HDFC Bank Bharti- HDFC बँकेत तब्बल २ हजार ५०० पदांची भरती

HDFC Bank Recruitment 2021

HDFC Bank Vacancy 2021- HDFC Bank has decided to recruit 2,500 people in the next six months. The bank aims to double its presence in rural areas in the next 18-24 months through branch network, business representative, common service center, virtual relationship management and digital outreach platform.

बॅँक परीक्षा आता मराठीसह १३ प्रादेशिक भाषांमध्ये होणार

HDFC बँकेत तब्बल २ हजार ५०० अधिक पदांची भरती

HDFC Bank Recruitment 2021: खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कर्ज देणारी एचडीएफसी बँकेने राज्यातील बेरोजगरांसाठी आनंदाची बातमी जाहीर केली आहे. एचडीएफसी बॅंक शहरातून आता ग्रामीण भागात आपली पोहोच दुप्पट करत आहे. येत्या काही दिवसात एचडीएफसी दोन लाख गावांपर्यंत पोहोचणार आहे. यासाठी बँकेतर्फे पुढील सहा महिन्यांत २ हजार ५०० लोकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

HDFC Bank Bharti 2021

  • पुढील १८ ते २४ महिन्यांत शाखा नेटवर्क, व्यवसाय प्रतिनिधी, सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर), भागीदार, व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजमेंट आणि डिजिटल आउटरीच प्लॅटफॉर्मद्वारे ग्रामीण भागात आपला सहभाग दुप्पट करण्याचे उद्दिष्ट असल्याचे बँकेने म्हटले आहे.
  • तत्पूर्वी रविवारीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांच्या सुलभतेबद्दल नाराजी व्यक्त केली आणि त्यांना त्यांची उपस्थिती आणखी वाढवण्यास सांगितले. त्यानंतर एचडीएफसीने हे पाऊल उचलण्याचा निर्णय जाहीर केला.
  • एचडीएफसी बँकेचे ग्रुप हेड (कमर्शियल अँड रूरल बँकिंग) राहुल शुक्ला यांनी यासंदर्भात माहिती दिली. ‘भारतातील ग्रामीण आणि निमशहरी बाजारपेठांमध्ये बँकेटा विस्तार कमी आहे.
  • भारतीय बँकिंग व्यवस्थेसाठी दीर्घकालीन वाढीच्या संधी याद्वारे निर्माण केल्या जातील’ असे ते म्हणाले. पुढे जाऊन देशातील प्रत्येक पिनकोडमध्ये सेवा उपलब्ध करणे हे बॅंकेचे उद्दीष्ट असल्याचेही ते म्हणाले.
31 Comments
  1. Prakash bharat barat says

    This is your job available sir , i am interested your job.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!