राज्यातील सर्व खासगी अनुदानित शाळांत शिक्षक भरती अॅप्टिट्यूड टेस्टद्वारे – Maha TET 2024

Maha TET 2024 Exam @mahatet.in Time Table Released

Maha TET 2024 200 marks – For the recruitment of Shiksha Sevaks, a state level common difficulty level test of 200 marks will be conducted in Marathi and English medium. Candidates who have possessed educational and professional qualifications in the Maharashtra Private Schools Employees (Conditions of Service) Rules, 1981 and have passed the Teacher Eligibility Test (TET) will be eligible to apply for the post of teacher in class I to VIII. Read the complete details given below and keep visit us for the further updates of Shikshak Bharti 2024.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

  • On the basis of the marks obtained in this test, every local body or private educational institution will have to select the candidates on the basis of merit. According to the decision, local bodies and private educational institutions will have to publish vacancies and reservation related matters on the computer system for at least 15 days. Test scores obtained in any given year will be eligible for the selection process of any year.
  • The candidate will get the opportunity to take the aptitude test 5 times and based on the maximum marks, the application can be made to the concerned institution on the basis of computer system. Also, the procedure has been fixed while recruiting education workers in primary, secondary and higher schools under all government-aided institutions in the state. Accordingly, all schools will be approved on the basis of the number of registered students on the SARAL system. Also, the advertisement for the recruitment of vacant posts of teaching staff in all management schools will be published in newspapers for a period of at least 15 days in the computer system “Pavitra”.

राज्यातील सर्व खासगी अनुदानित शाळांत शिक्षक भरती अॅप्टिट्यूड टेस्टद्वारे

राज्यातील सर्व खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षण सेवकांची भरती आता अभियोग्यता (अॅप्टिट्यूड) आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षण सेवकांच्या भरतीसाठी होणारी केंद्रीय भरतीपूर्व निवड चाचणी परीक्षा (सीईटी) रद्द करण्यात आली आहे. मात्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा व अल्पसंख्याक संस्थांच्या शाळांमधील भरतीस ही चाचणी प्रक्रिया लागू राहणार नाही.

  • २०० गुणांची परीक्षा : शिक्षण सेवक भरतीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमातून २०० गुणांची राज्यस्तरीय समान काठिण्य पातळी चाचणी परीक्षा घेतली जाईल. इयत्ता पहिली ते आठवीमधील शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेले तसेच ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार परीक्षेस अर्ज करण्यास पात्र ठरतील.
  • गुणांच्या आधारेच होणार निवड : या चाचणीत मिळालेल्या गुणाच्या आधारावर प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था अथवा खाजगी शैक्षणिक संस्थांना गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड करावी लागणार आहे. या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत आणि खाजगी शैक्षणिक संस्था यांना रिक्त पदे आणि आरक्षण विषयक बाबींच्या अंतर्भावासह संबधित संगणकीय प्रणालीवर किमान १५ दिवसांकरिता प्रसिद्ध करावी लागणार आहे. कोणत्याही वर्षी प्राप्त झालेले चाचणीचे गुण कोणत्याही वर्षाच्या निवड प्रक्रियेसाठी पात्र राहणार आहे.
  • उमेदवारास ५ वेळा संधी मिळणार : अभियोग्यता चाचणी देण्याची संधी उमेदवारास ५ वेळा मिळणार असून यातील जास्तीत जास्त गुणांच्या आधारे संबंधित संस्थेकडे संगणकीय प्रणालीच्या आधारे अर्ज करता येईल. तसेच राज्यातील सर्व शासन सहाय्यित संस्थांतर्गत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च शाळांमधील शिक्षण सेवकांची रिक्त पदावर भरती करताना कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार ‘सरल’ प्रणालीवरील नोंदणीकृत विद्यार्थी संख्येच्या आधारे सर्व शाळांची मान्यता करण्यात येणार आहे. तसेच सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात “पवित्र” या संगणकीय प्रणालीमध्ये किमान १५ दिवसांच्या कालावधीसाठी व संस्थांकडून वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध होईल.

Maha TET Exam 2024 – The Maha TET will be held in June to recruit 10,000 teachers in the state. Therefore, the Education Department has instructed to prepare for the TET and the exam schedule will be announced soon. The Maha TET exam has been conducted by the education department since 2014 to fill up the vacant teaching posts in the state.  However, the number of candidates who clear the Maha TET exam is very low, making it difficult to recruit teachers. Also, the Maha CET exam is conducted for the candidates who have cleared the Maha TET exam. Candidates who pass this examination are given priority for recruitment of teachers according to merit. However, the number of candidates who clear the Maha CET is two to three per cent. Therefore, if the education department decides to fill more seats, the candidates who have secured merit in the Maha CET exam are less, so despite the high number of seats, the sanctioned seats for recruitment of teachers remain vacant.

Maha TET Exam : शिक्षक भरतीसाठी ‘या’ महिन्यात टीईटी; राज्यात शिक्षकांच्या 10 हजार रिक्त जागांवर होणार भरती

राज्यात दहा हजार शिक्षकांच्या भरतीसाठी जूनमध्ये महिन्यात टीईटी होणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने टीईटीची तयारी करण्याची सूचना केली असून, परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. राज्यात रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी शिक्षण खात्याकडून २०१४ पासून टीईटी परीक्षा घेतली जात आहे.  मात्र, टीईटी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षार्थींचे प्रमाण अतिशय कमी असल्याने शिक्षक भरती करण्यास अडचण निर्माण होत आहे. तसेच टीईटी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींची सीईटी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत पास होणाऱ्या परीक्षार्थीना गुणवत्तेनुसार शिक्षक भरतीसाठी प्राधान्य दिले जाते. मात्र सीईटी पास होणाऱ्या परीक्षार्थींची संख्या दोन ते तीन टक्के असते. त्यामुळे शिक्षण खात्याने अधिक प्रमाणात जागा भरण्याचा निर्णय घेतला तर सीईटी परीक्षेत गुणवत्ता मिळविले परिक्षार्थी कमी असतात त्यामुळे अधिक प्रमाणात जागा असूनही शिक्षक भरती साठी मंजूर झालेला जागा रिक्त राहत आहेत.

त्यामुळे शिक्षण खात्याने १३५०० शिक्षकांच्या जागा भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जून महिन्यात पुन्हा टीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षकांच्या सर्व जागा भरती करण्यास अडचण येणार नाही असे मत व्यक्त होत आहे. गेल्या वर्षीपासून शिक्षण खात्याने राज्यात १३ हजार ५०० शिक्षकांच्या जागा भरती करण्याची प्रक्रिया हाती घेतली असून, पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करून अनेक शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
मात्र, सिंधुत्व प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्याने आणि सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक भरती प्रक्रियेला स्थगिती दिल्याने काही पात्र उमेदवारांना अद्याप नियुक्ती पत्र देण्यात आलेले नाही त्यामुळे काही पात्र उमेदवारांची चिंता वाढली आहे. मात्र ज्या शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे त्या शिक्षकांना कोणतीही अडचण होणार नाही त्यामुळे अनेक शाळांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरवर्षी टीईटी आवश्‍यक – राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. तसेच दर वर्षी निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दरवर्षी रिक्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढत जात आहे. त्याचा विचार करून दरवर्षी शिक्षकांच्या जागा भरती करणे गरजेचे बनले आहे. मात्र पाच ते सहा वर्षांतून एकदा शिक्षक भरती केली जात आहे. त्यामुळे अनेक शाळांची मोठी अडचण होत असल्याने शिक्षण खात्याने दरवर्षी टीईटी घेऊन अधिक प्रमाणात शिक्षकांची भरती करणे गरजेचे आहे.


Maha TET Exam Online Exam Dates details given here. The offline Maha TET exam conducted by the Maharashtra State Examination Council will also be conducted online. For the first time in the state, the online examination will be held in the month of February 2024 in the new year. It is learnt that the state government has directed to conduct the exam through IBPS. In the last two years, the transparency of the MAHA TET exam was questioned due to malpractices. The incident took place during the exam in Pune. Therefore, the state government has taken this step.

All management, examination boards, aided, unaided, school teacher candidates are required to pass Maha TET for classes 1 to 4 and 6 to 8 in primary and secondary schools in the Maharashtra state. The exam was conducted offline. However, the misconduct in Pune had raised questions about the transparency of the exam.

The chairman of the State Examination Council gave this information. Nandkumar Bedse said that the state examination council will focus on conducting the exams online at present. The government has also directed to conduct TET online. Meetings and correspondence are underway.

Maha TET Exam : आता टीईटी होणार ऑनलाइन! यंदा निकालही लागणार लवकर

राज्यभरात गाजलेल्या टीईटी परीक्षेबाबात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत होणारी ऑफलाइन टीईटी परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. राज्यात नवीन वर्षात फेब्रुवारी महिन्यात ऑनलाइन परीक्षेचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून IBPS या कंपनीमार्फत ही परीक्षा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती मिळाली.

  • मागच्या दोन वर्षात टीईटीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यामुळे संबंधित परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होतो. परीक्षेदरम्यान घडलेला हा प्रकार पुण्यातील होता. त्यामुळे राज्य सरकारने हे पाऊल उचलेले आहे.
  • राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, परीक्षा मंडळे, अनुदानित, विनाअनुदानित असणारे, शाळेतील शिक्षक उमेदवारांना टीईटी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येत होती. परंतु, पुण्यात घडलेल्या गैरवर्तनामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
  • याबाबतीची माहिती दिली राज्य परीक्षा परिषदचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी, ते म्हणाले की, राज्य परीक्षा परिषदेकडून सध्या परीक्षा ऑनलाइन घेण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच सरकारकडून देखील टीईटी ऑनलाइन घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यासाठी बैठका आणि पत्रव्यवहार सुरु आहे.

Maha TET Online Examine Details

टीईटी परीक्षा ऑनलाइन घेतल्यास फायदे काय?

  1. टीईटी परीक्षा (Exam) ऑनलाइन घेतल्यास निकाल लवकर जाहीर करता येईल.
  2. परीक्षेतील गैरव्यवहार टाळता येईल.
  3. परीक्षेसाठी लागणारा मनुष्यबळ कमी होईल.
  4. परीक्षा पारदर्शक होण्यास मदत
  5. ऑफलाइन परीक्षेत होत असलेल्या चुका टाळता येतील.

OFFICIAL WEBSITE


According to the new framework, four levels of education have been decided from Anganwadi to second class (foundation stage), third to fifth (preparatory stage), sixth to eighth (middle stage) and ninth to twelfth (secondary stage). The qualification of ‘TET’ will be made mandatory while appointing teachers in these four stages of education. Anganwadi to 12th Class teachers are offered a four-year integrated B.Ed. And ‘Maha TET Exam 2023‘ pass will also be required. Also, the appointment of the teacher will be done only after the written examination, oral interview and then the actual classroom teaching test. Notably, this condition will apply to schools of all mediums and all managements. Read the complete details given below and keep visit us for the further updates of Shikshak Bharti 2023.

राज्यातील 23 हजार शिक्षकांची भरती सुरु! ‘पवित्र’वर नोंदणीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत

शिक्षकांना अंगणवाडी ते १२वीपर्यंत ‘टीईटी’ आवश्यक – नवा आकृतिबंध : आराखड्यात तरतूद, चाचणी घेऊनच नेमणुका

आतापर्यंत केवळ पहिली ते आठवीच्या शिक्षकांना आवश्यक असलेली टीईटी परीक्षा लवकरच अंगणवाडीपासून बारावीपर्यंतच्या सर्वच शिक्षकांना बंधनकारक होणार आहे. नव्या धोरणानुसार शिक्षणाचा नवा आकृतिबंध अमलात येणार आहे. या आकृतिबंधासोबतच ‘टीईटी’ची पात्रता शिक्षकांना बंधनकारक करण्यात येईल, अशी स्पष्ट तरतूद राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात करण्यात आली आहे. नव्या आकृतिबंधानुसार अंगणवाडी ते दुसरा वर्ग (फाउंडेशन स्टेज), तिसरी ते पाचवी (प्रिपरेटरी स्टेज), सहावी ते आठवी (मिडल स्टेज) आणि नववी ते बारावी (सेकंडरी स्टेज) अशा शिक्षणाच्या चार पायऱ्या ठरविण्यात आल्या आहेत. शिक्षणाच्या या चारही टप्प्यांतील शिक्षकांची नेमणूक करताना ‘टीईटी’ची पात्रता बंधनकारक करण्यात येणार आहे. अंगणवाडी ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांना चार वर्षांचे इंटिग्रेटेड बी.एड. व ‘टीईटी’ उत्तीर्ण होणेही आवश्यक असेल. तसेच लेखी परीक्षा, तोंडी मुलाखत आणि त्यानंतर प्रत्यक्ष वर्गअध्यापनाची चाचणी घेऊनच शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ही अट सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना लागू होणार आहे.

  • घसघशीत वेतन अन् पदोन्नतीच्या संधीही ■ नव्या शतकाच्या आव्हानानुसार नव्या दमाच्या शिक्षकांची अपेक्षा शिक्षण धोरणात करण्यात आली आहे. त्यानुसारच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यातही शिक्षकांच्या सशक्तीकरणासाठी खास तरतुदी करण्यात आल्या आहेत. चांगल्या शैक्षणिक वातावरणासाठी समाजातील बुद्धीमान तरुणांना शिक्षकी पेशाकडे आकर्षित करणे आणि टिकविणे आवश्यक असल्याचे यात म्हटले आहे. त्यासाठी शिक्षकांना घसघशीत वेतन, पदोन्नतीच्या पुरेशा संधी उपलब्ध करुन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. एका स्टेजमधील सर्व शिक्षकांचा पगार सारखा असावा, अध्यापनात अडचण जाणाऱ्या शिक्षकांवर लक्ष देण्यासाठी ‘मेंटॉर टीचर’ची नेमणूक करावी, असेही या आराखड्यात म्हटले आहे.
  • बी. एड. होताच बना प्रशिक्षणार्थी शिक्षक! ■ सर्व वर्गाच्या शिक्षकांना ‘टीईटी’ लागू करण्याची निर्णय प्रक्रिया एनसीटीई ने दोन वर्षांपासून सुरु केली आहे. त्यासंदर्भात ३ फेब्रुवारी २०२१ रोजी ‘एनसीटीई ने महाराष्ट्राच्या शिक्षण सचिवांना पत्र पाठवून टीईटी परीक्षांची माहिती मागविली होती. आता २०२३-२४ या सत्रापासून ‘एनसीटीई ने शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी चारवर्षीय बी.एड.(आयटीईपी) अभ्यासक्रम सुरु केला आहे. त्यासाठी देशातील ४२ शिक्षण संस्थांना पहिल्या टप्प्यात मान्यताही देण्यात आली आहे. या प्रकारच्या बी.एड.चा अभ्यासक्रम केल्यानंतर विद्यार्थ्यांना लगेच ‘प्रशिक्षणार्थी शिक्षक’ म्हणून एखाद्या शाळेत कामही सुरु करता येईल, असे अभ्यासक्रम आराखड्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
  • मुलाचे बाबाही असतील सह-शिक्षक ! ■ शाळा आणि पालकांचे नाते अधिक घट्ट व्हावे, यासाठी पालकांना शाळेच्या उपक्रमांमध्ये सामील करण्याची सूचना अभ्यासक्रम आराखड्यात करण्यात आली आहे. केवळ पालक म्हणून नव्हे, तर सहशिक्षक (को-टीचर म्हणून त्यांना मुलांच्या वर्गातही उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार आहे. अशा पालकांची निवड करणे, त्यांच्या कामाच्या ठिकाणी शाळेतील मुलांना नेऊन त्या कामाची माहिती करून देणे अशा तरतुदी करण्यात आल्या आहेत.

Maha TET Exam 2023 Certificate now Digital. Last year, a serious scam came to light where over 10,000 candidates in the state obtained fake Teacher Eligibility Test (TET) certificates. Now to solve it permanently, the examination council has decided to give only ‘digital’ certificate to all the examinees. By scanning the QR code on these certificates, any third party can verify whether it is genuine or fake. Moreover, all these certificates will be available for all to see on the website of the examination council. The implementation of this new decision has been started from July 1. Read the complete details given below and keep visit us for the further updates of Shikshak Bharti 2023.

टीईटी प्रमाणपत्रांना ‘डिजिटल’ कुलूप – क्यूआर कोड स्कॅन करताच उघड होणार बनाव

राज्यातील दहा हजारांवर उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) बनावट प्रमाणपत्रे मिळविल्याचा गंभीर घोटाळा मागील वर्षी उघडकीस आला. त्यावर आता कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी परीक्षा परिषदेने सर्व परीक्षार्थ्यांना केवळ ‘डिजिटल’ प्रमाणपत्रच देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रमाणपत्रांवर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीला ते खरे की खोटे हे पडताळून पाहता येणार आहे. शिवाय, ही सर्वच्या सर्व प्रमाणपत्रे परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर सर्वांनाच पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत.
विशेष म्हणजे १ जुलैपासूनच या नव्या निर्णयाच्या अंमलबजावणीला प्रारंभही करण्यात आला आहे. २०१८ आणि २०१९ या सलग दोन वर्षांतील टीईटी परीक्षेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला. १० हजारांवर बोगस प्रमाणपत्रे दिली. त्यानंतर परिषदेला सर्वच उमेदवारांची प्रमाणपत्रे परत मागवून त्यांची पडताळणी करावी लागली. त्यानंतर बोगस प्रमाणपत्रधारकांची टीईटीतील संपादणूक रद्द करीत त्यांना पुढील सर्व परीक्षांसाठी अपात्र ठरविले गेले. परंतु, टीईटीसोबतच आरोग्य विभागाची भरती परीक्षा, पोलिस विभागाची भरती परीक्षा यातही घोटाळे पुढे आले. त्यामुळे बोगस प्रमाणपत्रांना पायबंद घालण्यासाठी परीक्षा परिषदेने उत्तीर्ण उमेदवारांचे प्रमाणपत्र व गुणपत्रक हे डिजिटल स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे.

टीईटीसोबतच याही परीक्षांसाठी डिजिटलचा निर्णय

■ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा, ऑनलाइन व मॅन्युअल टायपिंग, लघुलेखन परीक्षा, डीएड, एनटीएस, एनएमएमएस, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) तसेच विविध भरती परीक्षा घेतल्या जातात.
■ या सर्वच परीक्षांची प्रमाणपत्रे आणि गुणपत्रके आता डिजिटल रुपात मिळणार आहेत. परीक्षा परिषदेतर्फे फेब्रुवारीमध्ये टायपिंग व शॉर्टहॅन्डची (लघुलेखन) परीक्षा घेण्यात आली होती. त्यातील ६२ हजार ७०६ विद्यार्थ्यांना १ जुलै रोजी परीक्षा परिषदेने डिजिटल प्रमाणपत्र ऑनलाइन उपलब्ध आहेत.

यापुढे परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्वच परीक्षांचे प्रमाणपत्र डिजिटल स्वरुपात दिले जाईल. त्याची सुरुवात टायपिंग व लघुलेखनच्या विद्यार्थ्यांना डिजिटल प्रमाणपत्र देऊन करण्यात आली. पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, एनएमएमएस परीक्षा, डीएड व सर्वच परीक्षांचे प्रमाणपत्र डिजिटल असेल.
– शैलजा दराडे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद


Maha TET Exam 2024 Schedule Updates

Appeal to carry Maha TET Certificate – The Maharashtra Teacher Eligibility Test (TET) certificate conducted in November 2021 on behalf of the Maharashtra State Examination Council is being distributed from the Zilla Parishad and the education department has appealed to eligible students to carry this certificate. Maharashtra Teacher Eligibility Test (MAHA TET) was conducted on 21 November 2021. Paper no in this exam. One (Class – 1st to 5th) and paper no. The result of two (Class- 6th to 8th) has been declared online on the website of Maharashtra State Examination Council on 23 December 2022.

टीईटी प्रमाणपत्र घेऊन जाण्याचे आवाहन – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने नोव्हेंबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) प्रमाणपत्र जिल्हा परिषदेतून वितरित करण्यात येत असून पात्र विद्यार्थ्यांनी हे प्रमाणपत्र घेऊन जाण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे (MAHATET) आयोजन २१ नोव्हेंबर २०२१ रोजी करण्यात आले होते. या परीक्षेतील पेपर क्र. एक (इ.१ ली ते ५ वी) व पेपर क्र. दोनचा (इ. ६ वी ते ८ वी) निकाल २३ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.

Required Documents for Maha TET certificate

उमेदवारांनी खालील कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावे

  1. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा
  2. प्रवेशपत्र प्रत
  3. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रिका प्रत
  4. डी.टी.एड्. उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र अथवा बी. ए. उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक
  5. आरक्षण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र (असल्यास) दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र (असल्यास)
  6. माजी सैनिक असल्यास त्याबाबतचा पुरावा
  7. ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, निवडणूक ओळखपत्र)
  8. ताब्यात घेण्यासाठी उमेदवारांनी आपले शैक्षणिक, व्यावसायिक, आरक्षण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, अपंगत्वाचे प्रमाणपत्र आदी मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतीसह समक्ष उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले
  9. या परीक्षेमध्ये पात्र ठरलेल्या परीक्षार्थीची प्रमाणपत्रे वितरणासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात (प्राथमिक) ४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध असून हे प्रमाणपत्र आहे.

There is concern among teachers whether the planning of teacher eligibility Test (TET) in Maharashtra will change. The Teacher Eligibility Exam 2023 in the state is now upon us. But for this exam, the government has given a total time of only 20 to 22 days for all the procedures. This time is insufficient because there are different types of exams in many places in the state. So there is a concern in the teachers circle about a single candidate and how to give his four four exams. Read the complete details given below and keep visit us for the further updates of Shikshak Bharti 2023.

एकाच वेळी चार-चार परीक्षा देणे अशक्य; महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षांचे नियोजन बदलणार?

सध्या राजाच्या शिक्षक वर्तुळामध्ये धास्ती निर्माण झाली आहे. एकाच वेळी चार-चार परीक्षा देणे अशक्य असल्याचे उमेदवारांनी नमूद केले आहे. महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. उमेदवारांकडून नियोजन बदलण्यात यावे अशा मागण्या करण्यात येत आहेत. पदव्युत्तर तसेच डीएड, बीएड धारक यांच्या देखील परीक्षा असल्यामुळे अशी मागणी होत आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये डीटीएड, बीएड उमेदवारांच्या शिक्षक भरती परीक्षा पुढे ढकलण्याबाबत जोरदार मागणी होत आहे. त्याचे कारण असे की या संपूर्ण परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. यासाठी वेळ कमी आहे. त्याच दरम्यान राज्यातील डीएड, बीएड आणि सोलापूर विद्यापीठाच्या पदवी तसे पदव्युत्तर परीक्षा आहेत. त्यामुळे एकाच वेळेला याही परीक्षा त्याही परीक्षा असल्यामुळे सर्वांची अडचण होणार आहे. परिणामी शिक्षक वर्तुळातून याबाबतचे वेळापत्रक बदलण्याची मागणी होत आहे.

  • वेळ अपुरा पडणार : – राज्यामध्ये दरवर्षी शिक्षक पात्रता परीक्षा ज्याला संक्षिप्त नाव टेट (TET) असे म्हटले जाते. ती परीक्षा आता तोंडावर आलेली आहे. मात्र या परीक्षेसाठी शासनाने सर्व प्रक्रियांकरिता एकूण केवळ 20 ते 22 दिवसाचा वेळ दिलेला आहे. हा वेळ अपुरा आहे. त्याचे कारण राज्यातील अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या परीक्षा आहेत. त्यामुळे एकच उमेदवार आणि त्याच्या चार चार परीक्षा कशा द्यायच्या याची चिंता शिक्षक वर्तुळामध्ये आहे.
  • इतर विद्यापीठातही परीक्षा त्याच काळात : – राज्यातील सोलापूर विद्यापीठाच्या अंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा आहे. तसेच इतरही विद्यापीठातील विधीत परीक्षा आहे. त्याशिवाय डीएड आणि बीएडधारक यांच्या देखील परीक्षा याच कालावधीमध्ये होत आहेत. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये त्याच्या नियोजनामध्ये बदल करण्यासाठीची मागणी जोर धरत आहे.
  • शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रक्रियेसाठी वेळ अपूरा : – राज्यातील सोलापूर विद्यापीठाच्या अंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा आहे. तसेच इतरही विद्यापीठातील विधीत परीक्षा आहे. त्याशिवाय डीएड आणि बीएडधारक यांच्या देखील परीक्षा याच कालावधीमध्ये होत आहेत. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये त्याच्या नियोजनामध्ये बदल करण्यासाठीची मागणी जोर धरत आहे.
  • सगळ्यांची कसोटी लागली :- यासंदर्भात शिक्षक भारतीचे नेते सुभाष मोरे यांच्यासोबत ईटीवी भारत वतीने संवाद केला असता त्यांनी सांगितले की टेट साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाने जे काही नियोजन केलेले आहे. तो वेळ केवळ आठ दिवसांचा आहे. त्यामुळे सगळ्यांची कसोटी लागलेली आहे. परीक्षेच्या जाहीर सूचनांमध्ये जे उमेदवार आहे. त्यांच्या संख्येनुसार भौतिक सुविधांमध्ये बदलदेखील होऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर शासनाने वेळापत्रकात बदल केला. तर सर्वांना परीक्षा देता येईल.
  • एकच परीक्षा एका वेळेला :- ज्या उद्देशासाठी शिक्षक पात्रता परीक्षा आहे. तो उद्देश साध्य करायचा असेल तर राज्यातील शिक्षकांच्या संदर्भातील एकच परीक्षा एका वेळेला असायला हवी. एकाच वेळेला केंद्रीय विद्यालयांच्या शिक्षक भरतीची परीक्षा, डीएड बीएड धारकांची परीक्षा विविध विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा. त्यामुळे सर्व शिक्षक मंडळी धास्तावलेली आहे शासन या संदर्भात काय तोडगा काढत आहे ते येत्या एक-दोन दिवसात समजेल.

MAHA TET Exam 2023 https://mahatet.in/ – Education department announce the Maha TET Exam schedule. TET 2023 exam schedule will be announced on 31st January 2023 and the exam will begin at the end of February 2023. The recruitment of teachers will be started in the month of April-May 2023 after the examination is completed by 25th March 2023. Private schools will have to recruit teachers by interviewing ten persons (TET) for one post. On the other hand, the recruitment of teachers in schools of Zilla Parishad and other local bodies will be done on the basis of merit list. The ‘TET’ examination will be conducted online at nearly ten thousand centers of the companies ‘IBPS’ and ‘TCS’ appointed by the state government. Read the more details given below and keep visit us for the further updates of Shikshak Bharti 2023.

Maha TAIT Exam 2023- टेट’ परीक्षा ऑनलाईन लिंक उपलब्ध ; लगेच अर्ज करा

Shikshak Bharti तीन महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा




  1. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये सद्यस्थितीत ६७ हजारांवर पदे रिक्त आहेत. त्यातील ३४ हजार पदभरती जूनपूर्वी होणार आहे. तत्पूर्वी, परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ऑनलाइन ‘टेट’ घेतली जाणार आहे. पण, १५ दिवसांपूर्वीच निश्चित झालेले परीक्षेचे वेळापत्रक पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबणीवर पडले आहे. ३१ जानेवारीला वेळापत्रक जाहीर होऊन फेब्रुवारीअखेरीस परीक्षा सुरु होईल.
  2. पहिली ते बारावीच्या वर्गांव शिक्षक होण्यासाठी आता शालेय शिक्षण विभागाने शिक्षक क्षमता व अभियोग्यता चाचणी (टेट) उत्तीर्ण होण्याची अट घातली आहे. जिल्हा परिषद असो वा खासगी अनुदानित शाळांवरील नवीन शिक्षकांना त्याशिवाय मान्यताच दिली जात नाही. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा आता फेब्रुवारीअखेरीस घेतली जाणार आहे.
  3. २५ मार्चपर्यंत परीक्षा संपवून एप्रिल-मे महिन्यात शिक्षक भरतीला सुरवात केली जाणार आहे. खासगी शाळांना एका पदासाठी दहा जणांना (टेट) बोलावून त्यांच्या मुलाखतीतून शिक्षक भरती करावी लागणार आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांवरील शिक्षक भरती मेरिटनुसार होणार आहे. मात्र, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोकण व अमरावतीतील शिक्षक व पदवीधर आमदारकीच्या आचारसंहितेमुळे फेब्रुवारी होणाऱ्या ‘टेट’चे नियोजन १५ दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. तरीपण, मतदान झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होईल. त्यानंतर फेब्रुवारीअखेरीस परीक्षा सुरु होऊन मार्चअखेरीस संपेल आणि त्यानंतर काही दिवसांतच निकाल जाहीर होणार आहे.
  4. जेईई-सीईटीच्या धर्तीवर परीक्षा – ‘टेट’ परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात असून जेईई व सीईटीच्या धर्तीवर ‘टेट’ घेतली जाणार आहे. साधारणत: साडेतीन लाख परीक्षार्थी ही परीक्षा देतील असा अंदाज असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. दररोज आणि तीन सत्रातील पेपरसाठी प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या असणार आहेत.
  5. दररोज तीन सत्रात होतील पेपर – राज्य सरकारने नियुक्त केलेल्या ‘आयपीबीएस’ व ‘टीसीएस’ या कंपन्यांकडील जवळपास दहा हजार केंद्रांवर ‘टेट’ परीक्षा ऑनलाइन पार पडेल. परीक्षा केद्रांची यापूर्वीच निश्चिती झाली असून दररोज तीन सत्रात परीक्षा घेतली जाणार आहे. वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित प्रश्नपत्रिका असेल आणि पेपर सोडविण्यासाठी परीक्षार्थींना दोन तासांचा वेळ मिळेल. दररोज साधारणत: २५ ते ३५ हजार विद्यार्थी देतील, अशी व्यवस्था परीक्षा केंद्रांवर केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक जिल्ह्यात पेरीक्षेची केंद्रे असणार आहेत.

MAHATET Maharashtra Teacher Eligibility Test 2023

How to Fill Online Application Form

  1. Visit www.mahatet.in website.
  2. All the information related to MAHATET exam on the website, government decisions and circulars, exam plan and syllabus, schedule, terms and conditions for entering the exam, required certificates, exam fee and other information should be read carefully.
  3. After reviewing all the information, click on the “New Registration” button on the home page.
  4. Read the registration instructions carefully and click on the “New Registration” button only after clicking on the checkbox at the bottom of the instructions.
  5. Fill the information shown in the opened online registration form first name, father name, last name, date of birth (as per SSC certificate), mobile number and email id correctly.
  6. Login using the TET Registration ID and Password in the SMS received on the e-mail and mobile number mentioned in the registration form.
  7. Fill the information shown in the opened online application accurately, also upload your latest photograph and signature image. After filling the information correctly click on “Save & Preview” button.
  8. Make sure the information on the screen is correct. If you want to make some changes in the Preview, you can use the Edit button.
  9. If the filled information is confirmed, click on the Submit (Save and Preview) button. (No change can be made in the application form after payment of fee.)
  10. After going to the PAYMENT page, use the Confirm and Pay button to make online banking, credit/debit card etc.
  11. Fees have to be paid online. (Offline fee cannot be paid through currency.)
  12. After paying the fee, the applicant should take a print of the application form within the prescribed period and save it, for that, use the Preview / Print tab.
  13. Also, by clicking on the Transaction History tab, the transaction information can be seen.
  14. Keep a copy of the application form with you for your reference.

Maha TET Exam 2023

Maha TAIT Exam 2023 Time Table




Maha TET 2023 Question Paper Pattern and Format

Maha TET प्रश्नपत्रिका आराखडा व स्वरूप

शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर घेतली जाणार आहे.

  • प्राथमिक स्तर ( पेपर एक I) इ. १ ली ते इ. ५ वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
  • उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन II) इ. ६ वी ते इ. ८ वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
  • प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.

पेपर(१) (इ. १ ली ते इ. ५ वी – प्राथमिक स्तर)

एकूण गुण १५०  – कालावधी-२ तास ३० मिनिटे

अ.क्र. विषय (सर्व विषय अनिवार्य) गुण प्रश्न संख्या प्रश्न स्वरुप
बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र ३० ३० बहुपर्यायी
भाषा-१ ३० ३० बहुपर्यायी
भाषा-२ ३० ३० बहुपर्यायी
गणित ३० ३० बहुपर्यायी
परिसर अभ्यास ३० ३० बहुपर्यायी
एकूण १५० १५०

पेपर(१) (इ. १ ली ते इ. ५ वी)

अ. क्र. माध्यम पेपर सांकेतांक विभाग १ विभाग २ विभाग ३ विभाग ४ विभाग ५
भाषा (३० गुण) भाषा (३० गुण) बालमानसशास्र व अध्यापनशास्र (३० गुण) गणित (३० गुण) परिसर अभ्यास (३० गुण)
प्रश्न क्र.१ ते ३० प्रश्न क्र.३१ ते ६० प्रश्न क्र.६१ ते ९० प्रश्न क्र.९१ ते १२० प्रश्न क्र.१२१ ते १५०
मराठी १०१ इंग्रजी मराठी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
इंग्रजी २०१ इंग्रजी मराठी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
उर्दु ३०१ इंग्रजी किंवा मराठी उर्दु उर्दु व इंग्रजी उर्दु व इंग्रजी उर्दु व इंग्रजी
हिंदी ४०१ इंग्रजी किंवा मराठी हिंदी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
बंगाली ५०१ इंग्रजी किंवा मराठी बंगाली मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
कन्नड ६०१ इंग्रजी किंवा मराठी कन्नड मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
तेलुगु ७०१ इंग्रजी किंवा मराठी तेलुगु मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
गुजराती ८०१ इंग्रजी किंवा मराठी गुजराती मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
सिंधी ९०१ इंग्रजी किंवा मराठी सिंधी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी

पेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी – उच्च प्राथमिक स्तर)

एकूण गुण १५०  –  कालावधी-२ तास ३० मिनिटे

अ.क्र. विषय (सर्व विषय अनिवार्य) गुण प्रश्न संख्या प्रश्न स्वरुप
बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र ३० ३० बहुपर्यायी
भाषा-१ ३० ३० बहुपर्यायी
भाषा-२ ३० ३० बहुपर्यायी
अ) गणित व विज्ञान
किंवा
ब) सामाजिक शास्त्रे
६० ६० बहुपर्यायी
एकूण १५० १५०

पेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी)

अ. क्र. माध्यम पेपर सांकेतांक विभाग १ विभाग २ विभाग ३ विभाग ४
भाषा (३० गुण) भाषा (३० गुण) बालमानसशास्र व अध्यापनशास्र (३० गुण) गणित व विज्ञान (६० गुण) सामाजिक शास्र (६० गुण)
प्रश्न क्र.१ ते ३० प्रश्न क्र.३१ ते ६० प्रश्न क्र.६१ ते ९० प्रश्न क्र.९१ ते १५० प्रश्न क्र.९१ ते १५०
मराठी १०२ इंग्रजी मराठी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
इंग्रजी २०२ इंग्रजी मराठी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
उर्दु ३०२ इंग्रजी किंवा मराठी उर्दु उर्दु व इंग्रजी उर्दु व इंग्रजी उर्दु व इंग्रजी
हिंदी ४०२ इंग्रजी किंवा मराठी हिंदी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
बंगाली ५०२ इंग्रजी किंवा मराठी बंगाली मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
कन्नड ६०२ इंग्रजी किंवा मराठी कन्नड मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
तेलुगु ७०२ इंग्रजी किंवा मराठी तेलुगु मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
गुजराती ८०२ इंग्रजी किंवा मराठी गुजराती मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
सिंधी ९०२ इंग्रजी किंवा मराठी सिंधी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी

पेपर II मधील अ.क्र १ ते ३ विषय अनिवार्य आहेत. गणित व विज्ञान शिक्षकांसाठी विषय ४ मधील “अ” आणि सामाजिक शास्त्र शिक्षकांसाठी विषय ४ मधील “ब” व इतर शिक्षकांसाठी विषय क्र ४ मधील “अ” किंवा “ब” पैकी कोणताही एक विषय निवडता येईल.




Maha TET Exam 2023 Syllabus

पाठ्यक्रम (अभ्यासक्रम)

पेपर (१) (इ. १ ली ते इ. ५ वी – प्राथमिक स्तर)

१) भाषा-१ व २) भाषा-२

या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील.

भाषा-१ मराठी इंग्रजी उर्दु बंगाली / गुजराती / तेलुगू / सिंधी / कन्नड / हिंदी
भाषा-२ इंग्रजी मराठी मराठी किंवा इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी

इ. १ ली ते ५ वी असलेला अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील

३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-

या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ६ ते ११ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही सामावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.

या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारीत सध्या राज्यात सुरु असलेला विहित पाठ्यक्रम लागू राहील.

४) गणित :-

गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मुलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.

गणित विषयाची व्याप्ती इ. १ ली ते इ. ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल.

५) परिसर अभ्यास :-

परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मुलभूत संबोध व या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.

परिसर अभ्यासाची व्याप्ती इ. १ ली ते ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असेल. मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम-२०१२ मध्ये इ. १ ली व इ. २ री ला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही. परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पध्दतीने समाविष्ट केलेला आहे. इ ३ री ते इ. ५ वी चा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २००४ मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील.

काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता १ ली ते ५ वी च्या अभ्यासक्रमातील घटकावर, माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.

संदर्भ :-

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

संबंधित विषयांची राज्य शासनाची विहित केलेली प्रचलित इ. १ ली ते १० वी ची पाठ्यपुस्तके

पेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी – उच्च प्राथमिक स्तर)

१) भाषा-१ व २) भाषा-२

पाठ्यक्रमाची (Syllabus) व्याप्ती :-

या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील.

भाषा-१ मराठी इंग्रजी उर्दु बंगाली / गुजराती / तेलुगू / सिंधी / कन्नड / हिंदी
भाषा-२ इंग्रजी मराठी मराठी किंवा इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी

इ. ६ वी ते ८ वी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित भाषेचा पाठ्यक्रम लागू राहील.

३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-

या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ११ ते १४ वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही समावेश राहील. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.

या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व ११ ते १४ वयोगटाशी सबंधित प्रचलित बी. एड. अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारीत विहित केलेला व सध्या राज्यात सुरु असलेला पाठ्यक्रम लागू राहील.

४ अ) गणित व विज्ञान विषय गट :-

गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण ६० गुण असून त्यापैकी ३० गुण गणितासाठी व ३० गुण विज्ञानासाठी राहतील. या विषय स्तरातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मुलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबधीचे असतील.

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता ६ वी ते ८ वी चा पाठ्यक्रम लागू राहील.

४ ब) सामाजिक शास्त्रे विषय गट :-

सामाजिक शास्त्रासाठी एकूण ६० गुणांचे प्रश्न असतील. सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय व अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील.

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी च्या अभ्यासक्रमावर आधारीत संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील.

काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता ६ वी ते ८ वी चे अभ्यासक्रमातील घटकावर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.

संदर्भ :-

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी व पाठ्यक्रम

प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

प्रचलित संबंधित विषयांची राज्य शासनाने विहित केलेली प्रचलित इ. १ ली वी ते १२ वी ची पाठ्यपुस्तके

प्रचलित बी.एड्. अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

The Maharashtra State Examination Council will conduct the Teacher Eligibility Test (TET) next Sunday. Information in this regard has been given by Maharashtra State Examination Council. Examinations have been prepared and 1443 examination centers have been fixed. Health Department’s Group C and Group D exams, by-elections in Deglaur Assembly constituency had repeatedly postponed the exams. So, as there is a net exam on November 21, the question arose as to whether the exam would be postponed this time as well. However, the examination council has clarified that the TET examination will be held on the scheduled date.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने येत्या रविवारी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. परीक्षेची तायरी करण्यात आली असून 1443 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. आरोग्य विभागाची गट क आणि गट ड परीक्षा, देगलूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक यामुळं परीक्षा वारंवार लांबणीवर टाकण्यात आली होती. तर, 21 नोव्हेंबरला नेट परीक्षा असल्यानं यावेळी देखील परीक्षा लांबणीवर पडणार का असा प्रश्न निर्माण झाल होता. मात्र, परीक्षा परिषदेनं टीईटी परीक्षा ठरलेल्या तारखेलाचं होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

परीक्षेसासाठी यंत्रणा सज्ज

महाटीईटी परीक्षा 21 नोव्हेंबरला दोन सत्रात घेण्यात येणार आहे. टीईटी परीक्षेसाठी काही विद्यार्थी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 या दोन्हीसाठी अर्ज करतात. तर, काही विद्यार्थी एकाच पेपरला अर्ज करतात. दोन्ही पेपरसाठी 1 लाख 38 हजार 47 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची यंत्रणा सज्ज झालेली आहे. परीक्षेच्या आयोजनासाठी 1443 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत. तर, विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगीनमध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

नेट परीक्षा असूनही टीईटी होणारचं

आता टीईटी परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार हे स्पष्ट झालेलं आहे. यासाठीची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. दरम्यान, याच दिवशी युजीसीच्या नॅशनल टेस्टींग एजन्सीमार्फत सहायक प्राध्यापक भरतीसाठी घेण्यात येणारी नेट म्हणजे राष्ट्रीय पात्रता परीक्षा होणार आहे. नॅशनल टेस्टींग एजन्सीने (एनटीए) नेटचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. 20 ते 30 नोव्हेंबर व 1 ते 5 डिसेंबरदरम्यान ऑनलाईन विषयनिहाय ही परीक्षा होणार आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यानं काही विद्यार्थ्यांना कोणत्या तरी एका परीक्षेची निवड करावी लागणार आहे.

MAHA TET Exam Online Application Form – Date Extended




Government of Maharashtra are going to Conduct Examination is Maha TET Exam 2021 for the recruitment of teachers in the state of Maharashtra. Basically there are two levels in the Maharashtra TET 2021 Maha TET Registration date has been extended from 25th August 2021 to 5th September 2021..

Government of Maharashtra are going to Conduct Examination is Maha TET Exam 2021 for the recruitment of teachers in the state of Maharashtra. Basically there are two levels in the Maharashtra TET 2021.Online Application start from today. Applications can be filled till 25th August 2021


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Maha TET 2023 updates, time table, syllabus

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!