ICAI CA Exam- जुलै २०२१ परीक्षेतील ऑप्ट आऊटच्या पर्यायासंदर्भात एक महत्त्वाची सूचना

ICAI CA Exam 2021

The Institute of Chartered Accountants of India has issued an important notice regarding the opt-out option for students appearing for the CA July Exam 2021. Read More details are given below.

 

CA July Exam 2021: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (Institute of Chartered Accountants of India) ने सीए जुलै परीक्षा २०२१ मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑप्ट आऊटच्या पर्यायासंदर्भात एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. यानुसार, ज्या उमेदवारांना १५ एप्रिला २०२१ किंवा त्यानंतर कोविड-१९ संसर्ग झाला आहे, त्यांना ऑप्ट आऊट सुविधेचा लाभ घेता येऊ शकेल. अशा प्रकरणात, जुलै परीक्षेला एक अटेम्प्ट म्हणून मानले जाणार नाही.

उमेदवारांनी याकडेही लक्ष द्यावे, की जर परीक्षेदरम्यान कोणत्याही पेपरला उमेदवाराने ऑप्ट आऊट केले आहे, तर त्याला उर्विरित पेपर देण्याची अनुमती नसेल.

नियोजित वेळापत्रकानुसार, सीए इंटर आणि फायनल परीक्षा ५ जुलै ते २० जुलै या कालवधीत होणार आहेत. या परीक्षांसाठी अॅडमिट कार्ड जारी झाले आहे. सुमारे ३.७४ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षांसाठी अर्ज केला आहे. या परीक्षांसंबंधीची अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी उमेदवार अधिकृत पोर्टलला भेट देऊ शकतील.


 ICAI CA Exam 2021

The Supreme Court will hear the petitions of the candidates for the upcoming CA exam 2021 on Monday. It will include hearings on opt-out options, compliance with Covid protocol, more test centers and exam postponement. ICAI has given the option of opt-out for the exam to be held in the month of July.

सर्वोच्च न्यायालयात सोमवारी आगामी CA परीक्षा २०२१ च्या उमेदवारांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. यामध्ये ऑप्ट-आऊट पर्याय, करोना प्रोटोकॉल पालन, अधिक परीक्षा केंद्र आणि परीक्षा स्थगिती यावर सुनावणी होणार आहे. ICAI ने जुलै महिन्यात होणाऱ्या परीक्षेसाठी ऑप्ट आऊटचा पर्याय दिला आहे. जो उमेदवार किंवा त्याच्या घरचे करोना पॉझिटीव्ह असतील त्यांना हा पर्याय देण्यात आला आहे. अधिवक्ता अनुभा श्रीवास्तव सहाय्य यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

न्या. एएम खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. अनिरुद्ध बोस यांचे बेंच २८ जूनला सकाळी १०.३० वाजता अनुभा श्रीवास्तव सहाय यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. संस्थेने ऑप्ट आऊटची घोषणा केली आहे. अधिक परीक्षा केंद्र आणि परीक्षा स्थगित करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांनी केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होणार आहे.


ICAI CA Exam Schedule 2021

The Institute of Chartered Accountants of India (ICAI) has announced the dates of all the examinations. ICAI has announced the new schedule of CA Foundation, CA Inter and CA Final exams on its website icai.org.

ICAI CA Exam Schedule 2021: चार्टर्ड अकाऊंट कोर्सचा अभ्यास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. द इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया(ICAI) ने सर्व परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सीए फाउंडेशन (CA Foundation), सीए इंटर (CA Inter)आणि सीए फाइनल (CA Final)परीक्षेचे नवे वेळापत्रक आयसीएआयने आपली वेबसाइट icai.orgवर जाहीर केले आहे.

केव्हा कोणती परीक्षा होणार ?

 • सीए फाउंडेशन कोर्स २०२१ – २४,२६,२८ आणि ३० जुलै २०२१
 • सीए इंटर कोर्स ग्रुप १ (Old Scheme) – ६,८,१० आणि १२ जुलै २०२१
 • सी इंटर कोर्स ग्रुप २(Old Scheme) – १४,१६आणि १८ जुलै २०२१
 • सीए इंटर कोर्स ग्रुप १ (New Scheme) – ६,८,१० आणि १२ जुलै २०२१
 • सीए इंटर कोर्स ग्रुप २ (New Scheme) – १४,१६,१८ आणि २० जुलै २०२१
 • सीए फाइनल कोर्स ग्रुप १ (Old & New Scheme) – ५,७,९आणि ११ जुलै २०२१
 • सीए फाइनल कोर्स ग्रुप २ (Old & New Scheme) – १३,१५,१७आणि १९ जुलै २०२१

CA May Exam 2021 ICAI Releases Exam Date

CA Exam 2021- ICAI has announced a revised date for the postponed CA Intermediate, final exams. The May 2021 exams will now be held from Monday 5th July 2021.

CA Exam 2021:आयसीएआयने सीए इंटरमीडिएट, फाइनल आणि पोस्ट क्वालिफिकेशन कोर्सेसच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षा आता ५ जुलै २०२१ पासून आयोजित करण्यात आल्या आहेत. सीए इंटर, फायनल आणि पीक्यूसी परीक्षा स्थगित करण्यासंबंधी अपडेट आयसीएआयने बुधवारी २६ मे २०२१ रोजी यासंदर्भातील घोषणा केली. सुधारित वेळापत्रक लवकरच जारी करण्यात येणार आहे.

सीए परीक्षाए आयोजित करणारी संस्था ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड एकाउंटंट्स ऑफ इंडिया’ (ICAI) द्वारे जारी नोटिसनुसार, ‘चार्टर्ड अकाउंटंट इंटरमीडिएट (ओल्ड स्कीम), इंटरमीडिएट (न्यू स्कीम) आणि फायनल (ओल्ड आणि न्यू स्कीम) आणि इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंट (IRAM), टेक्निकल एक्झामिनेशन अँड इंटरनॅशनल टॅक्सेशन-असेसमेंट टेस्ट (INTT-AT) च्या मे २०२१ परीक्षांचे आयोजन आता सोमवार ५ जुलै २०२१ पासून होणार आहे. परीक्षांचा विस्तृत कार्यक्रम लवकरच जारी केला जाईल.’

CA Exam 2021 संबंधीचे परिपत्रक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


ICAI CA exam postponed

Final and Inter exams starting May 21 and 22 have been postponed due to corona virus infection and safety of students. Students will have 25 days to study, the date of the exam will be announced in this manner, the ICAI said.

इन्स्टिट्यूटऑफ चार्टड अकाउँटंट ऑफ इंडियानं (ICAI) सीए फायनल आणि इंटरमिजीएटच्या 21 मे पासून सुरु होणाऱ्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा पाहून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयसीएआयनं दिली आहे. आयसीएआयनं याबाबत ट्विट केलं आहे. 21 मे पासून सीए फायनल आणि इंटरमिजीएटची परीक्षा सुरु होणार होती.

 


ICAI CA Foundation Exam 2021

ICAI CA Foundation Exam 2021:- The Institute of Chartered Accountants of India (ICAI) has issued an important circular on its official website regarding application for the CA Foundation Examination. The CA Foundation has relaxed some of the rules regarding applying for candidates for the June exam. You can view this circular at icai.org.

ICAI CA Foundation Exam 2021: द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने सीए फाउंडेशन परीक्षेसाठी अर्ज भरण्यासंदर्भात आपल्या अधिकृत संकेतस्थळावर एक महत्त्वाचं परिपत्रक जारी केलं आहे. सीए फाउंडेशन या जूनमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासंबंधीचे काही नियम शिथील करण्यात आले आहेत. हे परिपत्रक icai.org या संकेतस्थळावर पाहू शकता.

आयसीएआयने सीए फाउंडेशन कोर्स परीक्षांसाठी ऑनलाइन फॉर्म भरताना आवश्यक असलेले बारावी परीक्षेचे अॅडमिट कार्ड अपलोड करण्याचा नियम शिथील केला आहे. तसेच अॅप्लीकेशन/डिक्लेयरेशन फॉर्म अटेस्ट करण्याच्या अनिवार्यतेतूनही सवलत देण्यात आली आहे.

ICAI ने जारी केलेले परिपत्रक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


 

ICAI CA Exam Application Form

ICAI CA Exam Application Form -The Institute of Chartered Accountants of India (ICAI) has started the registration process for the CA Foundation June Exam 2021 from April 20. Candidates who want to apply for the Foundation Course Examination should apply online on the official website of ICAI, icaiexam.icai.org. The last date for submission of online forms is May 4, 2021.

CA June Exam 2021: सीए जून परीक्षा’साठी नोंदणी प्रक्रिया सुरू- इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटट्‌स ऑफ इंडिया (आयसीएआय) ने सीए फाउंडेशन जून परीक्षा 2021 साठी नोंदणी प्रक्रिया 20 एप्रिलपासून सुरू केली आहे. ज्या उमेदवारांना फाउंडेशन कोर्स परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी आयसीएआयच्या अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org वर ऑनलाइन अर्ज दाखल करावा. ऑनलाइन फॉर्म जमा करण्याची शेवटची तारीख 4 मे 2021 पर्यंत आहे.

असा करा अर्ज

 • सीए फाउंडेशन जून परीक्षेसाठी उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org वर जाणे आवश्‍यक आहे.
 • यानंतर मेन पेजवरील लॉग इन / रजिस्टर’ टॅबवर क्‍लिक करा.
 • नोंदणी करण्यासाठी आवश्‍यक तपशिलामध्ये तपशील प्रविष्ट करा.
 • नंतर आपला नोंदणीकृत आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
 • यानंतर अर्ज फी भरा आणि सीए फाउंडेशन परीक्षा फॉर्म सबमिट करा. फॉर्मचे प्रिंटआउट घ्या आणि भविष्यासाठी ठेवा.

उमेदवारांनी नोंद घ्यावी, की भारतीय उमेदवारांसाठी अर्ज फी 1500 असेल. यूएस उमेदवारांना परदेशी केंद्रांसाठी 325 डॉलर द्यावे लागतील. याशिवाय उमेदवारांना काटमांडू (नेपाळ) केंद्रांमध्ये 2200 रुपये फी भरावी लागेल. यासह 600 रुपये उशिरा फी भरावी लागेल. या व्यतिरिक्त सीए फाउंडेशन जून परीक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी आपल्याला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.


ICAI CA January 2021 Exam Results

ICAI CA January 2021 Exam Results:  The Institute of Chartered Accountants of India has announced the results of the CA final and CA Foundation January 2021 examinations. Candidates who attend the exam may check their results form the given link.

CA January Exam 2021: सीए  जानेवारी परीक्षेच्या निकाल जाहीर

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने सीएच्या अंतिम आणि सीए फाउंडेशन जानेवारी 2021 च्या परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. आयसीएएआयच्या संकेतस्थळावर आणि ट्विटर हँडलवरून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

आयसीएआयच्या वतीने सीए अंतिम आणि सीए फाउंडेशनच्या परीक्षेचा निकाल रविवारी रात्री 10 वाजता जाहीर करण्यात आला. सीए परीक्षेचा निकाल जुना आणि नवीन अशा दोन्हीसांठी जाीर झाला आहे. ज्यांनी या दोन्ही परीक्षा दिल्या आहेत त्यांना निकाल चेक करता येईल. इमेलच्या माध्यमातून निकाल मिळवण्यासाठी उमेदवारांना icaiexam.icai.org संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशनची लिंक 19 मार्चपासून 2021 पासून संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Check CA January Exam 2021 Results Here


ICAI CA May Exam 2021

ICAI CA May Exam 2021: The Institute of Chartered Accountants of India (ICAI) has announced the exam dates in May for the CA Foundation course. The exam will be held on June 24, 26, 28 and 30, 2021. The schedule is available on ICAI’s official website icai.org. or given link

ICAI CA May Exam 2021:  इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) CA फाऊंडेशन कोर्ससाठी मे मधील परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. २४, २६, २८ आणि ३० जून २०२१ रोजी ही परीक्षा होणार आहे. वेळापत्रक icai.org या आयसीएआयच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

 

यापूर्वी, संस्थेने इंटरमीडिएट आणि अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमांची तारीख पत्रक आधीच जारी केली आहे. या परीक्षा 21 मेपासून सुरू होतील आणि 6 जून 2021 रोजी संपतील. दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहेत. अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमाचा पेपर 6 सायंकाळी 3 वाजेपर्यंतच घेण्यात येणार आहे. परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार आयसीएआयच्या अधिकृत साइटवर नवीनतम अद्यतने तपासू शकतात.

CA May Exam 2021: सीए मे परीक्षेच्या तारखा जाहीर


CA May Exam 2021:: The Institute of Chartered Accountants of India (ICAI) has released the schedule for the CA May Examination 2021 on Friday, February 19, 2021. This schedule is for both Intermediate and Final courses. This schedule is available on ICAI’s official website icai.org. The exam will start on May 21 and end on June 6, 2021.

सीए मे परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सविस्तर वेळापत्रक आयसीएआय च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. इंटरमीडिएट आणि फायनल अशा दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक जारी झाले आहे.

 इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने सीए मे परीक्षा 2021 चे वेळापत्रक शुक्रवारी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी जारी केले आहे. हे वेळापत्रक इंटरमीडिएट आणि फायनल अशा दोन्ही अभ्यासक्रमांसाठी आहे. हे वेळापत्रक आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळ icai.org पर उपलब्ध आहे. परीक्षा २१ मे पासून सुरू होणार आहे आणि ६ जून २०२१ रोजी संपणार आहे.

परीक्षा एकाच सत्रात होणार आहे. सर्व दिवशी सर्व पेपर्ससाठी दुपारी ३ ते सायंकाळी ६ असा परीक्षेचा कालावधी असेल. अपवाद केवळ फायनल कोर्स पेपरचा आहे. फाइनल कोर्स ६ विषयाची परीक्षा दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत असेल.

इंटरमीडिएट (IPC) कोर्स परीक्षा – ओल्ड स्कीम

 • – ग्रुप १- २२ मे, २४ मे, २७ मे आणि २९ मे २०२१
 • – ग्रुप ११- ३१ मे, २ जून आणि ४ जून २०२१

इंटरमीडिएट कोर्स परीक्षा – न्यू स्कीम

 • – ग्रुप १- २२ मे, २४ मे, २७ मे आणि २९ मे २०२१
 • – ग्रुप ११- ३१ मे, २ जून, ४ जून आणि ६ जून

फायनल कोर्स परीक्षा (ओल्ड आणि न्यू स्कीम)

 • – ग्रुप १- २१ मे, २३ मे, २५ मे आणि २८ मे
 • – ग्रुप ११- ३० मे, जून १, जून ३ आणि ५ जून

परीक्षेसाठी अर्ज उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org वर ३१ मार्च से १३ एप्रिल २०२१ पर्यंत उपलब्ध राहतील. उमेदवारांना विसा किंवा MAESTRO क्रेडिट / डेबिट कार्ड / रुपे कार्ड / नेट बैंकिंग / भीम यूपीआय या उपयोग करून परीक्षा शुल्क भरायचे आहे.cA Intermediate, Foundation Result 2020

cA Intermediate, Foundation Result 2020: The Institute of Chartered Accountants of India (ICAI) has announced the results of the CA foundation and Intermediate examinations. The results were announced on the official website of ICAI on Monday, February 8. Students can view their results using their registration number and roll number. Along with this result, ICAI has also released a merit list of up to 50 ranks. The exam was held last year in November 2020.

सीए फाउंडेशन, इंटरमिडिएट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल संकेतस्थळावरून तसेच एसएमएसद्वारे मिळवता येईल. कसा ते वाचा…

ICAI CA Intermediate, Foundation Result 2020: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने CA foundation and Intermediate परीक्षांचा निकाल जाहीर केला. सोमवारी ८ फेब्रुवारी रोजी आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्तळावर हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थी त्यांचा नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर म्हणजेच अनुक्रमांकाच्या सहाय्याने त्यांचा निकाल पाहू शकतात. या निकालासह आयसीएआयने ५० रॅंकपर्यंतची गुणवत्ता यादीही जाहीर केली आहे. ही परीक्षा मागील वर्षी म्हणजेच २०२० च्या नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात आली होती.

पुढील संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल –

icaiexam.icai.org,caresults.icai.org,
icai.nic.in

विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल विषयनिहाय गुणांसह पाहू शकतील. त्यासाठी त्यांना सं%Eेतस्थळावर त्यांच्या क्रिE0ेन्शिअल्स द्वारे लॉगइन करावे लागेल.

CA Foundation, CA Intermediate Results कसा पाहाल?

 • – आयसीएआयचे अधिकृत संकेतस्थळ icai.org वर जा.
 • – ‘students login’ टॅबवर क्लिक करा.- ICAI CA registration number भरा.
 • तुमचा सीए फाउंडेशन, इंटरमिडिएट निकाल दिसेल.
 • – हा निकाल भविष्यातील संदर्भासाठी सेव्ह करून ठेवा.

ICAI CA Result तक्रार पोर्टल

जर आयसीएआयच्या सीए फाउंडेशन आणि इंटर निकालांबाबत कोणा विद्यार्थ्यांना काही तक्रारी असतील तर ते आयसीएआय सीए तक्रार पोर्टलकडे मदत मागू शकतात. त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन ICAI ने केले आहे.

[email protected]
[email protected]

एसएमएसद्वारेही निकाल पाहता येणार आहे. कसा ते वाचा –

 • इंटरमिडिएटच्या (जुना अभ्यासक्रम) विद्यार्थ्यांसाठी – CAIPCOLD (space) सहा अंकी रोल नंबर
 • इंटरमिडिएटच्या (नवा अभ्यासक्रम) विद्यार्थ्यांसाठी – CAIPCNEW (space) सहा अंकी रोल नंबर
 • फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांसाठी – CAFND (space) सहा अंकी रोल नंबरहा मेसेज ५७५७५ वर पाठवावा आणि आपला इंटर किंवा फाउंडेशनचा निकाल मिळवावा.

CA इंटर आणि फाउंडेशन निकाल कधी? अधिकाऱ्यांनी दिली माहिती

CA Intermediate CA Foundation Result Update

CA Intermediate CA Foundation Result: The Institute of Chartered Accountants of India (ICAI) has recently announced the results of the CA final. Now the students are waiting for the results of CA Intermediate and CA Foundation. An ICAI official has said when the results of both the courses will be released.

CA Intermediate CA Foundation Result Update: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने अलीकडेच सीए फायनलचा निकाल जाहीर केला आहे. आता विद्यार्थ्यांना सीए इंटरमीडिएट (CA Intermediate) आणि सीए फाउंडेशन (CA Foundation) च्या निकालाची प्रतीक्षा आहे. या दोन्ही कोर्सेसचे निकाल कधी जारी होणार यासंबंधी आयसीएआयच्या एका अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

आयसीएआयचे सीसीएम (ICAI CCM) धीरज खंडेलवाल यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यांनी १ फेब्रुवारीला ट्वीट करून सांगितले होते की चार्टर्ड अकाउंटंट इंटर आणि फाउंडेशनचे संभाव्या निकाल ३ फेब्रुवारीपर्यंत जाहीर केले जातील.

आता त्यांनी एक ट्विट करून सांगितले आहे की निकालाच्या घोषणेला थोडा अवधी लागेल. पुढची संभाव्य तारीख ७ किंवा ८ फेब्रुवारी आहे. यासंबंधी विद्यार्थ्यांनी आयसीएआयच्या नोटिफिकेशनची वाट पाहावी लागेल.आयसीएआय आपली वेबसाइट icai.org सह अन्य दोन वेबसाइट्स वर निकाल जारी करणार आहे. विद्यार्थी रजिस्टर्ड ई-मेल आईडी आणि एसएमएस द्वारे आपला निकाल मिळवू शकणार आहेत.

I


%3h2 style=”text-align: justify;”>CAI CA November Result

ICAI CA November results 2021: The Institute of Chartered Accountants of India (ICAI) on Monday announced the results of the CA final exam. Results of both old and new courses have been announced. Candidates can view their results on the official website of ICAI.

सीए अंतिम परीक्षेचा निकाल आयसीएआयने जाहीर केला आहे. सीए अंतिम परीक्षा नोव्हेंबर २०२० मध्ये आयोजित करण्यात आली होती. कोणत्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल, कसा डाऊनलोड करता येईल… सविस्तर वाचा….

ICAI CA November results 2020: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने सोमवारी सीए अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला. जुना आणि नवा दोन्ही कोर्सेसचा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात.

पुढील संकेतस्थळांवर पाहता येईल सीए अंतिम परीक्षेचा निकाल –

icaiexam.icai.org,
caresults.icai.org, icai.nic.in

ICAI CA November results: कसा पाहाल निकाल?

 • स्टेप १- सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ icai.nic.in वर जा.
 • स्टेप २- ‘CA final result link’ लिंक वर क्लिक करा.
 • स्टेप ३ – आता विचारलेली माहिती भरा.
 • स्टेप ४ – निकाल आता तुमच्या स्क्रीवर दिसू लागेल.
 • स्टेप ५ – भविष्यातील संदर्भासाठी निकाल डाउनलोड करा आणि प्रिंट आउट घ्या.

नोव्हेंबर २०२० मध्ये सीए अभ्यासक्रमाची अंतिम परीक्षा घेण्यात आली होती. एकूण ४,७१,६१९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यात सीए फाउंडेशन, इंटरमिडिएट आणि फायनलच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. एकूण १,०८५ केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेला खूप विरोध होत होता. प्रकरण अखेर सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. ज्या उमेदवारांना महामारीसंबंधी मुद्द्यांमुळे परीक्षा देता आली नाही, त्यांना जानेवारीत यासाठी आणखी एक संधी देण्यात आली होती.ICAI CA नोव्हेंबर परीक्षेचा (ओल्ड सेमिस्टर) निकाल पाहण्याची थेट लिंक

ICAI CA नोव्हेंबर परीक्षेचा (न्यू सेमिस्टर) निकाल पाहण्याची थेट लिंक


ICAI CA January Exam 2021 Change Exam Centre Choice Till 26th December

ICAI CA January Exam 2021: The Institute of Chartered Accountants of India (ICAI) has allowed candidates registered for ICAI CA January 2021 to change the preference of examination centers. Candidates registered for the ICAI CA Cycle 2 exam can change their exam center preferences online on the official website icaiexam.icai.org till December 26 2020

CA जानेवारी परीक्षेसाठी उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे..

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने ICAI CA जानेवारी २०२१ साठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रांची पसंती बदलण्याची परवानगी दिली आहे. ICAI CA Cycle 2 परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार २६ डिसेंबरपर्यंत अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org वर आपले परीक्षा केंद्रांचे पसंतीक्रम ऑनलाइन बदलू शकतात.

CA Cycle 2 जानेवारी २०२१ परीक्षेसाठी परीक्षा केंद्र बदलण्यासाठी ICAI CA उमेदवारांना ICAI च्या वेबसाइट वर जाऊन लॉगइन करावे लागेल. यासंदर्भात ICAI CA वेबसाइट वर परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकात म्हटले आहे की, ‘जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांकडे परीक्षा केंद्राचे शहर बदलण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची संधी आहे. ही सुविधा २३ डिसेंबर (२ वाजल्यापासून) से २६ डिसेंबर २०२० (रात्री ११.५९ वाजेपर्यंत) उपलब्ध असेल.’

ICAI CA Cycle 2 January 2021 Exams: असे बदलता येतील परीक्षा केंद्र

– सर्वात आधी अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org वर जा.
– यानंतर ‘Login/ Register’ टॅब वर क्लिक करा.
– आता लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाका.
– माहिती सबमिट करून आपलं अकाउंट तपासा.
– आता अॅप्लिकेशन मध्ये जाऊन परीक्षा केंद्राच्या शहरात बदल करा.

CAI CA सेकंड सायकल परीक्षा २१ जानेवारी २०२१ पासून सुरू होणार आहेत. ICAI CA चे जे विद्यार्थी २१ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर २०२० पर्यंत घेण्यात आलेली परीक्षा देऊ शकले नाहीत, ते जानेवारी/फेब्रुवारी २०२१ मध्ये होणाऱ्या सीए परीक्षेच्या दुसऱ्या फेरीच्या परीक्षा देऊ शकणार आहेत.


CA January Exam: सीए जानेवारी परीक्षांचे वेळापत्रक जारी

ICAI CA January Exam 2021: The Institute of Chartered Accountants of India (ICAI) has announced the CA January Exam 2021 for its official web on icai.org. The exams will start on January 21 and end on February 7, 2021. Students who opted for the opt-out option for the November exam are eligible to appear for the exam in January. Exam time is from 2 pm to 5 pm. But the foundation paper is from 2 to 4 pm.

सीए जानेवारी परीक्षांचे वेळापत्रक जारी झाले आहे….

ICAI CA January Exam 2021: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने आपला अधिकृत वेबसाठी icai.org वर सीए जानेवारी २०२१ परीक्षेच्या तारखा (CA January Exam 2021) जाहीर केल्या आहेत.

या परीक्षा २१ जानेवारी पासून सुरू होऊन ७ फेब्रुवारी २०२१ रोजी संपणार आहेत. ज्या विदयार्थ्यांनी नोव्हेंबर परीक्षेसाठी ऑप्ट आऊटचा पर्याय निवडला होता, ते जानेवारी मध्ये होणाऱ्या परीक्षेत उपस्थित होण्यासाठी पात्र आहेत. परीक्षेची वेळ दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. मात्र फाउंडेशन पेपर दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत आहे.

असे आहे सीए जानेवारी परीक्षेचे वेळापत्रक

इंटरमीडिएट परीक्षा

ओल्ड आणि न्यू स्कीम

ग्रुप १ – २२,२४,२७ आणि २९ जानेवारी
ग्रुप २ – १,३ आणि ५ फेब्रुवारी

न्यू स्कीमअंतर्गत ७ फेब्रुवारी रोजी अतिरिक्त इंटरमीडिएट परीक्षा होणार आहे.

अंतिम परीक्षा

ओल्ड आणि न्यू स्कीम

ग्रुप १ – २१,२३,२५ आणि २८ जानेवारी
ग्रुप २ – ३० जानेवारी आणि २, ४, ६ फेब्रुवारी.

ICAI तर्फे सध्या ज्या फाउंडेशन परीक्षा घेण्यात येत आहेत त्यांचा निकाल ४ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ४.३० वाजता आयोजित केला जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!