Teacher Recruitment 2022-या राज्यात ६३५ शिक्षकांच्या जागा रिक्त

Belgaum Teacher Recruitment 2022

There are many vacancies for teachers in 13 districts of North Karnataka.There is an urgent need to fill the permanent vacancies of teachers and professors in government secondary schools and colleges. There are 221 vacancies in 130 secondary schools in Sandhya Belgaum educational district and 414 vacancies in Chikkodi educational district.

Belgaum Shikshak Bharti 2022- उत्तर कर्नाटकातील १३ जिल्हांमध्ये सरकारी माध्यमिक शाळा आणि पदवी पूर्व महाविद्यालये अवलंबून आहेत. त्यामुळे सरकारी माध्यमिक शाळा आणि महाविदयालय मध्ये तातडीने शिक्षक व प्राध्यापकांच्या कायमस्वरूपी जागा भरण्याची मागणी होत आहे.  संध्या बेळगाव शैक्षणिक जिल्यातील १३० माध्यमिक शाळांमध्ये २२१ तर चिक्कोडी शैक्षणिक जिल्हयामध्ये ४१४ जागा रिक्त आहेत.

 


Teacher Recruitment 2022-The education department has given permission to re-recruit 177 guest teachers in the Belgaum district there are large vacancies for teachers in Ramdurg, Saudatti, and Khanapur talukas of the Belgaum educational district. The education department had again sought permission from the government to recruit 4,000 guest teachers in the state after it was found that there were vacancies in many schools even after the appointment of teachers.

Shikshak Bharti 2022– बेळगाव जिल्हामध्ये अतिथी शिक्षकांच्या  पुन्हा १७७ जागा भरती  करण्यास शिक्षण खात्याने परवानगी  दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार असून १७७ अतिथी शिक्षकांची विविध तालुक्यातील शाळांमध्ये भरती केली जाणार आहे.

  • कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर शिक्षण खात्याने १ ते १० वीच्या शाळा पूर्व पदावर आल्यानंतर अतिथी शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पहिल्या टप्पात बेळगाव शैक्षणिक जिल्हात ८०० अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती.
  • मात्र राज्यात अतिथी शिक्षकांची नेमणूक केल्यानंतरही अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे दिसून आल्यानंतर शिक्षण खात्याने पुन्हा राज्यात ४००० अतिथी शिक्षकांची भरती करण्याची परवानगी सरकारकडे मागितली होती. त्याला प्रतिसाद देत ४००० जागा भरती करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये अतिथी शिक्षकांच्या जागा भरती होणार आहेत.
  • बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील रामदुर्ग, सौदत्ती व खानापूर तालुक्यात शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी राबविण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेवेळी या तिन्ही तालुक्यातील शिक्षकांना बदली प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले होते. त्यामुळे येथील शिक्षकांमधून तीव्र नाराजी व्यक्त झाली होती.
  • तसेच बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात पुन्हा १७७ अतिथी शिक्षकांची नेमनुक करताना खानापूर, सौदत्ती व रामदुर्ग तालुक्यातील शाळांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. बदली प्रकियेनंतर अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त झाल्या आहेत.
  • त्या जागांवर ही अतिथी शिक्षकांची भरती करणे आवश्यक आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हात शिक्षकांच्या 3500 हुन अधिक जागा रिक्त आहेत. त्या जागांवरही कायमस्वरूपी शिक्षण भरती करणे आवश्यक आहे. असे मत व्यक्त होत आहे.
  • दरवर्षी अतिथी शिक्षकांची भरती करण्यात येते. मात्र अतिथी शिक्षकांना वेळेत पगार दिला जात नाही. या वेळीही दोन महिने झाले तरी अद्याप अतिथी शिक्षकांना वेतन मिळालेले नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!