भारतीय सैन्यदलात भरती; कसा करायचा अर्ज? वाचा

Indian Army 132 TGC Recruitment 2020

Indan Army 132 TCG Recruitment 2020: If you have studied up to a degree in Engineering or are in the final year of BE / BTech, then you have the opportunity to join the Indian Army. The recruitment process has started for the Indian Army Technical Graduate Course (TGC 132). A notification in this regard has been issued on the official career website of the Army joinindianarmy.nic.in

भारतीय सैन्यदलात भरती; कसा करायचा अर्ज? वाचा

भारतीय सैन्यदलात इंजिनीअर्ससाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे..

जर तुम्ही इंजिनीअरिंगमधील पदवीपर्यंत शिक्षण घेतलं आहे किंवा बीई / बीटेक्.भारच्या अखेरच्या वर्षाला आहात, तर तुमच्यासाठी भारतीय सैन्यदलात भरती होण्याची संधी आहे. भारतीय सेनेच्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC 132) साठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. आर्मीची अधिकृत करिअर वेबसाइट joinindianarmy.nic.in वर यासंदर्भातील नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे.

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २८ जुलै पासून सुरू झाली आहे. आवश्यक पात्रता, नोटिफिकेशनची लिंक आणि अन्य माहिती पुढे देत आहोत.

कोणत्या शाखेसाठी किती पदे?

सिविल – ८
आर्किटेक्चर – १
मेकॅनिकल – ४
इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स – ५
कॉम्प्युटर सायन्स – ११
इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन – ८
इलेक्ट्रॉनिक्स – १
मेटलर्जिकल – १
इलेक्ट्रॉनिक्स अँड इंस्ट्रूमेंटेशन – १
मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स अँड मायक्रोवेव – १
एकूण पदे – ४१

अर्जांची माहिती

joinindianarmy.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची सुरुवात – २८ जुलै २०२० दुपारी १२ वाजल्यापासून
अर्ज करण्याची अंतिम मुदत – २६ ऑगस्ट २०२०

अभ्यासक्रम जानेवारी २०२० पासून देहरादून येथील इंडियन मिलिट्री अकाडमी मध्ये सुरू होईल. या कोर्सनंतर विद्यार्थ्यांना इंडियन आर्मीमध्ये स्थायी कमिशन दिले जाईल.

आवश्यक पात्रता

संबंधित शाखेतील इंजिनीअरिंग पदवीधर किंवा पदवीच्या अंतिम वर्षाचा शिकत असलेले उमेदवार. जर तुम्ही पदवीच्या अंतिम वर्षात असाल तर १२ आठवड्याच्या आत डिग्री जमा करावी लागेल.

वयोमर्यादा

उमेदवारांचे वय २० ते २७ वर्षांदरम्यान असावे. नियमानुसार सवलत मिळेल. ही भरती अविवाहित पुरुषांसाठी आहे.

निवड प्रक्रिया

इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमा सहाव्या सत्रात / मास्टर्समध्ये दुसऱ्या सत्रात / आर्किटेक्चरमध्ये आठव्या सत्रातील गुणांच्या आधारे कट ऑफनुसार उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल.

शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. सायकॉलॉजिस्ट, ग्रुप टेस्टिंग अधिकारी आणि मुलाखतकार अधिकारीद्वारे अलाहाबाद, भोपाळ, बंगळुरू आणि कपूरथला येथे सिलेक्शन सेंटर्सवर मुलाखती होतील. उमेदवारांना SSB द्वारे दोन टप्प्यांतील निवड प्रक्रियेतून जावे लागेल. जे उमेदवार मेडिकली फिट असतील त्यांना जॉइनिंग लेटर दिले जाईल.

भारतीय सैन्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!