Gramsevak Bharti 2022 – ग्रामसेवक आणि ग्रामविकास पदभरती अपडेट..

Gramsevak Bharti 2022

Gramsevak Bharti 2022 updates –  As per the news, The posts of Gram Sevak and Gram Vikas Adhikari will be Canceled soon. Instead of this a single post of Panchayat Development Officer will be created. The state government has also started preparations to canceled these posts and create a single post. Read More details regarding Garmsevak Bharti 2022/ Gramsevak Recruitment 2022

ग्रामसेवक आणि ग्रामविकास पदभरती संदर्भात नवीन अपडेट -जाणून घ्या

Gram Vikas Adhikari Vacancy 2022 

Gramsevak Bharti 2022- ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदाकरिता परीक्षा देणाऱ्या इच्छुकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ग्रामसेवक आणि ग्रामविकास आधिकारी ही पदं लवकरच रद्द होणार आहेत. याऐवजी पंचायत विकास अधिकारी हे एकच पद निर्माण केले जाईल. यासंबंधीची मागणी ग्रामसेवक संघटनेकडून अनेक दिवसांपासून होत होती. त्यानुसार, राज्य सरकारनेदेखील ही पदे रद्द करून एकच पद तयार करण्यासाठीची तयारी सुरु केली आहे. नाशिक येथील विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेसाठी यासाठीची समिती नेमण्यात आली आहे. रद्द झालेल्या दोन्ही पदांची वेतनश्रेणी, पदोन्नती आदी बाबींचा सविस्तर अभ्यास या समितीतर्फे केला जाईल आणि त्यानुसार नवीन पदासाठीचे नियम ठरवले जातील. समितीने सहा महिन्यांच्या आता अहवाल सादर करावा, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ  यांनी दिल्या आहेत.

ग्रामसेवक आणि ग्रामविकास पदे रद्द होणार, याऐवजी एकच पद निर्माण होणार. समितीने सहा महिन्यांच्या आता अहवाल सादर करावा, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिल्या आहेत. 

.. या गोष्टींचा अभ्यास करून निर्णय होणार

Gram Vikas Adhikari Bharti 2022

ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पद रद्द करून नवे पद निरमाण करण्याची आवश्यकता आणि त्याची कारणमीमांसा करण्याची जबाबदारी या समितीवर देण्यात आली आहे.तसेच ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांची स्वतंत्र वेतनश्रेणी असल्याने एकच पद निर्माण केल्यास अनुज्ञेय वेतनश्रेणीचा अभ्यास केला जाईल. तसेच वेतन, वेतन श्रेणी, कालबद्ध पदोन्नती, वित्तीय परिगणना आणि इतर बाबींचा अभ्यास करून शासनाला सहा महिन्याच्या मुदतीत अहवाल सादर करणार आहे.

 

 


Gramsevak Bharti 2022- There are about 250 vacancies in the Gram Sevak cadre of the district. As a result, only 578 Gram Sevaks are in charge of 883 Gram Panchayats in the district. Read More details as given below

जिल्यातील ग्राम सेवक संवर्गातील सुमारे २५० च्या जवळपास पदे रिक्त आहेत. त्यामळे जिल्ह्यातील एकूण ८८३ ग्राम पंचायतीचा डोलारा केवळ ५७८ ग्राम सेवक सांभाळत आहेत, परिणामी, ग्रामविकासामध्ये मुख्य भूमिका असणाऱ्या ग्रामसेवकांना एक नाही तर चक्क तीन ते चार ग्राम पंचायतीचा प्रभार सांभाळावा लागत आहेत.

Gramsevak Bharti 2022

मागील काही वर्षांपासून ग्राम सेवक भरती झाली नाही. याउलट अनेक ग्राम सेवक सेवानिवृत्त झाले. त्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे ग्रामसेवकांची रिक्त भरण्यात यावी अशी मागणी ग्रामसेवक संघटने कडून अनेकदा करण्यात आली.


Gramsevak Bharti 2022- There are 12 vacancies for Gram Sevaks in Sindevahi taluka. Due to non-filling of vacant posts of Gram Sevaks in Sindevahi taluka, development works are in progress. There are 50 gram panchayats through Sindevahi Panchayat Samiti and 22 to 24 gram sevaks are in charge of these gram panchayats.

Gramsevak Bharti 2022: सिंदेवाही तालुक्यातील ग्रामसेवकांची रिक्त पदे भरण्यात न आल्यामुळे विकास कामे खोळंबळी आहेत. सिंदेवाही पंचायत समिती मार्फत ५० ग्राम पंचायती असून, या ग्राम पंचायची कारभारात २२ ते २४ ग्रामसेवक सांभाळत आहेत. याच ग्राम सेवक पंचायत दोन -तीन गर्मसेवक पाचसात समितीच्या कार्यालयात दत्तक असल्या सारखे आहेत. त्यामुळे उर्वरित ग्रामसेवक ५० ग्राम  पंचायतीचा कारभार हा संशोधनाचा विषय आहे.

 

Gramsevak Bharti 2022

Gramsevak Bharti 2022

 

 


Grampsevak Bharti 2022: There are 74 Gram Panchayats under Pandharkavada Panchayat Samiti and only 48 Gram Sevaks are in charge of this Gram Panchayat. In Pandharkavada Panchayat Samiti there is 26 vacant post available these vacant posts will be filled soon. Read More details about are given below.

पांढरकवडा तालुक्यातील ग्रामसेवकांची रिक्त पदे भरण्यात न आल्यामुळे येथे विविध पदे रिक्त आहेत. पांढरकवडा पंचायत समिती अंतर्गत 74 ग्रामपंचायती असून, या ग्रामपंचायतीचा कारभार केवळ 48 ग्रामसेवक सांभाळत आहेत.

Gramsevak Bharti 2022

तालुक्यातील ग्रामसेवकांची रिक्त पदे भरण्यात न आल्यामुळे विकासकामे खोळंबली आहेत. पांढरकवडा पंचायत समिती अंतर्गत 74 ग्रामपंचायती असून, या ग्रामपंचायतीचा कारभार केवळ 48 ग्रामसेवक सांभाळत आहेत. या 48 ग्रामसेवाकांपैकी दोन-तीन ग्रामसेवक पंचायत समितीच्या कार्यालयात दत्तक असल्यासारखे आहेत. त्यामुळे उर्वरित असल्यासारखे आहेत. त्यामुळे उर्वरित ग्रामसेवक 74 ग्रामपंचायतीचा कारभार कसा सांभाळत असतील, हा संशोधनाचा विषय आहे.

 

 

 


ग्रामसेवकांच्या अभावी गावगाड्याला ब्रेक!

नाशिक : ग्रामपंचायतीला सरकारने थेट निधी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे ग्रामपंचायतीचे आर्थिक बळ वाढले आहे. या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची गरज आहे. पण, जिल्ह्यातील १,३८५ ग्रामपंचातीमध्ये ग्रामसेवकांचे ४२८ पदे रिक्त आहेत. त्यात मंजुरपदांपैकी असेलली संख्या ही १३४ आहे. त्यामुळे काही ठिकाणी ग्रामसेवकाला दोन ग्रामपंचायतीचा पदभार देण्यात आला आहे. या अतिरिक्त भारामुळे गावाचा विकास कसा करणार हाच खरा प्रश्न आहे.

जिल्ह्यात ग्रामपंचायतीची संख्या वाढली. पण, ग्रामसेवक पदाची संख्या मात्र २००१ च्या पॅटर्न प्रमाणेच आहे. त्यामुळे ही दरी थेट ४२८ पर्यंत वाढली आहे. काही ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत व छोट्या ग्रामपंचायत असल्यामुळे या संख्येत काही घट होवू शकते. तरीही मोठ्या प्रमाणात हे पदे रिक्त राहतात. त्यासाठी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. विस्तार अधिकारी यांचे १४ पदे मंजुर असून, त्याची संख्या पाच आहे. तर ग्रामविकास अधिकारी यांचे ५८ पदे मंजूर असून, १९ रिक्त आहे. तर ग्रामसेवकाचे १,०१९ पदे मंजूर असून, रिक्त पदाची संख्या ११० आहे.

ग्रामपंचायतील थेट केंद्र सरकारकडून १४ व्या वित्त आयोगाकडून २२५ कोटीच्या आसपास निधी दरवर्षी येतो. तर ‘पेसा’मधून राज्य सरकारकडून ५० ते ५५ कोटी रुपये मिळतात. त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन मंडळाकडून जनसुविधा, नागरी सुविधा, तीर्थ क्षेत्र विकास निधी, सर्वसाधारण व आदिवासी विकास निधीतून मोठ्या प्रमाणात पैसे मिळतात. त्याचप्रमाणे खासदार व आमदार निधीचे काम वेगळे असते. या सर्व निधीचा योग्य वापर व्हावा व त्यावर नियंत्रण राहणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामसेवक हा सरकारचा प्रतिनिधी येथे सक्षम असणे गरजेचे आहे. पण, १३८५ ग्रामपंचायत असतांना मंजूर पदे ही १०९१ आहे. त्यामुळे येथेच २९४ पदाचा फरक आहे. त्यात मंजूर पदातही १३४ पदे रिक्त आहेत.

चार वर्ष भरती नाही

नोव्हेंबर २०१५ मध्ये ग्रामसेवकांची भरती झाली. पण, त्यानंतर चार वर्षे ही भरती झाली नाही. त्यात अनुकंपा तत्त्वावर असलेल्या पदातून ७ ग्रामसेवक भेटले. पण, तरी ही संख्या कमीच राहिली. ग्रामसेवकांबरोबरच येथील कर्मचाऱ्यांची संख्याही कमीच आहे. त्याकडेही सरकारने लक्ष घालण्याची गरज आहे.

तरी होते शुक्रवारी तपासणी

जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत अधिकारी रविंद्र परदेशी ग्रामसेवकांची संख्या कमी असली तरी त्यातून समन्वय साधत असतात. दर शुक्रवारी त्यांनी ग्रामपंचायती तपासणी उपक्रमही हाती घेतला आहे. आतापर्यंत १,३८५ पैकी ७५० ग्रामपंचायतीची तपासणी त्यांनी केली आहे.

ग्रामपंचायत वाढल्या पण, त्या तुलनेत ग्रामसेवक कमी आहे. तरीही आम्ही कमी संख्येतही सर्व कामे चोखपणे पार पाडत आहोत. दर शुक्रवारी आम्ही ग्रामपंचायतीची तपासणी करतो. आतापर्यंत ७५० ग्रामपंचायतीची तपासणी केली आहे. पदे मंजूर करण्यासाठी आम्ही शासनस्तरावर पाठपुरावा करीत आहोत.

सौर्स : मटा 

1 Comment
  1. Shilpa Mishra says

    A. T. Post.vangaon kompada taluka. Dahanu, District .Palghar, pin no. 401103

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!