JEE Main 2023- जेईई मेन्स परीक्षेसाठीची 75 टक्के पात्रतेची अट.

JEE Main Exam Registration 2023

JEE Mains Percentile Eligibility

Latest udpates regarding the JEE Main Exam 2023 is given here. The condition of 75 percent and 20 percent top percentile in JEE Mains imposed by the National Testing Agency was challenged in the High Court. But the court has rejected this challenge. Nirwala Court has given that the High Court will not interfere in it as this is a policy matter of the government. The judgment was given by a bench of Acting Chief Justice Sanjay Gangapur Vala and Justice Sandeep Marne of Bombay High Court.

जेईई मेन्समधील पात्रता अट आम्ही हटवू शकत नाही – उच्च न्यायालय

Other Important Recruitment  

जिल्हा परिषद पदभरती मार्च 2019 व सान 2021 शुल्क परत लिंक सुरु
आरोग्य विभागातील गट क ११ हजार रिक्त पदाच्या ऑनलाईन भरतीला सुरुवात
आरोग्य विभाग भरती आवश्यक कागदपत्रांची यादी
महाराष्ट्र कृषी विभागांतर्गत २१०९ जागेंसाठी कृषी सेवकाची भरती सुरु

SBI PO २००० पदांची भरती - ऑनलाईन अर्जाला सुरुवात

तलाठी भरती परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोडसाठी उपलब्ध

पवित्र’वर शिक्षक भरती अर्ज भरताना ‘ही’ काळजी घ्या..!

राज्यातील 23 हजार शिक्षकांची भरती सुरु!

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!
 • जेईई मेन्स परिक्षेतील परसेंटाइलची पात्रता अट ही शासनाची धोरणात्मक बाब आहे. आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. कोरोना काळात जेईई मेन्स परीक्षेसाठीची 75 टक्के पात्रतेची अट काढून टाकण्यात आली होती, परंतु कोरोना नंतर ती अट पुन्हा घालण्यात आली आहे.
 • मुंबई : राष्ट्रीय चाचणी संस्थेकडून जेईई मेन्स मध्ये लावण्यात आलेली 75 टक्के आणि 20 टक्के टॉप परसेंटाइलच्या अटीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र न्यायालयाने हे आव्हान परतावून लावले आहे. शासनाची ही धोरणात्मक बाब असल्याने त्यामध्ये उच्च न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, असा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश संजय गंगापूर वाला आणि न्यायाधीश संदीप मारणे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.
 • सलग दोन दिवस सुनावणी झाली : जेईई मेन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लावलेली 75 टक्के आणि 20 टक्के पर्सेन्टाईल अट काढून टाकावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात विद्यार्थ्यांनी धाव घेतली होती. काल आणि आज सलग दोन दिवस यावर सुनावणी झाली. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चाचणी संस्थेकडून नॅशनल टेस्टिंग एजन्सीने याबाबत दस्तावेज सादर केले होते. उपलब्ध पुराव्याच्या आधारे सुनावणीच्या वेळी मुंबई उच्च न्यायालयाने अखेर शासनाची बाजू उचलून धरली आणि हा महत्त्वपूर्ण निकाल देत शासनाच्या धोरणात्मक बाबीत हस्तक्षेप करणार नाही, असे वक्तव्य केले.
 • कोरोना काळात एक वेळेची बाब म्हणून अट रद्द : कोरोना काळात जेईई मेन परीक्षेसाठी लावलेली 75 टक्के पात्रतेची अट काढून टाकली होती. परंतु कोरोना नंतर ती अट पुन्हा घालण्यात आली. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होते, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. मात्र केंद्र शासनाच्या वतीने आज या धोरणाच्या संदर्भात महत्त्वाच्या बाबी न्यायालयासमोर मांडल्या गेल्या. कोरोना काळामध्ये शासनाने हा धोरणात्मक निर्णय घेतला आणि केवळ ‘वन टाइम’ म्हणजे एका वेळे पुरताच तो निर्णय होता, असे केंद्र शासनाने आपल्या माहितीपत्रात म्हटल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यामुळे उपलब्ध कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया याचं निरीक्षण केल्यानंतर उच्च न्यायालयाने आज शासनाची भूमिका उचित असल्याचं म्हटलं आहे.
 • विद्यार्थ्यांची बाजू : विद्यार्थ्यांच्या बाजूने आज अ‍ॅडव्होकेट अनुभा सहाय यांनी महत्वाचा मुद्दा मांडला की, ‘विविध राज्यांचे गुण देण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्यामुळे जर 20 टक्के परसेंटाइलची अट लावली, तरच विद्यार्थ्यांना जेईई परीक्षेमध्ये पात्र केले जाईल. मात्र त्यामुळे अन्याय होऊ शकतो. त्यात महाराष्ट्राचे नुकसान होईल पण मणिपूरचा फायदा होईल. बिहारचे नुकसान होईल, पण गुजरातचा फायदा होईल. त्यामुळेच एकसमान काहीतरी निकष असला पाहिजे, जो विद्यार्थ्यांचं भलं करणारा असला पाहिजे’. मात्र हा तर्क आणि युक्तिवाद शासनाच्या वकिलांनी धोरणात्मक बाब असल्याने त्यात हस्तक्षेप करता येत नाही, असा मुद्दा मांडत खोडून काढला. मात्र विद्यार्थी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. तसेच शासनाने एक वेळची बाब म्हणून पात्रता अटी काढल्या, मात्र त्याची पूर्व सूचना द्यायला हवी होती, हे देखील वकील अनुभा साहाय यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने मांडले.
 • निकाल पत्र अद्याप संकेतस्थळावर अपलोड केले नाही : नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेने कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ मागितला होता. त्यांनी सर्व कागदपत्रे काल आणि आज झालेल्या सुनावणीमध्ये स्पष्टपणे मांडले. त्यामध्ये ही बाब वस्तुनिष्ठ रीतीने न्यायालयाच्या समोर दिसून आली की, पात्रता आणि परसेंटाइल अट रद्द करण्याचा निर्णय शासनाने केवळ एका वेळेसाठीच घेतला होता. हीच बाब उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश संजय गंगापूरवाला आणि न्यायधीश यांनी मान्य करत विद्यार्थ्यांचा दावा फेटाळून लावला. ह्या संदर्भात उच्च न्यायालयाचे निकाल पत्र अद्यापही संकेतस्थळावर अपलोड केलेले नाही.

JEE Main Exam Schedule

JEE Main Exam : दुसऱ्या सत्रातील ‘जेईई मेन २०२३’ परीक्षा येत्या गुरुवारपासून

The examination of the second session of the JEE Main 2023 examination conducted by the National Testing Agency (NTA) is starting from next Thursday (6th). More than nine lakh 40 thousand students across the country are going to give this exam in the second semester. This exam will be held on 6th, 8th, 10th, 11th, 12th, 13th and 15th of April. On behalf of ‘NTA’, the admit card of the students who will take the exam on Thursday has been made available. The exam will be held at 330 exam centers across the country and 15 exam centers outside the country. The schedule for making the admit card available to the students appearing for the exam after Thursday will be announced soon. Also, NTA has requested that students should regularly visit the official website of NTA to see the latest information regarding the examination.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)तर्फे घेण्यात येणाऱ्या जेईई मेन २०२३ परीक्षेतील दुसऱ्या सत्रातील परीक्षा येत्या गुरुवारपासून (ता.६) सुरू होत आहे. देशभरातील तब्बल नऊ लाख ४० हजारांहून अधिक विद्यार्थी दुसऱ्या सत्रातील ही परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा ६, ८, १०, ११, १२, १३ आणि १५ एप्रिलला होणार आहे. ‘एनटीए’च्या वतीने गुरुवारी परीक्षा होणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र (ॲडमिट कार्ड) उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशभरातील ३३० आणि देशाबाहेरील १५ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. गुरूवारनंतर परीक्षा होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबत अद्ययावत माहिती पाहण्यासाठी एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळाला सातत्याने भेट द्यावी, असे आवाहन एनटीएतर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ –

 • – www.nta.ac.in
 • – https://jeemain.nta.nic.in

NTA has changed the schedule of JEE Main (Main Exam) which is important for admission in IITs, NITs and other engineering colleges. ‘NTA’ has postponed the exam on 27th January. This exam will be conducted on January 28. Read More details are given below.

आयआयटी, एनआयटीसह अन्य इंजिनीअरिंग महाविद्यालयात प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जेईई मेनच्या (मुख्य परीक्षा) वेळापत्रकात ‘एनटीए’ने बदल केला आहे. ‘एनटीए’ने २७ जानेवारीची परीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा आता २८ जानेवारीला घेण्यात येणार आहे.

एनटीए’च्या मूळ नियोजनानुसार जेईई मुख्य परीक्षा २४, २५, २७, २८, २९, ३० आणि ३१ जानेवारीला घेतली जाणार होती. नवीन वेळापत्रकानुसार ही परीक्षा आता २४, २५, २८, २९, ३०, ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारीला होणार आहे. एनटीएकडून २७ जानेवारीला घेण्यात येणारी परीक्षा आता २८ जानेवारीला होणार आहे.

यातील बीई आणि बीटेक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई मुख्य पेपर १ ही परीक्षा दोन सत्रांत घेतली जाईल. बी आर्क आणि बी प्लॅनिंग अभ्यासक्रमासाठीचा जेईई मुख्य पेपर २ ही परीक्षा २८ जानेवारीला दुसऱ्या सत्रात घेतला जाणार आहे, असे ‘एनटीए’ने जाहीर केले आहे. या परीक्षा देशातील २९० केंद्रांवर आणि परदेशातील २५ शहरांत घेतल्या जाणार आहेत.

आयआयटी जेईई-मेन्सची परीक्षा ही देशभरात होते आणि देशातील लाखो लोक या परीक्षेची तयारी करीत असतील. ती परीक्षा पुढे ढकलणे आवश्यक असल्याची कोणतीही अनन्यसाधारण परिस्थिती दिसत नाही. जनहित याचिकाकर्त्याच्या विनंतीवरून ती पुढे ढकलण्याचा आदेश दिल्यास त्याचा भविष्यातील परीक्षांवरही परिणाम होईल,’ असे निरीक्षण नोंदवून तसा आदेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता.

एनटीए’ने ही प्रवेश परीक्षा अत्यंत उशिरा जाहीर करून विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा अवधीच दिलेला नाही. दर वर्षी ‘एनटीए’कडून चार महिने आधी प्रवेशपरीक्षेच्या तारखा घोषित होतात. या वेळी ‘एनटीए’ने खूप विलंब केला आहे. त्याचबरोबर सीबीएसई व अन्य परीक्षा मंडळांच्या इयत्ता बारावीच्या परीक्षा तोंडावर असताना; तसेच विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, तोंडी होणार असताना ही प्रवेश परीक्षा नियोजित आहे. या साऱ्यामुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड ताण येणार असल्याने प्रवेश परीक्षा एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा आदेश द्यावा,’ अशी विनंती बालहक्क कार्यकर्त्या अनुभा सहाय यांनी जनहित याचिकेद्वारे केली होती. याविषयी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती

JEE Main Exam Registration 2023

JEE Main Exam Registration : National Testing Agency (NTA) has released exam date. The exam will be conducted from January 24 to January 31, 2023. Admit Card will be released after 12th January 2023. The registration process for JEE Main 2023 has started from yesterday i.e. 15th December 2022. Last date of registration is 12th January 2023. Applicants need to registered themself through the given link.

JEE Exam 2023

यंदा बारावीची परीक्षा देणारे आणि ज्यांना पुढे इंजिनिअरींग क्षेत्रात करिअर करायचं आहे असे विद्यार्थी कित्येक दिवसांपासून JEE Mains 2023 च्या तारखांची आणि नोटिफिकेशनची वाट बघत होते. अखेर NTA कडून JEE Mains 2023 च्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. तसंच रजिस्ट्रेशन प्रोसेसही सुरु करण्यात आली आहे. आज आम्ही तुम्हाला या परीक्षेसाठी फॉर्म नक्की कसा भरायचा आणि रजिस्टर कसं करायचं हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

NTA ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, JEE मेन 2023 साठी नोंदणी प्रक्रिया कालपासून म्हणजेच 15 डिसेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. नोंदणीची अंतिम तारीख 12 जानेवारी 2023 आहे. आणि परीक्षा 24, 25, 27, 28, 29, 30 आणि 31 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. यासाठी रजिस्ट्रेशन नक्की कसं करायचं हे जाणून घेऊया.

अशा पद्धतीनं करा रजिस्ट्रेशन्स

 • JEE 2023 नोंदणी कशी करावी
 • नोंदणीसाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट- jeemain.nta.nic.in वर जा.
 • वेबसाइटच्या होम पेजवर दिलेल्या JEE मेन 2023 सत्र 1 पर्यायावर जा.
 • यामध्ये तुम्हाला JEE (मुख्य) 2023 सत्र 1 अर्जाच्या लिंकवर जावे लागेल.
 • आता Apply Online च्या लिंकवर क्लिक करा.
 • यानंतर, विनंती केलेले तपशील भरा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
 • नोंदणी केल्यानंतर, तुम्ही अर्ज भरू शकता.
 • अर्ज पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रिंट काढा.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई 2023 साठी अधिसूचना जारी केली आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, परीक्षा 24 जानेवारी ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत घेतली जाईल. 12 जानेवारीनंतर परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले जाईल. याशिवाय जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे शहर जाहीर केले जाणार आहे. JEE Mains या jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन विद्यार्थी परीक्षेसाठी जारी केलेली संपूर्ण सूचना तपासू शकतात.

REGISTRATION LINK 

Release of the NTA Examination Calendar for Academic Year 2023-24


JEE Main Exam Registration : National Testing Agency (NTA) may soon announce the date of Joint Entrance Examination Main 2023 exam date. According to media reports, JEE Mains 2023 will be held twice this year i.e. in January and April. JEE Main 2023 Exam Date will be announced on official website jeemain.nta.nic.in 2023, from here students can get exam date as well as other information.

अभियांत्रिकीची सर्वात प्रतिष्ठित परीक्षा असलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षेच्या (जेईई) तारखेची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, JEE Mains 2023 या वर्षी दोनदा म्हणजे जानेवारी आणि एप्रिलमध्ये होणार आहे. जानेवारीला फक्त काही दिवस शिल्लक असताना, असे म्हटले जात आहे की नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य 2023 ची तारीख जाहीर करू शकते. या महिन्यातच तारीख येऊ शकते.

अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य 2023 परीक्षेची तारीख ची तारीख जाहीर करू शकते. JEE मेन 2023 परीक्षेची तारीख अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in 2023 वर जाहीर केली जाईल, येथून विद्यार्थ्यांना परीक्षेची तारीख तसेच इतर माहिती मिळू शकेल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेईई मेन 2023 ची नोंदणी देखील लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइट- jeemain.nta.nic.in 2023 वरून JEE मुख्य नोंदणी 2023 पूर्ण करावी लागेल. JEE मेन 2023 अर्ज भरताना, विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागेल, कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि JEE अर्ज शुल्क भरावे लागेल.

अशा पद्धतीनं करता येईल रजिस्टर

 • JEE Main -jeemain.nta.nic.in 2023 च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
 • “JEE Main Registration 2023” या लिंकवर क्लिक करा.
 • नोंदणी पूर्ण करण्यासाठी फील्डमध्ये आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
 • नोंदणी पूर्ण झाल्यावर, लॉगिन क्रेडेन्शियल्स नोंदणीकृत ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरवर पाठवले जातील.
 • पुढे, क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा.
 • अर्ज भरण्यासाठी अर्ज क्रमांक आणि पासवर्ड एंटर करा.
 • आवश्यकतेनुसार वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशील प्रविष्ट करा.
 • आता आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
 • ऑनलाइन मोडमध्ये JEE मेन 2023 अर्ज शुल्क भरा.
 • JEE Mains अर्ज फॉर्म 2023 तपासल्यानंतर, तो सबमिट करा. शेवटी सबमिट केलेल्या फॉर्मची प्रिंट काढा.

JEE Main Exam Session 2 Registration: National Testing Agency, NTA has started registration process again for JEE Main 2022 July Session. The National Testing Agency (NTA), which is conducting the exams, has announced the resumption of the application process for the second session of JEE Main 2022 in two phases. Candidates can register for JEE Main Exam by visiting the official website jeemain.nta.nic.in. The application process can be completed by 9 pm on 9th July 2022.

JEE Main 2022: जेईई मेन २०२२ सत्र २ परीक्षेसाठी नोंदणी विंडो पुन्हा एकदा उघडण्यात आली आहे. जेईई मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन नोंदणी करता येईल. अर्जाची प्रक्रिया ९ जुलै रोजी रात्री ११ वाजेपर्यंत पूर्ण करता येईल. जेईई मुख्य २०२२ जुलै सत्रासाठी यापूर्वी अर्ज प्रक्रिया ३० जून रोजी बंद करण्यात आली होत  जेईई मुख्य सत्र २ हे २१ जुलै ते ३० जुलै दरम्यान आयोजित केले जाणार आहे.

एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, ‘जेईई मेन २०२२ सत्र १ साठी परीक्षा शुल्क भरलेल्या आणि जेईई मेन २०२२ सत्र २ साठी उपस्थित राहू इच्छिणाऱ्या उमेदवारांना मागील अर्ज क्रमांक आणि पासवर्डसह लॉग इन करावे लागेल. सत्र २ साठी पेपर, परीक्षेचे माध्यम आणि शहर निवडू शकतात आणि परीक्षा शुल्क भरु शकतात. इच्छुक विद्यार्थी पुढे दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करुन अर्ज करु शकतात

JEE Main 2022 Registration: असा करा अर्ज

 • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा.
 • वेबसाइटवर दिलेल्या नोंदणी लिंकवर क्लिक करा.
 • आता नाव, पालकांचे नाव, मोबाइल नंबर, ईमेल पत्ता आणि इतर तपशील सबमिट करून लॉगिन तयार करा.
 • आता पेजवर परत जाऊन लॉग इन करा.
 • लॉग इन केल्यानंतर, अर्ज भरा.
 • फोटो आणि सही अपलोड करा.
 • अर्ज शुल्क भरा
 • सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या.

अर्ज शुल्क
सर्वसाधारण उमेदवारांना ६०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. महिला उमेदवार, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि तृतीयपंथी उमेदवारांकडून ३२५ रुपये शुल्क आकारले जाईल. परदेशी विद्यार्थ्यांना ३ हजार रुपये तर परदेशी महिला, थर्ड जेंडर, एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून १,५०० रुपये शुल्क घेतले जाईल.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


 JEE Main Exam Session 2 Registration: National Testing Agency, NTA has started registration process again for JEE Main 2022 July Session. The National Testing Agency (NTA), which is conducting the exams, has announced the resumption of the application process for the second session of JEE Main 2022 in two phases. Applicants who applied for these exam may resisted themself online through the jeemain.nta.nic.in

JEE Main Exam 2022- देशातील सर्वात मोठ्या इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षेच्या २०२२ आवृत्तीसाठी अर्ज नाकारण्यात आलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. परीक्षेचे आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA), ने यावेळी दोन टप्प्यात जेईई मेन २०२२ च्या दुसऱ्या सत्रासाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

जेईईची अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर यासंदर्भात नोटीस जाहीर करण्यात आली आहे. जेईई मेन २०२२ सत्र २ (जुलै) साठी अर्जांसाठी अर्ज प्रक्रिया प्रथम आयोजित केली जाणार आहे. सत्र (जून) परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुरू होईल.

जेईई मेन २०२२ जून सत्र २३ ते २९ जून या कालावधीत देशातील ५०१ शहरांमध्ये आणि परदेशातील २२ शहरांमध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर, निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, पहिली तात्पुरती उत्तरतालिका जाहीर करून उपस्थित उमेदवारांकडून हरकती मागवण्यात येतील. ज्याच्या पुनरावलोकनानंतर जेईई मुख्य २०२२ अंतिम उत्तरतालिका आणि निकाल जाहीर केला जाईल.

अर्ज दुरुस्ती विंडो पुन्हा उघडली

दुसरीकडे, NTA ने जेईई मेन २०२२ च्या पहिल्या आणि दुसऱ्या सत्रासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या अर्जातील त्रुटी सुधारण्यासाठी किंवा आवश्यक दुरुस्तीसाठी १ जुलैपासून अर्ज सुधारणा विंडो पुन्हा उघडली आहे. ज्या उमेदवारांना जेईई मेन अर्ज २०२२ मधील त्रुटी दुरुस्त करायच्या आहेत ते परीक्षा पोर्टलवर लॉग इन करून दुरुस्त करू शकतात. उमेदवारांना ३ जुलै २०२२ (रात्री ११.५० पर्यंत) अर्ज दुरुस्ती करता येणार आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Admin says

  JEE Main Exam Registration 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  ????टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | ????Govnokri ची अप डाउनलोड करा!