जिल्ह्यात सरकारी दवाखान्यात २०४८ पदे रिक्त – ५० टक्के पदे तीन महिन्यात भरणार 

Aurangabad District Hospital Bharti 2021

Mumbai High Court has ordered to start the process of filling up 50 per cent of the vacancies in government hospitals in the district in one week and complete it in six to eight weeks. Out of 2048 vacancies in the district, 50 per cent posts will be filled in three months.

जिल्ह्यात सरकारी दवाखान्यात २०४८ पदे रिक्त – ५० टक्के पदे तीन महिन्यात भरणार

 औरंगाबाद: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यांमधील रिक्त असलेल्या पदांच्या ५० टक्के पदे भरण्याची प्रक्रिया एका आठवड्यात सुरू करून ६ ते ८ आठवड्यांत पूर्ण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या  न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. एस. डी. कुलकर्णी यांनी शुक्रवारी (दि. ७) राज्य शासनाला दिले. याचिकेवर पुढील सुनावणी १४ जून रोजी होणार आहे .

जिल्ह्यात रिक्त असलेल्या २०४८ पैकी ५० टक्के पदे तीन महिन्यात भरण्यात येतील, असे शासनातर्फे निवेदन करण्यात आले. यावर खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

 सरकारी दवाखान्यात २०४८ पदे रिक्त खा. जलील यांनी याचिकेत उल्लेख केल्यानुसार घाटीत ८६८, घाटी दवाखान्याच्या सुपर स्पेशालिटी वॉर्डात २१९, महापालिकेच्या दवाखान्यात ८३, जिल्हा परिषदेच्या दवाखान्यात ३३०, शासकीय कर्करोग रुग्णालयात १२२, शासकीय कर्क रुग्णालयाच्या एक्स्टेंशन बिल्डिंगमध्ये ३६४, चिकलठाणा येथील सिविल हॉस्पिटलमध्ये ६० पदे, अशी सरकारी दवाखान्यांत एकूण २०४८ पदे रिक्त आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!