GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Doctors Recruitment 2016 For 1100 Posts

Doctors Recruitment 2016 For 1100 Posts

The Recruitment for 1100 Posts will starts soon, Very soon the Recruitment process for the 1100 vacancies will start by health department.

सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांच्या तुटवड्यावर उपाय म्हणून राज्यात वैद्यकीय अधिकार्‍यांची गट अ ची तब्बल ११00 पदे भरण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. विदर्भ व मरावाड्यातील १४ जिलत डॉक्टरांची जवळपास ५00 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत न भरता ती वॉक इन इंटरव्ह्यूने भरण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. आत्महत्याग्रस्त भागांतील सरकारी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकार्‍यांची तातडीने आवश्यकता आहे. अशा वेळी एमपीएससीद्वारे भरती करण्यास विलंब होईल, हे लक्षात घेऊन ‘वॉक इन इंटरव्ह्यू’द्वारे भरतीची परवानगी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागितली होती.
ती देण्यात आल्यानंतर हा आदेश काढण्यात आला आहे. डॉ.सावंत यांनी लोकमतला सांगितले की आत्महत्याग्रस्त भागानंतर राज्याच्या इतर भागातील रिक्त पदे भरण्यात येतील आणि तिथेही वॉक इन इंटरव्ह्यूद्वारेच भरती केली जाईल.
भरती संबंधित जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील समिती करेल. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त हे समितीचे सदस्य असतील.
मराठवाड्यातील आठ, अमरावती विभागातील सर्व पाच तसेच नागपूर विभागातील वर्धा असे १४ जिल्हे आत्महत्याग्रस्त आहेत. तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांची थेट भरती करताना आरक्षणानुसारच करण्यात येणार आहे.
ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकही वैद्यकीय अधिकारी नाही, तिथे भरती करण्यास प्राधान्य दिले जाईल. एकूण रिक्त पदांच्या ७५ टक्के पदे भरण्यात येणार आहेत. नवीन वैद्यकीय अधिकार्‍यांनी मुख्यालयातच राहणे अत्यावश्यक असेल. एमडीमुळे ‘रिक्त’पदे भरण्याचा प्रस्तावर
एमबीबीएस झालेले आरोग्य अधिकारी एमडी करण्यासाठी गेल्यानंतर तो जिल्हा वा अन्य इस्पितळात सेवा देतो, पण त्याचे वेतन आधीच्या ठिकाणीच निघते. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते पद भरलेलेच असते आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रात डॉक्टर कागदावरच राहतात. या पार्श्‍वभूमीवर, एमडीसाठी गेलेल्या आरोग्य अधिकार्‍याची पदे हंगामी स्वरूपात भरण्याचा प्रस्ताव आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठविला आहे. /सार्वजनिक आरोग्य विभागात वर्ग क (तृतीय श्रेणी) आणि वर्ग डची (चतुर्थश्रेणी) ३ हजार रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले असून लेखी परीक्षा लवकरच घेतली जाईल, असे आरोग्य मंत्री डॉ.सावंत म्हणाले. दुसर्‍या टप्प्यात ३ हजार आणि तिसर्‍या टप्प्यात आणखी ३ हजार अशी एकूण किमान ९ हजार पदे नजिकच्या काळात भरण्यात येतील.

Leave A Reply

Your email address will not be published.