FYJC Admission -अकरावी प्रवेशासाठी अर्ज करण्यास सुरुवात

FYJC Online Admission [email protected]

FYJC Online Admission 2022-The eleventh admission process in Pune and Pimpri Chinchwad Municipal Corporation has started from today (23rd). Students will be able to practice filling online application form from 23rd to 27th May. The education department has clarified that the first part of the admission application will be filled from next May, and the second part of the admission application will be filled after the results of the 10th examination are declared.

11th Admission- अकरावी एडमिशन साठी लागणारी कागदपत्रे

अकरावी प्रवेशास सुरुवात

पुणे  व पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील अकरावी प्रवेश प्रक्रियेस आज  सोमवारपासून (दि. २३) सुरुवात झाली आहे, विद्यार्थ्यांना २३ ते २७ मे या कालावधीत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे. येत्या मेपासून प्रवेश अर्जाचा पाहिला भाग, तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश अर्जाचा दुसरा भाग प्रत्यक्ष भरता येईल, असे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

 राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पुणे व पिंपरी चिंचवड, मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका परिसरातील कनिष्ठ   महाविद्यालयांमधील  इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने दिले जातात. शिक्षण विभागाने ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश अर्ज भरण्याचा सराव करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

 शाळा व कनिष्ठ  महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करावी, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश फेऱ्या व कोट्यांतर्गत फेऱ्यातून प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेशी संपर्क साधावा. तसेच प्रवेशासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे काढून ठेवावी, अशाही सूचना राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिल्या आहेत.

How to fill Maharashtra Class 11 admission form 2022?

The Maharashtra FYJC admission procedure is quite simple, follow the steps to fill the form.

 • Go to the official website, 11thadmission.org.in

 • Click on the ‘login’ button on the right corner of the home page.

 • Login using user ID and Password.

 • Now, complete the part-1 registration and part-II registration choose colleges.

 • Fill in all the details required in the form.

 • Click on the proceed button.

 • Now upload your photograph in the required size and format.

 • The next stage is fee payment.

 • After paying the fees your registration form will be submitted completely.

 • A confirmation page will appear.

 • Download the page and submit it to the school.


FYJC Admission: For the eleventh admission, Mumbai metropolitan area, Pune, Pimpri-Chinchwad, Nashik, Amravati, Nagpur Municipal Corporation areas, the admission process will be carried out centrally online. The revised schedule for this has been published by the Directorate of Secondary and Higher Secondary Education. Accordingly, students will be able to fill part 1 of the application from 30th May 2022.

अकरावी प्रवेशासाठी मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठीचे सुधारीत वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केले आहे. यानुसर विद्यार्थ्यांना ३० मे पासून अर्जाचा भाग १ भरता येणार आहे.

विद्यार्थ्यांना भाग १ भरण्यापूर्वी २३ ते २७ मे या कालावधीत विद्यार्थ्यांना सरावही करता येणार आहे. तत्पूर्वी कॉलेजांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. संचालनालयाचे संचालक महेश पालकर यांनी काढलेल्या परिपत्रकामध्ये विद्यार्थ्यांना यंदा केंद्रीय प्रवेश फेऱ्यांमधून किंवा कोटांतर्गत राखीव जागांवर संबंधित कॉलेजांशी संपर्क साधून प्रवेश घेता येणार आहे.

भाग १ भरून पासवर्ड सेट केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व फेरीच्यावेळी अर्जाचा भाग २ भरावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना किमान १ आणि कमाल १० कॉलेजांचे पसंतीक्रम द्यावे लागणार आहेत. दरम्यान, अकरावी प्रवेशासाठी नियमित फेऱ्या पार पडल्यानंतर घेण्यात येणारी प्राधान्य फेरी यंदा रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकात या फेरीबाबत कोणताही उल्लेख नसल्याने शिक्षण क्षेत्रात ही फेरी रद्द केल्याची चर्चा रंगली आहे.

 1. कॉलेजांतील जागांचे गणित
 2. कोटाबिगर अल्पसंख्याक अल्पसंख्याक विद्यालये
 3. केंद्रीय फेरी ८५ टक्के ३५ टक्के
 4. संस्थांतर्गत १० टक्के १० टक्के
 5. व्यवस्थापन ५ टक्के ५ टक्के
 6. अल्पसंख्याक लागू नाही ५० टक्के

वेळापत्रक

 • – विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर नोंदणी सराव – २३ ते २७ मे
 • – ऑनलाइन नोंदणी व प्रवेश अर्ज भाग १ भरणे लॉगइन आयडी आणि पासवर्ड मिळविणे – ३० मेपासून पुढे
 • – भाग २ भरणे – दहावीच्या निकालानंतर याबाबतच्या तारखा जाहीर केल्या जातील.

FYJC Admission 2022– Students should get used to the online admission process (FYJC Online Admission 2022) for the eleventh admission, so the procedure for filling up the first part of the application has been changed. Accordingly, students will now be able to practice Mock Form Filling from 23rd May. Meanwhile, the first part of the application in the first week of June (FYJC Form Part 1); After June 20, the second part of the application (FYJC Form Part 2) can be filled directly.

अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा (FYJC Online Admission 2022) विद्यार्थ्यांना सराव व्हावा, म्हणून अर्जाचा पहिला भाग भरण्यासाठीच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना आता २३ मेपासून अर्ज भरण्याचा (Mock Form Filling) सराव करता येणार आहे. दरम्यान, जूनच्या पहिल्या आठवड्यात अर्जाचा पहिला भाग (FYJC Form Part 1); तर २० जूननंतर अर्जाचा दुसरा भाग (FYJC Form Part 2) प्रत्यक्ष भरता येणार आहे. याबाबतचे सुधारित वेळापत्रक (11th Admission Timetable) सोमवारी किंवा मंगळवारी जाहीर करणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

 • पुणे-पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह, मुंबई महानगर क्षेत्र, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील ज्युनिअर कॉलेजांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहेत.
 • दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल, अशा दृष्टीने अकरावी प्रवेश प्रक्रियेचे नियोजन करून संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र, दहावीचा निकाल २० जूनला जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे.
 • अकरावी प्रवेशासंदर्भात शाळा आणि मार्गदर्शन केंद्राचे उद्बोधन वर्ग घेण्यात आलेले आहेत. यंदा यात भर म्हणून ‘यू-ट्यूब’ आणि ‘फेसबुक लाइव्ह’द्वारे पालकांसाठी ऑनलाइन मार्गदर्शन देण्यात येणार आहे. यंदा प्रवेशाच्या नियमित तीन आणि एक विशेष फेरी राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्याऐवजी (एफसीएफएस) फेरीऐवजी प्रतीक्षा यादी लावण्यात येणार आहे.

कॉल सेंटरमधून मदत

अकरावी प्रवेशाचा अर्ज भरण्याचा सराव करता यावा, यासाठी विद्यार्थ्यांना २३ मेपासून संधी दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज कसा भरायचा याचा सराव करावा. प्रवेशासाठीचे कॉलसेंटरदेखील त्याच दिवशी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालकांना कोणत्याही शंका किंवा अडचणी आल्यास कॉलसेंटरच्या माध्यमातून दूर केल्या जाणार आहेत, असे अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीच्या सदस्यांनी सांगितले.


Students are curious as to when the 11th admission process will begin. This curiosity will come to an end by the end of May. The students appearing for the matriculation examination will have the facility to fill up part one of the eleventh admission form by the end of May. Read more details as given below.

मागच्या वर्षी दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर नव्या मूल्यमापन पद्धतीद्वारे निकाल जाहीर करून अकरावीचे प्रवेश करण्यात आले होते. मात्र यावर्षी कोरोना संकट कमी झाल्याने साळा तेथे केंद्र पद्धतीनुसार दहावीच्या परीक्षा झाल्या आहेत. त्यामुळे ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीची प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार याविषयी उत्सुकता आहे. ही उत्सुकता मे अखेरीस संपुष्टात येणार असून दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मे अखेरपर्यंत अकरावी प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. भाऊसाहेब चव्हाण यांनी व्यक्त केली

अकरावी प्रवेशप्रक्रिया  मे अखे पर्यत होणार सुरु

शहरात २५ हजार २६० जागा 

नाशिक शहरात अकरावीच्या प्रवेशासाठी २५ हजार २७० जागा उपलब्ध आहे. त्यात नवीन वर्षात कमी झालेल्या तुकड्या अथवा नवीन महाविद्यालयांची भर पडल्यास बदल होण्याची शक्यता आहे.


Director of Education, Mahesh Palkar informed that the CBSE Class X examination will continue till May 24, while the ICSE Board exam will continue till May 23. Therefore, the Directorate of Education has postponed the process of filling . Students will be informed about the decision in 3 to 4 days, he added.

CBSE दहावीची परीक्षा 24 मेपर्यंत, तर ICSE मंडळाची 23 मेपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे शिक्षण संचलनालयाकडून अकरावीचे सराव अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची माहिती शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली. 3 ते 4 दिवसांत निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना अवगत केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरण्याची सराव करण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिली जाते. याच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना अर्ज कसा भरावा, काय कागदपत्रे लागतात, याची माहिती मिळते. सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने अर्ज भरण्याचा सराव करता येणार नाही. विद्यार्थ्यांचा संधी दिली जावी या दृष्टीने वेळापत्रकाचे नियोजन केले जात असल्याची माहिती पालकर यांनी दिली.


Documents required for Eleventh Admission (FYJC Admission 2022) will be verified online. Students will have to upload Caste Certificate, Non Criminal Certificate, Financially Weak Component Eligibility Certificate on the Eleventh Admission Portal and this process will be completed at the time of filling up the application form. Relevant students will not be admitted without uploading the documents

अकरावी प्रवेशांसाठी आता कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी

अकरावी प्रवेशासाठी (FYJC Admission 2022) आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पडताळणी ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट, अर्थिक दुर्बल घटक पात्रता प्रमाणपत्र अकरावी प्रवेशासाठीच्या पोर्टलवर अपलोड करावी लागणार असून प्रवेश अर्ज भरतेवेळी ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 • शिक्षण विभागाकडून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला (11th Admission) सुरुवात करण्यात आली असून, प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांविषयीची माहिती परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली आहे.
 • या पत्रकानुसार इतर मागासवर्गीय (ओबीसी), अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), व्हीजेएनटी (भटके विमुक्त), विशेष राखीव प्रवर्ग (एसबीसी) या प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. याचप्रमाणे व्हीजेएनटी, ओबीसी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट सादर करणे गरजेचे आहे.
 • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना (ईडब्ल्यूएस) आर्थिक दुर्बल घटक पात्रता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. ही सर्व कागदपत्रे मिळवण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी सुरू करावी, अशी सूचना शिक्षण उपसंचालकांकडून करण्यात आली आहे.
 • याशिवाय दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, आजी-माजी सैनिकाचे पाल्य, स्वातंत्र्यसैनिकाचे पाल्य आणि बदलीने आलेल्या कर्मचाऱ्यांचे पाल्य यांनाही संबंधित कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. या सर्व कागदपत्रांची पडताळणी ऑनलाइन पद्धतीने केली जाणार असून, गरज पडल्यास कागदपत्रांची पडताळणी ऑफलाइन पद्धतीने शाळा स्तरावरून केली जाणार आहे.

विद्यार्थी, पालकांना ऑनलाइन मार्गदर्शन
‘प्रवेशासाठी अपलोड करायची वेगवेगळी कागदपत्रे कशा पद्धतीने अपलोड करायची याबाबत शिक्षण विभागाकडून विद्यार्थी आणि पालकांना ऑनलाइन मार्गदर्शन केले जाणार आहे. येत्या ११ मे रोजी यू ट्यूब, फेसबुक या माध्यमातून या मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले जाणार आहे,’ अशी माहिती शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिली आहे.


FYJC Admission 2022: The Directorate of Secondary and Higher Secondary Education has announced the probable timeline for this year’s 11th online admission process. From May 17, students will be able to fill the first part of the application for the eleventh admission and the second part after getting the result of the tenth (SSC Result 2022). Regular three of admissions this year; There will also be a special round. The directorate has clarified that the waiting list will be replaced by first come first served (FCFS) rounds.

अकरावी ऑनलाइन प्रवेशांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने यंदाच्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे  संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. १७ मेपासून विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठीच्या अर्जाचा पहिला भाग आणि दुसरा भाग दहावीचा निकाल (SSC Result 2022) लागल्यानंतर भरता येणार आहे. यंदा प्रवेशाच्या नियमित तीन; तसेच एक विशेष फेरी राबविण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) फेरीऐवजी प्रतीक्षा यादी लावण्यात येणार असल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

 • मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रांसह नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महापालिका क्षेत्रांतील ज्युनिअर कॉलेजांमध्ये अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे होतात. गेल्या शैक्षणिक वर्षाची अकरावी प्रवेश प्रक्रिया ३१ डिसेंबर २०२१ रोजी पूर्ण झालेली आहे.
 • राज्य मंडळाची दहावीची परीक्षा चार एप्रिलला संपली आहे. त्यामुळे दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येत्या २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामधील प्रवेश प्रक्रियेची पूर्वतयारी सुरू झाली आहे.
 • माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक महेश पालकर यांनी विभागीय उपसंचालकांना दिलेल्या सूचनांनुसार, अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रक्रिया २०२२-२३ साठी पूर्वतयारी त्वरित सुरू करण्यात यावी. त्यासाठी प्रवेश प्रक्रियेचे टप्पे समजावून घेऊन, त्यानुसार नियोजन करावे.
 • विद्यार्थी, पालक यांच्यासाठी मार्गदर्शन वर्ग आयोजित करावेत, शाळा मार्गदर्शन केंद्रांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशांची लगबग येत्या महिन्यात सुरू होणार असून, विद्यार्थ्यांनी अचूक अर्ज भरण्यासाठी सरावाची प्रक्रियादेखील होणार आहे.
 • विद्यार्थी आणि पालकांनी अधिक माहितीसाठीhttps://11thadmission.org.in/ या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अकरावी प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक

 • – विद्यार्थी, पालक, कनिष्ठ महाविद्यालये यांचे मार्गदर्शन : एप्रिल २०२२
 • – अर्जाचा भाग एक भरणे (सराव) : १ ते १४ मे
 • – विद्यार्थ्यांसाठी वेबसाइटवर नोंदणी, अर्ज भाग एक भरणे, तपासणे : १७ मे ते दहावीच्या निकालापर्यंत
 • – ज्युनिअर कॉलेज नोंदणी : २३ मे ते दहावीच्या निकालापर्यंत
 • अर्जाचा भाग दोन भरणे : दहावी निकालानंतर पुढील पाच दिवस
 • – कोटांतर्गत राखीव जागांवरील प्रवेश सुरू : दहावी निकालानंतर पुढील पाच दिवस
 • – प्रवेश फेऱ्या व अ‍ॅलॉटमेंट प्रवेश
 • – नियमित फेरी एक : १० ते १५ दिवसांचा कालावधी

FYJC Online Admission 2022- Eleventh online admission process and schedule for junior colleges in five to six Municipal Corporation areas of the state will be announced soon. For this, a meeting was held today at the level of Director of Education in which it was decided that the report for admission will be prepared and it will be sent to Mantralaya for approval. This year too, the 11th entry will be done online in Mumbai, Pune, Pimpri Chinchwad, Nashik, Amravati and Nagpur Municipal Corporation areas.

राज्यातील पाच ते सहा महापालिका (Municipal corporation) क्षेत्रांतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (eleventh online admission process) आणि त्यासाठीचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. त्यासाठी आज शिक्षण संचालकस्तरावर बैठक पार पडली असून त्यात प्रवेशासाठीचा अहवाल तयार करून तो मंजुरीसाठी मंत्रालयात (Mantralaya) पाठविण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

दहावीची लेखी परीक्षा सुरू होताच अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाकडून कार्यक्रम जाहीर केला जातो. शिक्षण विभागाकडून प्रवेश प्रक्रियेतील पहिला टप्पा सुरू केला जातो. मात्र, यंदा त्यासाठी काही दिवसांचा विलंब झाला असून त्यासाठीची प्रक्रिया पुढील काही दिवसांत सुरू होणार आहे. मागील वर्षी औरंगाबादचा अपवाद वगळता मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रांतील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले होती.

मुंबई विभागातच तब्बल दीड लाखांहून अधिक जागा रिक्त राहिल्या होत्या. त्या जागांबाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाली. रिक्त जागा कमी करण्यासाठी या वेळी वेगळे नियोजन केले जाणार असल्याचे सांगण्यात येते.

अहवाल मंत्रालयात मंजुरीसाठी

यंदाही मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रात अकरावी प्रवेश ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत प्रवेशासाठीचा अहवाल मंत्रालयात मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली.


Eleven entry rounds were conducted online in Nashik, Mumbai, Pune, Pimpri-Chinchwad, Amravati, and Nagpur. The process was announced to be over in about seven rounds. But, even after that, 270 students from Mumbai, Pune, Nagpur, Nashik, Amravati have requested admission in December. Mahesh Palkar has clarified through the Directorate of Education that the concerned students will be given admission in the round which will be held from 28th to 30th December.

सात फेऱ्यांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतरही मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती येथील २७० विद्यार्थ्यांनी अकरावीत प्रवेश देण्याची विनंती केली आहे. संबंधित विद्यार्थ्यांना २८ ते ३० डिसेंबरदरम्यान होणाऱ्या फेरीमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

प्रवेशाच्या तीन फेऱ्या, दोन विशेष फेऱ्या, स्पॉट अॅडमिशनची सुविधा, प्रवेश संपल्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वाने विशेष फेरी राबवल्यानंतरही अकरावीसाठी आजपासून प्रवेशाची अजून एक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या फेरीत ३० डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना आपले प्रवेश निश्चित करता येणार आहेत.

 • राज्यात नाशिकसह मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती आणि नागपूर या महानगरांमध्ये ऑनलाइन पद्धतीने अकरावीच्या प्रवेश फेऱ्या घेण्यात आल्या होत्या. जवळपास सात फेऱ्यांमध्ये ही प्रक्रिया संपल्याचे जाहीर करण्यात आले.
 • परंतु, त्यानंतरही मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती येथील २७० विद्यार्थ्यांनी अकरावीत प्रवेश देण्याची विनंती केली आहे. संबंधित विद्यार्थ्यांना २८ ते ३० डिसेंबरदरम्यान होणाऱ्या फेरीमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालनालयामार्फत महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे.
 • करोना परिस्थितीमुळे अनिश्चितता, माहिती वेळेत न मिळणे, पालकांचे स्थलांतर या कारणांमुळे प्रवेश न घेतल्याची कारणे या विद्यार्थ्यांनी शिक्षण उपसंचालकांपुढे मांडली आहेत. ही सर्व कारणे विचारात घेऊन कोणीही विद्यार्थी प्रवेशांपासून वंचित राहू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण संचालनालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
 • ही फेरी शिक्षण उपसंचालक स्तरावर राबविली जाणार असून, रिक्त जागांचा तपशील विद्यार्थ्यांना दाखवून त्यांच्या सोयीचे महाविद्यालय प्रवेशासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उशिरा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांची असणार आहे.

The process was implemented through the central admission system for the eleventh admission. There are 25,561 vacancies vacant even after the first-come-first-served first round held between October 25 and 30. Read More details as given below.

अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश पद्धतीच्या माध्यमातून प्रक्रिया राबविण्यात आली. त्याद्वारे २५ ते ३० ऑक्टोबरदरम्यान घेण्यात आलेल्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीनंतरही २५ हजार ५६१ जागा रिक्त आहेत. आता नोव्हेंबर उजाडल्याने आणखी किती दिवस प्रवेशासाठी फेऱ्या घेऊन प्रवेश देणार असा प्रश्‍न निर्माण झालेला आहे.

अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या निकालानंतर शहरातील २१८ कनिष्ठ महाविद्यालयामधील ५९ हजार १९५ जागांसाठी ऑगस्ट महिन्यात प्रवेश प्रक्रियेस सुरवात करण्यात आली होती. त्यासाठी ३६ हजार ८७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, आतापर्यंत सात फेऱ्यांमध्ये ३३ हजार ६३४ विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविले. यापैकी सर्वाधिक पहिल्या फेरीत ११ हजार ५२३ प्रवेश देण्यात आले. मात्र, त्यानंतर प्रक्रियेला उशिर झाल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरविली. त्यामुळे आतापर्यंत २५ हजार ५६१ जागा रिक्त असल्याचे दिसून आले आहे. आता पुन्हा राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत प्रवेश फेरी घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी किती प्रवेश फेऱ्या घेणार हे कळत नाही.

अभ्यासक्रम पूर्ण होणार काय?

गेल्या वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यावेळी बारावीच्या निकालासाठी अकरावीच्या मूल्यांकनाचा समावेश करण्यात आला होता. मात्र, प्रवेशप्रक्रिया लांबल्याने विद्यार्थी वर्गात जाईल केव्हा आणि त्याचा अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार या मोठा प्रश्‍न आहे.

ग्रामीण भागात गेले विद्यार्थी

निकालानंतरही प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी उशिर झाल्याने विद्यार्थ्यांनी क्लासेसच्या टायअपच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला. त्यातून शहरी भागातील बऱ्याच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त राहिल्याचे दिसून आले.

शाखा प्रवेश रिक्त

 • कला ३,९७९ ५,४४१
 • वाणिज्य ९,०१४ ८,८६६
 • विज्ञान १८,८४१ ९,०३९
 • एमसीव्हीसी १,८०० २,२१५
 • एकूण ३३,६३४ २५,५६१

This is important news for students who have not yet been admitted under the Eleventh Central Online Admission Process. There is another opportunity for these students who have not been admitted. The first-come, first-served basis (FCFS) admission process has been extended till October 21.

Maharashtra Fyjc Admission 2021: अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. प्रवेश न मिळालेल्या या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक संधी चालून आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

कोणताही विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित राहू नये शिक्षण विभागातर्फे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. याअंतर्गत ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (FCFS) तत्त्वावर सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेला २१ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शालेय शिक्षणविभागातर्फे मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर या पाच शिक्षण विभागांना यासंदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगपालिका विभागांना अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील FCFS प्रवेश फेरी सध्या सुरु आहे. याआधीच्या वेळापत्रकानुसार१८ ऑक्टोबर ही या प्रवेश फेरीची शेवटची तारीख होती. पण शालेय शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन या FCFS प्रवेश फेरीला ३ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.


FYJC Online Admission 2021: The 11th online admission process has started from Saturday 14th August 2021. All the process is going to be online. Here we are giving step by step information on how to fill Part 1 and Part 2 of the application.

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला शनिवार १४ ऑगस्ट २०२१ पासून सुरुवात झाली आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. विद्यार्थ्यांनी अर्जाचा पार्ट १ तसेच पार्ट २ कसा भरायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती आम्ही येथे देत आहोत… मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती येथील महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीची मध्यवर्ती प्रवेश प्रक्रिया राबवली जाते.

कसा भराल अकरावी ऑनलाइन अर्ज?-How to Apply For 11th Admission 2021

अकरावीत प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी 11thadmission.org.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे.

– विद्यार्थ्यांनी स्वत:चा लॉगइन आयडी आणि पासवर्ड तयार करून नोंदणी करावी. स्वत:चा लॉगइन आयडी आणि पासवर्ड कोणाहीसोबत शेअर करू नये.

पार्ट – १ Part 01 For FYJC Online Admission 2021

अर्जाचा पहिला भाग कसा भराल?

 • – अॅप्लिकेशन पार्ट -१ भरण्यासाठी संकेतस्थळावर जाऊन सर्वात आधी आपल्याला ज्या भागातील महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे, तो शहरी भागाच्या नावावर क्लिक करावे.
 • – यानंतर स्टुडंट रजिस्ट्रेशन करावे. जो आयडी पासवर्ड क्रिएट केलाय तो वापरून लॉग इन करावे. पार्ट १ चा फॉर्म ओपन होईल, तो भरावा.
 • पार्ट १ भरताना दिलेले प्रश्न नीट वाचून विचारलेली माहिती भरा. यात नाव, पत्ता, ईमेल, गुण, प्रवर्ग, कोणत्या कोट्यातून प्रवेश घ्यायचा आहे आदी माहिती यात भरावी.
 • फॉर्म पूर्ण भरल्यानंतर, जर विशिष्ट प्रवर्गातील विद्यार्थी असतील, तर त्यांना ते प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल
 • प्रवेश शुल्क ऑनलाइन भरायचे आहे.
 • यानंतर आपला अर्ज लॉक करायचा आहे. मुलांनी हे लक्षात घ्यावे की फॉर्म पूर्ण भरून झाल्यानंतर तो नीट वाचून लॉक करायचा आहे. लॉक न केल्यास तो सबमीट होणार नाही.
 • डॅश बोर्डवर आपल्या फॉर्मचे स्टेटस नक्की पाहा. (व्हेरिफाइड किंवा नॉनव्हेरिफाइड असे स्टेटस दिसेल.)

ज्यांनी विशिष्ट प्रवर्गातून अर्ज भरला आहे, त्यांनी आपला अर्ज आपल्या शाळेत किंवा जवळच्या गायडन्स सेंटरमधून व्हेरिफाय करून घ्यायचा आहे. राज्य मंडळाच्या शाळा आपल्या विशिष्ट प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज शाळा लॉगइनमधून व्हेरिफाय करतात. अन्य बोर्डाच्या विशिष्ट प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी गायडन्स सेंटरमधून आपला अर्ज व्हेरिफाय करायचा आहे.

पार्ट – २- PART -2 For 11th Online Admission Process 

अर्जाचा दुसरा भाग – ऑप्शन फॉर्म कसा भराल?

– आपल्याला ज्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याची इच्छा आहे, त्या महाविद्यालयाचे नाव या फॉर्ममध्ये भरायचे आहे. विद्यार्थी किमान १ आणि जास्तीत जास्त १० कॉलेजांची नावे देऊ शकतात.

– कॉलेजचा पसंतीक्रम भरण्यापूर्वी कॉलेजांची मागील वर्षीची कट ऑफ नक्की पाहा आणि आपल्या गुणांनुसार त्या कॉलेजमध्ये आपल्याला प्रवेश मिळू शकतो का याचा अंदाज घ्यावा.

अकरावी ऑनलाइन प्रवेशांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे – FYJC Online Admission Time Table

 • भाग एक भरणे : १४ ते २२ ऑगस्ट
 • भाग एक व दोन भरणे : १७ ते २२ ऑगस्ट
 • प्रवेशाची गुणवत्ता यादी : २७ ऑगस्ट
 • प्रवेश घेणे : २७ ते ३० ऑगस्ट
 • प्रवेशाची दुसरी फेरी : ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर
 • प्रवेशाची तिसरी फेरी : ५ ते ११ सप्टेंबर
 • प्रवेशाची चौथी फेरी : १२ ते १७ सप्टेंबर

कोटा प्रवेश

कोटा प्रवेशासाठी यंदा विद्यार्थ्यांना १७ ते २२ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने भाग एक आणि दोन पूर्ण भरायचे आहे. त्यानंतर या अर्जाची प्रिंटआउट घेऊन, ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे, त्या ठिकाणी तो द्यायचा आहे. त्यानंतर कॉलेजांकडून प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. या यादीतील विद्यार्थ्यांना वेळापत्रकाप्रमाणेच प्रवेश घ्यावे लागणार आहे.


FYJC CET Exam Cancelled

The CET for 11 admissions in the state has been canceled. The proposed CET (Class XI CET) for Class XI admission was quashed by the High Court. The High Court has directed that children should be admitted for Class XI on the basis of Class X marks without taking the CET.

राज्यात 11 प्रवेशसाठी होणारी सीईटी अर्थात प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने हा महत्वाचा निकाल दिला. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 11 वी मध्ये प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी CET परीक्षा नियोजित होती. मात्र, हायकोर्टाने सर्व बाजू ऐकल्यानंतर प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.राज्य सरकारनं अकरावी सीईटी परीक्षेसाठी काढलेला अध्यादेश मुंबई हायकोर्टानं रद्द केला आहे. मुंबई हायकोर्टाचा निकाल वाचून पुढील निर्णय घेऊ, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी प्रस्तावित सीईटी (अकरावी सीईटी )उच्च न्ययालयाकडून रद्द करण्यात आली. अकरावी सीईटी न घेता इयत्ता दहवीच्या गुणांच्या आधारावर मुलांना अकरावीसाठी प्रवेश द्या, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

हायकोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा दणका मिळाला असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 11 वी मध्ये प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी CET परीक्षा नियोजित होती. मात्र, हायकोर्टाने सर्व बाजू ऐकल्यानंतर प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आयसीएसई बोर्डाच्या एका विद्यार्थिनीनं सीईटी परीक्षेसंदर्भात उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती.

सीईटी परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम हा महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित होता. त्यामुळे आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची अडचण होण्याची शक्यता होती. आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमाची माहिती नाही. त्यामुळे परीक्षेत त्यांना कमी गुण मिळण्याचा आक्षेप उपस्थित करण्यात आला होता.

FYJC cET 2021 CET Application Form

Applicants are now given the opportunity to correct their mistakes. Students will be allowed this till 11:59 pm on Monday, 2nd August 2021.

राज्य शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) अकरावीच्या (FYJC) प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी (CET) वादात अडकली असताना आता यासाठी अर्जदार विद्यार्थ्यांना त्यातील चुका दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना सोमवार, २ ऑगस्टच्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत ही मुभा असेल, असे मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.

What kind of change or correction can be made? 

 • – ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक
 • – परीक्षेचे माध्यम, सेमी इंग्रजीचा विकल्प, सामाजिक शास्त्रे या विषयाच्या प्रश्नांचे माध्यम
 • – विद्यार्थ्यांचा तात्पुरता किंवा कायमच्या निवासस्थानाचा पत्ता, त्यानुसार परीक्षा केंद्रासाठी निवडलेला जिल्हा, तालुका किंवा शहराचा विभाग
 • – प्रवर्ग

How to repair an application? 

 • – अकरावी सीईटीच्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर आपला अॅप्लिकेशन क्रमांक आणि मोबाइल क्रमांक वापरून लॉग इन करावे.
 • -नंतर एडिट ऑप्शन (Edit Option) वर क्लिक करून भरलेल्या माहितीत दुरुस्ती करता येईल.
 • – आवश्यक ती दुरुस्ती केल्यानंतर दुरुस्तीसह फॉर्म सबमिट करावा.

एकच अर्ज ग्राह्य

सीईटीची नोंदणी करताना अनेक विद्यार्थ्यांनी अधिक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्याने मंडळाकडून दुरुस्तीचा हा पर्याय दिल्याचेही सांगण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांनी अनेक अर्ज व पर्याय दिले आहेत, अशा विद्यार्थ्यांचा केवळ एकच अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहे. जादाचे अर्ज विद्यार्थ्यांनी काढून टाकावेत. ही सुविधा १ ऑगस्ट सकाळी ११ वाजल्यापासून आहे. अर्जात बदल करण्यासाठी विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन अॅप्लिकेशन क्रमांक व संगणक प्रणालीतील मोबार्इल क्रमांक टाकून लॉगीन करता येईल. काही अडचणी असल्यास विद्यार्थ्यांनी हेल्पलाईनवर संपर्क साधावा.


Students who have registered with the State Board for the Common Entrance Examination for the Class XI Admission of the academic year 2021-22 will be able to fill up the online application from 3 pm today (26). Students of other boards will be able to apply from Wednesday (28). Students will be able to apply on the website “https://cet.11thadmission.org.in”. Students will be able to apply till 2nd August 2021.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या इयत्ता अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी राज्य मंडळाकडे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना आज (ता.२६) दुपारी तीन वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. तर अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना बुधवारपासून (ता.२८) अर्ज करता येतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी होणारी ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे ऐच्छिक असून ती ऑफलाइन स्वरूपाची असून राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. विद्यार्थ्यांना ” ‘https://cet.11thadmission.org.in’’ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहेत. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी २ ऑगस्टपर्यंत सुविधा उपलब्ध राहणार आहे. राज्य मंडळाने रविवारी रात्री उशिरा याबाबतचे परिपत्रक काढले.

राज्य मंडळाने यापूर्वी २० जुलै रोजी अकरावी सीईटी परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र तांत्रिक बिघाडामुळे २१जुलैला ही अर्ज नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली होती. त्यानंतर पाच दिवसांनी अर्ज नोंदणीसाठी नव्याने यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार राज्य मंडळाने जाहीर केलेल्या नव्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे.

यापूर्वी २० आणि २१ जुलै दरम्यान परीक्षेसाठी नोंदणी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज क्रमांक आणि नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून या संकेस्थळावर अर्ज पाहता येईल. यावेळी अर्ज पूर्णपणे सादर केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. मात्र यापूर्वी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करावा लागणार आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून या परीक्षेचे शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेतले जाणार आहे. यासाठी पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामूळे अशा विद्यार्थ्यांना बुधवारपासून (ता. २८) परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे, असे डॉ. भोसले यांनी सांगितले.

परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका असून त्यासाठी दोन तासांचा कालावधी असेल. परीक्षेची प्रश्नपत्रिका आठ माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल.  सेमी इंग्रजी या माध्यमाची निवड केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी अर्जात निश्चित केलेल्या इंग्रजी आणि इतर माध्यमाचा विचार करून प्रश्नपत्रिका पुरविण्यात येईल.

प्रश्नपत्रिकेचे असे असेल स्वरूप :

विषयाचे नाव : गुण

इंग्रजी : २५ गुण

गणित  (भाग एक आणि दोन) : २५

विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग एक आणि दोन) : २५

सामाजिक शास्त्रे (इतिहास, राज्यशास्त्र, भुगोल : २५

एकूण : १००Maharashtra FYJC CET 2021:  After announcing the results of Class X, the date of the 11th CET exam, which was awaited by students across the state, has finally been announced. The statewide examination will be held on August 21, 2021. Students will be able to apply for this exam online through http://cet.mh-ssc.ac.in/

अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी सीईटीची वेबसाईट लुडकली आहे. दहावी निकालाच्या दिवशी बोर्डाच्या वेबसाईटवर झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर विद्यार्थ्यांना संध्याकाळपर्यंत ऑनलाइन निकाल पाहता आला नव्हता. बोर्डाच्या वेबसाईटवरील सर्व्हर बिघाडाची समस्या अकरावी सीईटीचा ऑनलाइन प्रवेश अर्ज भरतेवेळीही निर्माण झाली आहे. रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांना सीईटीचा अर्ज भरता आलेला नाही.

 दहावी निकालाच्या वेबसाईटप्रमाणे अकरावी सीईटीच्या वेबसाईटसाठीही राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आऊटसोर्सिंग केले आहे. वेबसाईटचे काम पाहणाऱया खासगी कंपनीच्या सर्व्हरवर लोड आल्याने पहिल्याच दिवशी सीईटीच्या वेबसाईटनेही मान टाकली आहे. या बिघाडाबाबत बोर्डाच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अनेक विद्यार्थी वारंवार अर्ज भरण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र वेबसाईटवरील ‘ऑप्लिकेशन एरर’ या मेसेजमुळे त्यांना प्रवेश अर्ज भरताच आलेला नाही.

सीईटी देणाऱया विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन

अकरावी प्रवेशासाठी सीईटी देणाऱया विद्यार्थ्यांना सीईटीचा ऑनलाइन अर्ज भरताना काही अडचणी असल्यास तसेच परीक्षेसंदर्भात काही शंका असल्यास त्या सोडविण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विभागनिहाय हेल्पलाइन सुरू केली आहे. मुंबई विभागीय मंडळातील विद्यार्थी मुंबई विभागीय शिक्षण सचिव राजेंद्र अहिरे, सहाय्यक सचिव नीलम ढोके, वरिष्ठ अधिक्षक एस. एस. फाटक यांच्याशी अनुक्रमे 9423933435, 9869086061, 9869433816 या क्रमांकावर किंवा [email protected] या वेबसाईटवर संपर्क साधू शकतात.

विभागीय मंडळ – संपर्क क्रमांक

१) पुणे – ९६८९१९२८९९ / ८८८८३३९५३०

२) नागपूर – ९४०३६१४१४२ / ९८९०५१४८३९

३) मुंबई – ९४२३९३३४३५, / ९८६९०८६०६१

४) औरंगाबाद – ९९२२९००८२५ / ९४२३४६९७१२

५) अमरावती – ९९६०९०९३४७ / ९४२३६२१६४७

६) कोल्हापुर – ७५८८६३६३०१ / ८००७५९७०७१

७) नाशिक – ८८८८३३९४२३ / ८३२९००४८९९

८) लातुर – ९४२१६९४२८२ / ९४२१७६५६८३

९) कोकण – ८८०६५१२२८८/ ८८३०३८४०४४


11std CET Exam: दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यभरातील विद्यार्थी ज्याची वाट पाहत होते त्या ११ वीच्या सीईटी परीक्षेची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. राज्यभरात ही परीक्षा २१ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना २० जुलै सकाळी ११.३० वाजल्यापासून ते २६ जुलै पर्यंत अर्ज भरता येणार आहे. हा अर्ज ऑनलाइन माध्यमातून भरायचा आहे.

राज्यभराताली विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेल्या इयत्ता ११ वीच्या सीईटी परीक्षेची तारखी अखेर आज जाहीर झाली आहे. २१ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत ही परीक्षा राज्यभरात पार पडणार आहे. विद्यार्थ्यांना २० जुलै सकाळी ११.३० वाजेपासून २६ जुलैपर्यंत या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.

अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया कशी असेल?

 •  अकरावीची प्रवेशासाठी CET परीक्षा
 • इयत्ता 11 वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET परीक्षा
 • प्रवेश परीक्षेत राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न
 • गुण – 100
 • बहुपर्यायी प्रश्न
 • परीक्षा OMR पद्धतीने
 • परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी
 • कॉलेजमध्ये प्रवेशाचे निकष काय?
 • CET परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश
 • CET परीक्षा देणाऱ्यांना 11 वी प्रवेशप्रक्रियेत प्राधान्य
 • त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश
 • CET परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन इयत्ता 10 वीच्या पद्धतीनुसार

राज्यात काही दिवस अगोदरच इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झालेला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी इयत्ता ११ वी ची सीईटी द्यावी लागणार आहे. या सीईटीच्या आधारेच विद्यार्थ्यांना विविध नामांकीत महाविद्यालयांमध्ये त्यांच्या गुणवत्तेनुसार प्रवेश मिळत असतो.

Application Fees For maha FYJC CET Exam 2021

Apply Online

Read Full Notification


State Secondary Board President Dinkar Patil said that the Common Entrance Test (CET) for the first time this year will be held till August 21. The application process for the CET will start on July 19, for which a separate portal will be set up, the board said. A link to the portal will be made available on the board’s official website, and students will be able to decide whether to take the CET.

अकरावी प्रवेशांसाठी यंदा प्रथमच घेण्यात येणारी सामाइक प्रवेश परीक्षा (सीईटी) २१ ऑगस्टपर्यंत घेणार असल्याचे सूतोवाच राज्य माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी केले. सीईटीसाठी अर्ज प्रक्रिया १९ जुलैला सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी स्वतंत्र पोर्टलची निर्मिती करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. या पोर्टलची लिंक मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करण्यात येणार असून, सीईटी द्यायची की नाही, हे विद्यार्थ्यांना ठरवता येणार आहे.

‘सीईटी’ दृष्टीक्षेपात

 • १९ जुलैला अर्ज प्रक्रिया सुरू होणार.
 •  राज्य माध्यमिक मंडळाच्या वेबसाइटद्वारे ‘सीईटी’साठी स्वतंत्र पोर्टल.
 •  २१ ऑगस्ट पर्यंत परीक्षा घेण्यात येईल.
 • सीईटीसाठी वेगळा अभ्यासक्रम देणार.
 •  सीईटी देणे बंधनकारक नाही.
 •  सीईटी न देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश दुसऱ्या टप्प्यात.
 • सीईटी ऑफलाइन पद्धतीने होणार.

The entrance test for the eleventh admission in the state will be of 100 marks. The exam will be held in late July or the first week of August. This common entrance examination will be based on the 10th syllabus of the State Board. Read More details as given below.

राज्यात अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा १०० गुणांची असणार आहे. ही परीक्षा जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहे, असे राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयात स्पष्ट केले आहे. या परीक्षेसाठी चार विषयांची निवड करण्यात आली आहे. मात्र यामध्ये मराठीचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

11th CET Exam- अकरावी सामाईक प्रवेश परीक्षा अशी होणार-जाणून घ्या

ही सामाईक प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असणार आहे. तसेच ही परीक्षा पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील. ही परीक्षा ऑफलाइन स्वरूपात घेण्यात येणार आहे.

12th CET बारावी सीईटीसंदर्भात महत्वाची माहिती- जाणून घ्या !

FYJC CET Syllabus -अकरावी सीईटीसाठी अभ्यासक्रम कोणता?

प्रश्नपत्रिका ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि राज्य परीक्षा परिषदेतर्फे या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर या परीक्षेच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण आयुक्तांच्या अंतर्गत एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याचेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे आणि परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असणार आहे.


FYJC Online Admission 2021

FYJC Online Admission: The Department of Education has decided to give one last chance to the students who have not yet got admission in Class XI. Accordingly, there will be a final round for students deprived of this admission.

ज्या विद्यार्थ्यांना अजूनह अकरावीत प्रवेश मिळालेला नाही त्यांना शिक्षण विभागाने एक अखेरची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार या प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांसाठी एक अंतिम फेरी होणार आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत प्रवेशासाठी विविध फेऱ्या पार पडल्या. मात्र तरीही काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले असल्याचे निदर्शनास आल्याने शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांसाठी एक अंतिम फेरी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांनी १३ फेब्रुवारी २०२१ पर्यंत आपले प्रवेश निश्चित करायचे आहे.

अंतिम फेरीचे वेळापत्रक आणि नियोजन पुढीलप्रमाणे असेल –१) या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना १२ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल आणि १३ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल.
२) ही प्रवेशांचि अंतिम फेरी असणार आहे. २०२०-२१ च्या प्रवेशांसाठी १३ फेब्रुवारी ही अंतिम दिनांक आहे. य%0नंतर अकरावीचे प्रवेश बंद होतील.
३) प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर हे प्रवेश होणार आहेत.

प्रवेशांचे वेळापत्रक –
५ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी २०२१ – ऑनलाइन अर्ज भरणे, प्रवेश रद्द करणे (आवश्यकता असल्यास), मार्गदर्शन केंद्राकडून अर्ज पडताळणी करणे

८ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी २०२१ – प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावर प्रवेशांची फेरी सुरू. सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार

८ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी २०२१ – अलॉटमेंट मिळाल्यावर प्रोसिड फॉर अॅडमिशन हा पर्याय क्लिक करणे. दिलेल्या कॉलेजमधील प्रवेश निश्चित करणे.

१३ फेब्रुवारी २०२१ (सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत) – कॉलेजांनी झालेल्या प्रवेशांची स्थिती दर्शवणे

१४ फेब्रुवारी २०२१ – रिक्त जागा आणि अंतिम प्रवेश स्थिती जाहीर करणे.


FYJC Online Admission 2021: There are around one and a half lakh vacancies in junior colleges in Mumbai and metropolitan areas. About 15,000 students are still without admission. Admission rounds have been started on a first come first served basis for admission to these seats.

FYJC Online: प्राधान्य फेरीचे वेळापत्रक जाहीर

मुंबई आणि महानगर परिसरातील ज्युनिअर कॉलेजांत अकरावीच्या जवळपास सव्वा लाख जागा रिक्त आहेत. तर सुमारे १५ हजार विद्यार्थी अद्याप प्रवेशाविना आहेत. या जागांवरील प्रवेशासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर प्रवेशफेरी सुरू करण्यात आली आहे.

अकरावीच्या तीन नियमित आणि दोन विशेष फेऱ्या अशा एकूण पाच फेऱ्यांनंतर मुंबई आणि परिसरातील कॉलेजांमध्ये एक लाख ९६ हजार १३६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राधान्य फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरीसाठी मुंबई आणि महानगर परिसरातील ज्युनिअर कॉलेजांमध्ये अकरावीच्या एक लाख २४ हजार २५४ जागा उपलब्ध आहेत. बुधवारपासून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार नऊ टप्प्यांत या फेरीतील प्रवेश करण्यात येणार आहेत. आतापर्यंत प्रवेश न मिळालेले विद्यार्थी, अर्ज न केलेले विद्यार्थी किंवा प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडलेले, मिळालेले प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी या फेरीत सहभागी होऊ शकतील. अकरावीला प्रवेश घेण्याची ही शेवटची संधी असणार आहे.

प्रवेश प्रक्रिया कशी?

 • १३ ते १५ जानेवारी – ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी
 • १६ ते १८ जानेवारी – ८० ते १०० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी
 • १९ आणि २० जानेवारी – ७० ते १०० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी
 • २१ आणि २२ जानेवारी – ६० ते १०० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी
 • २३ ते २५ जानेवारी – ५० ते १०० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी
 • २७ आणि २८ जानेवारी – दहावी उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी
 • २९ आणि ३० जानेवारी – एटीकेटी मिळालेले विद्यार्थी
सोर्स: म. टा.
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!