Teacher Recruitment 2023-बेळगावात लवकरच 2500 शिक्षक पदांची भरती; अधिसूचना फेब्रुवारीमध्ये

Belgaum Teacher Bharti 2023

Belgaum Shikshak Bharti 2023- As per the lastest news It has been decided to fill up 2500 secondary teacher posts in Belgaum soon. The notification regarding this recruitment will be issued in February. Read More details about Belgaum Teachers Recruitment 2023 are given below.

 राज्यात रिक्त असणार्‍या 2500 माध्यमिक शिक्षकांच्या जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेब्रुवारीमध्ये याबाबत अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी दिली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, नव्या कायद्यानुसार अनुसूचित जाती आणि जमातीसाठी लागू केलेल्या आरक्षणाच्या आधारे शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. यामध्ये क्रीडा शिक्षकांचाही समावेश असणार आहे

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

कर्नाटकात अजून नवे शिक्षण धोरण (एनईपी) जारी झालेले नाही. राज्यातील 300 ते 400 निवडक शाळांमध्ये 26 जानेवारीपासून नवे शिक्षण धोरण जारी केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. नवे शिक्षण धोरण पूर्णपणे अभ्यासक्रमावर आधारित नाही. याचा बहुतेक भाग कार्यानुभवावर आधारित आहे. त्यानुसार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे मंत्री नागेश यांनी सांगितले.

15 हजार शिक्षकांच्या नेमणूक प्रक्रियेचा विषय उच्च न्यायालयात आहे. न्ययालयाच्या आदेशानुसार नेमणुका करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे. याबाबत 18 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीवेळी न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील प्रक्रिया हाती घेतली जाईल, असे नागेश यांनी सांगितले.


Belgaum Teacher Recruitment 2022: Latest updates regarding Belgaum Teacher Bharti 2022 is that 8 thousand 128 teacher posts have been sanctioned for Belgaum Educational District. 8,128 teacher posts will be filled soon in Belgaum district. Read More details regarding Belgaum Teacher Bharti 2022 updates here. visit our website www.govnokri.in regularly.

राज्यात मोठ्या प्रमाणात प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. मात्र, सरकारने केवळ 15 हजार शिक्षक भरतीचा निर्णय यापूर्वी घेतला होता. आता राज्यात 1 लाख 88 हजार 532 शिक्षकांची भरती केली जाणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासाठी 8 हजार 128 शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. खानापूर तालुक्यात1,444 शिक्षकांची भरती केली जाणार आहे. शिक्षक भरतीचा आदेश 29 जुलै रोजी आला आहे.

बेळगाव  जिल्ह्यात 8,128 शिक्षकांची पदे भरणार

1967 च्या नियमानुसार विषय शिक्षक भरतीला 2001 पासून प्राधान्य देण्यात आले आहे. सामान्य विज्ञान, इंग्रजी आणि हिंदी या विषयांसाठी चार वर्ग तयार करण्यात आले होते. यामध्ये प्राथमिक शाळा सहाय्यक शिक्षक/शिक्षकांमध्ये बदल करण्यात आला होता. 1967 चे नियम आणि 2001 च्या सुधारित नियमांमध्ये भरतीची पात्रता आणि कार्यपद्धती नमूद केली आहे. वित्त विभागाने प्राथमिक शाळा मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या मंजूर पदांचे मनुष्यबळ शिक्षण हक्क (आरटीआय) कायद्याच्या निकषांनुसार निश्चित केले आहे. सध्या मंजूर पदांची संख्या 2011 मध्ये मंजूर केलेल्या पदांपेक्षा भिन्न आहेे.

दि. 7 सप्टेंबर 2020 च्या आदेशनानुसार इयत्ता पहिली ते आठवीसाठी लागू असलेल्या विज्ञान-गणित विषयाला एकच शिक्षक होता. आता विषय शिक्षक भरतीला प्राधान्य दिल्याने विज्ञान, गणित, इंग्रजी विषय शिक्षकांना उच्च प्राथमिक शाळेत प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी सीईटी, टीईटी पास होणे गरजेचे आहे.

 राज्यातील भरतीची आकडेवारी 
मुख्याध्यापक : ……3,396
सह मुख्याध्यापक : …..13,096
प्राथमिक शिक्षक : ….1,12,467
(पहिली ते पाचवी)
उच्च प्राथमिक शिक्षक : .. 51,781
(सहावी ते आठवी)
विषय शिक्षक : ………….6,772
संगीत शिक्षक :…………… 259
चित्रकला शिक्षक :…………222
अंगणवाडी :………………539
एकूण : ………….1,88,532

 बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात होणारी शिक्षक भरती 

तालुका साहाय्यक मुख्याध्यापक प्रा. विज्ञान पदवीधर क्रीडा विशेष अंगणवाडी एकूण
शिक्षक शिक्षक शिक्षक शिक्षक शिक्षक शिक्षक
बेळगाव शहर 15 48 471 224 23 3 4 788
बेळगाव ग्रामीण 50 121 1,021 474 57 2 7 1,732
खानापूर 14 99 956 349 21 1 4 1,444
बैलहोंगल 32 61 588 250 34 1 4 470
कित्तूर 18 33 294 131 23 0 0 503
रामदुर्ग 40 57 697 309 51 3 5 1,162
सौंदत्ती 61 62 949 379 71 2 5 1,529
एकूण 230 481 4,976 2,116 280 12 29 8,128

 बेळगाव जिल्ह्यातील भरतीची आकडेवारी
मुख्याध्यापक :……………481
सह मुख्याध्यापक :………..230
प्राथमिक विज्ञान शिक्षक :. 4,976
पदवीधर प्राथमिक शिक्षक :.2,116
क्रीडा शिक्षक :……………..280
विशेष शिक्षक :………………12
अंगणवाडी :…………………23
एकूण :………………..8,128

 जिल्ह्यात रिक्त जागांप्रमाणे शिक्षक भरती करण्यात येणार आहे. बेळगाव ग्रामीण व सौंदत्ती तालुक्यात शिक्षकांची पदे रिक्त आहेत. डी. एड्. व बी. एड्.धारकांना शिक्षक होण्याची संधी प्राप्त झाली आहे. यामुळे सरकारी शाळांचा प्राथमिक शिक्षणाचा दर्जा वाढणार आहे.<br>
बसवराज नलतवाड, जिल्हा शिक्षणाधिकारी


Belgaum Teacher Recruitment 2022: The education department has decided to fill 15,000 posts of graduate teachers in the state for sixth to eighth standard. The CET was held in May. The Department of Education is preparing to complete the recruitment process for graduate teachers by December. Therefore, the result of the CET taken for teacher recruitment is likely to be announced soon. After the results are announced, the counseling process will be implemented to fill all the 15,000 vacancies by December 2022.

शिक्षकांची भरती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत

 • पदवीधर शिक्षकांची भरती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची तयारी शिक्षण खात्याने सुरू केली आहे. त्यामुळे, शिक्षक भरतीसाठी घेतलेल्या सीईटीचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
 • शिक्षण खात्याने सहावी ते आठवीसाठी राज्यात पदवीधर शिक्षकांच्या १५ हजार जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मे महिन्यात सीईटी घेण्यात आली होती.
 • राज्यातील हजारो उमेदवारांनी सीईटी दिली होती. या परीक्षार्थींचे लक्ष सध्या निकालाकडे लागले आहे. निकाल लवकर जाहीर व्हावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर डिसेंबर २०२२ पर्यंत सर्व १५ हजार जागा भरण्यासाठी काउन्सेलिंग प्रक्रिया राबविली जाणार आहे.
 • यापैकी पाच हजार जागा कल्याण कर्नाटकातील विविध जिल्ह्यांमध्ये भरल्या जाणार आहेत. उर्वरित दहा हजार जागा राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये भरल्या जातील. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या ८७ जागांचा समावेश आहे.
 • राज्यात शिक्षकांच्या जागा मोठ्या संख्येने रिक्त असल्या तरी फक्त १५ हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे, अजूनही अनेक शाळांना अतिथी शिक्षकांवर अवलंबून राहावे लागत आहे.

Shikshak Bharti- या जिल्ह्यात शिक्षकांच्या ७०० जागा रिक्त

Shikshak Bharti बच्चू कडू – शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!


Belgaum Teacher Recruitment 2022- There are more than 3000 vacancies in Belgaum and Chikodi educational districts. Many Marathi schools in Belgaum and Khanapur talukas are short of teachers. Therefore, schools have to be run on guest teachers. As teachers will be recruited by the state government, priority should be given to schools in Belgaum and Khanapur talukas. A. This was done through a statement to the education authorities on Monday on behalf of the youth committee. Read More details as given below.

Shikshak Bharti- शिक्षक भरतीसाठी या महिन्यात सीईटी;

 बेळगाव व खानापूर तालुक्मयांमधील बऱयाच मराठी शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे अतिथी शिक्षकांवर शाळा चालवाव्या लागत आहेत. राज्य सरकारकडून शिक्षक भरती केली जाणार असल्याने यामध्ये बेळगाव व खानापूर तालुक्मयातील शाळांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी खानापूर तालुका म. ए. युवा समितीच्यावतीने सोमवारी शिक्षणाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

 बेळगाव व चिकोडी या दोन शैक्षणिक जिल्हय़ांमध्ये जागा भरून घेतल्या जाणार आहेत. खानापूर तालुक्मयात अनेक दुर्गम भाग असून अनेक शाळांना शिक्षक नाहीत. विशेषतः मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये अनेक जागा रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या अनेक शाळा अतिथी शिक्षकांवर अवलंबून आहेत. या शाळांना कायमस्वरुपी शिक्षक मिळाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळले जाणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीमध्ये मराठी माध्यमाला प्राधान्य देत सर्व जागा भरून घ्याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

 बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ात 3 हजारहून अधिक जागा रिक्त आहेत. या जागा भरून घेताना मराठीला प्राधान्य न दिल्यास म. ए. युवा समितीच्या नेतृत्वाखाली शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांना निवेदन सादर केले. मराठी माध्यमातील रिक्त जागा भरण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन शिक्षणाधिकाऱयांनी दिले.

 यावेळी म. ए. युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, आंबेवाडी ग्रा. पं. अध्यक्ष चेतन पाटील, नारायण सरदेसाई, राजू पाटील, बळीराम पाटील, विनायक सावंत, गोपाळ देसाई, सुरेश देसाई, राजाराम देसाई, महेश धामणेकर, कांतेश चलवेटकर यासह इतर उपस्थित होते.


There are many vacancies for teachers in 13 districts of North Karnataka.There is an urgent need to fill the permanent vacancies of teachers and professors in government secondary schools and colleges. There are 221 vacancies in 130 secondary schools in Sandhya Belgaum educational district and 414 vacancies in Chikkodi educational district.

Belgaum Shikshak Bharti 2022- उत्तर कर्नाटकातील १३ जिल्हांमध्ये सरकारी माध्यमिक शाळा आणि पदवी पूर्व महाविद्यालये अवलंबून आहेत. त्यामुळे सरकारी माध्यमिक शाळा आणि महाविदयालय मध्ये तातडीने शिक्षक व प्राध्यापकांच्या कायमस्वरूपी जागा भरण्याची मागणी होत आहे.  संध्या बेळगाव शैक्षणिक जिल्यातील १३० माध्यमिक शाळांमध्ये २२१ तर चिक्कोडी शैक्षणिक जिल्हयामध्ये ४१४ जागा रिक्त आहेत.


Teacher Recruitment 2022-The education department has given permission to re-recruit 177 guest teachers in the Belgaum district there are large vacancies for teachers in Ramdurg, Saudatti, and Khanapur talukas of the Belgaum educational district. The education department had again sought permission from the government to recruit 4,000 guest teachers in the state after it was found that there were vacancies in many schools even after the appointment of teachers.

Shikshak Bharti 2022– बेळगाव जिल्हामध्ये अतिथी शिक्षकांच्या  पुन्हा १७७ जागा भरती  करण्यास शिक्षण खात्याने परवानगी  दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार असून १७७ अतिथी शिक्षकांची विविध तालुक्यातील शाळांमध्ये भरती केली जाणार आहे.

 • कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर शिक्षण खात्याने १ ते १० वीच्या शाळा पूर्व पदावर आल्यानंतर अतिथी शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पहिल्या टप्पात बेळगाव शैक्षणिक जिल्हात ८०० अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती.
 • मात्र राज्यात अतिथी शिक्षकांची नेमणूक केल्यानंतरही अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे दिसून आल्यानंतर शिक्षण खात्याने पुन्हा राज्यात ४००० अतिथी शिक्षकांची भरती करण्याची परवानगी सरकारकडे मागितली होती. त्याला प्रतिसाद देत ४००० जागा भरती करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये अतिथी शिक्षकांच्या जागा भरती होणार आहेत.
 • बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील रामदुर्ग, सौदत्ती व खानापूर तालुक्यात शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी राबविण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेवेळी या तिन्ही तालुक्यातील शिक्षकांना बदली प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले होते. त्यामुळे येथील शिक्षकांमधून तीव्र नाराजी व्यक्त झाली होती.
 • तसेच बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात पुन्हा १७७ अतिथी शिक्षकांची नेमनुक करताना खानापूर, सौदत्ती व रामदुर्ग तालुक्यातील शाळांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. बदली प्रकियेनंतर अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त झाल्या आहेत.
 • त्या जागांवर ही अतिथी शिक्षकांची भरती करणे आवश्यक आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हात शिक्षकांच्या 3500 हुन अधिक जागा रिक्त आहेत. त्या जागांवरही कायमस्वरूपी शिक्षण भरती करणे आवश्यक आहे. असे मत व्यक्त होत आहे.
 • दरवर्षी अतिथी शिक्षकांची भरती करण्यात येते. मात्र अतिथी शिक्षकांना वेळेत पगार दिला जात नाही. या वेळीही दोन महिने झाले तरी अद्याप अतिथी शिक्षकांना वेतन मिळालेले नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!