GMC Bharti – राज्यात शासकीय डॉक्टरांच्या ६० टक्के जागा रिक्त 

Govt Medical College Bharti 2022

Govt Medical College Bharti 2022– As per the latest news, About 60 per cent vacancies for medical doctors in government medical colleges and hospitals in the state are vacant. With the exception of the Department of Ophthalmology, Gynecology and Surgery, more than 50 per cent of the vacancies in the remaining 10 departments are vacant.

नागपूर : सामान्य व गरीब रुग्णांचे आशेचे किरण असलेल्या राज्यातील वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) डॉक्टरांच्या तब्बल ६० टक्के जागा रिक्त आहेत. यातही नेत्र, स्त्री रोग व शल्यचिकित्सा विभाग सोडल्यास उर्वरित १० विभागांतील सहायक प्राध्यापक संवर्गातील ५० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त आहेत. 

राज्यात शासकीय डॉक्टरांच्या ६० टक्के जागा रिक्त 

राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांचा विचार केला असता, या महाविद्यालयांवर तज्ज्ञ व कौशल्यप्राप्त

डॉक्टर घडविण्यासोबत ‘टर्शरी केअर’चीही जबाबदारी आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आधीच मंजूर पदांची संख्या कमी पडत आहे. त्यात रिक्त पदांमुळे कार्यरत डॉक्टरांवर कामाचा ताण पडला आहे.

सहायक प्राध्यापकांच्या ५८६ जागा रिक्त

राज्यात २२ मेडिकल कॉलेजमधील १३ विविध विषयांतील सहायक प्राध्यापकांच्या ९४६ जागा मंजूर आहेत. यातील ३७८ जागा भरलेल्या असून, तब्बल ६० टक्के म्हणजे, ५८६ जागा रिक्त आहेत.


राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत विविध पदांच्या 884 जागा रिक्त

Govt Medical Assistant Professor Bharti 2022: There are 884 vacancies in 22 government medical colleges and Hospital  in the state. It has posts of Associate Professor, Professor, Assistant Professor. Out of these, 450 assistant professors are currently serving in these medical colleges. Read More details as given below.

GMC औरंगाबाद मध्ये123 पदांची भरती – नवीन जाहिरात प्रकाशित

Govt Medical College Bharti 2022 राज्यातील 22 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत 884 सहायक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. त्याचप्रमाणे सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक यांनी वर्षानुवर्षे सेवा दिली, तरीही त्यांची वेळेवर पदोन्नती होत नाही की त्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभही दिला जात नाही. यावरून शासकीय वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात सध्या अनागोंदी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

या जिल्ह्यातील GMC मध्ये 56 पदांची भरती – नवीन जाहिरात प्रकाशित

या जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये भरती-नवीन जाहिरात प्रकाशित

Govt Medical College Bharti 2022

  • कोविड काळात पहिली, दुसरी आणि तिसर्‍या लाटेत अविरत काम करणार्‍या डॉक्टरांच्या मागणीची तत्काळ दखल घेण्याची गरज आहे. राज्यातील 22 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटलमध्ये 884 सहायक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत.
  • यापैकी सध्या 450 सहायक प्राध्यापक हे या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड सेवा देत असून, ते या जागांवर पात्र आहेत. मात्र, सध्या हे सहायक प्राध्यापक कंत्राटी पद्धतीने राबत आहेत; परंतु, वारंवार आंदोलन, मोर्चे काढूनही त्यांची ही मागणी पूर्ण केली जात नाही, ही शोकांतिका आहे. यामुळे या शिक्षकांचा उत्साह मावळत असून, ते वैद्यकीय शिक्षणाच्या भविष्याच्या दृष्टीने योग्य नाही.
  • राज्यात दरवर्षी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतून पदव्युत्तर पदवी घेऊन साडेतीनशे ते पाचशे डॉक्टर बाहेर पडतात. ज्या डॉक्टरांनी कोरोनाच्या काळात सक्रियपणे काम केले आहे, त्यांचे वैद्यकीय सेवेत समावेशन करावे, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशनने केली आहे.
  • त्यासाठी या संघटनेने जे जे वैद्यकीय महाविद्यालयात नुकतेच 17 दिवस साखळी उपोषण केले. मात्र, त्याचीही दखल न घेतल्याने शिष्टमंडळ वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांना भेटायला गेले असताना त्यांनी डॉक्टरांना ‘बास्टर्ड, गेट आउट’ अशी भाषा वापरून त्यांना अपमानित केले होते.

या जिल्यातील वैद्यकीय महाविद्यालयांत अध्यापकांची पदे भरणार

Govt Medical College Bharti 2022-GMC Bharti 2022- Under the Center of Excellence scheme, teaching posts will be filled in medical colleges in Nagpur, Pune, and Akola. It has been approved to create a total of 9 posts of 1 Professor, 3 Associate Professors, and 5 Assistant Professors. Read More details as given below.

GMC Recruitment 2022– सेंटर ऑफ एक्सलन्स योजनेंतर्गत नागपूर, पुणे तसेच अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सध्याच्या उपलब्ध मनुष्यबळात वाढ करून ९ अध्यापकीय पदांची निर्मिती करण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

त्यानुसार वै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अकोला या तीन संस्थांकरिता १ प्राध्यापक, ३ सहयोगी प्राध्यापक व ५ सहायक प्राध्यापक अशी एकूण ९ पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या पदांसाठी वार्षिक रु.१.७५,१०,६५२/- (रु. एक कोटी पंच्चाहत्तर लाख दहा हजार सहाशे बावन्न फक्त ) खर्च होईल. तसेच सद्याच्या एकूण २७ पदव्युत्तर विद्यार्थ्यांमध्ये अतिरिक्त ५९ पदव्युत्तर विद्यार्थ्यांची वाढ होईल.


Government Medical College Recuritment 2021 for Professor posts will be held soon. As per the latest news there were 790 posts of associate professors are vacant in government medical colleges across the Maharashtra state. The government has started the process through the Maharashtra Public Service Commission (MPSC) to fill that posts. Currently, professors are being appointed on a three-month contract basis across the state. The MPSC recruitment process has received a great response. The majority of applicants are currently working on honorarium. Eligibility such as MD or MS after MBBS and at least one year of experience as a resident doctor.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद मध्ये123 पदांची भरती

MPSC वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागामध्ये 228 पदांची भरती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत प्राध्यापकांची ७९० पदे रिक्त

 राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत सहयोगी प्राध्यापकांची तब्बल ७९० पदे रिक्त आहेत. त्या भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासनाने प्रक्रिया सुरू केली आहे; पण आयोगाच्या कामकाजाची मंद गती पाहता ही पदे केव्हा भरली जातील याबाबत वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी साशंक आहेत.

राज्यात काही नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये मंजूर झाल्याने रिक्त जागांचा प्रश्न चर्चेत आला आहे. सातारा शासकीय सर्वोपचार रुग्णालयात व वैद्यकीय महाविद्यालयाला येत्या शैक्षणिक वर्षापासून १०० जागांवर प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने गुरुवारी (दि. १६) मंजुरी दिली. पण तेथे कामासाठी प्राध्यापकच उपलब्ध नाहीत. परिषदेच्या पाहणीवेळी मिरज, सांगली, पुणे व सोलापुरातून प्राध्यापक तात्पुरते नियुक्त केले होते. अलिबाग, सिंधुदुर्ग व उस्मानाबादेतही नव्या महाविद्यालयांचे काम सुरू आहे; पण तेथेही प्राध्यापक नाहीत.

 सध्या राज्यभरात तीन-तीन महिन्यांच्या कंत्राटी तत्त्वावर प्राध्यापक नियुक्तीस आहेत. एमपीएससीच्या भरतीप्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अर्ज करणाऱ्यांमध्ये सध्या मानधनावर काम करणारेच बहुसंख्येने आहेत. एमबीबीएसनंतर एमडी किंवा एमएस आणि किमान एक वर्षाचा निवासी डॉक्टर म्हणून सेवेचा अनुभव अशी पात्रता अपेक्षित आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संपली. एमपीएससीच्या कार्यपद्धतीनुसार उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार नाही, गरजेनुसार चाळणी परीक्षा होईल. मुलाखती मात्र होणार आहेत. ही प्रक्रिया कितपत गतीने पूर्ण होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. नव्या महाविद्यालयांना यातूनच प्राध्यापक मिळणार आहेत.

1 Comment
  1. Krushna Baburao Darunte says

    X-Ray technician
    1 years experience

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!