ICSE बोर्डाच्या दहावी परीक्षा रद्द

ICSE Board Exam 2021

ICSE board has also decided to cancel the 10th exam. Meanwhile, the Class XII examination has not been canceled and a new date will be announced soon.

सीबीएसईच्या (CBSE) दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर आता आयसीएसई (ICSE) बोर्डानेही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान बारावीची परीक्षा रद्द करण्यात आलेली नसून लवकरच नवीन तारीख जाहीर होणार आहे.

आयसीएसईकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दहावीची परीक्षा रद्द करण्यात आलेली असली तरी बारावीची परीक्षा मात्र होणार आहे. ऑफलाइन पद्धतीने होणाऱ्या बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. तसंच अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया लवकरात लवकर सुरु करण्यास सांगण्यात आलं आहे.


 

ICSE Board Exam 2021: The ICSE Board has said that the 10th (ISCE Exam 2021) and 12th (ISC Exam 2021) exams have been postponed due to the COVID-19 infection. A decision will be taken in the first week of June 2021 after reviewing the Corona epidemic situation.

ICSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा पोस्टपोन

ICSE Board Exam 2021: ICSE 10th 12th exam 2021 postponed: सीबीएसई (CBSE) आणि अनेक राज्यांच्या शिक्षण मंडळांनंतर आता आयसीएसई बोर्डाने देखील दहावी आणि बारावीच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. काउन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) ने यासंबंधी परिपत्रक जारी केले आहे. बोर्डाने या परिपत्रकात काय म्हटले आहे जाणून घ्या…

आयसीएसई बोर्डाने सांगितले आहे की कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावी (ISCE Exam 2021) आणि बारावी (ISC Exam 2021) परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. या परीक्षांच्या आयोजनासंदर्भात करोना महामारी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जून २०२१ च्या पहिल्या आठवड्यात निर्णय घेतला जाईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!