Aurangabad Arogya Vibhag -आरोग्य विभागात ३२९ पदांची होणार भरती

Aurangabad Arogya Vibhag Bharti 2021

Aurangabad Arogya Vibhag- The process for filling 329 posts in Aurangabad district will be implemented soon. Only applications submitted in mega recruitment will be considered for this recruitment. A total of 329 posts of 189 health workers, 130 health workers, 8 drug manufacturers, 2 laboratory technicians will be filled in the health department of the district. This recruitment process will be implemented as per the instructions in the ordinance dated 14 June 2021 issued by the government. The process is expected to be completed by the end of July.

राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद भरती

Arogya Vibhag Bharti- जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार

शासनाने मेगा भरती-२०१९ च्या जाहिरातीतील आरोग्य विभागाशी Health Department संबंधित पाच संवर्गातील पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील Aurangabad ३२९ पदे भरण्यासाठी लवकरच प्रक्रिया राबविली जाणार आहे. २०१९ ला शासनाच्या वतीने आरोग्य विभागातील विविध पदांची जाहिरात काढण्यात आली होती. मात्र, विधानसभा निवडणूक, कोरोना महामारी आदींमुळे गेल्या दोन वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडली. गेल्या वर्षभरात कोरोनाची दोनदा लाट येऊन गेली. या लाटेत आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता दिसून आल्याने, शासनाने आरोग्य विभागातील रिक्तपदे भरण्यास मान्यता दिली आहे. आरोग्य विभागातील आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेविका आदी पाच संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. दरम्यान, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या Recruitment In Aurangabad Zilla Parishad स्थायी समितीच्या सभेत या भरतीसंदर्भातील माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

जिल्ह्यातील आरोग्य विभागातील १८९ आरोग्य सेविका, १३० आरोग्य सेवक, ८ औषध निर्माता, २ प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशी एकूण ३२९ पदे भरण्यात येतील

एसईबीसी उमेदवारांना खुला

सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी आरक्षण रद्द ठरविल्याने एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना खुल्या किंवा ईडब्ल्यूएस प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेता येईल. त्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी १ ते २१ जुलै २०२१ पर्यंत डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.महाआरडीडीझेडपी.इन या संकेतस्थळावर लॉगिन करून विकल्प द्यायचा आहे. एकदा दिलेल्या विकल्पात बदल करता येणार नाही. तसेच ईडब्ल्यूएसचा विकल्प देणाऱ्यांना परीक्षेपूर्वी सक्षम अधिकाऱ्याचे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र जिल्हा निवड समितीकडे सादर करणे बंधनकारक केलेले आहे.

मार्च- २०१९ मध्ये काढलेल्या मेगा भरतीत अर्ज केलेले अर्जच या भरतीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. जिल्ह्यातील आरोग्य विभागातील १८९ आरोग्य सेविका, १३० आरोग्य सेवक, ८ औषध निर्माता, २ प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशी एकूण ३२९ पदे भरण्यात येतील. शासनाने काढलेल्या १४ जून २०२१ च्या अध्यादेशातील निर्देशानुसार ही भरती प्रक्रिया राबविली जाईल. जुलै अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.


Aurangabad Arogya Vibhag Bharti 2021

As per the latest news, Out of 683 posts of District Surgeons in the state, 296 posts are vacant and out of a total of 10,323 posts in GRD category, 3,767 posts are vacant, the Aurangabad bench of the Bombay High Court said on Friday.

Arogya Vibhag Bharti – SEBC ची पदे खुल्या किंवा EWS प्रवर्गातून भरणार 

राज्यात जिल्हा शल्यचिकित्सक संवर्गातील २९६ पदे रिक्त

औरंगाबाद : राज्यात जिल्हा शल्यचिकित्सक संवर्गातील ६८३ पदांपैकी २९६ पदे रिक्त असून जीआरडी संवर्गातील एकूण १० हजार ३२३ पदांपैकी ३ हजार ७६७ पदे रिक्त असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शुक्रवारी सादर करण्यात आली. करोनासारख्या महामारीच्या गंभीर काळातही आरोग्य विभागातील पदे रिक्त कशी आणि पदे भरण्यासाठी विलंब का होत आहे, असा प्रश्न उपस्थित करत खंडपीठाने पदस्थापनेचा कालबद्ध कार्यक्रम सुधारित प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे आदेश दिले.

सुनावणीवेळी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर राज्या शासनाच्या वतीने आरोग्यसेवा संचालक डॉ. साधना तायडे यांनी अतिरिक्त शपथपत्र दाखल केले. तर राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी राज्य शासनाची बाजू मांडली.

 जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील २८७ पदापैकी २०५ पदे, विकारतज्ज्ञ संवर्गातील५६५ पदापैकी ४०० पदे, जीआरडी संवर्गातील१०,३२३ पदापैकी ३ हजार ७६७ पदे रिक्त आहेत. तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्व रिक्त पदे भरण्यासाठी कोणत्याही प्रकारे विलंब न करता त्वरित भरती प्रक्रिया राबवावी असा युक्तिवाद केला.


Aurangabad Arogya Vibhag – Fill Vacancies in the Valley Immediately

आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती होणार

Aurangabad Ghati Specialist Hospital, Cancer Hospital needs the Medical staff. Deputy Chief Minister Ajit Pawar has instructed the State Directorate of Medical Education to immediately fill up the vacancies of Class-3 and Class-4 cadres in the Ghati (Valley), Aurangabad. All important details are given below. Candidates read the below given information carefully and keep visit us.

घाटी रूग्णालयांमधील वर्ग-३ व वर्ग-४ ची पदे त्वरित भरण्याचे निर्देश

औरंगाबाद : घाटी, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि शासकीय कर्करोग रूग्णालयातील वर्ग-३ आणि वर्ग-४ संवर्गाची रिक्त पदे त्वरित भरण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला दिले असल्याची माहिती आ. सतीश चव्हाण यांनी दिली.

 घाटी, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, कर्करोग रूग्णालयातील मंजूर पदे भरावीत, अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत मंगळवारी यासंदर्भात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोविडची परिस्थिती लक्षात घेऊन सदरील रूग्णालयांमधील वर्ग-३ व वर्ग-४ ची पदे त्वरित भरण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला दिले. तर वर्ग-१ ची पदे ‘एमपीएससी’मार्फत भरली जात असल्याने ही पदेही त्वरित भरण्याच्या सूचना एमपीएससीला दिल्या जातील, सदरील रूग्णालयांसाठी जे मंजूर बजेट आहे, ते तत्काळ वितरित करण्याच्या सूचना देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीस पालकमंत्री सुभाष देसाई, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख तसेच वित्त व वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते..
3 Comments
  1. Poonam Anant Rode says

    Lab technician

  2. Poonam Anant Rode says

    I will do it .

  3. Harshada Alhat says

    वर्ग 3 व 4 वर्ग पदासाठी requirnment

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!