बीए-बीएस्सी बीएड्ऐवजी आता आयटीईपी अभ्यासक्रम सीईटी कक्षाऐवजी एनटीएकडून प्रवेश परीक्षा – MBA MMS CET 2025
CET Online Registration 2025 -
बीए-बीएस्सी बीएड्ऐवजी आता आयटीईपी अभ्यासक्रम सीईटी कक्षाऐवजी एनटीएकडून प्रवेश परीक्षा
सीईटी कक्षाऐवजी एनटीएकडून प्रवेश परीक्षा – राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषदेच्या (एनसीटीई) सूचनेनुसार चार वर्षीय बीए-बीएस्सी बीएड् (एकात्मिक) हा अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम बंद करण्यात येणार असून, या अभ्यासक्रमाचे ४ वर्षीय एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम (आयटीईपी) यामध्ये परिवर्तीत करण्यात येणार आहे. त्यामुळे ४ वर्षांच्या बीए-बीएससी बीएड् (एकात्मिक) अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षामार्फत राबविण्यात येणारी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यात येणार आहे.
या नोंदणी प्रक्रियेअंतर्गत अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या पत्रानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ४ वर्षांच्या बीए-बीएससी बीएड् (एकात्मिक) प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना एनटीएमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘एनसीईटी २०२५’साठी ऑनलाइन अर्ज करण्याचा सल्ला दिला आहे. तरी या अभ्याक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘एनसीईटी’साठी अर्ज भरण्यासाठी https:// exams. nta. ac. in/ NCET या संकेतस्थळावर दिलेल्या https:// ncet2025. ntaonline. in/ या लिंकवर अर्ज भरावा, असे आवाहन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून करण्यात आले आहे.
The Maha CET Cell has extended the registration deadline for the common entrance exams for MCA, MBA and B. Design courses. Therefore, now registration for the entrance exams for these courses can be done till February 25. While the registration deadline for BBA, BCA, BMS, BBM and MBA integrated courses has also been extended till March 20. The CET Cell had earlier extended the registration deadline for MCA, MBA and B. Design for the first time to January 31, and then to February 10. However, since registration is ongoing from students, the CET cell has extended this registration for the third time till February 25.
सीईटी प्रवेश परीक्षांसाठी २५ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी
सीईटी सेलने एमसीए, एमबीए आणि बी. डिझाइन या अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेशपरीक्षांच्या नोंदणीला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता या अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षेसाठी दि. २५ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येईल. तर बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम व एमबीए इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या नोंदणीलाही २० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सीईटी सेलने यापुर्वी एमसीए, एमबीए आणि बी. डिझाइनच्या नोंदणीला पहिल्यांदा ३१ जानेवारी, आणि त्यानंतर १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र विद्यार्थ्याकडून नोंदणी सुरू असल्याने सीईटी कक्षाने या नोंदणीला तिसऱ्यांदा २५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
Maha MBA MMS CET 2025
पाच वर्षे विधि अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणीस पुन्हा संधी
एमबीए/एमएमएस आणि एमसीए, बी-एचएमसीटी/एम एचएमसीटी इंटिग्रेटेड, बी-डिझाइन आणि एम-एचएमसीटी या पाच अभ्यासक्रमांच्या अर्ज नोंदणीला मुदतवाढ दिल्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) आता पाच वर्षे विधि अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणीलाही मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांना आता १८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे.
- अधिकाधिक विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेता यावा, तसेच ऐनवेळी त्यांची अर्ज नोंदणी करण्यासाठी धावपळ होऊ नये यासाठी सीईटी कक्षाने डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यापासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली होती. मात्र एमबीए / एमएमएस आणि एमसीए, बी-एचएमसीटी / एम एचएमसीटी इंटिग्रेटेड, बी-डिझाइन आणि एम-एचएमसीटी या पाच अभ्यासक्रमांना अल्प प्रतिसाद मिळाल्याने विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली.
- या अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेला ३ जानेवारी २०२५ पासून सुरुवात करण्यात आली होती. नोंदणीसाठी दिलेल्या महिनाभराच्या कालावधीत विधि पाच वर्षे अभ्यासक्रमाला २२ हजार २१३ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी फक्त नोंदणी केली असून, शुल्क भरून अर्ज निश्चित केलेला नाही. हे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत व त्यांना संधी गमवावी लागू नये, तसेच अधिकाधिक विद्यार्थ्यांना अर्ज करता यावा, यासाठी सीईटी कक्षाने अर्ज नोंदणी करण्यासाठी १८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यानंतर पुन्हा अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ दिली जाणार नाही, असे कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
- अधिकाधिक जागांवरील प्रवेशासाठी प्रयत्न – या अभ्यासक्रमासाठी राज्यात गतवर्षी १२ हजार ७३१ जागा होत्या. या जागांकरिता घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेसाठी राज्यभरातून ३४ हजार ७६६ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी २६ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९ हजार ४३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यात ४ हजार ५११ विद्यार्थी आणि ४ हजार ९२२ विद्यार्थिनींचा समावेश आहे. गतवर्षी झालेल्या ९ हजार ४३८ प्रवेशामुळे विविध महाविद्यालयांमध्ये ३ हजार २९३ जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे अधिकाधिक जागांवर प्रवेश होऊन रिक्त जागांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सीईटी कक्षाकडून सांगण्यात आले.
MAH MBA MMS CET 2023 : State Common Entrance Test Cell, Maharashtra State has relesed admission notification for admission to First Year of Full Time Management program (MBA/MMS) for academic year 2023-2024. As per the require eligibility for this admission process, interested candidates can be apply by using following official website link. Also applicants need to pay the registration fees as given below. Closing date for registration is 4th March 2023.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत तंत्रशिक्षण विभागांतर्गत एमबीए, एमएमएस या सामाईक प्रवेश परीक्षेची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया दि. २३ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होणार आहे. ही नोंदणी प्रक्रिया दि. ४ मार्च २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता घेण्यात येणाऱ्या एमबीए/एमएमएस या व्यावसायिक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महा- एमबीए/एमएमएस सीईटी २०२३ ही परीक्षा दिनांक १८ मार्च २०२३ व १९ मार्च २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी https://mbacet2023.mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Eligibility Criteria MBA MMS CET 2023 :
- Passed minimum three year duration Bachelor’s Degree awarded by any of the Universities
- Obtained non zero score in MAHMBA/MMS-CET 2023
- Obtained non zero positive score in any one of the following examinations; MAH-MBA/MMS-CET 2023, GMAT, CAT, MAT, ATMA, XAT and CMAT
Application Fees for MBA-MMS Admission 2023 – 2024 :
- For General category applicants : Rs.1000/-
- For Reserved Category Candidates of Backward Class Categories [SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B), NT(C), NT(D), OBC, SBC] & Persons with Disability Candidates belonging to Maharashtra State only : Rs.800/-
Maharashtra CET 2023: How to apply for MBA/MMS admission
- Step 1: Visit the official website— mbacet2023.mahacet.org
- Step 2: Click on the link for registration
- Step 3: Enter your details such as name, date of birth, email address and more
- Step 4: Login using your application number and password
- Step 5: Fill the application form
- Step 6: Save, submit and pay the fees
- Step 7: Download the application form for future reference
Notice No-1 – MAH-MBA/MMS-CET-2023 Online Registration Schedule