FYJC Online: प्राधान्य फेरीचे वेळापत्रक जाहीर

FYJC Online Admission 2021

FYJC Online Admission 2021: There are around one and a half lakh vacancies in junior colleges in Mumbai and metropolitan areas. About 15,000 students are still without admission. Admission rounds have been started on a first come first served basis for admission to these seats.

FYJC Online: प्राधान्य फेरीचे वेळापत्रक जाहीर

मुंबई आणि महानगर परिसरातील ज्युनिअर कॉलेजांत अकरावीच्या जवळपास सव्वा लाख जागा रिक्त आहेत. तर सुमारे १५ हजार विद्यार्थी अद्याप प्रवेशाविना आहेत. या जागांवरील प्रवेशासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर प्रवेशफेरी सुरू करण्यात आली आहे.

अकरावीच्या तीन नियमित आणि दोन विशेष फेऱ्या अशा एकूण पाच फेऱ्यांनंतर मुंबई आणि परिसरातील कॉलेजांमध्ये एक लाख ९६ हजार १३६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राधान्य फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरीसाठी मुंबई आणि महानगर परिसरातील ज्युनिअर कॉलेजांमध्ये अकरावीच्या एक लाख २४ हजार २५४ जागा उपलब्ध आहेत. बुधवारपासून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार नऊ टप्प्यांत या फेरीतील प्रवेश करण्यात येणार आहेत. आतापर्यंत प्रवेश न मिळालेले विद्यार्थी, अर्ज न केलेले विद्यार्थी किंवा प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडलेले, मिळालेले प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी या फेरीत सहभागी होऊ शकतील. अकरावीला प्रवेश घेण्याची ही शेवटची संधी असणार आहे.

प्रवेश प्रक्रिया कशी?

  • १३ ते १५ जानेवारी – ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी
  • १६ ते १८ जानेवारी – ८० ते १०० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी
  • १९ आणि २० जानेवारी – ७० ते १०० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी
  • २१ आणि २२ जानेवारी – ६० ते १०० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी
  • २३ ते २५ जानेवारी – ५० ते १०० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी
  • २७ आणि २८ जानेवारी – दहावी उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी
  • २९ आणि ३० जानेवारी – एटीकेटी मिळालेले विद्यार्थी
सोर्स: म. टा.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!