Fire Department – मुंबई अग्निशमन दलामध्ये ९०२ फायरमन भरती पुढील महिन्यात

Fire Department Bharti 2022

As per latest information regarding the Firemen Bharti in Mumbai Fire department is that the Mumbai Fire Brigade will recruit 902 firemen in next month. Also, this mega recruitment will be for 902 people through direct interview and the actual recruitment process will start within the next month. Under the Mega Bharti 30% (Thirty percent)of the seats are reserved for women. Complete details regarding the recruitment is given below. We provide the further details of this recruitment process on this page. So keep visit us for the further updates.

Pune Fire Brigade Bharti-पुणे अग्निशामक दलात भरती प्रकिया सुरू; 1 हजार 700 जवानांची गरज

Nashik Fire Brigade Bharti -नाशिक अग्निशामक दलात २०९ फायरमन पदे रिक्त

मुंबई अग्निशमन दलात मेगाभरती – ९०२ पदे भरणार

  1. मुंबई अग्निशमन दलामध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी पदभरती होणार असून त्याबाबतच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांची मंजुरी मिळाली आहे. थेट मुलाखतीने ९०२ जणांची मेगाभरती होणार असून पुढील महिन्याभरात प्रत्यक्षात भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
  2. त्यामुळे मुंबई अग्निशमन दलाचे बळ आणखी वाढणार आहे. मुंबई अग्निशमन दलामध्ये ९०२ फायरमनच्या जागा भरण्यात येणार आहेत. सहा महिन्यांपूर्वी अग्निशमन दलाने पाठवलेल्या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. त्यात ३० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मागील ५ वर्षांपासून अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया रखडल्याने कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत होती.
  3. मुंबई अग्निशमन दलात २०१७ मध्ये ७५० कर्मचाऱ्यांची शेवटची भरती झाली होती. त्यानंतर गेल्या पाच वर्षात एकाही कर्मचाऱ्याची नव्याने भरती झाली नाही. अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा बढतीने भरण्यात येत असल्या, तरी कर्मचाऱ्यांच्या शेकडो जागा रिक्त होत्या. त्यामुळे मुंबईतील वाढत्या आगीच्या किंवा इतर आपत्कालीन समस्यांचा सामना करण्यात अनेक अडचणी येत होत्या.
  4. कर्मचाऱ्यांचा तुटवडा लक्षात घेता महापालिका आयुक्तांकडे पदभरतीचा प्रस्ताव पाठवला होता. आयुक्तांनी या प्रस्तावास मान्यता दिल्याने मेगाभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदा अग्निशमन दलामध्ये होणारी भरती ही थेट मुलाखतीने होणार आहे. यापूर्वी अग्निशमन दलात भरती प्रक्रियेसाठी टाटा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केली जात होती. या वेळी मात्र भरती प्रक्रिया लवकर संपवायची असल्याने इतर बाबींना फाटा देऊन अग्निशमन दलाकडूनच शारीरिक चाचणी आणि थेट मुलाखत घेऊन पुढील महिन्यात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
  5. २७० जागा महिलांसाठी राखीव – अग्निशमन दलाच्या मेगाभरती मध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहे. त्यानुसार एकूण ९०२ जागांपैकी २७० जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. त्यामुळे महिलांना ही मोठी संधी प्राप्त होणार आहे. सध्या दलात केवळ १०८ महिला कर्मचारी आहेत. त्यात आता २७० महिलांची भर पडणार असल्याने त्यांची संख्या पावणेचारशेच्या पुढे जाणार आहे.
  6. केंद्र वाढले; कर्मचारी नाही – सध्या मुंबईत ३५ अग्निशमन दल केंद्रे आहेत. यापैकी ४ केंद्रे ही मागील पाच वर्षांत उभारण्यात आली आहेत. मुंबई अग्निशमन दलामध्ये नवी केंद्र सुरू करण्यात आली, तरी त्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती न केल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांनावरच नव्या केंद्राची देण्यात आली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण आला होता.
  7. २० टक्के कर्मचाऱ्यांचा तुटवडा – मुंबईत ३५ अग्निशमन केंद्रांमध्ये साधारणतः २८०० अधिकारी आणि कर्मचारी वर्ग आहे. मुंबई शहराचा आवाका पाहता साधारणतः २५ टक्के कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. दर महिन्याला ३० ते ४० अधिकारी-कर्मचारी निवृत्त होतात. त्यातील अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा बढती प्रक्रियेने भरल्या गेल्या; मात्र फायरमनसारख्या महत्त्वाच्या जागा रिक्त राहिल्याने प्रत्येक केंद्रावर साधारणता २० टक्के कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

मुंबई अग्निशमन दलामध्ये सर्वात मोठी भरती प्रक्रिया प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे; मात्र त्यात काही सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. त्यानुसार आवश्यक ते बदल करण्यात आले असून पुढील महिन्याभरात भरतीचा मार्ग मोकळा होईल.

– हेमंत परब, मुख्य अग्निशमन अधिकारी

अग्निशामक दलाच्या पदभरतीचा मार्ग मोकळा

Fire Department Vibhag 2022 Latest update of Pune Mahanagarpalika is that there are 527 vacancies in Pune Fire Department. The way was cleared for the recruitment of Fire Department in Pune division. There are 28 different types of posts in the Pune Fire Brigade. Of these, six posts of Director (Vehicle), Senior Radio Technician, Superintendent, Deputy Superintendent and Peon have been filled to full capacity, with only seven working. While 903 seats are available for the remaining 22 posts, there are currently 393 employees and 510 vacancies. Read the complete detail below given on this page and keep visit us.

  1. पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाचा आकृतिबंध निश्‍चीत झालेला असला तरी सेवा प्रवेश नियमावलीला राज्य शासनाकडून मान्यता मिळत नव्हती. अखेर सुमारे चार वर्षानंतर ही नियमावली मंजूर केल्याने या अत्यावश्यक विभागात पदभरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याबाबत नगरविकास विभागाने आदेश काढला आहे. सध्या या विभागातील तब्बल ५५ टक्के म्हणजे ९०३ पैकी ५१० जागा रिक्त आहेत. शहरात लागणाऱ्या आगीमुळे पुणेकरांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे, लाखो रुपयांचे नुकसान होऊन व्यावसायिक देशोधडीला लागत आहेत. शहराची हद्द, लोकसंख्या, इमारती, बाजारपेठ वाढत असताना नागरिकांच्या सुरक्षेच्या उपाय योजना करणे गरजेचे आहे.
  2. आगीच्या घटना घडल्यानंतर अग्निशामक दलावरील जाण कमी व्हावा यासाठी पुरेसे व प्रशिक्षित मनुष्यबळ असणे गरजेचे आहे. पण पुणे महापालिकेकडील पदे रिक्त असल्याने सध्याच्या मनुष्यबळावर ताण येत आहे. अग्निशामक दलातील अधिकारी व कर्मचारी यांची भरतीसाठी ‘आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियमावली’ अग्निशमन सेवा संचालनालयाने मार्च २०१८ मध्ये तयार केली. पण गेल्या तीन वर्षापासून नगरविकास खात्याने त्यास मान्यता दिली नाही. त्यामुळे पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलातील भरती रखडली आहे. सध्या अग्निशामक दलामध्ये विविध प्रकारची २८ पदे आहेत. त्यापैकी कार्यदेशक (वाहन), सिनिअर रेडिओ टेक्निशियन, अधिक्षक, उप अधिक्षक आणि शिपाई ही सहा पदे पूर्ण क्षमतेने भरलेले असून, तेथे केवळ सात जणच कार्यरत आहेत. उर्वरित २२ पदांसाठी ९०३ जागा उपलब्ध असल्या तरी तेथे सध्या ३९३ जण काम करत असून, ५१० जागा रिक्त आहेत.
  3. पदोन्नतीलाही गती येणार – सेवा प्रवेश नियमावलीत मुख्य अग्निशामक अधिकारी १०० टक्के पदोन्नतीने पद भरता येणार आहे. तर उप मुख्य अग्निशामक अधिकारी हे पद ५० टक्के पदोन्नतीने, तर विभागीय अग्निशमन अधिकारी , सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी, उप अग्निशमन अधिकारी, यंत्र चालक या पदांपैकी ७५ टक्के पदे पदोन्नतीने भरली जाणार आहेत. तर काही पदे १०० टक्के पदोन्नतीने भरता येणार आहेत. त्यामुळे सध्या कार्यरत असलेले कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून पदोन्नतीसाठी प्रतिक्षेत होते, त्यांनाही न्याय मिळणार आहे.

Vacancy Details in PMC Fire Department / रिक्त असलेली प्रमुख पद

  1. तांडेल – ४७
  2. फायरमन – १९८
  3. यंत्रचालक – १५२
  4. रुग्णवाहिका चालक – ३७
  5. उप अग्निशमन अधिकारी – १७
  6. सहाय्यक अग्निशमन अधिकारी – १८

पुणे विभागात अग्निशमन विभागात ५२७ जागा

Pune Vibhag Fire Department Bharti 2022


Fire Department Bharti 2022: The Mumbai Fire Brigade has demanded that the recruitment process should not be given to any agency while the fire brigade administration should carry out the process while demanding that the recruitment process for the vacant posts of firefighters in the fire brigade of Mumbai Municipal Corporation should include written test and other necessary conditions.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलातील अग्निशामकच्या रिक्त पदांच्या सरळसेवा भरती प्रक्रियेत लेखी चाचणी परीक्षेसह इतर आवश्यक अटी-शतींचा आवर्जून समावेश करण्यात यावा, अशी मागणी करतानाच भरतीप्रक्रिया कोणत्याही एजन्सीकडे देण्यात येऊ नये तर अग्निशमन दल प्रशासनाने ही प्रक्रिया पार पाडावी यावर मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेने जोर दिला आहे.

Eligibility Criteria For Fire Department Bharti 2022

  • अग्निशामक पदाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील लेखी चाचणी परीक्षा यासाठी होणे आवश्यक आहे.
  • त्याचप्रमाणे हा उमेदवार बारावी पास असावा मात्र यासाठी बारावीची ५० टक्क्यांची शैक्षणिक अट नसावी.
  • उंची मर्यादा १७२ सेमीऐवजी पुरुष १६५ आणि स्त्री १५५ सेमी याप्रमाणे गणवेशधारी पोलीस, मनपा सुरक्षारक्षक खाते इत्यादीप्रमाणे असावी.
  • अग्निशमन दलासाठी आवश्यक असलेल्या ड्रायव्हिंग लायसन्स, एसएफटीसी कोर्स, स्विमिंग इत्यादी सर्व प्रमाणपत्रांना सारखे बोनस गुण असावेत.
  • सर्वात महत्वाचे म्हणजे भरती प्रक्रिया कोणत्याची एजन्सीकडे देण्यात येऊ नये. अग्निशामक दल सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. 

Fire Department Bharti 2022: The fire brigade will soon be recruiting 100 posts. A fire station will be set up soon at the reserved place in Vathoda area. Considering the need to increase the capacity of the fire brigade, a big decision has been taken to recruit 100 personnel. Read More details regarding Fire Department Bharti 2022 are given below.

 

शहराचा वाढता विस्तार व लोकसंख्या विचारात घेता वाठोडा परिसरातील आरक्षित जागेवर लवकरच अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. केंद्रामुळे या भागातील नागरिकांना अग्निशमन सेवा उपलब्ध होणार आहे. अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागातर्फे अग्निशमन सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने गुरुवारी मनपा मुख्यालयातील हिरवळीवर आयोजित अग्निशमन सेवा दिवस कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली.


Fire Department Recruitment 2022-The fire brigade of the corporation will soon have a permanent recruitment of 900 firemen. For this recruitment, it is necessary to have passed 12th from any branch and after written examination, field test, medical test, this fireman will be selected on merit. Chief Fire Brigade Hemant Parab informed that the recruitment process is underway. The process of filling up the vacancies in the fire brigade as soon as possible is underway at the fire brigade level. The actual recruitment process will start in May or June. 30 per cent women will have reservation in recruitment. If female candidates are not eligible then the recruitment will be done from the male group. Read More details as given below. (Fire Department Bharti 2022)

Fire Department -अग्निशमन दलात 900 फायरमन पदांची भरती लवकरच

मुंबई पालिकेच्या अग्निशमन दलात लवकरच 900 फायरमनची कायमस्वरूपी भरती होणार आहे. या भरतीसाठी कुठल्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून लेखी परीक्षा, मैदानी चाचणी, मेडिकल टेस्टनंतर मेरिटवर या फायरमनची निवड होणार आहे. या भरतीसाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती प्रमुख अग्निशमन दल हेमंत परब यांनी दिली.

मुंबई पालिकेच्या अग्निशमन दलात 2600 अधिकारी-कर्मचारी आहेत. आगीसह कोणत्याही दुर्घटनेत मुंबईकरांचा जीव वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात. त्यामुळे अग्निशमन दलातील जवानांची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याची कार्यवाही अग्निशमन दलाच्या पातळीवर सुरू आहे. मे किंवा जून महिन्यात या भरतीबाबत प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होणार आहे. लेखी परीक्षा, मैदानी परीक्षेतील गुणांच्या आधारावर ही भरती होणार असून हेवी ड्रायव्हिंग लायसन्सचे गुणही मिळणार आहेत. ऑगस्ट 2016 नंतर ही भरती होत असल्यामुळे रोजगाराची संधी आणि अग्निशमन दलात नोकरी करून शौर्य गाजवण्याची संधीही उमेदवारांना मिळणार आहे.

 

Fire Department Bharti 2022

सहा महिन्यांचे प्रशिक्षण

  • 900 पदांच्या या भरतीसाठी हजारो अर्ज येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जाहिरातीनंतर ऑनलाइन करणाऱया उमेदवारांची टाटा कन्सलटन्सीकडून ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
  • यामध्ये पात्र ठरणाऱया उमेदवारांमधून मैदानी चाचणीसाठी उमेदवार निवड केले जातील. यानंतर मेडिकल चाचणीत पात्र ठरणाऱया उमेदवारांमधून मेरिटवर अंतिम निवड केली जाईल.
  • भरतीमध्ये 30 टक्के महिलांना आरक्षण असेल. यामध्ये महिला उमेदवार पात्र ठरले नाहीत तर पुरुष गटातून पात्र उमेदवारांची ही भरती केली जाईल.
  • यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना सहा महिन्यांचे ट्रेनिंग दिले जाईल. अग्निशमन दलाच्या मरोळ, वडाळा, बोरिवली प्रशिक्षण केंद्रांवर हे ट्रेनिंग होईल.

Fire Department Bharti 2022-In Pune Fire Department, there are various vacancies are vacant. At present only 383 employees are working in 14 centers operating in the city and 510 posts are vacant. An insufficient number of personnel puts extra work stress on them. Inadequate centers and manpower shortages are major concerns for the fire brigade.

Fire Department Bharti 2022: नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमुळे हद्द वाढ झालेल्या पुणे शहराला ७३ अग्निशमन केंद्रांची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत केवळ १४ अग्निशमन केंद्रांवर शहराच्या अग्निसुरक्षेची जबाबदारी आहे,’ अशी माहिती पुणे अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दिली.

सध्या शहरात कार्यान्वित असणाऱ्या १४ केंद्रांवर केवळ ३८३ कर्मचारी कार्यरत आहेत आणि ५१० पदे रिक्त आहेत. जवानांची संख्या अपुरी असल्याने त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण येतो. अपुरी केंद्रे आणि मनुष्यबळाची कमतरता, हा अग्निशमन दलासाठी चिंतेचा विषय ठरला आहे.

नवीन गावांच्या समावेशामुळे येत्या काळात अग्निशमन दलाच्या कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे; मात्र, अग्निशमन दलाची सध्याची यंत्रणा अपुरी पडत असताना, नवीन भार उचलण्यासाठी दलाचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे,’ असे मत पुणे अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी व्यक्त केले.


Pune Fire Department 2021 for various posts is still vacant. As per the news Fire Department under the Pune Municipal Corporation having 57% vacant Posts from last 3.5 yrs. A proposal for recruitment regulations by the Directorate of Fire Services to fill these posts is pending with the state government. In March 2018, the Directorate of Fire Services prepared the Adarsh Shared Service Admission Rules for the recruitment of officers and staff of the Fire Brigade. But after three and a half years, the rules have not been paid.

महापालिकेच्या अग्निशमन दलात तब्बल ५५ टक्के जागा रिक्त असून, ही पदे भरण्यासाठी अग्नीशमन सेवा संचालनालयाने पदभरतीच्या नियमावली चा प्रस्ताव राज्य सरकार कडे प्रलंबित आहे. अग्निशामक दलातील अधिकारी व कर्मचारी यांची भरती करण्यासाठी आदर्श सामायिक सेवा प्रवेश नियमावली आग्निशामन सेवा संचालनाल याने  मार्च २०१८ मध्ये तयार केली. पण साडेतीन वर्ष उलटून गेली तरी या नियमावलीला मजुरी मिळाली नाही.

अग्निशामन दलात ९१० पदे आहेत, त्यापैकी ५२७ पदे रिक्त आहेत. गेल्या वर्षभरात सिरम इन्स्टिटयूट फॅशन स्ट्रीट येथे मोठ्या आगीच्या घटना घडून गेल्या आहेत.


Pune Fire Department 2021: Pune Municipal Fire Department there is 55% posts are vacant. The regulations for the recruitment of these posts have been sent to the Government for approval and the proposal has been pending with the Urban Development Department for years.

पुणे  महापालिकेच्या अग्निशमन दलात तब्बल ५५ टक्के जागा रिक्त

Updated on 09.11.2021: महापालिकेच्या अग्निशमन दलात तब्बल ५५ टक्के जागा रिक्त असून, ही पदे भरण्यासाठी अग्नीशमन सेवा संचालनालयाने भरती नियमावलीला मंजूरी मिळावी यासाठी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवून साडे तीन वर्ष झाली आहेत. मात्र, अद्यापही त्यास मंजूरी मिळालेली नाही. त्यामुळे पुणे महापालिकेतील पदभरती रखडली असून, ही नियमावली त्वरीत मंजूर करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

नगर जिल्हा रुग्णालयातील अग्निकांडानंतर अग्निसुरक्षा हा विषय ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत व घडल्या तरी त्यात जिवतनाही होऊ नये यासाठी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीचे अग्निशमन दल मनुष्यबळासह सुसज्ज असणे आवश्‍यक आहे याकडे लक्ष वेधत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पदभरतीची मागणी केली आहे.

अग्नीशामक दलातील अधिकारी व कर्मचारी यांची भरती करण्यासाठी आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियमावली अग्नीशमन सेवा संचालनालयाने मार्च २०१८ मध्ये तयार केली. ही नियमावली नगरविकास मंत्रालयाकडे मंजुरीसाठी सादर केली होती. पण साडे तीन वर्षे उलटून गेली तरी या नियमावलीला मंजूरी मिळाली नाही. त्यामुळे पुणे महापालिकेच्या अग्नीशामक दलातील भरती रखडली आहे.

पुण्यातील अग्नीशमन दलात ९१० पदे आहेत, त्यापैकी ५२७ पदे रिक्त आहेत. गेल्या वर्षभरात शहरात सिरम इन्स्टिट्यूट , फॅशन स्ट्रीट येथे मोठ्या आगीच्या घटना घडून गेल्या आहेत. शहराचा विस्तार होत असताना लोकसंख्याही वाढत आहे. महापालिकेने मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला तरी त्यास अद्याप मंजूरी दिलेली नाही. निमावलीची मंजूरी प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.


पुणे पालिकेच्या अग्निशमन दलात ५५ टक्के पदे रिक्त

Fire Department Bharti 2022 :पुणे  पालिकेच्या अग्निशमन दलात ५५ टक्के पदे रिक्त आहेत. या पदांच्या भरतीसाठीची नियमावली मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आले असून नगरविकास विभागाकडे हा प्रस्ताव वर्षा़पासून प्रलंबित आहे.

पुणे आणि परिसरात आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. दोन महिन्यांपूर्वी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली होती. या आगीत पाच जणांना प्राण गमवावे लागले होते. फॅशन स्ट्रीटवर भीषण आग लागून कोट्यावधी रुपयांची हानी झाली आहे. या घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे, फायर सेफ्टी ऑडीट करणे व आगीच्या घटना घडल्या तरी कमीतकमी हानी व्हावी यासाठी पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले जाते.


Agnishamak Bharti Nagpur 2021: In Nagpur Fire and Emergency Service Department there is various 60% posts are vacant. This has adversely affected the functioning of this department. The state government was pursuing the matter to get the recruitment sanctioned. Finally, the government has approved the filling and promotion of the posts of Chief Fire Extinguisher, Fire Extinguisher and Chief Mechanic cum Driver.

अग्निशामक विभागातील पदभरतीला शासनाची मंजुरी

नागपुरात पदभरतीसाठी अग्निशमन समितीने ठराव मंजूर करून मनपा सभागृहाला पाठविला होता. सभागृहाच्या मंजुरीनंतर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यावर आता शासनाच्या नगरविकास विभागाच्या १८ मार्च, २०२१ च्या शासन निर्णयानुसार मान्यता दिलेली आहे.

नागपूर महापालिकेच्या अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागात विविध  ६० टक्के पदे रिक्त आहेत. यामुळे या विभागाच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. पदभरतीला मंजुरी मिळावी, यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर प्रमुख अग्निशामक विमोचक, अग्निशामक विमोचक व मुख्य मेकॅनिक कम ड्रायव्हर ही पदे भरण्याला व पदोन्नतीला शासनाने मंजुरी दिली आहे. पदभरतीसाठी अग्निशमन समितीने ठराव मंजूर करून मनपा सभागृहाला पाठविला होता. सभागृहाच्या मंजुरीनंतर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यावर आता शासनाच्या नगरविकास विभागाच्या १८ मार्च, २०२१ च्या शासन निर्णयानुसार मान्यता दिलेली आहे. या संदर्भातील पुढील माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.


As per the Latest News The way forward for recruitment of fire department has been cleared. Currently, it is understood that about 80% of the posts are vacant as per the city’s expansion. Candidates are expecting this big recruitment to start soon.

नागपूर  महापालिकेतील अग्निशमन या आणीबाणी सेवा विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या सेवा प्रवेश नियमात बदल करण्याला मनपा सभेत २०१७ ला मंजुरी देण्यात आली होती. हा ठराव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. 

या ठरावाला शासनाची मंजुरी नसल्याने विभागाला सरळ सेवा भरतीचा प्रक्रिया मागील काही वर्षांपासून बंद असल्याने विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. ही पदे भरता यावीत, यासाठी एम्प्लॉईस असोसिऐशनने शासनाकडे व पालकमंत्राकडे वेळोवेळी पुरवठा केला. अखेर या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आहे.


There are a total of 665 posts in the fire brigade. Of these, 158 posts are vacant. However, due to lack of experienced drivers, 54 contract drivers will be hired for two years. A proposal has been tabled in the Standing Committee to fill 54 posts of drivers on contract basis for light vehicles such as jeeps and motor vehicles in the fire brigade.There are not enough drivers available at the time of an accident after the trained mechanics of the force are hired to drive jeeps and motor vehicles. Therefore, the corporation has decided to hire drivers for light vehicles such as jeeps and motor vehicles on a contract basis

 

Updated 12.02.2021:: अग्निशमन दलात जीप, मोटरगाडी अशी हलकी वाहने चालविण्यासाठी ५४ वाहनचालक कंत्राटी पद्धतीने घेण्याचा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. शिवसेनाप्रणीत कामगार संघटनेपाठोपाठ आता ‘मुंबई फायर सव्‍‌र्हिसेस युनियन’नेही या कंत्राटाला विरोध केला आहे. सेवाशर्तीमध्ये परस्पर बदल करण्याचा हा निर्णय म्हणजे औद्योगिक कलह कायद्याचा भंग असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. तसेच या प्रकरणी संघटनेने कामगार आयुक्तांकडे दाखल केले आहे. यंत्रचालकांची पदे पदोन्नतीनेच भरावीत, अशीही मागणी त्यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

अग्निशमन दलात जीप व मोटरगाडय़ा आदी हलकी वाहने चालवण्यासाठी वाहनचालकांची ५४ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. मात्र या विषयावरून कामगार संघटनांनी आधीच आपला विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे. कामगार सेनेच्या विरोधानंतर हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मागील बैठकीत राखून ठेवण्यात आला. दरम्यान, आता दुसऱ्या संघटनेनेही या प्रस्तावाला विरोध के ला आहे. रिक्त पदे पदोन्नतीने न भरता कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी परस्पर सेवा शर्तीमध्ये बदल करणे हा औद्योगिक कलह कायद्याचा भंग असून याबाबत आम्ही कामगार आयुक्तांकडे दाद मागणार आहोत, असे ‘मुंबई फायर सव्‍‌र्हिसेस युनियन’चे सरचिटणीस रमाकांत बने यांनी सांगितले.

अग्निशमन दलात ६६५ यंत्रचालकांची पदे आहेत. त्यापैकी ५०७ पदे भरलेली असून १५८ पदे रिक्त आहेत. ही पदे अग्निशमन संवर्गातून विहीत अर्हता धारण करणाऱ्या अग्निशामक जवानांमधून पदोन्नतीने भरण्यात येतात. या पदासाठी इच्छुक अग्निशामकाने अग्निशामक दलात किमान पाच वर्षे काम के ल्याचा अनुभव व एक वर्षे जड वाहन चालवण्याचा वैध परवाना असणे आवश्यक आहे. दलात किमान १०० कर्मचारी ही अर्हता प्राप्त करणारे आहेत, तर ३०० जवानांकडे जड वाहन चालवण्याचा परवाना आहे, असा दावा बने यांनी के ला आहे. हे जवान पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असून पदोन्नती न मिळाल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचेही बने यांचे म्हणणे आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी संघटनेचा दावा फे टाळून लावला आहे.

दलातील प्रशिक्षित यंत्रचालक जीप व मोटरगाडय़ा चालवण्यासाठी नियुक्त के ल्यानंतर दुर्घटनेच्या वेळी पुरेसे यंत्रचालक उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे पालिके ने जीप व मोटरगाडय़ा अशा हलक्या वाहनांसाठी कंत्राटी पद्धतीने चालक नेमण्याचे ठरवले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.


Fire Department Bharti 2021: While the dispute over the privatization of BEST has started, the Mumbai Municipal Corporation will now hire a contract driver to operate small vehicles and ambulances in the fire brigade. A sum of Rs 3 crore 99 lakh will be spent to fill 54 contract drivers and the appointment will be for two years.

अग्निशमन विभागात कंत्राटी पद्धतीने चालकांची भरती

Updated 06.02.2021: बेस्टच्या खासगीकरणावरुन वाद सुरु असताना मुंबई महानगर पालिका आता अग्निशमन दलातील लहान वाहाने आणि रुग्णवाहीका चालविण्यासाठी कंत्राटी चालक भरणार आहे. 54 कंत्राटी चालक भरण्यासाठी 3 कोटी 99 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून दोन वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात येणार आहे.

अग्निशमन दलाच्या जिप, रुग्णवाहीका चालविण्यासाठी ही भरती करण्यात येणार आहे. अग्निशमन दलात चालकांची 665 पदं मंजूर आहेत. यातील 158 पदं रिक्त आहेत. हे कायमस्वरुपी चालक प्रशिक्षीत असून त्यांना पाच वर्षांचा अग्निशमन जवाना पदाचाही अनुभव असतो. अशा चालकांकडून हलकी वाहाने चालवून घेतल्यास बंब तसेच आपत्ती काळात वापरली जाणारी अवजड वाहाने चालविण्यासाठी मनुष्यबळ कमी पडते. त्यामुळे अग्निशमन दलाने हलकी वाहने चालविण्यासाठी कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता.या नियुक्तींचा प्रस्ताव पुढील आठवड्यात होणाऱ्या स्थायी समA4तीच्य%A पटलावर मांडण्यात आला आहे. ही नियुक्ती खासगी कंपनीमार्फत करण्यात येणार आहे.

अग्निशमन दलाच्या पुर्णवेळ चालकांना वेतन आयोगानुसार वेतन असते. त्यात त्यांचा ओव्हरटाईम आणि इतर भत्यांमुळे वेतन वाढते. तसेच, त्यांना वैद्यकिय, अपघात सुविधाही पुरवल्या जातात. या सर्व खर्चाला कात्री लावण्यासाठी अग्निशमन दल हे पाऊल उचलत असल्याची शक्यता आहे. मात्र, अग्निशमन दलाचे चालकही आपत्तीच्या ठिकाणी स्वत:चा जिव धोक्यात घालून काम करत असतात, त्यामुळे या कंत्राटी चालकांना कोणत्या सुविधा मिळणार असा प्रश्‍नही आहेच.

कंत्राटीकरणाकडे वाटचाल (Contract Basis Bharti 2021)

बेस्टने कंत्राटी बसेस घेतल्याचा वाद सध्या सुरु आहे. यापुर्वी महानगर पालिकेने अनेक कार्यालयात ‘हाऊस किंपींग’च्या नावाखाली कंत्राटी भरती सुरु केली आहे. महापालिका मुख्यालयातही कंत्राटी ‘हाऊस किपींग’कामगार नियुक्त केले आहेत. त्याबरोबर उपनगरात सुरु होणाऱ्या नव्या वैद्यकिय अभ्यासक्रमासाठीही कंत्राटी वैद्यकिय प्राध्यापक नियुक्त करण्यात येणार असल्याची घोेषणा अर्थसंकल्पीय भाषणात करण्यात आली आहे. तसेच,रुग्णालयातील कारकुनांच्या जागा भरुन काढण्यासाठी कंत्राटी भरती करण्यासाठी निवीदा मागविण्यात आल्या आहेत. तर, गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेने कंत्राटी सफाई कामगार नियुक्त केले आहे.


Fire Department Bharti 2021

Fire Department Bharti 2021: In Nagpur Fire Department, 872 posts have been sanctioned in the department.The number of retired employees is increasing every month. The posts of Chief Fire Officer (1), Deputy Chief Fire Officer (1) and Divisional Fire Officer (2) are vacant. Read Details on Fire Department Bharti 2021 at below:

अग्निशमन विभागात विविध पदे!

मनपाच्या ९ फायर स्टेशनची जबाबदारी १९० कर्मचारी व अधिकाऱ्यांवर आहे. आकृतिबंधानुसार विभागात ८७२ पदे मंजूर आहे. सध्या ६८२ पदे रिक्त आहेत.त्यात दर महिन्याला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. यात मुख्य अग्निशमन अधिकारी(१)उपमुख्य अग्निशमन अधिकारी (१), विभागीय अग्निशमन अधिकारी (२) पदे रिक्त आहे.

सहायक विभागीय अग्निशमन अधिकाऱ्याच्या ४ पैकी २ पदे, अग्निशमन केंद्र अधिकारी १५ पैकी १४,सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी ३९ पैकी ३५ उपअग्निशमन केंद्र अधिकारी ३९ पैकी २८ प्रमुख अग्निशमन विमोचक ८१ पैकी ४०, चालक-यंत्र चालकांच्या १६२ पैकी ९३ वाहन चालक १०पैकी १०, अग्निशामक विमोचक ५०० पैकी ४४० , फीटर कम ड्रायवरच्या १५ पैकी ९ पदे ºरिक्त आहेत…..

तरतुदीपैकी २८.९६ टक्के खर्च
अग्निशमन विभागासाठी वर्ष २०१९-२० या वर्षात अर्थसंकल्पात ३७ कोटींची तरतूद करण्यात आली होती. परंतु १०.७१ कोटी खर्च झाले. मागील सहा वर्षात सर्वात कमी रक्कम खर्च केली. वर्ष २०१६-१७ मध्ये २८.७२ कोटींच्या तरतुदीपैकी १८.०२ कोटी खर्च झाले. त्यानंतर तरतूद व खर्च यातील अंतर मोठे होते. दुर्दैवाने या विभागासाठी कमी तरतूद केली जाते. अग्निशमन विभागासाठी वर्ष २०१३-१४ मध्ये फक्त १.३७ टक्के तरतूद होती. वर्ष २०१४-१५ मध्ये १.३१ टक्के, वर्ष २०१५-१६ मध्ये १.१७ टक्के, वर्ष २०१६-१७ व वर्ष २०१७-१८मध्ये १.४० टक्के, वर्ष २०१८-१९ मध्ये १.१२ व वर्ष २०१९-२० मध्ये १.१५ टक्के तरतूद करण्यात आली.

सोर्स: लोकमत

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
3 Comments
  1. SHUBHAM RUPESH PADADUNE says

    application form kute bharaycha ani kute submit karaycha

  2. Dipashri Belsare says

    Hello sir

  3. Akshay Bhapkar says

    Diploma in fire engineering and safety management

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!