Divyang Bharti दिव्यांगासाठी मोठा निर्णय; 2 हजार लोकांची भरती करणार; मुख्यमंत्र्यांकडून घोषणा
Divyang Bharti 2022
Handicapped Recruitment 2022:
Chief Minister Eknath Shinde has taken a big decision for the disabled today. He has announced a separate ministry for the welfare of persons with disabilities. 2 thousand 63 people will be recruited in the Disability Welfare Department. Read More details are given below.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिव्यांगासाठी मोठा निर्णय घेतला आहे. स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालयाची घोषणा त्यांनी केली आहे. यासोबतच, या विभागात 2 हजार 63 लोकांची भरती करणार असल्याची माहिती त्यांनी दिले आहे. तसेच, खोके-खोके सरकार म्हणणाऱ्यांना जर दिव्यांगांच्या एवढे बौद्धिक डोके आले तरी खूप झाले, असा टोलाही शिंदेंनी शिवसेनेला लगावला आहे. जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
Disability Welfare Department Bharti 2022
- एकनाथ शिंदे म्हणाले की, स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग असला पाहिजे, अशी कडू यांची मागणी होती. हे सर्वसामान्य हिताचे सरकार आहे. ज्या दिवशी कारभार हाती घेतला.
- तेव्हापासून राज्यांचे हिताचे निर्णय घेत आहे. लाखो रोजगार देण्याचे काम सुरू आहे. 75 हजार शासकीय नोकऱ्या देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. तसेच, नियुक्ती करण्याचा कार्यक्रम आपण सुद्धा घेतला.
- तीन टक्के लोक अपंग आहेत. स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालय घोषणा करत आहोत. दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग केला जाईल. यामध्ये 2 हजार 63 लोकांची भरती केले जाईल.
- या विभागाला स्वतंत्र सचिवही असणार आहे. हे सरकार संवेदनशील आहे. आम्हाला भावना कळतात. 24 दिवसांत विभाग झाला आहे. हा काय छोटा मोठा निर्णय नव्हे. बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा दिव्यांगांवर प्रेम होते. केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांनी कोठेही पैसे कमी पडणार नाही, असे सांगितले आहे.
Maharashtra Disability Welfare Commissionerate Bharti 2022
मंत्रालयासाठी विकासाला 1143 कोटी दिव्यांग मंत्रालयासाठी तरतूद करण्यात आले आहेत. देशातला पहिला हा निर्णय आहे. जे दिव्यांग वर गुन्हे दाखल झाले होते राज्य सरकार गुन्हे मागे घेणार, अशीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
बच्चू भाऊ कधी खोके घेतील का, असा प्रश्न विचारत एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, खोके-खोके सरकार म्हणणाऱ्यांना जर दिव्यांगांच्या एवढे बौद्धिक डोके आले तरी खूप झाले. ज्यांनी रोखने व्यवहार केले त्यांना फक्त खोक्यांचीच भाषा समजते. तुम्ही आरोप करत रहा मात्र आम्ही कामातून उत्तर देऊ, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.
Divyang Bharti 2022: Commissionerate of Disability Welfare has invited application form for State Coordinator Posts. Job Location for these posts in Pune. Applicants age should not exceed 35 Year. This jo is on a temporary basis for 06 Basis. Eligible and Interested candidates may submit their application form to the given address before 12th August 2022. Read more details about Divyang Bharti 2022/ Divyang Recruitment 2022 like application and application address are given below.
पुणे जिल्ह्यातील सर्व नवीन जॉब्स येथे पहा
Handicapped Jobs: दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य समन्वयक या तात्पुरत्या स्वरुपाच्या (6 महिने) पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी 12 ऑगस्ट, 2022 पर्यंत लेखी अर्ज आयुक्त दिव्यांग कल्याण, चर्चरोड, पुणे-1, येथे टपालाने अथवा [email protected] या ईमेलवर पाठवावे.
Notification Details For Divyang Vacancy 2022
- शेवटची तारीख: 12 ऑगस्ट 2022
- पदाचे नाव: राज्य समन्वयक
- नोकरी ठिकाण:पुणे
- वयोमार्यदा: 35 वर्षे
- अर्ज करण्याचा इमेल पत्ता: [email protected]
- अर्ज करण्याचा पत्ता: आयुक्त दिव्यांग कल्याण, चर्चरोड, पुणे-1,
या पदासाठी शैक्षणिक अर्हता- Eligibility Criteria For Divyang Recruitment 2022
- संगणक शास्त्र/माहिती व तंत्रज्ञान यामधील पदविका/प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
- किंवा संगणक शिक्षकामधील पदवी, आणि माहिती तंत्रज्ञान संगणक या मधील नामांकित कंपनीमधील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल,
- अशी माहिती दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
Age Criteria For Handicapped Jobs 2022
- या पदासाठी उमेदवाराचे वय 35 वर्षे पूर्ण असावे, मराठी व इंग्रजी भाषेत प्रभूत्व असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालय-3, चर्चरोड, महाराष्ट्र राज्य, पुणे-400001, या पत्त्यावर किंवा 020-26126471 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.