GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Nagpur Fire Department Bharti 2016

Nagpur Fire Department Bharti 2016

In Fire Deprtment Nagpur there are total 146 vacant Posts. Very soon the recruitment Process for these posts will begins soon. More details given below in Marathi.

१९६५ च्या लोकसंख्येच्या आधारावर नागपूर शहरात अग्निशमन केंद्र व कर्मचार्‍यांची पदे निर्माण करण्यात आली होती. त्यानुसार पाच केंद्रे व १९३ कर्मचार्‍यांची पदे मंजूर करण्यात आली होती. गेल्या चार दशकात शहराची लोकसंख्या २५ लाखांवर गेली आहे. दोन लाख लोकसंख्येमागे एक अग्निशमन केंद्र असायला हवे, त्यानुसार शहरात १३ केंद्रांची व ८२२ कर्मचार्‍यांची गरज आहे. परंतु अधिकृ त ५ केंद्रे असताना ८ केंद्रे सुरू आहेत. या विभागात २६५ कर्मचारी व अधिकारी कार्यरत असून १४६ पदे रिक्त आहेत. आजच्या लोकसंख्येचा विचार करता विभागात ५५७ कर्मचारी कमी आहेत.
मेट्रो रेल्वे, मिहान यासारख्या प्रकल्पासोबतच शहरात ६५ मीटरहून अधिक उंचीच्या टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागावर मेट्रोरिजनमधील ९ तालुक्यांची जबाबदारी आहे. सोबतच विभागातील सहा जिल्ह्यांच्या समन्वयांची जबाबदारी आहे. परंतु विभागाकडे सुसज्ज यंत्रणेचा अभाव व मनुष्यबळाची कमतरता असल्याने कार्यक्षमतेवर र्मयादा आल्या आहेत. अग्निशमन विभागाचे वर्षाला ३ ते ४ कोटींचे उत्पन्न होते. ते मनपा तिजोरीत जमा होते. परंतु विभागाच्या गरजा व अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यासाठी विभागाला निधी मिळत नाही. त्यामुळे वायरलेस यंत्रणा, नवीन गाड्या, बंब ,व आवश्यक उपकरणे विभागाकडे उपलब्ध नाही. प्रशिक्षण केंद्राचा प्रस्तावही रखडला आहे. अग्नीशमन विभागाकडे उपलब्ध असलेल्या हायड्रोलिक प्लेटफार्मच्या माध्यमातून उंच इमारतीतील आग आटोक्यात आणताना अडचणी येतात. पाच मिनिटात मदत कशी मिळणार?
आग लागल्यास पाच मिनिटात अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहचणे आवश्यक आहे. परंतु पार्कींगचा प्रश्न, शहरातील वाहतुकीचा अडथळा, जुन्या वस्त्यातील अरुंद रस्ते यामुळे ते शक्य नाही. अशा परिस्थितीत पाच मिनिटात मदत कशी मिळणार असा प्रश्न आहे.

पदाचे नाव | मंजूर पदे | कार्यरत | रिक्त
मुख्य अग्निशमन अधिकारी १ 0 १
केंद्र अधिकारी ६ ४ २
सहाय्यक केंद्र अधिकारी १५ १ १४
ज्येष्ठ फायरमन १५ 0 १५
लिडिंग फायरमन ४५ ४0 ५
फायरमन चालक ५७ ३0 २७
फायरमन १९३ १४0 ५३
हायडन्ट मिस्त्री १५ ७ ८
टेलिफोन ऑपरेटर १0 ६ ४
(तसेच फिटर, इलेक्ट्रेशियन,हायड्रन्ट कुली, व्हॅन कुली, अँम्बुलन्स बॉय आदी पदे रिक्त आहेत. )

27 Comments
 1. Kishor R Zagade says

  Atta kadhi ahe agnishamak Bharati 2018madhe

 2. kiran darade says

  ok

 3. parag Hirekhan says

  Maza fire&safety mdhe diploma zala ahe ani 6 month experience ahe

 4. rajesh Pimpale says

  fire man job

 5. Yashonath koli says

  Diploma in fire service .

 6. Bhumeshwar chaurawar says

  Fire man

 7. Nikhil Mhake says

  Maza Fire an safety cha Diploma Comelet zala Ahe

Leave A Reply

Your email address will not be published.