IBPS Bharti 2020: सरकारी बँकांमध्ये विविध पदांवर भरती सुरू

IBPS PO MT Recruitment 2020: The Institute of Banking Personnel Selection (IBPS) will fill several posts of Probationary Officer (PO) and Management Trainee (MT). The recruitment process has started from Wednesday 5th August 2020. It will be possible to apply online at ibps.in. Through this recruitment process, jobs will be available in various government banks. Notifications, application links are given below in this news, by clicking on it, you can read the full notification.

इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शनकडून विविध पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे…

IBPS PO MT Recruitment 2020: इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT) ची अनेक पदे भरणार आहे. यासाठी बुधवार ५ ऑगस्ट २०२० पासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ibps.in या संकेतस्थळावरवर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून विविध सरकारी बँकांमध्ये नोकर्‍या मिळतील. अधिसूचना, अर्जाच्या लिंक्स या बातमीत पुढे देण्यात आल्या आहेत, त्यावर क्लिक करून, आपण संपूर्ण अधिसूचना वाचू शकता.

अर्जाचा तपशील

पीओ / एमटीसाठी ऑनलाईन अर्ज लिंक ५ ऑगस्ट २०२० पासून आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवर कार्यान्वित केली गेली आहे. या भरती प्रक्रियेत सामील होऊ इच्छिणारे उमेदवार आता ऑनलाइन अर्ज करू शकतात.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ ऑगस्ट २०२०

अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन फी जमा करण्याची
अंतिम तारीख – २६ ऑगस्ट २०२०

अर्ज प्रिंट करण्याची अंतिम तारीख – १० सप्टेंबर २०२० या भरतीसाठी

निवड प्रक्रिया

IBPS (आयबीपीएस) द्वारेत लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा दोन टप्प्यात असेल. प्रथम टप्पा प्रीलिम्स आणि दुसरा मुख्य. दोन्ही परीक्षा ऑनलाइन मोडवर घेतल्या जातील. दोघांमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. त्यानंतर निवडल्या जाणार्‍या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

IBPS PO Exam 2020 calendar: पूर्ण वेळापत्रक

ऑनलाईन नोंदणी – ५ ते २६ ऑगस्ट २०२०
प्रिलिम्स प्रशिक्षणासाठी कॉल लेटर डाउनलोड – सप्टेंबर २०२०
पूर्व परीक्षा प्रशिक्षण तारीख – २१ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२०
ऑनलाइन प्रिलिम्स परीक्षेसाठी कॉल लेटर डाउनलोड – ऑक्टोबर 2020
ऑनलाईन पूर्व परीक्षा – ३, १० आणि ११ ऑक्टोबर
पूर्व परीक्षेचा निकाल –
ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२०
ऑनलाइन मुख्य परीक्षेचे कॉल लेटर डाउनलोड – नोव्हेंबर २०२०
ऑनलाइन मुख्य परीक्षा – २८ नोव्हेंबर २०२०
मुख्य परीक्षेचा निकाल – डिसेंबर २०२०
मुलाखतीसाठी कॉल लेटर डाउनलोड – जानेवारी २०२१
मुलाखत – जानेवारी / फेब्रुवारी २०२१
प्रोव्हिजनल अलॉटमेंट – एप्रिल २०२१

आयबीपीएस पीओ 2020 परीक्षेच्या अधिसूचनेसाठी येथे क्लिक करा.


IBPS Exams 2020 August Exam Date Postponed

IBPS Exam 2020: The Institute of Banking Personnel Selection (IBPS) has postponed several recruitment examinations for August 2020. The exams were to be held on August 9, 2020, across the country. IBPS has also issued a notice to postpone the examination. More updated related with the exam visit our site regularly.

IBPS Admit Card-Download

IBPS Exams :आयबीपीएसच्या ऑगस्टमधील परीक्षा लांबणीवर

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन अर्थात आयपीपीएस परीक्षेच्या ऑगस्टमधील परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत..

IBPS exams for 9 august 2020 postponed: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने ऑगस्ट २०२० मध्ये होणाऱ्या अनेक भरती परीक्षा स्थगित केल्या आहेत. ९ ऑगस्ट २०२० रोजी देशभरात या परीक्षा होणार होत्या. परीक्षा लांबणीवर टाकल्याबाबतची नोटीसही आयबीपीएसने जारी केली आहे.

 

या नोटीशीत परीक्षेच्या नव्या तारखेबाबतची माहितीदेखील देणअयात आली आहे. यानुसार, आयबीपीएस ९ ऑगस्ट २०२० च्या सर्व परीक्षा आता १२ ऑगस्ट रोजी होणार आहेत.

पुढील परीक्षांच्या तारखा बदलल्या –

फॅकल्टी रिसर्च असोसिएट (पोस्ट कोड – ४)
रिसर्च असोसिएट (पोस्ट कोड – ५)
रिसर्च असोसिएट टेक्निकल (पोस्ट कोड – ६)
हिंदी ऑफिसर (पोस्ट कोड – ७)
अॅनालिस्ट प्रोग्रामर – विंडोज (पोस्ट कोड – ८)
एनालिस्ट प्रोग्रामर – लाइनक्स (पोस्ट कोड – ९)
आयटी अॅमिनिस्ट्रेटर (पोस्ट कोड – १०)
प्रोग्रामिंग असिस्टंट (पोस्ट कोड – ११)

आयबीपीएसने परीक्षार्थींना वेळोवेळी आपल्या संकेतस्थळावर ibps.in येथे जाऊन अद्ययावत माहिती घेण्याची सूचना केली आहे.

परीक्षा लांबणीवर टाकल्याबाबतची नोटीस वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


IBPS RRB Notification 2020: The Institute of Banking Personnel Selection i.e. IBPS has started bumper recruitment in rural banks. Officers of Scale 1, 2, and 3, Assistant posts will be recruited. The last date to apply is July 21, 2020. Through this recruitment, thousands of posts of PO and Clerk will be filled. In all, there are more than 9,000 posts in total.

IBPS RRB ग्रामीण बँकांमध्ये पीओ, क्लर्क पदांवर बंपर भरती

आयबीपीएस आरआरबी रिक्रुटमेंट: ४३ वेगवेगळ्या ग्रामीण बँकांमध्ये पीओ आणि क्लर्कच्या हजारो पदांवर भरती केली जाणर आहे.

IBPS RRB Notification 2020: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन अर्थात IBPS ने ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती सुरू केली आहे. स्केल १,२ आणि ३ चे अधिकारी, सहाय्यक पदांवर भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै २०२० आहे. या भरतीद्वारे पीओ आणि क्लर्कच्या हजारो पदांवर भरती केली जाणार आहे. ही सर्व मिळून एकूण ९ हजारांहून अधिक पदे आहेत.

आयबीपीएस आरआरबी रिक्रुटमेंट २०२० मध्ये ४३ वेगवेगळ्या ग्रामीण बँकांमध्ये ही भरती केली जाणर आहे. यामध्ये स्केल १,२ आणि ३ चे अधिकारी, सहाय्यक पदांवर भरती केली जाणार आहे. अधिकृत जाहिरातीनुसार यामध्ये यूपी ग्रामीण बँक, उत्तर बिहार ग्रामीण बँक, हरियाणा ग्रामीण बँक, राजस्थान मुरुधारा ग्रामीण बँक, मध्यांचल ग्रामीण बँक, मध्य प्रदेश ग्रामीण बँक, हिमाचल प्रदेश ग्रामीण बँक, झारखंड राज्य ग्रामीण बँक, बडोदा यूपी बँक, आर्यवर्त बँक लखनऊ, दक्षिण बिहार ग्रामीण बँक, पटना बिहार, बडोदा राजस्थान क्षेत्रीय ग्रामीण बँक आणि छत्तीसगड राज्य ग्रामीण बँकेसह अन्य राज्यांच्या बँकांचा समावेश आहे.

पगार किती?

ऑफिस असिस्टंटला ७२०० रुपये ते १९३०० रुपये पगार असणार आहे. तर ऑफिसर स्केल – III (सीनियर मॅनेजर )- २५७०० रुपये ते ३१५०० रुपये प्रति महिना पगार असणार आहे. ऑफिसर स्केल – II (मॅनेजर)- १९४०० रुपये ते २८१०० रुपये प्रति महिना पगार असणार आहे. ऑफिसर स्केल – I (असिस्ंटट मॅनेजर) – १४५०० रुपये ते २५७०० रुपये प्रति महिना पगार असणार आहे.

अशी होणार निवड

सहाय्यक अधिकारी पदाच्या भरतीसाठी पूर्व आणि मुख्य परीक्षा होईल. पदाच्या निवडीची अंतिम गुणवत्ता यादी मुख्य परीक्षेच्या आधारे तयार होईल.

ऑफिस स्केल १ मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवारांना मुलाखतीला बोलावले जाईल, त्याआधारे फायनल मेरिट लिस्ट तयार होईल.

ऑफिस स्केल २ आणि ३ साठी सिंगल पातळीवरील परीक्षा होईल. या परीक्षेतील गुणांच्या आधारे मुलाखतीला बोलावले जाईल आणि अंतिम गुणवत्ता यादी तयार होईल.

नोटीफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

1 Comment
  1. Bhushan Narendra patil says

    I am bhushan Narendra patil
    I am bcom complicated…

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!