GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Maharashtra Shikshak Bharti 2017

Maharashtra Shikshak Bharti 2017/ Teachers Recruitment 2017

Maharashtra Teachers Recruitment 2017 – 2018 Details & New News is published in local News paper. The News details are given below.

Teachers Recruitment 2017 Details

Shikshak Recruitment 2017 Details

teachers recruitment Details 2017

 

राज्यात सध्या सुरू असलेली २०१६-१७ ची संचमान्यता तथा शिक्षण समायोजन प्रक्रिया मार्चअखेरपर्यंत पूर्ण होणार असून, त्यानंतर राज्यातील विविध शाळांमध्ये रिक्त राहणाऱ्या पदांवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी परवानगी देण्याचे संकेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत. नाशिकमधील दंत महाविद्यालयात सोमवारी (दि. १६) दुपारी जिल्हा मुख्याध्यापक संघटना, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या विविध समस्या समजावून घेतल्या. तसेच विविध शिक्षण संस्थाचालकांचीही त्यांनी यावेळी बैठक घेतली. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार अपूर्व हिरे, माजीमंत्री प्रशांत हिरे, भाजपाचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे आदि उपस्थित होते. मुख्याध्यापक व संस्थाचालकांच्या दोन्ही बैठकांमध्ये शिक्षणमंत्र्यांसमोर नवीन शिक्षक भरतीची मागणी प्रामुख्याने मांडण्यात आली. त्यावर तावडे यांनी चिपळूणकर समिती आणि शासनाचा शिक्षक व शिककेतर भरतीप्रक्रियेसंबंधी नियमावलीतून सुवर्णमध्य काढून रिक्त जागांवर भरतीची मान्यता दिली जाऊ शकते, असे संकेत देतानाच संस्थाचालकांना ही पदे मनमानी पद्धतीने भरता येणार नसल्याचेही स्पष्ट केले.
Maharashtra Shikshak Bharti 2017details
शासनस्तरावर झालेल्या निवड चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांमधूनच संस्थांना शिक्षकांची भरती करता येणार असल्याचे सांगितले. तसेच गंथपाल, प्रयोगशाळा सहायक यांच्या भरतीवर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. सध्या जिल्ह्यात पदवीधर मतदार संघ निवडणुकीसह जिल्हा परिषद तथा मनपा निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याचे सांगत बहुतेक प्रश्न व समस्यांवर ‘बघू, करू’ अशी आश्वासने तावडे यांनी दिली.

‘बरे बोलू की खरे बोलू’

मुख्याध्यापक व संस्थाचालकांसोबत झालेल्या दोन्ही बैठकांमध्ये शिक्षणमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांनी विविध निर्णय योग्यरीतीने शालेय संस्था तसेच शाळांपर्यंत पोहोचवला नसल्याचे सांगत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली, तर संस्थाचालकांनीच अधिक ाऱ्यांना अनावश्यक सवयी लावल्याचे सांगत संस्थाचालकांनाही खडे बोल सुनावले. विविध गैरप्रकारांना हद्दपार करून यातून होणाऱ्या बचतीतून आयटी, संस्थांचे लाइट, घरभाडे, कला, संगीत, क्रीडाशिक्षण खर्चात वाढ करणे शक्य असल्याचे तावडे यांनी सांगितले. परंतु केवळ समाधान व्हावे म्हणून वेगवेगळी आश्वासनांनी दिशाभूल करणे योग्य नसल्याचे सांगताना ‘बरे बोलू की, खरे बोलू’ अशी उक्ती वापरून संस्थाचालक, मुख्याध्यापकांची विश्वासार्हता मिळविण्याचा प्रयत्न केला.

राज्यात सध्या सुरू असलेली २०१६-१७ ची संचमान्यता तथा शिक्षण समायोजन प्रक्रिया मार्चअखेर पूर्ण होणार असून, निवडणूक आचारसंहितेनंतर शाळांमधील रिक्त पदांवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे संकेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत.

नाशिकमधील दंत महाविद्यालयात सोमवारी जिल्हा मुख्याध्यापक संघटना, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. तावडे यांनी विविध समस्या समजावून घेतल्या.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन, खा. हरिश्चंद्र चव्हाण, भाजपाचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार आदी उपस्थित होते.

आचारसंहिताभंगाची तक्रार
====================
मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीचे शिक्षणमंत्र्यांनी आश्वासन दिले. हा आचारसंहितेचा भंग आहे, अशी तक्रार पदवीधर मतदारसंघातील उमेदवार राजू देसले यांनी निवडणूक आयोगाक डे केली आहे.

उपरोक्त बैठक होणार असल्याने बैठकीचे चित्रीकरण करण्याची विनंती स्थानिक प्रशासनाला केली होती. परंतु, प्रशासन सरकारमधील मंत्र्यांच्या दबावाखाली काम करीत असल्याचे राजू देसले यांनी सांगितले.

Maharashtra Shikshak Bharti 2017 Starts Soon, The Details of teachers Bharti in maharashtra is given below. 

चार वर्षांपासून बंद केलेल्या शिक्षक भरतीला अखेर केंद्रीय भरती पद्धत बाजूला ठेवून शिक्षण खात्याने परवानगी दिली खरी, परंतु त्यासाठी ताज्या कर्मचारी संख्येच्या संचमान्यतेची अट घालण्यात आली आहे. शिक्षण खात्यानेच गेल्या दोन वर्षांपासून संच मान्यता न घेतल्याने आता शिक्षक भरती कशी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या घोळामुळे भरतीवरील बंदी उठवणे केवळ फार्स ठरला आहे.
राज्यात २0१२ पासून शिक्षक भरतीला बंदी घालण्यात आली आहे. मध्यंतरी राज्य शासनाने संस्थाचालकांना थेट शिक्षक भरती करू न देता केंद्रीय पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली. त्यामुळे हा विषय अधिकच लांबला गेला. दरम्यानच्या काळात अनेक शाळांमध्ये शिक्षक नवृत्त झाल्याने दोन चार शिक्षकांवर विद्यार्थी सांभाळण्याची वेळ आली होती. आता ९ फेब्रुवारीला राज्य शासनाने केंद्रीय भरती निवड पूर्व प्रक्रिया घेण्याची बाब विचाराधीन असल्याने याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत खासगी व्यवस्थापन आणि स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील नियुक्ती, पदभरतीस असलेली बंदी उठविण्यात आली असल्याचे नमूद केले आहे. अर्थात, त्यासाठी २0 जून आणि २0 ऑगस्ट २0१४ च्या शासन निर्णयाचा संदर्भ घेऊन त्या आधारे कार्यवाह करण्यास सांगितले आहे. मात्र, हे निर्णय तपासले तर संच मान्यतेच्या आधारे पदे भरता येतील, असा संदर्भ आहे.
सध्या शिक्षण खात्याने २0१३-१४ या आर्थिक वर्षानंतर संचमान्यताच केलेली नाही. त्यामुळे तीन वर्षांत अनेक शाळांमध्ये शिक्षक नवृत्त झाले आहेत. आताही संच मान्यता करायचे ठरवले तर २0१५-१६ हे शैक्षणिक वर्ष संपत आले असून अद्याप संचमान्यता झालेली नाही. त्यामुळे अशा स्थितीत शिक्षक भरती कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्य शासनाने अगोदरच अनुदानित शाळांवरील खर्च कमी करण्यासाठी पटपडताळणीचा फंडा शोधून काढला आणि अप्रत्यक्षरीत्या कपात सुरू केली आहे. आता भरतीसाठी परवानगी देतानाही शासनाने स्वत:च ज्या अटींचे पालन केले नाही त्या अटी लादून संस्थाचालकांच्या भरती प्रक्रियेत खोडा घालत असल्याची भावना संस्थाचालकांमध्ये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.