GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

UPSC CAPF Exam 2020

सीएपीएफ २०२० परीक्षविषयी यूपीएससीची ही माहिती

Notification for UPSC CAPF 2020 Exam: Central Public Service Commission (UPSC) has issued a new circular. This circular deals with recruitment in the Central Armed Police Force. The UPSC has issued notification of CAPF Recruitment Exam 2 in this circular. This circular is available on the official website of UPSC. A link to it is also given later in this news.

According to the scheduled schedule, the notification for the CAPF (Assistant Commandants) Exam 2020 was to be announced by UPSC on Wednesday, April 22. Besides, the pre-recruitment examination was to be held on August 9, 2020. But now, according to the UPSC circular, the recruitment notification of CAPF will be issued later. The commission said the decision was taken against the backdrop of an outbreak of the corona virus and a lockdown in the country.

यूपीएससी सीएपीएफ २०२० परीक्षेची अधिसूचनाः केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नवे परिपत्रक जारी केले आहे. हे परिपत्रक केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील भरती संबंधित आहे. यूपीएससीने या परिपत्रकात सीएपीएफ भरती परीक्षा २०२० च्या अधिसूचनेची माहिती दिली आहे. यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर हे परिपत्रक उपलब्ध आहे. या बातमीत पुढे त्याची लिंकही देण्यात येत आहे.

नियोजित वेळापत्रकानुसार, सीएपीएफ (सहाय्यक कमांडंट्स) परीक्षा २०२० ची अधिसूचना बुधवारी, २२ एप्रिल २०२० रोजी यूपीएससी जाहीर करणार होते. त्याचबरोबर या नोकरभरतीची पूर्व परीक्षा ९ ऑगस्ट २०२० रोजी घेण्यात येणार होती. पण आता यूपीएससीच्या परिपत्रकानुसार, सीएपीएफच्या भरतीसंदर्भातील नोटिफिकेशन नंतर जारी केलं जाणार आहे. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे आयोगाने कळवले आहे.

 CAPF च्या कुठल्या सेवांमध्ये भरती?

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स परीक्षेद्वारे विविध दलांमध्ये भरती केली जाते. सीएपीएफ असिस्टंट कमांडंट (ग्रुप ए) द्वारे निवड झालेल्या उमेदवारांची पुढील दलांमध्ये नियुक्ती होते –

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF)
सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (CRPF)
सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF)
इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP)
सशस्त्र सीमा बल (SSB)

यूपीएससीच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

सोर्स: मटा

Leave A Reply

Your email address will not be published.