GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

तंत्रनिकेतनमधील भरती ‘एमपीएसी’तून काढणार

तंत्रनिकेतनमधील भरती ‘एमपीएसी’तून काढणार/ Government Polytechnic Collage Recruitment 2016

शासकीय तंत्रनिकेतनातील शिक्षकांची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वेळच्या वेळी भरली जात नसल्याने, विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. रिक्त असलेली पदे तातडीने भरता यावीत, यासाठी वैद्यकीय शिक्षणाप्रमाणे ही पदेसुद्धा लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेर काढण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
तंत्रनिकेतन संस्थांमधील अध्यापकांची पदे भरली जात नसल्याने, कंत्राटी, तासिका तत्त्वावर शिक्षकांची नियुक्ती केली जाते. राज्यात मंजूर पदांपैकी नोव्हेंबर २0१५पर्यंत तब्बल ११३३ पदे रिक्त होती. न्यायालयाच्या आदेशानुसार, ४६४ कंत्राटी सेवा नियमित करण्यात आल्या. अद्याप ६६९ पदे रिक्त असून, ती भरण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील, असे विनोद तावडे यांनी तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.