भारतीय रेल्वेत २.८ लाख जागांवर भरती – Railways Bharti 2023

RRB Recruitment 2023 Apply Notification, Exam Date & More

RRB Recruitment 2023

Latest updates published in the news paper is that there are 2.8 lakh posts of Group C and Group D will be recruited by the Board soon. There is a good news for the youth who are looking for jobs in Indian Railways (RRB). After releasing the notification by RRB, candidates can apply by visiting the official website. The application process will be given on the official website. Earlier, Railway Minister Ashwini Vaishnav had said in reply to a question by MP Pramod Tiwari in the Rajya Sabha that the board would soon recruit for 2.8 lakh posts. The board is preparing for that. For further updates Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

RRB ALP Recruitment-कसं बनता येतं लोको पायलट, कशी मिळेल नोकरी? जाणून घ्या

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

भारतीय रेल्वेत २.८ लाख जागांवर भरती; तरुणांना मोठ्या प्रमाणावर मिळणार रोजगार

भारतीय रेल्वे (RRB) मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. मंडळाकडून गट क आणि गट ड च्या २.८ लाख पदांवर लवकरच भरती केली जाईल. अधिसूचना जारी केल्यानंतर, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतील. अर्जाची प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर दिली जाईल.  यापूर्वी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत खासदार प्रमोद तिवारी यांच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले होते की बोर्डाकडून २.८ लाख पदांसाठी लवकरच भरती केली जाईल. त्यादृष्टीने मंडळाची तयारी सुरू आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Railways Bharti 2023 Details

 • रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्व २१ आरआरबींकडून रिक्त पदांची मागणी केली आहे. २०२३ पर्यंत रेल्वेमध्ये दीड ते दोन लाख रिक्त पदे भरली जातील, अशी अपेक्षा आहे. यामध्ये, गट ड आणि गट क संबंधित पदांवर पुनर्नियुक्ती केली जाईल. त्याची तयारी सुरू आहे.
 • मध्य रेल्वे यावर्षी २ लाखांहून अधिक पदांची भरती करणार आहे, ज्यामध्ये गट C आणि D पदांवर जास्तीत जास्त भरती केली जाईल. पूर्व, दक्षिण पूर्व आणि दक्षिण पश्चिम विभाग वगळता प्रत्येक झोनमध्ये १० हजारांहून अधिक जागा रिक्त असतील.
 • याशिवाय मंडळ लवकरच अ आणि ब गटातील पदांसाठी भरती सुरू करणार आहे. ही भरती यूपीएससीच्या माध्यमातून केली जाणार आहे. २०२० पासून ग्रुप-ए आणि बी पदांची भरती झालेली नाही. मात्र, या दोन्ही भरतीच्या अधिसूचनेबाबत भारतीय रेल्वेकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
 • एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्यात भरतीची अधिसूचना निघू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. यापूर्वी रेल्वेकडून ग्रुप डीच्या १ लाखाहून अधिक पदांवर भरती करण्यात आली होती.

Indian Railway Bharti 2023: As per the latest news, Minister Nirmala Sitharaman has announced that 75000 new employees will be recruited in Indian Railways. As per the Union Budget Indian Railway is now going to become even more superfast. Because now 2.4 lakh crore rupees will be given for Indian Railways. Many comforting announcements have been made in this budget. Read More details are given below.

भारीत्य रेल्वे आता सुस्साट आणि सुपरफास्ट होणार आहे. भारतीय रेल्वेला 2.४ लाख कोटी रुपये देण्यात येणार आहे.  तसेच भारतीय रेल्वेत ७५००० नवीन नोकरी भरती करण्यात येणार आहे, अशी घोषणाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. रेल्वेच्या नवीन योजनेकरिता ७५ हजार कोटी रुपये दिले जाणार आहे.  

Indian Railway Recruitment 2023

 नव्या योजनांसाठी 75 हजार कोटी 
भारतीय रेल्वेच्या नव्या योजनांसाठी 75 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत. निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की, परिवहनाच्या पायाभूत सुविधांसाठी 75000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. रेल्वेसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 2.4 लाख कोटींची तरतूद केल्याची घोषणा केली आहे. गेल्या दहा वर्षांमधील ही सगळ्यात जास्त तरतूद आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत ही रक्कम चौपट आहे. तसेच 2013-14 मधील अर्थसंकल्पाशी तुलना केली तर ही रक्कम नऊ पट आहे.

As per the latest updates about RRB Recruitment 2023 – Although the Ministry of Railways claims that it is working hard to fill up the vacancies, according to the statistics of December 1, 2022, it is clear that there are more than three lakh vacancies in the railways. Vacancies in gazetted and non-gazetted categories are included in various departments of railways including security and transport departments. According to railway department the number of vacancies is 3.11 lakh.
रेल्वेत तब्बल 3 लाख जागांचे रिक्त पदे

रिक्त पदे भरण्यासाठी कठोर परिश्रम घेत असल्याचा दावा रेल्वे मंत्रालय करीत असले तरी १ डिसेंबर २०२२ च्या आकडेवारीनुसार रेल्वेत तीन लाखांहून अधिक रिक्त पदे असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षा आणि वाहतूक विभागांसह रेल्वेच्या विविध विभागात राजपत्रित आणि अराजपत्रित श्रेणींमध्ये रिक्त पदांचा समावेश आहे. रेल्वे विभागाच्या मते रिक्त पदांची संख्या ३.११ लाख आहे. भरतीसाठी निश्चित कालमर्यादाही नाही ही रिक्त पदे कधी भरता येतील याबाबत रेल्वेने कोणतीही कालमर्यादा निश्चित केली नाही. विशेष म्हणजे, रेल्वेने गेल्या पाच वर्षांत १८,४६३ शिकाऊ प्रशिक्षणार्थींची नियुक्ती केली. मात्र, या कालावधीत यापैकी एकाही शिकाऊ उमेदवाराला कायम करण्यात आलेले नाही. रेल्वे अप्रेंटिसशिप कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याचा विचार आहे का, असे विचारले असता मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही.

 1. कर्मचारी कपातीची मानसिकताकर्मचाऱ्यांना बदललेल्या वातावरणात प्रशिक्षित करणे आणि स्वत:ला पुन्हा दिशा देण्याची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा आकार कमी करण्यासाठी ते उत्सुक आहेत.
 2. तीन सदस्यीय टास्क फोर्स नोकरशाहीमध्ये पंतप्रधानांच्या ‘कर्मयोगी’ संकल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी पंतप्रधानांनी इन्फोसिसचे माजी सीईओ एस. डी. शिबू लाल यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे.
 3. गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेतील तीन लाखांसह केंद्र सरकारमध्ये १० लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. तेही भरून काढण्याची सरकारला घाई नाही हेच यावरून दिसते.

RRB Recruitment 2023 Vacancy details

एकूण रिक्त पदेविभाग पदसंख्या

 1. अकाऊंट १२४५५
 2. प्रशासन ४२२७
 3. सिव्हिल ८७६५४
 4. इलेक्ट्रिकल ३८०९६
 5. मेकॅनिकल ६४३४६
 6. मेडिकल ५१९३
 7. पर्सोनेल ३९४४
 8. सिक्युरिटी ९०६८
 9. सिग्नल, टेलिकम्युनिकेशन १४८१५
 10. स्टोअर ८८८१
 11. ट्रॅफिक ट्रान्स्पोर्टेशन ६२२६४
 12. अन्य ५७८
 13. एकूण ३११५२१

Railway Bharti 2022

Ministry of Railways in consultation with UPSC i.e. Central Public Service Commission and Department of Personnel and Training has decided to recruit Indian Railway Management Service (IRMS) through Central Public Service Commission Specially Prepared Examination (IRMSE) from 2023.

 • केंद्रीय लोकसेवा आयोगाला (UPSC) रेल्वे मंत्रालयाने मोठी जबाबदारी दिली आहे. या जबाबदारी अंतर्गत आता UPSC ला रेल्वे मंत्रालयाच्या परीक्षेचे आयोजन करावे लागेल, जी 2023 मध्ये घेतली जाईल. रेल्वे मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, ‘इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस’ (IRMS) ची भरती खास तयार केलेल्या परीक्षेद्वारे केली जाईल. युनियन लोकसेवा आयोग (UPSC) 2023 पासून ही भरती परीक्षा आयोजित करेल.
 • मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा परीक्षा (IRMSE) ही दोन टप्प्यांची परीक्षा असेल ज्यामध्ये प्राथमिक स्क्रीनिंग परीक्षा आणि त्यानंतर मुख्य लेखी परीक्षा आणि मुलाखत असेल. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की पात्र उमेदवारांना परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच IRMS (मुख्य) लेखी परीक्षेत बसण्यासाठी नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षेत बसावे लागेल.

RRB Recruitment 2023 – असं असेल IRMSE चं पॅटर्न

 • आयआरएमएस (मुख्य) परीक्षेत सेट केलेल्या विषयामध्ये पारंपारिक निबंध प्रकारच्या प्रश्नांसह चार पेपर असतील. पहिल्या पेपरमध्ये दोन पात्रता पेपर असतील, जे 300-300 गुणांचे असतील. पेपर A उमेदवाराने निवडलेल्या भारतीय भाषेत असेल. तर, बी पेपर इंग्रजीमध्ये घेण्यात येईल. तेथे ऐच्छिक विषयाचे 250 गुणांचे दोन पेपर असतील. 100 गुणांची व्यक्तिमत्व चाचणीही घेतली जाईल.
 • स्थापत्य अभियांत्रिकी, यांत्रिक अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी आणि वाणिज्य आणि लेखा हे पर्यायी विषय आहेत. पात्रता पेपर आणि पर्यायी विषयांचा अभ्यासक्रम नागरी सेवा परीक्षा (CSE) सारखाच असेल. CSE आणि IRMS (मुख्य) परीक्षेला बसणाऱ्या उमेदवाराला दोन्ही परीक्षांसाठी वरीलपैकी कोणताही पर्यायी विषय निवडण्याचा पर्याय असेल. त्याला पर्यायी विषय स्वतंत्रपणे निवडण्याचा पर्यायही असेल.

RRB Recruitment 2023 Eligibility Criteria 

 1. पात्रता पेपर आणि वैकल्पिक विषयासाठी भाषा माध्यम आणि लिपी सीएसई (मुख्य) सारखीच असेल. वयोमर्यादा आणि उमेदवाराला परीक्षेला बसण्याचा पर्याय CSE प्रमाणेच असेल. IRMSE परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता म्हणून अभियांत्रिकी, वाणिज्य किंवा चार्टर्ड अकाउंटन्सीची पदवी असणे आवश्यक आहे.
 2. UPSC गुणवत्तेच्या क्रमाने चार विषयांनुसार अंतिम यादी तयार करेल आणि जाहीर करेल. CSE आणि IRMSE या दोन्हींसाठी प्राथमिक आणि मुख्य लेखी परीक्षेच्या फेऱ्या एकाच वेळी घेतल्या जातील. रेल्वे मंत्रालयाने सांगितले की CSE सोबत IRMSE ला सूचित केले जाईल. UPSC च्या 2023 च्या परीक्षेच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, CSE (Prelims) अनुक्रमे 1 फेब्रुवारी रोजी अधिसूचित केले जाईल आणि परीक्षा 28 मे रोजी घेतली जाऊ शकते.

रेल्वे विभागात 35 हजार पदांची भरती; डेडलाईन जाहीर

India Railway Recruitment 2022: Good news for the aspirants working in Railways more than 35, 000 posts are going to be filled soon in many trades. Indian Railway Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

 रेल्वेने प्रथमच आपल्या भरती परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी वेळापत्रकच निश्चित केले आहे. तसेच मार्च २०२३ पर्यंत यंदाच्या नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी परीक्षांमध्ये निवड झालेल्या ३५,२८१ उमेदवारांना नोकरी देण्याची मुदतही निश्चित केली आहे

 • या निर्णयामुळे विविध टप्प्यांवर परीक्षा दिलेल्या आणि निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या एक लाखाहून अधिक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरआरबी एनटीपीसी परीक्षा 2022, भारतीय रेल्वेच्या विविध विभागीय रेल्वे आणि त्यांच्या उत्पादन युनिट्ससाठी सुमारे चार वर्षांत 35,281 रिक्त जागा भरण्याचे निश्चित केले आहे.
 • अधिकाऱ्यांनी सांगितले की, सप्टेंबरमध्ये लेव्हल-६ मध्ये ७,१२४ उमेदवारांचे निकाल जाहीर करण्यात आले होते, त्यांचे वैद्यकीय मूल्यमापन आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू होती. 21 आरआरबींपैकी 17 जणांनी आपला अंतिम निकाल आधीच जाहीर केला आहे, तर बाकीचे लवकरच आपला निकाल जाहीर करतील.
 • रेल्वेने तयार केलेल्या टाइम टेबलनुसार, नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत लेव्हल-५ चा निकाल हाती येईल आणि डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत त्यांची कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय काम पूर्ण होईल. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत त्यांची नियुक्त करण्यात येणार आहे.
 • आरआरबी एनटीपीसी भरती प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे. यामध्ये संगणक-आधारित परीक्षा, टायपिंग कौशल्य चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या दोन टप्प्यांचा समावेश आहे. स्टेशन मास्तर, गुड्स गार्ड, कमर्शिअल अप्रेंटिस, तिकीट क्लार्क, ज्युनिअर अकाउंट असिस्टंट, सीनिअर क्लार्क कम टायपिस्ट आणि टाइमकीपर या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

India Railway Recruitment 2022: Good news for the aspirants working in Railways more than 3000 posts are going to be filled soon in many trades. Recruitment has started for Apprentice Posts in Railways. Candidates must have passed 10th with minimum 50% marks from a recognized board. Candidates Read the complete details given below on this page regarding the Indian Railway Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

 रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू झाली आहे. लवकरच अनेक ट्रेडमध्ये 3000 हून अधिक पदे भरली जातील. याची माहीती रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबर 2022 ते 29 ऑक्टोबर ही आहे.

रेल्वेच्या फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, सुतार, पेंटर यासह अनेक ट्रेडमध्ये 3000 हून अधिक जागा निघाल्या आहेत. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट er.indianrailways.gov.in वर ऑनलाइन अर्ज करावा. ही प्रक्रीया 30 सप्टेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. केवळ ऑनलाइन पद्धतीनेच हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या पदांसाठी आहे संधी

 • हावडा डिवीजन – 659 पद
 • लिलुआ ऑफिस- 612 पद
 • सियालदह डिवीजन – 440 पद
 • कांचरापाडा ऑफिस – 187 पद
 • मालदा डिवीजन – 138 पद
 • आसनसोल ऑफिस – 412 पद
 • जमालपुर ऑफिस – 667 पद

कोण करू शकतो अर्ज

उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, NCVT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त संस्थेकडून वेल्डर, शीट मेटल वर्कर, लाइनमन, वायरमन, सुतार आणि पेंटर यासारख्या संबंधित शिक्षणातील ITI प्रमाणपत्र असावेत. उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 24 वर्षे असावेत.

ओबीसी आणि ईडब्यूएस उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर, एससी, एसटी, दिव्यांग, महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.


Indian Railway Recruitment 2022: There are 2,65,547 vacancies in various sections of the railways. The Union Minister recently informed the House about the vacancies in the Gazetted and Non-Gazetted posts in the zone.RRB has started recruitment process for vacant posts in phases from 15th December 2020. In the last five years, the Railway Recruitment Board has recruited 1,89,790 people. Read More details as given below.

रेल्वेत तब्बल 2 लाख पदं रिक्त; कुठल्या झोनमध्ये किती आहेत जागा पाहा

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Union Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी काल राज्यसभेत सांगितलं की, रेल्वेच्या विविध विभागांत 2,65,547 पदे रिक्त आहेत. त्यापैकी 2,177 राजपत्रित आणि 2,63,370 अराजपत्रित पदं आहेत. माकपचे खासदार डॉ. व्ही. शिवासदन (Dr. V. Shiva Sadana) यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिलीय. विविध झोनमध्ये रिक्त असलेल्या राजपत्रित आणि अराजपत्रित पदांची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी सभागृहाला नुकतीच दिली.

रेल्वे मंत्री म्हणाले, मध्य रेल्वेत 56 राजपत्रित (Gazetted) आणि 27177 अराजपत्रित (Non-Gazetted) पदे रिक्त आहेत. तर ईस्ट कोस्ट रेल्वेमध्ये 87 राजपत्रित आणि 8477 अराजपत्रित पदे रिक्त आहेत. शिवाय, पूर्व मध्य रेल्वेत 170 राजपत्रित आणि 15268 अराजपत्रित पदं रिक्त आहेत. पूर्व रेल्वेमध्ये 195 राजपत्रित आणि 28204 अराजपत्रित पदं, तर मेट्रो रेल्वेत 22 राजपत्रित आणि 856 अराजपत्रित पदं रिक्त असल्याचं त्यांनी सांगितलं.

रिक्त जागांचा तपशील

 • उत्तर मध्य रेल्वे – 141 राजपत्रित, 19366 अराजपत्रित
 • ईशान्य रेल्वे – 62 राजपत्रित, 14231 अराजपत्रित
 • नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे – 112 राजपत्रित, 15677 अराजपत्रित
 • उत्तर रेल्वे – 115 राजपत्रित, 37436 अराजपत्रित
 • उत्तर पश्चिम रेल्वे – 100 राजपत्रित, 15049 अराजपत्रित
 • दक्षिण मध्य रेल्वे – 43 राजपत्रित, 16741 अराजपत्रित
 • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे – 88 राजपत्रित, 9422 अराजपत्रित
 • दक्षिण पूर्व रेल्वे – 137 राजपत्रित, 16847 अराजपत्रित
 • दक्षिण रेल्वे – 161 राजपत्रित, 19500 अराजपत्रित
 • दक्षिण पश्चिम रेल्वे – 65 राजपत्रित, 6525 अराजपत्रित
 • पश्चिम मध्य रेल्वे – 59 राजपत्रित, 11073 अराजपत्रित
 • पश्चिम रेल्वे – 172 राजपत्रित, 26227 अराजपत्रित

रेल्वेमंत्री पुढे म्हणाले, इतर युनिटमध्ये 507 राजपत्रित आणि 12760 अराजपत्रित पदं रिक्त आहेत. ती पदं निर्माण करणं आणि भरणं ही सतत प्रक्रिया सुरुय. मात्र, कोरोना महामारी आणि विविध राज्यांनी लादलेल्या लॉकडाउनमुळं परीक्षेच्या प्रक्रियेवर परिणाम झालाय. देशात कोविडची (Coronavirus) पहिली लाट संपल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर RRB नं 15 डिसेंबर 2020 पासून टप्प्याटप्प्यानं रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केलीय. गेल्या पाच वर्षांत रेल्वे भरती बोर्डानं 1,89,790 लोकांची नियुक्ती केलीय, असं त्यांनी सांगितलं.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
12 Comments
 1. Rakesh sanjeev Natekar says

  Rakesh Sanjeev Natekar 12 pass शिक्षण B, S, C, टायपिंग ऐमेसियाटी पास आय टि या डिझेल मेकॅनिक गारमेंट पास 9960328372

 2. Santosh kailas sonwane says

  I am handicap
  MLA bhetel naukari

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!