JEE Main 2021: जेईई मेनचा निकाल जाहीर

JEE Main 2021 Result

The results of the JEE-Main Engineering entrance exam were announced on Tuesday night. In which a total of 44 candidates got 100% marks. 18 candidates got top rank.

JEE Main Result: जेईई मेन 2021 सेशन्स 4 चा निकाल मंगळवारी रात्री उशिरा घोषीत करण्यात आलाय. यात रेकॉर्डब्रेक अशा 44 विद्यार्थ्यांनी 100 टक्के मार्क मिळवलेत. तर नंबर 1 रँकवर 18 जण आहेत. विशेष म्हणजे यावर्षी 7 लाख 32 हजार विद्यार्थ्यांनी जेईईची परिक्षा दिलेली होती. ज्या 18 जणांनी रँक 1 मिळवलीय त्यात महाराष्ट्रातून अथर्व अभिजीत तांबट हा एकमेव मराठी विद्यार्थी आहे. आंध्राचे सर्वाधिक 4 तर त्यापाठोपाठ राजस्थानचे 3, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि तेलंगणाचे प्रत्येकी 2 विद्यार्थी टॉप 18 मध्ये आहेत. भाषिकदृष्ट्या तुलना केली तर सर्वाधिक 6 विद्यार्थी हे आंध्र-तेलंगणाचे आहेत. नंबर वन वर कर्नाटकचा गौरब दास आहे.

जेईई मेन 2021 सेशन 4 च्या परीक्षा 2 सप्टेंबरला संपल्या होत्या. फायनल अन्सर की वर आक्षेप घेण्यासाठी 8 सप्टेंबर ही शेवटची तारीख होती. त्यानंतर फायनल अन्सर की जारी करण्यात आली. तेव्हापासूनच जेईई मेन्सचा निकाल jeemain.nta.ac.in वर अपेक्षीत होता. गेल्या वर्षी 24 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले होते.

JEE Main Result 2021 चेक कसा कराल?

 • स्टेप 1- सर्वात आधी तुम्ही अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic वर जा
 • स्टेप 2- जेईई मेन 2021 च्या सेशन 4 च्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
 • स्टेप 3- आता परीक्षेचं सेशन, अर्ज संख्या, जन्म तारीख नोंद करा
 • स्टेप 4- JEE मेन 2021 च्या निकालाची कॉपी डाऊनलोड करा.

कोणत्या साईटवर निकाल चेक करु शकता?

 • nta.ac.in
 • ntaresults.nic.in
 • jeemain.nta.nic.in

The results of the JEE Main Examination have been delayed and the registration process for the JEE Advance Examination has also been postponed.

JEE Main 2021 Result : जेईई मुख्य परीक्षेच्या निकालास उशीर झाला असून जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया देखील पुढे ढकलण्यात आलीय. आयआयटी खरगपूरने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ११ सप्टेंबरपासून नोंदणी सुरू होणार होती. पण, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडून सत्र -४ साठी जेईई मेनच्या निकालास उशीर झाल्यामुळे संस्थेने वेळापत्रकही बदलले आहे. त्यामुळे परीक्षेसाठी नोंदणी आजपासून सुरू होण्याऐवजी आता 13 सप्टेंबरपासून सुरू होईल.

‘NTA’कडून वेळापत्रकात बदल

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आयआयटी खडगपूरने जेईई अॅडव्हान्सचे वेळापत्रक बदल्याने नोंदणीची प्रक्रिया 13 सप्टेंबरपासून सुरू होऊन ती 19 सप्टेंबरपर्यंत चालू राहील. यासाठी अर्ज फी जमा करण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर असणार आहे. दरम्यान, जेईई मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेले व अडीच लाखांत आलेले उमेदवार या परीक्षेसाठी नोंदणी करू शकणार आहेत. यासाठी Jeeadv.ac.in जेईईच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. दरम्यान, या परीक्षेस बसलेल्या उमेदवारांनी jeemain.nta.nic.in या वेबसाइटवर जाऊन आपला निकाल पाहू शकता.

JEE Advanced 2021 साठी नोंदणी कशी करावी?

 • स्टेज 1 : सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला jeeadv.ac.in भेट द्या.
 • स्टेज 2 : त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
 • स्टेज 3 : आता नवीन नोंदणीच्या दुव्यावर क्लिक करा.
 • स्टेज 4 : यानंतर तुमचे नाव, वडिलांचे नाव, मोबाईल, ईमेल आणि इतर माहिती भरून नोंदणी करा.
 • स्टेज 5 : आता लॉगिन करा आणि आपला अर्ज भरा. तद्नंतर फोटो अपलोड करुन स्वाक्षरीही करा.
 • स्टेज 6 : सर्व भरुन झाल्यावर अर्ज फी सबमिट करा.
 • स्टेज 7 : शेवटी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंटही घ्या.

The results of JEE Main 2021, an engineering entrance examination conducted nationally by the National Testing Agency (NTA), may be announced on Thursday, September 9, 2021.Candidates appearing for JEE Main 2021 exam should keep visiting the jeemain.nta.nic.in . Further details are as follows:-

JEE Main 2021 Result: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे राष्ट्रीय स्तरावर आयोजित केली जाणारी इंजिनीयरिंग प्रवेश परीक्षा जेईई मेन २०२१ च्या निकालाची घोषणा गुरुवार ९ सप्टेंबर २०२१ रोजी केली जाऊ शकते. जेईई मेन निकाल २०२१ च्या घोषणेनंतर उमेदवार परीक्षा पोर्टल वर लॉग-इन करून आपला जेईई मेन २०१२ निकाल, कॅटेगरी रँग आणि ओव्हरऑल रँक आदी माहिती घेऊ शकणार आहेत. एनटीए जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन (मेन), २०२१ च्या निकालांची घोषणा अधिकृत पोर्टल, jeemain.nta.nic.in वर करणार आहे. जेईई मेन २०२१ परीक्षेत सहभागी उमेदवारांनी निकालासाठी पोर्टलला भेट देत राहावी.

JEE Main 2021- JEE Main 2021 जेईई मेन परीक्षेची उत्तरतालिका जारी

How to Check JEE Main Exam Result

 • अधिकृत पोर्टलला भेट द्यावी.
 • त्यानंतर होमपेजवर उपलब्ध केल्या जाणाऱ्या लिंकवर क्लिक करावे.
 • यानंतर नव्या पेजवर उमेदवारांना आपले लॉगइन डिटेल्स भरून सबमिट करावे लागेल.
 • यानंतर आपला जेईई मेन २०२१ स्कोअर उमेदवारांना पाहता येईल. कॅटेगरी आणि ओव्हरऑल रँकदेखील पाहता येणार आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा

JEE Main 2020 Result

जेईई मेन २०२० बीई / बीटेक् स्कोअर आणि कट ऑफ लिस्ट

जेईई मेन २०२० बीई / बीटेक् स्कोअर आणि कट ऑफ लिस्ट पाहा…

JEE Main 2020: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने शुक्रवारी ११ सप्टेंबर रोजी जेईई मेन परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला. यावर्षी एकूण ११.७४ लाख विद्यार्थ्यांनी जेईई मेन परीक्षेसाठी नोंदणी केली (जानेवारी आणि सप्टेंबर परीक्षा मिळून) त्यापैकी १०.२३ लाख विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. देशभरात २३२ शहरांमध्ये एकूण ६६० केंद्रांवर परीक्षा पार पडली. यापैकी ८ केंद्रे ही देशाबाहेरची होती.

जेईई मेन परीक्षा २०२० बीई / बीटेक अभ्यासक्रमांसाठी यंदा दोन वेळा संगणक आधारित पद्धतीने झाली. पहिली परीक्षा ७ ते ९ जानेवारी २०२० या कालावधी सहा सत्रात झाली तर दुसरी परीक्षा २ ते ६ सप्टेंबर २०२० या कालावधीत १० सत्रात झाली.

जेईई मेन २०२० कट ऑफ टोटल पेपर – १ (बीई / बीटेक)

प्रवर्ग – कट ऑफ

सर्वसाधारण रँक यादी – ९०.३७६५३३५

आर्थिक वंचित गट – ७०.२४३५५१८

ओबीसी – ७२.८८८७९६९

एससी – ५०.१७६०२४५

एसटी – ३९.०६९६१०१

दिव्यांग – ०.०६१८५२४

एकूण २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल मिळाले आहेत. जानेवारी आणि सप्टेंबर असा दोन्ही स्कोर पाहून सर्वोत्तम स्कोर ध्यानात घेतला आहे. एनटीएचं स्कोअर कार्ड jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलं आहे.

जेईई मेन २०२० परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा…


JEE MAIN 2020 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे…

आयआयटी; तसेच देशातील नामांकित इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील होणाऱ्या जेईई मेन्स प्रवेश परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री उशीरा जाहीर झाला. या परिक्षेत २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले आहेत. शिवाय विद्यार्थी व पालकांना ही उत्तरतालिका नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वेबसाइटवर पाहायला मिळेल. जेईई मेन्स परीक्षा १ ते ६ सप्टेंबर दरम्यान देशभरात पार पडली. देशातील साधारण ८ लाख ६७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. परीक्षेचा निकाल jeemain.nic.in आणि jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल.

शुक्रवारी निकाल जाहीर होणार म्हणून विद्यार्थी आणि पालक दिवसभर एनटीए जेईई मेन्सची वेबसाइटवर पाहत होते. मात्र, दिवसभर निकाल जाहीर न होता रात्री अकराच्या सुमारास जाहीर झाला. निकाल वेबसाइटवर अपलोड झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना आपल्या लॉगइन आयडी आणि इतर माहितीद्वारे वेबसाइटवर पाहता येईल, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.

कसा पाहाल निकाल?

– जेईई मेनच्या jeemain.nic.in किंवा jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर जा.
– View Result / Scorecard या पर्यायावर क्लिक करा.
– अॅप्लिकेशन क्रमांक आणि जन्मतारीख टाका.
– सिक्युरिटी पिन नंबर टाका
– लॉग इन करा.
– तुमचा जेईई मेन परीक्षेचा निकाल तुम्हाला पाहता येईल.

ज्या २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंंटाइल मिळाले त्यांची यादी पुढीलप्रमाणे –

१०० पर्सेंटाइल मिळालेल्या विद्यार्थ्यांची नावे
८ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली होती. प्रत्यक्षात ६ लाख ३५ हजार विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. म्हणजेच २ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरवली. जेईई मेन परीक्षा वर्षातून दोन वेळा होते. यावर्षी जानेवारी महिन्यात ही परीक्षा झाली होती. गेल्या वर्षी जानेवारी आणि एप्रिल परीक्षेला अनुक्रमे ९४.११ आणि ९४.१५ टक्के उपस्थिती होती.

JEE Main Results 2020: The results of JEE Main 2020 exam will be announced today. This result will be available to the students on the official website of JEE Main Examination jeemain.nta.nic.in. The exam was held from September 1 to 6. More than 8 lakh students had registered for this national level examination and 6.35 lakh students had participated. Covid – This is the first large-scale nationwide examination during the 19 epidemic period.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!