CBIC Recruitment 2022

CBIC Recruitment 2022:– Central Board of Indirect Taxes & Customs, Directorate General of Goods and Services Tax Intelligence invites applications for the recruitment of Intelligence Officer. There is a total of 03 vacancies to be filled under CBIC Bharti 2022. Applicants having qualifications as mention below are eligible to apply. Candidate need to submit offline application form to the given address before the last date.. The last date for submission of application form is 30th April 2022. More details of CBIC Recruitment 2022 candidate advised to read the Advertisement here and then apply :

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे गुप्तचर अधिकारी. पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 एप्रिल 2022 (जाहिरातीनुसार) पर्यंत अर्ज करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ

 

  • शेवटची  तारीख : 30 एप्रिल 2022
  •  पदाचे नाव: गुप्तचर अधिकारी.
  • अधिकृत वेबसाईट : www.cbic.gov.in
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर.

CBIC Bharti 2022

?Department (विभागाचे नाव)  Central Board of Indirect Taxes & Customs
⚠️ Recruitment Name
CBIC Vacancy 2022/ CBIC Pune Bharti 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.cbic.gov.in

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1. Intelligence Officer.
पदानुसार शैक्षणिक पात्रता 
  • For Intelligence Officer.
Refer PDF

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख   30th April 2022

 

Important Link of CBIC Recruitment 2022

OFFICIAL WEBSITE
 PDF ADVERTISEMENT

 


  

CBIC Recruitment 2021

In the Central Board of Indirect Taxes and Customs (CBIC), which is under the jurisdiction of the Ministry of Finance, 47 per cent of the 91,701 posts sanctioned in the ‘A’ to ‘C’ category are vacant. Read More details as given below.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क बोर्डात ४७ टक्के पदे रिक्त

अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क बोर्डात (सीबीआयसी) मंजूर वर्ग ‘अ’ ते ‘क’ संवर्गातील ९१ हजार ७०१ पदांपैकी ४७ टक्के पदे रिक्त आहे. त्यामुळे देशभरात जीएसटीच्या करचोरीवर नियंत्रण मिळणार कसे? हा प्रश्न या क्षेत्रातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.

CBIC Bharti 2021

देशात एकच कर रहावा म्हणून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणाली सुरू झाली. त्यामुळे देशातील जीएसटीच्या महसुलात सातत्याने वाढ होत असल्याचे अर्थमंत्रालय सांगते. परंतु अद्यापही सीबीआयसीमध्ये वर्ग अ ते वर्ग क पर्यंतच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांची हजारो रिक्त पदेच भरली जात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात करचोरी होत असल्याचा दावा ऑल इंडिया फेडरेशन ऑफ कस्टम्स, सेंट्रल एक्साईज अ‍ॅन्ड जीएसटी, एससी/ एसटी इम्प्लॉईज वेल्फेअर ऑर्गनायझेशनकडून उपस्थित केला गेला. सध्या देशभरात ‘सीबीआयसी’च्या अखत्यारित वर्ग अ- ६, ३८१ पदे, वर्ग ब (गॅझेटेड) २२,२१७, वर्ग ब (नॉन गॅझेटेड) ३२,३६२, वर्ग क संवर्गातील ३०,७४१ अशी एकूण ९१,७०१ पदे मंजूर आहेत.

या एकूण पदांपैकी वर्ग अ- ३,७०२ पदे, वर्ग ब (गॅझेटेड)- १७,९६३, वर्ग ब (नॉन गॅझेटेड) १४,२५७ पदे, वर्ग क- १२,५०७ अशी एकूण ४८,४२९ पदे भरलेली आहेत. तर वर्ग अ संवर्गातील- २,६७९ पदे, वर्ग ब (गॅझेटेड)- ४,२५४, वर्ग ब (नॉन गॅझेटेड) १८,१०५ पदे, वर्ग क- १८,२३४ अशी एकूण ४३,२७२ पदे रिक्त आहेत. सीबीआयसीतील सर्व रिक्त पदांपैकी सर्वाधिक ५९.३१ टक्के रिक्त पदे ही क संवर्गातील आहे. तर वर्ग ब (नॉन गॅझेटेड) संवर्गात ५५.९४, वर्ग अ संवर्गात ४१.९८ टक्के, वर्ग ब (गॅझेटेड) संवर्गात १९.१४ टक्के पदे रिक्त आहे.

देशात प्रत्येक दोन ते चार दिवसांत निवडक उद्योगपतींची शेकडो कोटीहून अधिकची करचोरी पकडली जात आहे. सातत्याने तपासणी झाल्यास त्याहून जास्त असल्याचा दावा ऑल इंडिया फेडरेशन ऑफ कस्टम्स, सेंट्रल एक्साईज अ‍ॅन्ड जीएसटी, एससी/ एसटी इम्प्लॉईज वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय थुल यांनी केला.

प्रत्येक ग्राहक विविध वस्तू खरेदी करताना जीएसटी देत असतो. हा महसूल सरकारचा असतो. तो वेळीच सरकारी तिजोरीत जायला हवा. परंतु ग्राहकांकडून घेतलेला हा कर बरेच व्यापारी व उद्योगपती सरकारी तिजोरीत भरत नाही. त्यातूनच करचोरीची प्रकरणे पुढे येतात. सीबीआयसीमध्ये ४७ टक्के पदे रिक्त असल्याने या व्यापारी, उद्योजकांवरील कारवाईवर मर्यादा येत असल्याने देशात खूप करचोरी होत आहे. तातडीने ही पदे भरल्यास करचोरीवर नियंत्रण येऊन सरकारचा महसूल मोठ्या प्रमाणावर वाढेल. सोबत बऱ्याच करचोरीही उघडकीस येईल.


 


  

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!