Maharashtra SSC Online Result 2019

Maharashtra SSC Online Result 2019

Maharashtra Board SSC or 10th Class Result will be declare today at 1 PM. You can check your Result from this page. So, The results of secondary school certificate (SSC) examinations conducted by Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education in March this year, will be declared on Today, Monday, June 6. The MS Board will announce the results online at 1.00 p.m. Huge Number of  students had appeared for the examination from all over Maharashtra.

आज दुपारी १ वाजता आपण www.GovNokri.in द्वारे आपला १० वी निकाल विनाविलंब बघू शकता. तेव्हा सर्व १०वीच्या मित्रांना आमच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (सोमवारी) दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येईल. विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका आणि कलअहवाल 15 जूनला दुपारी तीन वाजता शाळेमार्फत देण्यात येतील, असे राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी रविवारी जाहीर केले.

राज्य मंडळाच्या पुणे, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांतर्गत ही परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर होणार, अशी शक्‍यता वर्तविण्यात आल्याने विद्यार्थ्यांची निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोचली होती. सोमवारी विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.

माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका, तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख आणि कलचाचणीचा कलअहवाल यांचे वाटप विभागीय मंडळामार्फत 15 जून सकाळी अकरा वाजता करण्यात येईल. त्याचदिवशी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, कलअहवाल यांचे वाटप माध्यमिक शाळांमार्फत करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर आणि मोबाइलद्वारेही पाहता येणार आहे.

दहावीचा निकाल पाहण्यासाठी अन्य संकेतस्थळ / List of Websites Publishing SSC Result 2019

 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!💬