Bank Jobs 2022-सरकारी बँकांमध्ये तब्बल ४० हजारांहून अधिक पदे रिक्त

Upcoming Bank Exam 2022

Bank Jobs 2022-Millions of young people across the country are looking for bank jobs. On the other hand, there are more than 40,000 vacancies in 12 government banks across the country. These nationalized banks include thousands of positions of bank officers, clerks and co-workers.

सरकारी बँकांमध्ये तब्बल ४० हजारांहून अधिक पदे रिक्त

Public Sector Bank Jobs 2022: देशातील लाखो युवक बँकेची नोकरी शोधत असतात. दुसरीकडे देशातल्या १२ सरकारी बँकांमध्ये तब्बल ४० हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये बँक अधिकारी, लिपीक आणि सह कर्मचाऱ्यांच्या  हजारो पदांचा समावेश आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीच ही माहिती लोकसभेत लेखी उत्तरांद्वारे दिली आहे. सरकारी बँकांमधील पदभरतीबाबत काय म्हणाल्या अर्थमंत्री… जाणून घ्या…

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1226 पदांची ऑनलाईन भरती सुरु

अधिकृत आकडेवारीनुसार, भारतातील सर्व सरकारी बँकांमध्ये एकूण ८,०५,९८६ पदे मंजूर आहेत. अर्थमंत्री सीतारामन यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की यापैकी सुमारे ९५ टक्के भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. १ डिसेंबर २०२१ रोजी प्राप्त आकडेवारीनुसार, ४१,१७७ पदे अद्यापही रिक्त आहेत. यापैकी सर्वाधिक रिक्त पदे ही स्टेट बँक ऑफ इंडिया  मध्ये आहेत.

कोणत्या प्रकारची किती पदे रिक्त?

  • बँक अधिकारी (Bank Officer Vacancy) – १७,३८०
  • बँक क्लर्क (Bank Clerk Vacancy) – १३,३४०
  • सब स्टाफ – १०,४५७

कोणत्या बँकेत किती पदे?

  • एसबीआई (SBI) मध्ये तूर्त ८,५४४ पदे रिक्त आहेत.
  • एसबीआयमध्ये एकूण रिक्त पदांपैकी ३,४२३ पदे अधिकारी पदाची आणि ५,१२१ पदे लिपीक स्तरावरची आहेत.
  • पंजाब नॅशनल बँक म्हणजेच पीएनबीत (PNB) ६,७४३ पदे भरायची आहेत.
  • तिसऱ्या स्थानी आहेत सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India). या बँकेत ६,२९५ पदे रिक्त आहेत.
  • इंडियन ओवरसीज बँक (Indian Overseas Bank) चौथ्या स्थानी असून या बँकेत ५,११२ पदे रिक्त आहेत.
  • बँक ऑफ इंडियात (BOI)रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या ४,८४८ आहे.

या १२ बँकांमध्ये आहेत रिक्त पदे

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!