Aurangabad Arogya Vibhag – वर्ग-३ व वर्ग-४ ची पदे त्वरित भरण्याचे निर्देश

Aurangabad Arogya Vibhag – Fill Vacancies in the Valley Immediately

आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती होणार

Aurangabad Ghati Specialist Hospital, Cancer Hospital needs the Medical staff. Deputy Chief Minister Ajit Pawar has instructed the State Directorate of Medical Education to immediately fill up the vacancies of Class-3 and Class-4 cadres in the Ghati (Valley), Aurangabad. All important details are given below. Candidates read the below given information carefully and keep visit us.

घाटी रूग्णालयांमधील वर्ग-३ व वर्ग-४ ची पदे त्वरित भरण्याचे निर्देश

औरंगाबाद : घाटी, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि शासकीय कर्करोग रूग्णालयातील वर्ग-३ आणि वर्ग-४ संवर्गाची रिक्त पदे त्वरित भरण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला दिले असल्याची माहिती आ. सतीश चव्हाण यांनी दिली.

 घाटी, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, कर्करोग रूग्णालयातील मंजूर पदे भरावीत, अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत मंगळवारी यासंदर्भात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोविडची परिस्थिती लक्षात घेऊन सदरील रूग्णालयांमधील वर्ग-३ व वर्ग-४ ची पदे त्वरित भरण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला दिले. तर वर्ग-१ ची पदे ‘एमपीएससी’मार्फत भरली जात असल्याने ही पदेही त्वरित भरण्याच्या सूचना एमपीएससीला दिल्या जातील, सदरील रूग्णालयांसाठी जे मंजूर बजेट आहे, ते तत्काळ वितरित करण्याच्या सूचना देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीस पालकमंत्री सुभाष देसाई, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख तसेच वित्त व वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते..
1 Comment
  1. Harshada Alhat says

    वर्ग 3 व 4 वर्ग पदासाठी requirnment

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!