Mahatransco Bharti महापारेषणमधील रिक्त साडेचार हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा

Mahatransco Bharti 2021

The Maharashtra State Electricity Workers Federation (MSEWF) had been pursuing the issue since 2007 to rectify the imbalance in the promotion of Class I and Class IV in the Mahatransport Company formed after the split of the Maharashtra State Electricity Board. He has finally succeeded and the way has been cleared to fill the four and a half thousand vacancies in Mahapareshan.

महापारेषणचा सुधारित आकृतीबंध लागू झाला असून, नवीन हजरो रिक्त पदे भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटनिस कृष्णा भोयर यांनी दिली.

 

 कोपर्डे हवेली : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या विभाजनानंतर तयार झालेल्या महापारेषण कंपनीत वर्ग एक व वर्ग चार प्रवर्गातील आकृतीबंध पदोन्नतीमध्ये तयार झालेला असमतोल दूर करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर फेडरेशन संघटनेच्यावतीने २००७पासून सतत पाठपुरावा करण्यात आला होता. त्याला अखेर यश येऊन महापारेषणमधील रिक्त साडेचार हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दि. १५ जून रोजी प्रशासकीय पत्रानुसार साडेचार हजार तंत्रज्ञान नेमणूक वर्ग चारच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. 

 २०१७मध्ये सुधारित आकृतीबंध लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, काही कारणांमुळे त्याला काहींनी विरोध केला होता. त्यामुळे ही प्रक्रिया रखडली. ही प्रक्रिया सुरू होण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर फेडरेशन संघटनेने मुंबई येथे आंदोलन केले. त्यावेळी ऊर्जा सचिव, कंपनीचे संचालक व संघटनेचे नेते यांच्यात बैठक होऊन एप्रिल महिन्यात सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला. मे महिन्यात कंपनीचे अध्यक्ष नितीन राऊत यांनी तयार केलेल्या आकृतीबंधाला मान्यता दिली. मंगळवार, दि. १५ जून रोजी प्रशासकीय पत्रानुसार साडेचार हजार तंत्रज्ञान नेमणूक वर्ग चारच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे


Mahatransco Bharti 2021 For 8500 Posts expected

Updated 24.12.2020: Mahatransco released the Maha Bharti for Technical posts very soon. As per the latest news, Nitin Raut said the General Administration Department had pointed out a proposal to fill the vacancies for SEBC and the economically backward classes without filling up the remaining 23 percent.The issue was discussed at yesterday’s cabinet meeting. After that, Chief Minister Uddhav Thackeray has called a high-level meeting on Thursday evening on how to implement the appointment process against the backdrop of suspension of Maratha reservation.

महावितरणमधील ७५०० पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा

Mahapareshan Bharti 2021

Updated 24.12.2020: राज्य सरकारने मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गातंर्गत आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी एक नवी मागणी केली आहे. मराठा समाजासाठीच्या सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्ग (SEBC) एसईबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठीच्या एकूण 23 टक्के जागा न भरता अर्थात त्या रिक्त ठेवून उर्वरित पदांवर नियुक्त्या कराव्यात, असा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने आपल्या निदर्शनास आणून दिल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले.

कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर नियुक्ती प्रक्रिया कशी राबवायची याबद्दल एक उच्चस्तरीय बैठक राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी संध्याकाळी बोलावली आहे.

‘महापारेषणमध्ये तब्बल 8500 पदं रिक्त’

सध्या महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक यांच्या 7500 रिक्त पदांची व महानिर्मिती कंपनीमध्ये 500 रिक्त पदांची भरती प्रक्रिया रखडलेली असून महापारेषण कंपनीमध्ये 8500 पदे रिक्त आहेत.

सामान्य प्रशासन विभागाने 23 टक्के वगळून इतर घटकांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे लेखी आदेश वा सूचना दिल्यास ही प्रक्रिया राबविण्यात आपल्याला काहीही अडचणी येणार नाहीत. यापूर्वी या विषयावर झालेल्या चर्चेत मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी इतर समाजाच्या नियुक्तीला स्थगिती नसल्याने ती प्रक्रिया राबविता येईल असे मत व्यक्त केले होते. मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय उपस्थित करून नियुक्ती प्रक्रियेबाबत स्पष्टता मिळविण्याचा आणि सामान्य प्रशासन विभागाकडून आपल्याला अपेक्षित अनुमती मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांमधील रिक्त पदाची भरती प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्याने राज्यात भरती प्रक्रिया थांबविण्यात आलेली आहे.

सोर्स: टीव्ही 9 मराठी


Mahatransco released the Maha Bharti for Technical posts very soon. As per the latest news the MahaTransco wants to filled the 8500 vacant seats of Technical in this year. Official Advertisement published soon for 8500 posts. Candidates who are interested in this mega recruitment they should keep visit on our website

 खुशखबर… महापारेषणमध्ये 8,500 जागांची मेगाभरती, सरकारी नोकरीची मोठी संधी

 महापारेषणमध्ये तांत्रिक श्रेणीतील 8 हजार 500 पदांची ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. तांत्रिक संवर्गातील 6750 पदे व अभियंता संवर्गातील 1762 पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहे.

ऊर्जा विभागात महाभरती 

 मुंबई – कोरोनामुळे राज्यात गेल्या 8 महिन्यांपासून एकाही विभागात भरतीप्रक्रिया झाली नाही. मात्र, लॉकडाऊन संपुष्टात येत असल्याने हळूहळू विविध विभागात रिक्त पदांची भरती होणार असल्याचे दिसून येते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी डिसेंबरपर्यंत पोलीस भरती पूर्ण करण्याच्या सूचना विभागाला दिल्या आहेत. आता, ऊर्जामंत्री  यांनी महापारेषण कंपनीत तब्बल 8,500 जागांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे, नोकर भरतीकडे डोळे लावून बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Mahavitaran Recruitment 2021

महापारेषण मध्ये 8500 जागेची भरती लवकरच अपेक्षित

 महापारेषणमध्ये तांत्रिक श्रेणीतील 8 हजार 500 पदांची ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. तांत्रिक संवर्गातील 6750 पदे व अभियंता संवर्गातील 1762 पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहे. महापारेषण कंपनीतील ही रिक्त पदे भरण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी शुक्रवारी दिले आहेत. त्यामुळे राज्यात मेगा-भरतीचा मार्ग आता मोकळा झाल्याचे दिसून येत आहे. नव्याने होणाऱ्या या पदभरतीत आय.टी.आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर  नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय अभियांत्रिकी पदवीधारकांनाही नोकरीचीसंधी या भरतीद्वारे निर्माण होणार आहे.

 ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांच्या सूचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी ;पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केला. मंत्रालयात या विषयावर झालेल्या बैठकीत डॉ. राऊत यांनी ही पदभरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. सोबतच बक्षी समितीच्या शिफारशीनुसार पदांचा तुलनात्मक विचार करण्यात येऊन भरती प्रक्रिया राबविण्यात यावी व राज्य शासनास नवा मंजूर पदाचा आकृतीबंध सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले

 आयटीआय उत्तीर्ण तरुणांना या भरती प्रक्रियेमुळे सरकारी विभागात नोकरीची मोठी संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे, तरुणांनी भरती प्रक्रियेच्या तारखा आणि परीक्षेच्या अभ्यावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.


महापारेषण मध्ये २२०० जागेची भरती लवकरच अपेक्षित

Mahatransco Maha Bharti expected soon : Mahatransco released the Maha Bharti for Technician posts very soon. As per the latest news the MahaTransco wants to filled the 2200 vacant seats of Technician in this year. Official Advertisement published soon for 2200 posts. Candidates who are interested in this mega recruitment they should keep visit on our website and keep solve the practice paper which link is given here. More details regarding the Mahapareshan Bharti 2019-2020 are given below:

महापारेषणच्या २२०० तंत्रज्ञांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

महापारेषण कार्यालयातील २२०० तंत्रज्ञ श्रेणी चारमधील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. महापारेषणच्या नवीन आकृतीबंध आराखड्याला संचालक मंडळाने मान्यता दिली असून या बैठकीतील ठराव लवकरच समोर येणार आहे. यामुळे आगामी काही दिवसांत २२०० तंत्रज्ञ श्रेणी चारमधील कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञ श्रेणी तीनची पदोन्नती मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सचिव सय्यद जहिरोद्दीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापारेषण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या संबंधित विविध मागण्यांबाबत आंदोलन करण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला होता. १६ डिसेंबरपासून हे आंदोलन केले जाणार होते. मात्र, या आंदोलनापूर्वी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी संचालक सुगत गमरे यांची भेट घेतली. या भेटीत सुगत गमरे यांनी सांगितले की, बढती व सरळ भरती एकाच वेळी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच संघटनेने सुचविलेली यंत्र चालकांच्या पदांची कपात न करणे, ३७२ यंत्रचालकांना वरिष्ठ यंत्रचालक म्हणून मान्यता देणे, ४२ टेक्निशियनला हेड फोरमन करणे, अभियंत्यांच्या जागाही कमी न करण्याच्या मागण्या देण्यात आलेल्या आहेत. या मागण्यांबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची किंवा ठरावाची माहिती प्रशासनाला मिळणार आहे. सर्व पदोन्नती करण्यासाठी लवकरच पॅनल तयार करण्यात येणार आहे.

म.टा.

5 Comments
 1. Yogesh wankhede says

  8208833402

 2. Sachin Nikam says

  साहेब या भरती मध्ये वायरमन ट्रेड ला पण सहभागी करून घ्यावे ही नम्र विनंती🙏🙏🙏

 3. Patilumeshlaxman says

  Iti ilectrecian

 4. Ramesh Mohite says

  Ramesh yashwant mohite
  AT. पोस्ट sawntwadi, सिंधुदुर्ग, amboli

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!