Maha Tourism Bharti -पर्यटन व सांस्कृतिक विभागात भरती IBPS मार्फत होणार- GR जाहीर
Maharashtra Tourism Recruitment 2023 - Notification, Apply Link
Maharashtra Tourism Recruitment 2023
Maha Tourism Bharti 2023– Latest updates regarding Maharashtra Tourism Bharti 2022 as per the GR Group-C and Group-D cadres will be recruited in Tourism and Cultural Affairs Department. Government has decided to recruit this post through IBPS Examination. Recruitment will be done in this department soon. Candidates Read the complete details given below on this page regarding the Maha Tourism Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने गट-ब (अराजपत्रित), गट-क आणि गट-ड संवर्गातील नामनिर्देशन कोट्यातील पदे भरण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षा प्रक्रियेसाठी कंपनीच्या नियुक्तीबाबत नवीन जीआर प्रकाशित केला आहे. लवकरच पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाद्वारे पदभरती करण्यात येईल त्याकरिता IBPS कंपनी ची निवड करण्यात आली आहे.
भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) “गट-ब (अराजपत्रित)”, “गट-क” व “गट-ड” संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे सरळसेवेने भरण्याबाबतच्या, सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र. १ व संदर्भ क्र.३ अन्वये देण्यात आलेल्या एकत्रित मार्गदर्शक सूचनांनुसार, संदर्भ क्र.४ येथील या विभागाच्या शासन निर्णयानुसार या विभागाच्या अधिपत्याखालील (१) पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, (२) पुराभिलेख संचालनालय, (३) सांस्कृतिक कार्य संचालनालय, (४) महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी व गुजराती साहित्य अकादमी, (५) दर्शनिका विभाग, मुंबई, (६) रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, मुंबई व (७) पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई या सात क्षेत्रिय कार्यालयांसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णयान्वये, भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) “गट-ब (अराजपत्रित)”, “गट-क” व “गट-ड” संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी स्पर्धा परीक्षा प्रक्रियेसाठी टि.सी.एस.- आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन) या कंपन्यांमार्फत ऑनलाईन पध्दतीने (Computer Programme Based Test / Examination) घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
यासंदर्भात या कंपन्यांच्या प्रतिनिधीसमवेत प्राथमिक स्तरावरील चर्चेनंतर याबाबत प्रतिसाद दिलेल्या आय. बी. पी. एस. (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन) या कंपनीसोबत विचारविनिमय करण्यासाठी समितीची बैठक दि. २० डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आली. सदर बैठकीचे इतिवृत्त संदर्भ क्र.५ येथील संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये तथा अध्यक्ष, राज्यस्तरीय समिती यांच्या दि. २० डिसेंबर २०२२ च्या पत्रान्वये प्राप्त झाले असून, समितीने भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील ) “गट-ब (अराजपत्रित)”, “गट-क ” व ” गट-ड” संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी आय.बी.पी.एस. (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन) या कंपनीची निवड करण्याची शिफारस केली आहे. समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने, भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) “गट-ब (अराजपत्रित)”, “गट-क” व “गट- ड” संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी स्पर्धा परीक्षा प्रक्रियेसाठी आय.बी.पी.एस. (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन) या कंपनीची निवड करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :- Department of Tourism and Cultural Affairs Bharti GR 2022- 23
१. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, पुराभिलेख संचालनालय, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी व गुजराती साहित्य अकादमी, दर्शनिका विभाग, मुंबई, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, मुंबई व पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई या सात क्षेत्रिय कार्यालयांतील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील ) “गट-ब (अराजपत्रित) – “, “गट-क” व “गट-ड ” संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने (Computer Programme Based Test / Examination) स्पर्धा परीक्षा प्रक्रियेसाठी आय. बी. पी. एस. (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पसनल सिलेक्शन) या कंपनीची निवड करण्यास संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये, मुंबई तथा अध्यक्ष, राज्यस्तरीय समिती यांनी संदर्भ क्र.५ येथील पत्रान्वये केलेल्या शिफारशीस अनुसरुन शासन मान्यता देण्यात येत आहे.
२. पदभरतीसाठी सर्व क्षेत्रिय कार्यालयांच्यावतीने संचालक मुंबई, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये यांनी आय.बी.पी.एस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पसनल सिलेक्शन) या कंपनीशी सामंजस्य करार करावा. सामंजस्य करारामध्ये सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयातील परिच्छेद क्र.३ येथे नमूद सर्व बाबींचा समावेश करण्याची दक्षता घेण्यात यावी. कंपनीचे दर सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयात नमूद केल्यानुसार राहतील. तसेच संदर्भ क्र. १ येथील सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयात नमूद एकत्रित मार्गदर्शक सूचनांनुसार सदर भरती प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी राज्यस्तरीय समितीची राहील.
३. सदर कंपनीला आवश्यक ती सर्व माहिती विनाविलंब उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सर्वस्वी विभागातील संबंधित प्रशासकीय कार्यासने व क्षेत्रिय कार्यालयांची राहील. संपूर्ण भरती प्रक्रियेचे समन्वयन संचालक, पुरातत्व वस्तुसंग्रहालये संचालनालय, मुंबई यांच्याकडून करण्यात येईल.
४. सदर ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविण्यासाठी निवड झालेल्या कंपनीसोबत सामजस्य करारावर व अन्य पत्रव्यवहार / मान्यता स्वाक्षरीत करण्यासाठी समितीचे अध्यक्ष तथा संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. सामजंस्य करारातील अटी / शर्ती संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णयाशी सुसंगत असतील यांची दक्षता घेण्यात यावी.
५. सदर प्रयोजनार्थ होणारा खर्च सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयातील परिच्छेद क्र. (२) मधील तरतूदी नुसार करण्यास समितीचे अध्यक्ष तथा संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
६. उमेदवारांकडून प्राप्त होणारे परीक्षा शुल्क जमा करण्यासाठी वित्त विभागाच्या मार्गदर्शक सुचनानुसार बँकेची निवड करुन एक स्वतंत्र बँक खाते उघडण्यासाठी समितीचे अध्यक्ष तथा संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२१२२११६४३५१३१२३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
Maha Tourism Bharti 2022: Tourism will help in creating employment opportunities. Nature tourism creates employment opportunities in the employment area To the east of Vidarbha, Gondia-Bhandara district is prosperous in terms of tourism. There are many tourist attractions in this place. Bodalkas is famous for its tourism. Therefore, there is a need for all round development of these tourist destinations, said MLA Vijay Rahangdale.
Maha Tourism Bharti 2022- निसर्ग पर्यटनामुळे रोजगार परिसरात रोजगाराच्या संधी निर्माण होतात. विदर्भाच्या पूर्व दिशेला गोंदिया-भंडारा जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने सुजलाम, सुफलाम आहे. या ठिकाणी अनेक पर्यटनस्थळे आहेत. पर्यटनामुळेच बोदलकसाचे नाव सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्यामुळे या पर्यटनस्थळांचा सर्वांगीण विकास करण्याची गरज असल्याचे मत आमदार विजय रहांगडाले यांनी व्यक्त केले.
Maha Tourism Recruitment 2022
बोदलकसा पर्यटन निवास येथे पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालय नागपूरच्या वतीने दोन दिवसीय बोदलकसा पक्षी महोत्सवाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते.