CBSE Board 10th, 12th Exam 2020

CBSE Board 10th, 12th Exam 2020

सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी परीक्षा शनिवारपासून

CBSE Exam 2020 : CBSE Board 10th Exam 2020 and CBSE Board 12th Exam 2020 will be started from 15th February 2020 and CBSE Board 10th Exam 2020 will be ended on 20th February 2020. and CBSE Board 12th Exam 2020 will be ended on 30th March 2020. Complete details regarding CBSE Examin 2020 are given same time table of CBSE examine 10th and 12th are also given below:

CBSE Exam 2020 :

सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा शनिवारी १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. दहावीची परीक्षा २० मार्च तर बारावीची परीक्षा ३० मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. यावर्षीपासून मुलांच्या निकालावर Fail किंवा कंपार्टमेंट हा शब्द न लिहिण्यावर विचार सुरू आहे. जे विद्यार्थी एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण होतात, त्यांना कंपार्टमेंटल परीक्षा द्यावी लागते. पण यापुढे निकालावर तसे नमूद करण्याचा विचार बोर्ड करत आहे. दरम्यान, शनिवारी होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी ते पाहा…

परीक्षेला जाण्यापूर्वी ‘ही’ काळजी घ्या :

> हॉलतिकिट किंवा अॅडमिट कार्ड विसरू नका.

> परीक्षा केंद्रावर नियोजित वेळेआधी ३० ते ४० मिनिटे अगोदर पोहोचा.

> परीक्षा केंद्रावर आपल्या जागेवर बसण्यापूर्वी आजूबाजूला कोणता कागदाचा तुकडा वगैरे तर नाही ना पडला हे नीट तपासून घ्या.

> इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स परीक्षा केंद्रात घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे.

> हॉल तिकिटाची एक फोटोकॉपी घरी जरूर ठेवा.
————

सीबीएसईच्या अध्यक्षांचं मुलांना भावुक पत्र

मागील वर्षी कसा होता निकाल?

सीबीएसई दहावी – २०१९ मध्ये सीबीएसई दहावीत ९१.१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

एकूण १८,२७,४७२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.

सीबीएसई बारावी – २०१९ मध्ये सीबीएसई बारावीत ८३.४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

सीबीएसई दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक : CBSE Time Table 2020

सीबीएसई दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक येथे पाहा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाची इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा येत्या शनिवारपासून १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. सीबीएसईने जाहीर केलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार दोन्ही वर्गांतील विद्यार्थ्यांची परीक्षा सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत आहे. तथापि, त्यापूर्वी सकाळी १० ते रात्री १०:१५ या वेळेत परीक्षार्थिंना प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत. तर, सकाळी १०.१५ ते १०:३० दरम्यान प्रश्नपत्रिका वितरित केल्या जातील. दहा वाजण्यापूर्वीच परीक्षार्थिंनी परीक्षा हॉलमध्ये पोहोचणे आवश्यक आहे.

  1. सीबीएसई बारावीचं वेळापत्रक येथे पहा CBSE 12th Time table
  2. सीबीएसई दहावी परीक्षेचं वेळापत्रक येथे पहा CBSE 10th Time Table

दहावी आणि बारावी दोन्ही परीक्षा शनिवार १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. सीबीएसई दहावीचा शेवटचा पेपर सामाजिक शास्त्र असून तो १८ मार्चला आहे. बारावीचा शेवटचा पेपर सोशलॉजी विषयाचा असून तो ३० मार्चला आहे.

सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना अॅडमिट कार्ड (हॉल तिकीट) देण्यात आले आहेत. त्यांनी अधिक परीक्षेसंदर्भातली अधिक माहितीसाठी शाळांना संपर्क करण्याचे आवाहन बोर्डाने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!