Bhumi Abhilekh- भूमी अभिलेख विभागाची भरती परीक्षा मे अखेर

Maha Bhumi Abhilekh Vibhag Bharti Exam Update

Maha Bhumi Abhilekh Vibhag Exam : Important updates for Bhumi Abhilekh Exam as per the latest news, The Land Records Department Recruitment Examination will be held at the end of May. The Land Records Department Recruitment Examination will be conducted through Tata Consultancy Services (TCS). The Maharashtra Land Records Department will conduct online examinations for more than one thousand vacancies in Amravati, Nagpur, Nashik, Pune, Mumbai and Aurangabad divisions. Read More details as given below

भूमी अभिलेख विभागाची विविध कारणांनी रखडलेली भरती परीक्षा मे अखेरीस घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही परीक्षा घेण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) संस्थेची निवड करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत टीसीएसचे अधिकारी आणि भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी यांच्यात बैठक होऊन, मागील चार महिन्यांपासून रखडलेली परीक्षा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाकडून अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई आणि औरंगाबाद या विभागांकरिता तब्बल एक हजारांहून अधिक रिक्त पदांसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. पदभरतीसाठी पुणे विभागात १६३, कोकण प्रदेश-मुंबई २४४, नाशिक १०२, औरंगाबाद २०७, अमरावती १०८ आणि नागपूर विभागात १८९ जागा आहेत. १०२० पदांसाठी तब्बल ७६ हजार अर्ज आले होते. त्यापैकी ४६ हजार ८०० अर्ज वैध ठरले आहेत.

जानेवारी महिन्यात होणाऱ्या या परीक्षेसाठी जीए सॉफ्टवेअर कंपनीला नियुक्त करण्यात आले होते. मात्र, म्हाडाच्या ऑनलाइन परीक्षेत अनियमितता झाल्याचे समोर आल्यानंतर या कंपनीच्या माध्यमातून भूमी अभिलेखची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलीस कारवाई, भरतीसाठी प्राप्त अर्जांमधील चुकांची दुरूस्ती अशा कारणांमुळे परीक्षेला विलंब झाला आहे. परीक्षा घेणारी कंपनी बदलली असली, तरी विद्यार्थ्यांकडून आता कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. टीसीएस कंपनीला त्यांच्या कामाचा पैसे राज्य शासनाकडून अदा केले जातील, असे भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते यांनी स्पष्ट केले आहे.

जमाबंदी आयुक्तांची टीम प्रश्नपत्रिका तयार करणार

विविध शासकीय विभागांच्या भरती प्रक्रियेत प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाच्या परीक्षेसाठी जमाबंदी आयुक्त के. सुधांशू यांच्या टीमकडून प्रश्नपत्रिका तयार केली जाणार आहे. ही प्रश्नपत्रिका उमेदवारांना ऑनलाइन लॉगइन केल्यानंतर थेट संगणकावरच दिसणार आहे. टीसीएसच्या कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्याला ही प्रश्नपत्रिका दिसणार नाही, असेही रायते यांनी स्पष्ट केले.


Maha Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022


Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022- As per the news various posts are vacant in the Land Records Office. Kej Constituency MLA demands immediate filling of vacancies in Land Records Office. Namita Mundada has made a statement to Revenue Minister Balasaheb Thorat. More details regarding Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 are given below.

भूमिअभिलेख कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांची विविध पदे रिक्त 

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील भूमिअभिलेख कार्यालयातील रिक्त पदांअभावी या कार्यालयातील होणारी कामे खोळंबल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. वारंवार आपल्या कामासाठी कार्यालयात खेटे घालण्याची पाळी नागरिकांवर आली आहे. ही बाब लक्षात घेऊन भूमिअभिलेख कार्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरावीत अशी मागणी केज मतदार संघाच्या आ. नमिता मुंदडा यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Bhumi Abhilekh Bharti 2022

,बीड तालुक्यात उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे आहेत. सदर कार्यालय शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे कार्यालय आहे असे सांगून आ. मुंदडा म्हणाल्या की, केवळ कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोजणीची कामे रखडली आहेत.  

Maha Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022: As per the latest news, The department has decided to start the process of scrutinizing the applications for the selection of eligible and eligible candidates from the applications received through online application acceptance. Detailed instructions will be posted on the department’s website https://mahabhumi.gov.in. Read More details as given below.

Scrutiny Forms are being filled by the candidates who have submitted their applications for the post of Land Records Department during the said period due to various errors found in the applications received through online application acceptance. The period for filing scrutiny application will be from 10:00 AM on 28/02/2022 to 23:59 PM on 09/03/2022.

भूमि अभिलेख विभाग सरळसेवा भरती -छाननी अर्ज प्रक्रिया सुरु

भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भुकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता दिनांक 09/12/2021 रोजी जाहीरात प्रसिद्ध करुन दिनांक 09/12/2021 ते दिनांक 31/12/2021 अखेर ऑनलाईन अर्ज मागविणेत आले होते. सदर भरतीप्रक्रिया ज्या कंपनी मार्फत राबविण्यात येणार होती त्या कंपनीद्वारे शासनाच्या इतर विभागात आयोजित केलेल्या विविध परिक्षांमध्ये झालेले गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे या विभागाकडून केवळ उमेदवारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज स्विकृतीची प्रक्रिया सदर कंपनीद्वारे राबविण्यात आली. परंतु ऑनलाईन अर्ज स्विकृतीद्वारे प्राप्त अर्जांमध्ये अनेक त्रुटी आढळल्याने ज्या उमेदवारांनी उक्त कालावधीत भूमि अभिलेख विभागाचे पदभरतीकामी अर्ज सादर केले आहे, अशा उमेदवारांकडून छाननी अर्ज (Scrutiny Form) भरुन घेण्यात येत आहेत. छाननी अर्ज भरण्याचा कालावधी दिनांक 28/02/2022 सकाळी 10:00 वाजलेपासून दिनांक 09/03/2022 रोजी 23:59 वाजेपर्यंत असेल.

तरी, यापुर्वी उपरोक्त परिक्षेकरीता शुल्कासह अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांनी खालील सुचनांनुसार छाननी अर्ज भरावा. जे उमेदवार वर नमुद कालावधीमध्ये छाननी अर्ज भरणार नाहीत त्यांचा अर्ज रद्द समजणेत येईल.

छाननी अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विहीत अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने  अर्ज करण्याची सुविधा विभागाच्या  https://landrecordsrecruitmen2021.in व  https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर दि. 9 डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेली होती.

त्यानुसारदिनांक ३१ डिसेंबर २०२१ अखेर ऑनलाईन स्वरुपात स्विकारण्यात आलेल्या एकूण ७६३७९ अर्जाचा डाटा विभागाकडे प्राप्त झालेला आहे. या अर्जाची छाननी केल्यानंतर शैक्षणिक अर्हता धारण करीत नसलेल्या उमेदवारांनी अर्ज भरल्याचे दिसून आले. त्याचबरोबर एकाच विभागातून एकच अर्ज भरणे आवश्यक असताना काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याचे आढळले, तसेच छायाचित्र व स्वाक्षरी देखील चुकीच्या पद्धतीने अपलोड केल्याचे दिसून आले.

या कारणांस्तव विभागाने ऑनलाईन अर्ज स्विकृतीद्वारे प्राप्त अर्जामधुन अर्हता धारण करणारे व पात्र उमेदवार निवडीकरीता छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविणेचे ठरविले आहे. त्याबाबतच्या सविस्तर सूचना विभागाच्या https://mahabhumi.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.

छाननी अर्ज हे केवळ दि. 9 डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत अर्ज केलेल्या उमेदवारांनाच भरता येतील. या उमेदवारांनी आपले विहीत शैक्षणिक अर्हता धारण करीत असल्याचे प्रमाणपत्र छाननी अर्जामध्ये अपलोड करावयाचे आहे. तसेच जे उमेदवार विहीत शैक्षणिक अर्हता धारण करणार नाहीत अशा उमेदवारांना परिक्षेस बसण्यास अपात्र ठरविण्यात येवून छाननी अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात योग्य ती माहिती भरल्यानंतर त्यांच्या अधिकृत बँक खात्यामध्ये भरलेल्या शुल्काचा परतावा करण्यात येणार आहे. याबाबत सर्व उमेदवारांनी सहकार्य करावे अशी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख(Mahabhulekh) पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.


Maharashtra is leading in Svamitva Yojana. The scheme operates under the Department of Land Records (Bhumi Abhilekh). The scheme aims to promote socio-economic empowerment and self-reliant rural India. The government claims that the scheme will boost village development and trust. Under this scheme, drone survey was conducted in 1 lakh villages. There are many vacancies in the Land Records Department of the State of Maharashtra. Therefore, the government is demanding attention to this department and filling the vacancies immediately.

पीएम स्वामित्व योजना प्रॉपर्टी कार्ड अप्लीकेशन फॉर्म

स्वामित्व योजनेत महाराष्ट्र अग्रेसर आहे. हि योजना भूमी अभिलेख विभागात अंतर्गत काम करते. या योजनेचा हेतू सामाजिक-आर्थिक सशक्तीकरण आणि आत्मनिर्भर ग्रामीण भारताला प्रोत्साहन देणे आहे. सरकारचा दावा आहे या योजनेतून गावाचा विकास आणि विश्वासाला प्रोत्साहन मिळेल. या योजने अंतर्गत १ लाख गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षण करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील भूमी अभिलेख विभागात अनेक पदे रिक्त आहेत, या परिस्थितीत सर्वेक्षणाचे काम उत्तम रित्या पार पडणार आले. त्यामुळे शासनाने या विभागाकडे लक्ष दावे आणि रिक्त पदे तातडीने भरावी अशी मागणी केली जात आहे.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022

Maha Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022: As per the latest news, Approval to fill various posts in the Land Records Department. A total of 132 for Group B posts are vacant in this department. The highest number is in Vidarbha, Marathwada. This is clear from the number of vacancies in this important section of land records. Read More details as given below.

सातबारा ऐवजी येणार प्रॉपर्टी कार्ड Property Card

Mahabhumi Recruitment 2022

भूमी अभिलेख विभागातील विविध पदे भरण्यास मान्यता

विकासात मागास असलेल्या विदर्भ, मराठवाड्यात विविध सरकारी विभागांत पुण्या-मुंबईच्या तुलनेत रिक्त पदाची संख्या अधिक असून भूमि अभिलेख विभागही त्याला अपवाद नाही. या विभागात एकूण रिक्त वर्ग दोनच्या १३३ पदांपैकी विदर्भ व मराठवाड्यातील पदांची संख्या ९८ आहे.

या तुलनेत पुणे विभागात ६ तर मुंबई विभागात ११  इतकी अत्यंत कमी आहे.  दरम्यान, रिक्तपदांपैकी ९२ पदे पदोन्नतीतून भरली जाणार असून ती भरताना विदर्भातील रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्याची मागणी होत आहे. विदर्भ, मराठवाड्याला विकास निधी कमी मिळतो, मिळालेला निधी रिक्त पदांमुळे खर्च होत नाही. असे झाल्यावर तो इतरत्र वळता केला जातो, असा आरोप या भागातील लोकप्रतिनिधी वर्षानुवर्षे करीत आले तरी चित्र बदलले नाही.

 • भूमि अभिलेख या महत्त्वाच्या विभागातील रिक्त पदाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास ही बाब स्पष्ट होते. या विभागात वर्ग दोनची एकूण १३२ पदे रिक्त आहेत. त्यात सर्वाधिक संख्या ही विदर्भ, मराठवाड्यातील आहे.
 •  याचा विभागाच्या कामकाजाला फटका  बसला असून जमीन मोजणीसह अनेक कामे प्रलंबित आहेत. ही पदे भरावी म्हणून कर्मचारी संघटना सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत होती. अखेर महसूल विभागाने १३३ रिक पदांपैकी ९२ पदे पदोन्नतीतून भरण्यास मंजुरी दिली आहे.
 • विदर्भ,मराठवाड्यात रिक्तपदांची संख्या अधिक असल्याने पदोन्नतीतून ती भरताना या विभागांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी आहे. पुणे-मुंबई-नाशिक भागातील कर्मचारी विदर्भात येण्यास इच्छुक नसतात, त्यामुळेही या भागातील पदे रिक्त राहतात, हे येथे उल्लेखनीय.

As per the news published in the newspaper that the Bhumi Abhilekh Bharti Exam 2021 will be expected in 23rd January 2022. But Due to the MPSC State Service Preliminary Exam 2021 Schedule is change both examine date is same now. MPSC State Service Preliminary Exam 2021 was schedule on 2nd January but now it will be on 23rd January. Now the big question is that the student who wants to appeared both the examine how they will manage. Read the below given details carefully and keep visit us for the further updates.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti Exam Date

Maha Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021-  Land Records Advertisement has been issued a notification for Maharashtra Division. Under MahaBhumi Abhilekh Recruitment 2021 there is a vacancy for Surveyor and Clerk Posts. In Bhumi Abhilekh Vibhag there are 1013 vacancies to be filled in district Wise. Online applications start from 9th Dec 2021. Applicants also pay the application fees as given below. Applicants should apply online https://mahabhumi.gov.in/ before the last date. The last date for submission of the application form is 31st December 2021. More details about Maha Bhumi Abhilekh Maharashtra Bharti 2021  / Land Records Recruitment 2021 / Bhumi Vibhag Recruitment 2021 / like application and application link are given below.

भुमि अभिलेख अंतर्गत अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद विभागाकरिता भूकरमापक तथा लिपिक पदांच्या एकूण 1013 रिक्त जागा भरण्याकरिता पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरीचे ठिकाण विविध जिल्हे विभाग आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. पुढील सर्व अपडेट्स करीता www.govnokri.in ला  भेट देत रहा. 

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Online Apply

How to Apply for Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021

Mhada invited online application form from eligible candidates from official website i.e. https://landrecordsrecruitment2021.in.

Candidates follow the below given steps and complete their online registration process:

 1. First click on the below given online apply link on this page.
 2. Fill the registration form with given information.
 3. Click on the Submit Button
 4. Pay the prescribed examination fee by filling all the details in the online application form.
 5. The list of candidates for the examination will be displayed on the website.
 6. Helpline Telephone number if candidates have difficulty in filling online application contact to – 7057070842, 7057080572 Monday to Saturday from 9.00 am to 6.00 pm, also [email protected] e-mail id 

How to Apply for Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021

Mahabhumi Recruitment 2021

 • महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात इथे लवकरच तब्बल 1013 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भूकरमापक तथा लिपिक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 असणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील निरनिराळ्या शहरांमध्ये अनेक जागांसाठी ही भरती असणार आहे.

Pay Scale to Surveyor and Clerk at MahaBhumi Bharti 2021

इतका मिळणार पगार-

 • भूकरमापक तथा लिपिक (Surveyor and Clerk) – 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये प्रतिमहिना

Essential Document For Maha Bhumi Abhilekh Maharashtra Bharti 2021

भूकरमापक तथा लिपिक पदाच्या भरतीसाठी लागणारे ही कागदपत्रं आवश्यक-

 • Resume (बायोडेटा)
 • दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईझ फोटो
JOB TITLE Mahabhumi Recruitment 2021
या पदांसाठी भरती भूकरमापक तथा लिपिक (Surveyor and Clerk) – एकूण जागा 1013
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यलयातुन शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी 30 WPM किंवा 40 WPM पर्यंत टायपिंग उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आणि कम्प्युटर टायपिंग येणं अनिवार्य आहे. उमेदवारांना संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
या शहरांमध्ये होणार भरती कोकण पुणे मुंबई नाशिक अमरावती नागपूर औरंगाबाद
परीक्षा शुल्क खुला वर्ग: ₹ 300 /- रुपये राखीव वर्ग: ₹ 150/- रुपये
वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी 18 ते 38 वर्षांची वयोमर्यादा असणार आहे.

भुमि अभिलेख विभाग

 • शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021
 • पदाचे नाव – भूकरमापक तथा लिपिक
 • रिक्त पदे  –1013 जागा
 • नोकरी ठिकाण –  अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 डिसेंबर 2021
 • अधिकृत वेबसाईटhttps://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/

Bhumi Abhileskh Vibhag Bharti 2021

? Department (विभागाचे नाव)  Land And Records Department
⚠️ Recruitment Name
Land and Records  Bharti 2021/Mahabhumi Recruitment 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/

भुमि अभिलेख मुंबई भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

 Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Details

1 Surveyor and Clerk 1013 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

Bhumi Abhilekh Vibhag  Recruitment 2021- Eligiblity Criteria 

 • For Surveyor and Clerk
Diploma in Civil Engineering

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

 • Open category (खुला वर्ग)
₹ 300/-
 • Reserved category (राखीव वर्ग)
₹ 150-

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

✅ अर्ज सुरु होण्याची तारीख :  9th Dec 2021
⏰ शेवटची तारीख  31st December 2021

Maha Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021- Vacancy Details

Sr. No. Region No. of Vacancy
1 Pune Region 163
2 Konkan Region, Mumbai 244
3 Nashik, Region 102
4 Aurangabad Region 207
5 Amravati Region 108
6 Nagpur Region 189
Total 1013

भूमि अभिलेख विभागात 1013 पदांसाठी जाहिरात प्रकाशित- आपल्या जिल्ह्यानुसार ऑनलाईन अर्ज करा

Important Link of Maha Bhumi Abhilekh Recruitment 2021

?OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT

Maha Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 for 1020 Group C Posts. Latest updates received from Land Records Department published that a Regional Selection Committee has been set up to fill the regional level posts in Group C category. There were total 1020 posts needs to be filled under this department. A selection committee has been constituted at the regional level in the Land Records Department to fill the posts of Deputy Director Land Records, Konkan, Pune, Nashik, Aurangabad, Amravati and Nagpur in Group ‘C’.

Maha Bhumi Abhilekh Vibhag Recruitment 2021 Details

भूमि अभिलेख विभागातील गट ‘क’ संवर्गातील पदे लवकरच भरणार

भूमि अभिलेख विभागातील गट ‘क’ संवर्गातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्यासाठी प्रादेशिक निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. महसूल व वन विभागामार्फत याबाबतचा शासन आदेश 25 ऑक्टोबर 2021 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावर उपसंचालक भूमि अभिलेख, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर प्रदेशातील गट ‘क’ संवर्गातील पदे भरण्यासाठी निवड समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक हे अध्यक्ष असतील. तसेच ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत तेथे अन्य विभागाचे उपसंचालक भूमि अभिलेख, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील विभागीय कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील विभागीय समाजकल्याण अधिकारी, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील विभागीय सैनिक कल्याण अधिकारी हे सर्व या समितीमध्ये सदस्य असतील. तर ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख संलग्न उपसंचालक भूमि अभिलेख हे सदस्य सचिव या समितीमध्ये असतील.

जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक यांच्या अनुपस्थितीत निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अप्पर जमाबंदी आणि भूमि अभिलेखचे अतिरिक्त संचालक कामकाज पाहतील. निवड समितीमध्ये आवश्यकतेप्रमाणे अतिरिक्त सदस्यांची निवड करण्याची मुभा जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक यांना राहील. ज्या विभागात पदे भरण्यात येणार आहेत त्या विभागात निवड समितीचे सदस्य म्हणून अन्य विभागातील भूमि अभिलेख उपसंचालक यांची नियुक्ती जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक यांच्या स्तरावरुन करण्यात येईल. असे शासन आदेशात नमूद आहे.

Mahabhulekh 7-12 Download

महाराष्ट्रातील सर्व जिल्हांचा सात बारा कसा डाउनलोड करायचा ? – येथे पहा

Maharashtra 7/12 Download

3 Comments
 1. Rajendra Aurase says

  My government jobs my carrier

 2. Priya Pimprikar says

  Bhumi abhilekha vibhag barti 2021

 3. Viraj says

  Government job

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!