अग्निशमन विभागात विविध पदे!
Fire Department Bharti 2021
Fire Department Bharti 2021: In Nagpur Fire Department, 872 posts have been sanctioned in the department.The number of retired employees is increasing every month. The posts of Chief Fire Officer (1), Deputy Chief Fire Officer (1) and Divisional Fire Officer (2) are vacant. Read Details on Fire Department Bharti 2021 at below:
अग्निशमन विभागात विविध पदे!
मनपाच्या ९ फायर स्टेशनची जबाबदारी १९० कर्मचारी व अधिकाऱ्यांवर आहे. आकृतिबंधानुसार विभागात ८७२ पदे मंजूर आहे. सध्या ६८२ पदे रिक्त आहेत.त्यात दर महिन्याला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. यात मुख्य अग्निशमन अधिकारी(१)उपमुख्य अग्निशमन अधिकारी (१), विभागीय अग्निशमन अधिकारी (२) पदे रिक्त आहे.
सहायक विभागीय अग्निशमन अधिकाऱ्याच्या ४ पैकी २ पदे, अग्निशमन केंद्र अधिकारी १५ पैकी १४,सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी ३९ पैकी ३५ उपअग्निशमन केंद्र अधिकारी ३९ पैकी २८ प्रमुख अग्निशमन विमोचक ८१ पैकी ४०, चालक-यंत्र चालकांच्या १६२ पैकी ९३ वाहन चालक १०पैकी १०, अग्निशामक विमोचक ५०० पैकी ४४० , फीटर कम ड्रायवरच्या १५ पैकी ९ पदे ºरिक्त आहेत…..
तरतुदीपैकी २८.९६ टक्के खर्च
अग्निशमन विभागासाठी वर्ष २०१९-२० या वर्षात अर्थसंकल्पात ३७ कोटींची तरतूद करण्यात आली होती. परंतु १०.७१ कोटी खर्च झाले. मागील सहा वर्षात सर्वात कमी रक्कम खर्च केली. वर्ष २०१६-१७ मध्ये २८.७२ कोटींच्या तरतुदीपैकी १८.०२ कोटी खर्च झाले. त्यानंतर तरतूद व खर्च यातील अंतर मोठे होते. दुर्दैवाने या विभागासाठी कमी तरतूद केली जाते. अग्निशमन विभागासाठी वर्ष २०१३-१४ मध्ये फक्त १.३७ टक्के तरतूद होती. वर्ष २०१४-१५ मध्ये १.३१ टक्के, वर्ष २०१५-१६ मध्ये १.१७ टक्के, वर्ष २०१६-१७ व वर्ष २०१७-१८मध्ये १.४० टक्के, वर्ष २०१८-१९ मध्ये १.१२ व वर्ष २०१९-२० मध्ये १.१५ टक्के तरतूद करण्यात आली.
सोर्स: लोकमत
Diploma in fire engineering and safety management