GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Nagpur Fire Department Bharti 2016 Application

Nagpur Fire Department Bharti 2016

Fire Brigade Department Nagpur (Angnishamak Vibhag nagpur) is going to publish an advertisement for the various vacancies at Nagpur. No in Nagpur there are more than 600 vacant posts.

[wp_ad_camp_2]

उपराजधानीचा होत असलेला विकास व विस्तार विचारात घेता अग्निशमन विभागाला सक्षम करण्याची गरज आहे. अत्याधुनिक यंत्रसामुग्री सोबतच आवश्यक मनुष्यबळाची गरज विचारात घेता महापालिका अधिनियमानुसार विभागाची नवीन सेवा प्रवेश नियमावली तयार करण्यात आली आहे.
नवीन अधिनियमानुसार महापालिकेच्या प्रत्येक विभागाला नवीन आकृतिबंध तयार करावयाचा आहे. अग्निशमन विभागाने सर्वप्रथम आकृतिबंध तयार केला असून सेवा भरतीची नियमावली तयार केली आहे. याबाबतचा प्रस्ताव सोमवारी होणार्‍या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. सभागृहाच्या मंजुरीनंतर प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. शासनाकडून प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर नवीन पदभरतीची जाहिरात दिली जाणार आहे.
१९६५ च्या लोकसंख्येच्या आधारावर शहरात अग्निशमन केंद्र व कर्मचार्‍यांची पदे निर्माण करण्यात आली होती. त्यानुसार पाच केंद्रे व १९३ कर्मचार्‍यांची पदे मंजूर करण्यात आली होती. गेल्या चार दशकात मंजूर पदांची संख्या ४११ पर्यंत वाढली आहे. परंतु शहराची लोकसंख्या ३0 लाखांवर गेली आहे. दोन लाख लोकसंख्येमागे एक अग्निशमन केंद्र असायला हवे, त्यानुसार शहरात १५ केंद्रांची गरज विचारात घेता नवीन आकृतिबंधात अधिकारी व कर्मचार्‍यांची ८७२ पदे निर्माण करण्यात आली आहे. याचा विचार करता अग्निशमन विभागात ६0८ पदे रिक्त आहेत.
शहरात गगनचुंबी इमारती उभ्या राहात असल्याने अग्निशमन विभागात लवक रच टर्न टेबल लॅन्डर (टीटीएल) यासारखी अत्याधुनिक यंत्रसामग्री दाखल होत आहे. सोबतच विभागाच्या ताफ्यात नवीन वाहने सहभागी होणार आहे. यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. याचा विचार करून नवीन सेवा प्रवेश नियमावली तयार करण्यात आली आहे. यात शैक्षणिक पात्रता, प्रशिक्षण व इतर बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

[wp_ad_camp_1]

लवकरच नागपूर अग्निशामक दल भरती सुरु होणार भरती प्रक्रिया
नवीन नियमानुसार नवीन आकृतिबंध, सेवा भरती नियमावलीला सभागृह व शासनाची मंजुरी आवश्यक आहे. अग्निशमन विभागाने आकृतिबंध व सेवा भरती नियमावली तयार केली आहे. सभागृहाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल. लवकरच भरती प्रक्रिया केली जाणार आहे.

37 Comments
  1. sadanand ingole says

    Drayvar

  2. amol Ramesh Rathod says

    Hi bharti only 12th pass var pahije Art com sci

  3. janardhan shankar dnake says

    chadapur road

Leave A Reply

Your email address will not be published.