GATE 2021 परीक्षेचे वेळापत्रक जारी; पॅटर्नही बदलला!

GATE 2021 Exam Schedule Issued

Indian Institute of Technology IIT Mumbai has released the schedule of the Graduate Aptitude Test in Engineering. According to official information, the application window for Gate 2021 will be open from September 14 to 30. These applications can be filled from the official website gate.iitb.ac.in.

GATE 2021 परीक्षेचे वेळापत्रक जारी; पॅटर्नही बदलला

गेट २०२१ परीक्षेचे वेळापत्रक, पेपर पॅटर्न, परीक्षा केंद्रे आदी सर्व माहिती असणारी माहिती पुस्तिका आयआयटी मुंबईने संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT मुंबईने ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग अर्थात गेट परीक्षेचे वेळापत्रक जारी केले आहे. अधिकृत माहितीनुसार, गेट २०२१ साठी अॅप्लिकेशन विंडो १४ ते ३० सप्टेंबर या कालावधीत खुली होणार आहे. gate.iitb.ac.in या अधिकृत संकेतस्थळावरून हे अर्ज भरता येणार आहेत.

अर्ज ७ ऑक्टोबरपर्यंत शुल्कासह जमा करता येणार आहे. जमा केलेल्या अर्जात सुधारणा करण्याची सुविधा १३ नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध असेल. परीक्षेचे अॅडमिट कार्ड gate.iitb.ac.in या संकेतस्थळावर ८ जानेवारीपासून उपलब्ध होतील. गेट परीक्षेचे आयोजन ५ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. परीक्षा २ वेगवेगळ्या सत्रांत होतील. पहिलं सत्र सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत तर दुसरं सत्र दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असेल. अर्थात या शिफट्स तात्पुरत्या आहेत. म्हणेजच भविष्यात या बदल होऊ शकतो, असे आयआयटी मुंबईने कळवले आहे.

गेट २०२१ मध्ये यंदा दोन नव्या विषयांची भर पडली आहे. एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड इंजिनीअरिंग आणि ह्युमॅनिटिज अँड सोशल सायन्स हे दोन विषय नव्याने समाविष्ट करण्यात आले आहेत.

गेट २०२१ साठी पात्रता निकषांत बदल

GATE 2021 साठी पात्रता निकषांमध्ये यंदा सवलत देण्यात आली आहे. यूजीचे तृतीय वर्षाचे विद्यार्थी देखील गेट २०२१ परीक्षेसाठी अर्ज करू शकणार आहेत.

आयआयटी मुंबईने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘GATE 2021 परीक्षा देण्यासाठी पात्रता निकष १०+२+४ असायचा तो यंदा १०+२+३ केला आहे. म्हणजेच पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाला असणारे विद्यार्थी देखील ही परीक्षा देऊ शकतात.’

हेही वाचा: नवे शिक्षण धोरण: पंतप्रधान मोदींनी दिली ‘या’ सात प्रश्नांची उत्तरे

परीक्षेचा पॅटर्नही बदलला

गेट परीक्षेची माहिती पुस्तिका आयआयटी मुंबईने संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. यानुसार यंदा परीक्षेच्या पॅटर्नमध्येदेखील काही बदल करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना MCQ (मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स) आणि NAT (न्यूमरिकल आन्सर टाइप क्वेश्चन्स) सोबतच यंदा मल्टीपल सिलेक्ट क्वेश्चन्स असतील. गुणांची विभागणी पुढीलप्रमाणे –

सब्जेक्ट क्वेश्चन्स – ७२ मार्क
जनरल अॅप्टिट्यूड – १५ मार्क
इंजिनीअरिंग मॅथेमॅटिक्स – १३ मार्क
एकूण गुण – १००

परीक्षा केंद्रांच्या शहरात वाढ

झांसी (आयआयटी कानपूर), ढेंकनाल (आयआयटी खडगपूर), चंद्रपूर (आयआयटी मुंबई) आणि मुझफ्फरनगर (आयआयटी रुरकी) ही शहरं परीक्षा केंद्रे म्हणून वाढवण्यात आली आहेत, तर पाला (आयआयटी मद्रास) हे शहर परीक्षा केंद्रांच्या यादीतून वगळण्यात आलं आहे.

हेही वाचा: घरबसल्या देता येणार सीएस परीक्षा; पॅटर्नही बदलला

गेट परीक्षा कशासाठी?

एम.टेक्. अभ्यासक्रमांचे प्रवेश तसेच पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग शासकीय कंपन्यांमधील नोकऱ्यांसाठी गेट स्कोरची आवश्यकता असते. देशातील सर्व आयआयटी मिळून एम.टेक्.च्या २५०० जागा उपलब्ध आहेत. यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!