GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Superspeciality Hospital, Amravati Recruitment 2016

Super speciality Hospital, Amravati Bharti 2016, Maharashtra Arogya Vibhag Bharti 2016

Superspeciality Hospital, Amravati Recruitment 2016 will starts soon. As per the news published by Superspeciality Hospital, Amravati, the recruitment will be for 290 posts. more details are given below. Also the recruitment for 2380 vacancies will begin under the Maharashtra Arogya Vibhag (Health Department Maharashtra Recruitment 2016).

अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा दुसरा टप्पा कार्यान्वित होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या हॉस्पिटलसाठी लागणारी पदस्थापना करण्यासाठी एक महिन्यात निर्णय घ्या, असे निर्देश उच्चाधिकार समितीला दिले जातील, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिले.
डॉ. सुनील देशमुख यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करीत आरोग्यसेवेशी संबंधित या महत्त्वाच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. देशमुख म्हणाले, अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या टप्पा १ अंतर्गत २२ हजार रुग्णांचे डायलिसीस करण्यात आले असून १५ हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. दुसर्‍या टप्प्याचे काम सुरू आहे. इमारतीचे बांधकाम झाले आहे. त्यावर शासनाने ४५ कोटी रुपये खर्च केले आहेत. आता हॉस्पिटल कार्यान्वित करण्यासाठी साधनसामुग्री व मनुष्यबळ देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत म्हणाले, इमारतीचे काम ८0 टक्के पूर्ण झाले आहे. इमारतीच्या विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. राज्यात आरोग्य विभागात एकूण २३८0 पदनिर्मिती केली जाणार आहे. यात अमरावतीची २९0 पदे समाविष्ट आहेत. पदनिर्मितीचा प्रस्ताव उच्चाधिकार समितीकडून एकदा परत आला आहे. तो पुन्हा पाठविला जाईल, असे सावंत यांनी सांगितले. या हॉस्पिटसाठी २0 प्रकारची यंत्रसामुग्री लागणार असून ११ चे खरेदी आदेश देण्यात आले आहेत. ९ ची खरेदी प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.