CBSE बारावीची श्रेणीसुधार परीक्षा सप्टेंबरमध्ये

CBSE 12th Class Improvement Exam 2020:

सीबीएसई बारावीची श्रेणीसुधार परीक्षा सप्टेंबरमध्ये

CBSE 12th Class Improvement Exam 2020: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईची इयत्ता बारावीची श्रेणीसुधार परीक्षी सप्टेंबर महिन्यात होणार आहे. सीबीएसई बोर्डाने ही माहिती दिली. ही परीक्षा कोविड – १९ महामारीमुळे रद्द झाली होती. गेल्या महिन्यात तिचा निकाल जाहीर झाला आहे. दरम्यान, सीबीएसई दहावी, बारावीच्या फेरपरीक्षादेखील सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.

ऑनलाइन शिक्षणाचे व्यासपीठ होणार आता सहजपणे उपलब्ध! 

‘ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बारावीच्या गुणांमध्ये किंवा श्रेणीमध्ये सुधारणा करायची आहे त्यांच्यासाठी सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऐच्छिक आहे. यासोबतच दहावी आणि बारावीची कम्पार्टमेंट परीक्षा (फेरपरीक्षा) देखील सप्टेंबरमध्ये होणार आहे. परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर होतील,’ असे सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक सन्यम भारद्वाज म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ‘या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना जे गुण मिळतील ते अंतिम असतील. नियमित विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळांमार्फत अर्ज करायचे आहेत, तर खासगीरित्या परीक्षा देणारे विद्यार्थी थेट बोर्डाच्या संकेतस्थळावरील लिंकवरून अर्ज करू शकतील. २२ ऑगस्टपर्यंत ही अर्ज प्रक्रिया सुरू राहणार आहे.’

विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वर्षाच्या कालावधीतल्या सिलॅबसमधील प्रश्न येतील. विद्यार्थ्यांनी पात्रता निकष, उत्तीर्णतेचे निकष, अभ्यासक्रम आणि योजनेची संपूर्ण माहिती घेऊन मगच परीक्षेसाठी अर्ज करावा असेही भारद्वाज यांनी सांगितले.
यावर्षी सीबीएसई बारावीत विद्यार्थिनींचे उत्तीर्णतेचे प्रमाण विद्यार्थ्यांच्या तुलनेत सुमारे सहा टक्के अधिक आहे. निकालाची एकूण टक्केवारी ५.३८ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्यावर्षीचा बारावीचा निकाल ८३.४० टक्के होता तर यावर्षी तो ८८.७८ टक्के आहे.

CBSE Compartment Exam 2020

CBSE Compartment Exam 2020: The Central Board of Secondary Education has conducted the compartment examination (re-examination) of Class X and XII. The link to fill the application for this exam has been started. Students who have failed in one or more subjects and their X or XII results have been declared as compartments, can apply online for this exam. Candidates will be able to apply online for compartment examination till 5 pm on August 20.

सीबीएसई दहावी, बारावी कंपार्टमेंट परीक्षा सप्टेंबरमध्ये

CBSE Compartment Exam 2020: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या कंपार्टमेंट परीक्षेचे (फेरपरीक्षा) आयोजन केले आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची लिंक सुरु करण्यात आली आहे. जे विद्यार्थी एक किंवा अधिक विषयांत अनुत्तीर्ण झाले आहेत आणि त्यांचा दहावी किंवा बारावीचा निकाल कंपार्टमेंट म्हणून जाहीर करण्यात आला आहे, असे विद्यार्थी या परीक्षेसाठी ऑलाइन अर्ज करू शकतात. उमेदवार कंपार्टमेंट परीक्षेसाठी २० ऑगस्ट सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.

दहावी, बारावी उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांबाबत राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय

सीबीएसईने आपल्या निवेदनात म्हटले आहे की ‘कंपार्टमेंट परीक्षा सप्टेंबर महिन्यात आयोजित केली जाईल. परीक्षेची तारीख लवकरच घोषित केली जाईल.’ नियमित विद्यार्थी आपल्या शाळेच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. मात्र, खासगी स्तरावर उमेदवार सीबीएसईचे अधिकृत संकेतस्थळ www.cbse.nic.in वर जाऊन थेट अर्ज करू शकतात. सीबीएसई कंपार्टमेंट परीक्षेसाठी अर्ज तेव्हाच स्वीकारले जातील जेव्हा विद्यार्थी अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेच्या आधी अर्जाचे शुल्क जमा करतील. परीक्षा अर्ज, परीक्षा शुल्क आदी अर्जाशी संबंधित सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

यावर्षी सीबीएसई बारावीत ८७,६५१ विद्यार्थ्यांना कंपार्टमेंटसाठी पात्र हा शेरा मिळालेला आहे. यावर्षी बारावीचा निकाल ८८.७८ टक्के लागला होता. दहावीचे १,५०,१९८ विद्यार्थी कंपार्टमेंटसाठी पात्र आहेत. बोर्डाने दहावीचा निकाल १५ जुलै रोजी जारी केला होता. दहावीचा निकाल यंदा ९१.४६ टक्के लागला होता.

दरम्यान, देशभरातून एकूण सुमारे ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सीबीएसई फेरपरीक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहून सीबीएसईच्या फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयाची दखल घेऊन (स्यू मोटो) सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. कोविड – १९ महामारी काळात परीक्षा घेण्याचा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय विद्यार्थी हिताचा नाही, असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!