Art Teacher Bharti- महत्वाचे- हजारो कलाशिक्षकांची पदे रिक्त

Art Teacher Bharti 2022

Art Teacher Bharti 2022: As per the teachers updates in Art Faculty is that 1000 of posts for Art Teachers have not been filled from last 7 years. This Art teachers Posts have been vacant due to retirement in numerous schools in the state. The Maharashtra State Federation of Arts Teachers has demanded the state’s school education minister to fill all these posts as soon as possible. Read the More details which are given below.

महत्वाचे- हजारो कलाशिक्षकांची पदे रिक्त

  1. कलाशिक्षणातून आपल्या विद्यार्थ्यांना आनंददायी नवी दृष्टी देऊन भारतीय सांस्कृतिक वारसा जोपासण्याचे संस्कार करणार्‍या कलाशिक्षकांनाच शालेय स्तरावरून हद्दपार करण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील सर्व शाळांमधील हजारो कलाशिक्षकांची पदे गेल्या 7 वर्षापासून रिक्त आहेत. ही सर्व पदे भरण्यासाठी आता महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाने राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांना साकडे घातले आहे.
  2. शालेय स्तरावर कला विषयास महत्वाचे स्थान मिळावे, प्रत्येक शाळेमध्ये कला विषय अध्यापनाकरिता एका कलाशिक्षकांची नेमणूक व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ गेल्या अनेक वर्षापासून शासन स्तरावर असंख्य निवेदनाव्दारे पाठपुरावा करून संघर्ष करीत आहे.
  3. गेल्या 7 वर्षांपासून राज्यातील असंख्य शाळांमध्ये सेवानिवृत्तीमुळे हजारो कलाशिक्षकांची पदे रिक्त असतांनाही कलाशिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत शासनाची उदासीन भूमिका दिसून येत असल्याने महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाने नुकतीच राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, शालेय शिक्षण सचिव यांची मुंबई येथे भेट घेतली.
  4. तसेच शिक्षक पदवीधर आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वात महासंघाचे राज्य अध्यक्ष विनोद इंगोले, राज्य सरचिटणीस प्रल्हाद साळुंके, राज्य कोषाध्यक्ष राजेश निंबेकर, नाशिक विभाग अध्यक्ष प्रभाकर शेलार, मुंबई विभागीय अध्यक्ष मोहन माने, महिला प्रदेश आघाडी प्रमुख निता राऊत, नाशिक विभागीय संपर्क प्रमुख सचिन पगार, चंद्रशेखर सावंत आदी पदाधिकार्‍यांनी मंत्री महोदयांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भेट घेऊन राज्यातील शाळांमधील रिक्त असलेल्या कलाशिक्षकांची पद भरती तातडीने करण्याबाबत आग्रह धरला. तसेच संच मान्यतेमध्ये कलाशिक्षकांची पदे पूर्वी प्रमाणेच स्वतंत्र दिसावीत, ही मुख्य मागणी देखील महासंघाने लावून धरली. या प्रसंगी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत संघटनेच्या पदाधिकार्‍याची बैठक आयोजित करण्यात येऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट आश्वासन दिले. तर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शालेय शिक्षण सचिव यांना बैठक आयोजित करण्याचे पत्राव्दारे तातडीने निर्देश दिले आहेत.

Shikshak Bharti- या जिल्ह्यात शिक्षकांच्या ७०० जागा रिक्त

Shikshak Bharti बच्चू कडू – शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

1 Comment
  1. Rajeev Gandhi says

    कृपया मंत्री महोदयांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व राज्यातील सर्व बेरोजगार कला शिक्षकांना लवकरात लवकर न्याय द्यावा ही विनंती…😢

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!