्या पदांसाठी एकही उमेदवार आला नाही, तर एमबीबीएस डॉक्टरच्या १० पदांपैकी २ पदे भरण्यात आली. त्याचप्रमाणे ८० स्टाफ नर्सपैकी ५५ पदे भरण्यात आली, तसेच आणखी १४ पदांवर लवकरच उमेदवार रुजू होणार आहेत. त्याचप्रमाणे लॅब टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन व डाटा एंट्री ऑपरेटरची पदे भरण्यात आली आहेत. आवश्यक ती पदे लवकरच भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!