मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष BA, B.Sc व BMS परीक्षेचा निकाल जाहीर

Final Year Exam Result  : Mumbai University Results 2020: मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या अंतिम वर्ष/ सत्राच्या नियमित परीक्षेतील तृतीय वर्ष बीए, बीएस्सी व बीएमएस सत्र ६ या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आजपर्यंत विद्यापीठाने ८७ परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत.आज विद्यापीठाने १३ परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत.

तृतीय वर्ष बीए सत्र ६ या परीक्षेचा निकाल ९४.७० टक्के लागला आहे. या परीक्षेत एकूण ९ हजार ७८२ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. या परीक्षेला १३ हजार ६३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १३ हजार ५३७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. तर १०० विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच ५४७ विद्यार्थी हे परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत.

तृतीय वर्ष बीएस्सी सत्र ६ या परीक्षेचा निकाल ९७.८५ टक्के लागला आहे. या परीक्षेत एकूण ८ हजार ०२५ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. या परीक्षेला १० हजार ५२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १० हजार ४४७ परीक्षेस विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. तर ७६ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच १७६ विद्यार्थी हे परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत.

तृतीय वर्ष बीएमएस सत्र ६ या परीक्षेचा निकाल ९७.५८ टक्के लागला आहे. या परीक्षेत एकूण १३ हजार १६६ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. या परीक्षेला १५ हजार ७५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १५ हजार ७०७ परीक्षेस विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. तर ४४ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच ३२७ विद्यार्थी हे परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत.

परीक्षा विभागातील निकाल कक्ष व सीसीएफ मधील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग निकाल जाहीर करण्यासाठी कार्यरत आहेत.

निकाल – http://www.mumresults.in/


मुंबई विद्यापीठाच्या बीकॉम, बीएमएम परीक्षांचे निकाल जाहीर

Final Year Exams Results 2020 Bcom, Bmm Results

मुंबई विद्यापीठाचा बीकॉम आणि बीएमएमचा निकाल जाहीर झाला आहे…

मुंबई विद्यापीठाच्या बीकॉम, बीएमएम परीक्षांचे निकाल जाहीर

 

मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२०च्या अंतिम वर्षाच्या नियमित परीक्षेतील बीकॉम आणि बीएमएमचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. बीकॉमच्या सत्र ६चा निकाल ९५.७९ टक्के, तर बीएमएमचा निकाल ९६.११ टक्के इतका लागला आहे.

बीकॉमच्या परीक्षेत एकूण ४९ हजार २९३ एवढे विद्यार्थीउत्तीर्ण झाले. या परीक्षेला ६४ हजार ७४७ एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६४ हजार १८२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, तर ५३९ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. यासह बीएमएम सत्र ६च्या परीक्षेत एकूण तीन हजार ९५७ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेसाठी एकूण चार हजार ९४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी चार हजार ९०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षांचे निकाल विद्यापीठाच्या वेबसाइटवरील http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाने प्रथमतःच सत्र ६ सह नियमित मुख्य परीक्षेच्या सर्व निकालांच्या नमुना गुणपत्रिका गुण, ग्रेड व छायाचित्रासह विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांने त्यांच्या कॉलेजच्या नावाची निवड करून आसन क्रमांक टाकल्यास ही गुणपत्रिका छायाचित्रासह पीडीएफ फॉर्मेटमध्ये उपलब्ध होणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

‘अन्य निकालही वेळेत लागणार’
मुंबई विद्यापीठाच्या सर्व नियमित आणि बॅकलॉग परीक्षांच्या निकालास सर्वोच्च प्राधान्य देऊन वेळेत निकाल जाहीर करण्यासाठी विद्यापीठाने यशस्वी नियोजन केले आहे. कॉलेजांनी वेळेत पोर्टलवर गुण उपलब्ध करून दिल्यामुळे अल्पावधीतच विद्यापीठाने हे महत्वाचे निकाल जाहीर केले आहेत. इतरही सर्व निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी विद्यापीठाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!