राज्यात सव्वादोन लाख सरकारी पदे रिक्‍त; कोरोनामुळे मेगाभरती होईना !

Mega Maharashtra Recruitment 2020

राज्यात सव्वादोन लाख सरकारी पदे रिक्‍त; कोरोनामुळे मेगाभरती होईना !

महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून 72 हजार रिक्‍त पदांची मेगाभरती करण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारने घेतला. मात्र, लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ही भरती आचारसंहितेत अडकली. त्यानंतर महाविकास आघाडीने मार्च 2020 मध्ये सर्वच विभागांमधील रिक्‍त पदांची माहिती संकलित केली. त्यामध्ये सरकारी विभागांमधील गट ‘अ’च्या अकरा हजार, गट ‘ब’ 21 हजार 92, गट “क’ 86 हजार आणि गट “ड’च्या चार हजार 252, तर जिल्हा परिषदांमधील 47 हजार जागांचा समावेश होता. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने एकूण रिक्‍त पदाच्या 50 टक्‍के जागा भरतीचे नियोजनही केले. मात्र, कोरोनामुळे ते अद्यापही स्वप्नच राहिले. काही विभाग कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत कामे करुन घेत आहेत.

Mega Bharti 2020

  राज्यातील जिल्हा परिषदांसह सरकारी 29 विभागांमधील दोन लाख 29 हजारांहून अधिक पदे रिक्‍त आहेत. लोकहिताची कामे करताना येणाऱ्या अडचणींमुळे या विभागांनी वित्त विभागाकडे पदभरतीसाठी मान्यता मागितली. मात्र, कोरोनामुळे तिजोरीत अपेक्षित महसूल जमा होत नसल्याने ही भरती पुढच्या वर्षांत करावी, असा अभिप्राय वित्त विभागाने दिल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले .

फडणवीस सरकारच्या काळात शासकीय विभागांमधील रिक्‍त पदांची संख्या दोन लाख होती. आता गृह विभागासह अन्य सरकारी विभागांमधील काही कर्मचारी कोरोनाचे बळी ठरले आहेत. तर पदोन्नतीने काही विभागांमधील पदे रिक्‍त झाली असून कोरोना काळात सरकारने अधिकारी, कर्मचाऱ्यांबाबतीत घेतलेल्या स्वेच्छानिवृत्तीच्या निर्णयामुळे एप्रिल ते 15 सप्टेंबरपर्यंत तब्बल 22 हजार जागा रिकाम्या झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, राज्याच्या 29 सरकारी विभागांसाठी सात लाख 34 हजार 756 जागा मंजूर आहेत. त्यामध्ये गट “अ’ प्रवर्गातील 40 हजार 567, गट “ब’, “क’ आणि “ड’ या प्रवर्गातील सहा लाख 94 हजार 189 जागा आहेत. एकूण मंजूर पदांपैकी चार लाख 63 हजार 985 जागा सरळसेवेच्या, तर दोन लाख 70 हजार 771 जागा पदोन्नतीवरील आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या गट “क’ आणि गट “ड’ संवर्गातील तीन लाख 64 हजार 348 जागा मंजूर आहेत. त्यातील 47 हजार 810 जागा पदोन्नतीवरील असून उर्वरित जागा सरळसेवेतून भरल्या जातात.

मेगाभरतीसाठी आग्रह मात्र, तिजोरीत पैसाच नाही

महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून 72 हजार रिक्‍त पदांची मेगाभरती करण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारने घेतला. मात्र, लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ही भरती आचारसंहितेत अडकली. त्यानंतर महाविकास आघाडीने मार्च 2020 मध्ये सर्वच विभागांमधील रिक्‍त पदांची माहिती संकलित केली. त्यामध्ये सरकारी विभागांमधील गट ‘अ’च्या अकरा हजार, गट ‘ब’ 21 हजार 92, गट “क’ 86 हजार आणि गट “ड’च्या चार हजार 252, तर जिल्हा परिषदांमधील 47 हजार जागांचा समावेश होता. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने एकूण रिक्‍त पदाच्या 50 टक्‍के जागा भरतीचे नियोजनही केले. मात्र, कोरोनामुळे ते अद्यापही स्वप्नच राहिले. काही विभाग कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत कामे करुन घेत आहेत.

 विभागनिहाय रिक्‍त जागा 

 • गृह : 25,848
 • सार्वजनिक आरोग्य: 20,000
 • सामाजिक न्याय :3,127
 • जलसंपदा :21,073
 • उद्योग-कामगार :3,456
 • कृषी व पशुसंवर्धन : 15,283
 • महसूल व वने:12,098
 • महिला व बालविकास: 1,997

राज्यात ‘एवढी’ पदे रिक्त?…माहिती अधिकारातून उलगडा!

गुड न्यूज! आता होणार 4.75 लाख सरकारी नोकर भरतीNew Update

खूशखबर… राज्यात शासकीय मेगाभरती अखेर मुहूर्त मिळाला

‘एमपीएससी’मार्फत महाभरती राबवा !!

मेगाभरती ऑफलाईन पद्धतीनेच होणार !!

Maharashtra Mega Bharti 2020 : As per the news there were total  29 government departments and zilla parishers in the state, Group A, B, C, D are two lakh 193 posts vacant at the end of December 31, 2019. It includes one lakh 41 thousand 329 posts of direct service. It will also include 58 thousand 864 posts when it is promoted. Nitin Yadav, from Someshwarnagar (Tal. Baramati), has come out with the information obtained by the General Administration Department in the Right to Information. Former Chief Minister Devendra Fadnavis’ government was going to Mega Bharti for 72 thousand posts, however, the recruitment ceased during the election code of conduct. Candidates read the complete details carefully and keep visit on our website. 

Maharashtra Maha Bharti 2020

राज्यातील 29 सरकारी विभाग आणि जिल्हा परिषदांमधून गट “अ’, “ब’, “क’, “ड’ची 31 डिसेंबर 2019 अखेर दोन लाख 193 पदे रिक्त आहेत. त्यात सरळसेवेच्या एक लाख 41 हजार 329 पदांचा समावेश आहे. याखेरीज पदोन्नती मिळाल्यावर 58 हजार 864 पदांचाही यात समावेश होणार आहे. सोमेश्‍वरनगर (ता. बारामती) येथील नितीन यादव यांना सामान्य प्रशासन विभागाकडून माहितीच्या अधिकारामध्ये मिळालेल्या माहितीतून हा उलगडा झाला आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारतर्फे 72 हजार पदांची “मेगाभरती’ करण्यात येणार होती. मात्र, निवडणूक आचारसंहिता काळात ही भरती थांबली. राज्यात सत्तांतर झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या महाविकास आघाडी मंत्रिमंडळाच्या बैठकीत 70 हजार पदांच्या मेगाभरतीचा निर्णय घेण्यात आला. शिवाय बहुचर्चित महापोर्टलद्वारे होणाऱ्या भरतीवर फुली मारण्यात आली. नवीन सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक पद्धतीने भरतीचे धोरण स्वीकारण्यात आले. अशातच, शिक्षकभरतीसाठी आंदोलकांशी संवाद साधत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षकांच्या मेगाभरतीचे संकेत दिले. मराठी भाषा विभागामुळे शिक्षकांच्या 20 हजार रिक्त जागा झाल्या. निवृत्तीमुळे दहा हजार पदे रिक्त होतील. मागील सरकारच्या भरतीमधील 24 हजारांपैकी 12 हजार पदे रिक्त राहिली, अशी माहिती देण्यात आली.

गट “क’मध्ये रिक्त पदांचे प्रमाण मोठे

गृह, सार्वजनिक आरोग्य, जलसंपदा, कृषी व पशुसंवर्धन-दुग्धोत्पादन, उच्च व तंत्रशिक्षण, महसूल आणि वने, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये, आदिवासी विकास, शालेय शिक्षण व क्रीडा, सार्वजनिक बांधकाम, सहकार-पणन, वस्त्रोद्योग, सामाजिक न्याय, उद्योग, कामगार, अन्न व नागरी पुरवठा, पाणीपुरवठा व स्वच्छता, महिला व बालविकास, विधी व न्याय, नगरविकास, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, ग्रामविकास, पर्यटन, सामान्य प्रशासन, मृद व जलसंधारण, गृहनिर्माण,अल्पसंख्याक, पर्यावरण, मराठी भाषा अशा विभागांसाठी सात लाख 34 हजार 756 पदे मंजूर आहेत. त्यात गट “अ’च्या 40 हजार 567, “ब’च्या 63 हजार 912, “क’च्या पाच लाख 19 हजार 16, “ड’च्या एक लाख 11 हजार 261 पदांचा समावेश आहे. त्यांपैकी सरळसेवेची चार लाख 63 हजार 985, तर पदोन्नतीची दोन लाख 70 हजार 771 पदे आहेत. जिल्हा परिषदांमध्ये गट “क’ची तीन लाख 39 हजार 153 आणि “ड’ची 25 हजार 195 अशी एकूण तीन लाख 64 हजार 348 पदे मंजूर आहेत. त्यातील तीन लाख 16 हजार 538 पदे सरळसेवेची आणि 47 हजार 810 पदे पदोन्नतीची आहेत.

No. of Vacant Posts रिक्त पदांची संख्या :

 1. * सरकारी विभाग : गट “अ’- 10 हजार 545, “ब’- 20 हजार 999, “क’- 84 हजार 734, “ड’- 36 हजार 953.
 2. * जिल्हा परिषदा : गट “क’- 42 हजार 971, “ड’- 3 हजार 991.

सरकारी विभाग अन्‌ जिल्हा परिषदांमधील गटनिहाय रिक्त पदांच्या संख्येची स्थिती

 1. * “अ’- 10 हजार 545
 2. * “ब’- 20 हजार 999
 3. * “क’- 1 लाख 27 हजार 705
 4. * “ड’- 40 हजार 944

(एकूण सरळसेवेची एक लाख 41 हजार 329 आणि पदोन्नतीची 58 हजार 864 पदे)

Department wise total vacant posts : विभागनिहाय एकूण रिक्त पदे

 • * गृह —– 24 हजार 848
 • * सहकार-पणन व वस्त्रोद्योग —– तीन हजार दोन
 • * सार्वजनिक आरोग्य —– 20 हजार 544
  * सामाजिक न्याय —– दोन हजार 856
 • * जलसंपदा —– 20 हजार 873
 • * उद्योग-कामगार —– तीन हजार 406
 • * कृषी व पशुसंवर्धन —– 14 हजार 364
 • * अन्न-नागरी पुरवठा —– दोन हजार 736
 • * उच्च व तंत्रशिक्षण —– तीन हजार 762
 • * पाणीपुरवठा व स्वच्छता —– 728
 • * महसूल व वने —– 11 हजार 333
 • * महिला व बालविकास —– एक हजार 445
 • * वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये —– सहा हजार 490
 • * विधी व न्याय —– एक हजार 869
 • * वित्त —– पाच हजार 567
 • * नगरविकास —– एक हजार 291
 • * आदिवासी विकास —– सात हजार 391
 • * नियोजन —– 552
 • * शालेय शिक्षण व क्रीडा —– तीन हजार 477
 • * कौशल्य विकास व उद्योजकता —– पाच हजार 55
 • * सार्वजनिक बांधकाम —– आठ हजार 628
 • * ग्रामविकास 256 आणि जिल्हा परिषदा —– 46 हजार 962
 • * पर्यटन —– 301
 • * सामान्य प्रशासन —– दोन हजार 100
 • * गृहनिर्माण —– 281
 • * अल्पसंख्याक —– 16
 • * पर्यावरण —– दोन
 • * मराठी भाषा —– 58

विशेष गृह, महसूल, सामाजिक न्याय, नगरविकास, कौशल्य विकास, ग्रामविकास, सामान्य प्रशासन, मृद व जलसंधारण, गृहनिर्माण या विभागांची 31 डिसेंबर 2018 अखेरची माहिती उपलब्ध झाली आहे. तसेच 2013 पासून राज्य सरकारने भरलेल्या विभागवार रिक्त पदांची माहिती संकलित झालेली नाही. माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेली माहिती प्रशासकीय विभाग आणि जिल्हा परिषदांकडून 31 डिसेंबर 2019 अखेरची असल्याचे नमूद आहे. ही सारी परिस्थिती पाहता, रिक्त पदांमुळे कामाचा ताण आहे. शिवाय निवृत्तीमुळे रिक्त होणारी पदे आणखी वेगळी असतील. त्यामुळे स्वाभाविकपणे रिक्त पदे कशी भरली जाणार, याबद्दलची उत्सुकता तरुणाईमध्ये आहे.

सौर्स : सकाळ


Maharashtra Mega Bharti 2020 : Soon Maharashtra government will start the recruitment process for filling up the various vacant seats from various government department. Candidates from various Maharashtra district posses with 10th pass qualifications to another higher level qualifications will get recruit to various vacancies as per the requirement. From latest announcement for recruitment to the various posts, it is assume that this will be another mage recruitment which may going to be conduct by the Maharashtra Government. For Maharashtra Mega Bharti 2020 the various Maharashtra government departments like Public Works Department, MHADA, Postal, Agriculture, Fisheries & banking sectors will conduct this mega recruitment process.

Maharashtra Mega Bharti 2019

Name of the department and no. of posts details are given below:

Name of DepartmentNo. Of Posts
Krushi Vibhagनागपूर (२४९ पदे)
Krushi Vibhagअमरावती (२३९)
Krushi Vibhagलातूर (१६९)
Krushi Vibhagऔरंगाबाद (११२)
Postal Vibhag3650 Posts
Mhada Vibhag500 Posts
PWD Vibhag405 Posts
मत्स्यविभाग३७ पदे
जलसंधारण विभागातऔरंगबादसाठीही (१८२)

एकूण ५५४३ पदांची भरती अपेक्षित..

Maharashtra Mega Recruitment 2020

Maharashtra Mega Bharti 2020 : In consideration to the importance of the agriculture department as the need to of the Krushi Sevak post, there will be recruitment to the 769 vacancies of the posts in Nagpur (249 Posts), Amravati (239 Posts), Latur (169 Posts) & Auranagabad (112 Posts) will be filled. Also to get start the Maharashtra mega recruitment process, Maharashtra Postal Circle Mega Recruitment 2019 for filling up the 3650 vacancies advertisement is already been published. For online applications for this recruitment process the last date for online applications is 30th November 2019. In Public Works Department (PWD) there are 405 posts of Junior Engineer are approved, in fisheries department, Fishery Development Officer posts for 37 vacancies while for Water Resource Department 182 various posts are approved.

Along with other Maharashtra Government department will soon going to start their recruitment process. As the recruitment to fill the vacant positions from various department will soon going to start. Official notification regarding the recruitment process from these government department is going to start soon. Stay update with us to get all latest details regarding these various recruitment process.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!