महिला व बाल विकास विभागात विविध पदे 

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021

WCD Bharti 2021: Under the Integrated Child Development Scheme, services like nutrition and health improvement and pre-primary education are provided to children below the age of six years. The Department of Women and Child Development and the Department of Public Health work for this. The posts of Child Development Project Officer, Supervisor, Anganwadi Worker, Helper, Mini Anganwadi Worker in Nagpur district are largely vacant. In addition, there are always fluctuations in the number of malnourished children.

महिला व बालविकास विभागातील कंत्राटी पदांवर अनाथांना प्रथम संधी 

 महिला व बाल विकास विभागात विविध पदे

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021 – ग्रामीण भागातील बालक, किशोरवयीन मुली व गर्भवती मातांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम महिला व बाल विकास विभाग (WCD Nagpur Bharti 2021) करतो. परंतु या विभागाची नियोजन आणि पर्यवेक्षिय यंत्रणेत रिक्त पदांचा मोठा बॅकलॉग आहे. त्याचा फटका योजनांच्या अंमलबजावणीला बसतो आहे.

साडेसहा हजार अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरणार

एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत सहा वर्षांखालील मुलांचे पोषण व आरोग्य सुधारणे व पूर्व प्राथमिक शिक्षण आदी सेवा देण्यात येतात. यासाठी महिला व बालविकास विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा काम करते. जिल्ह्यात जवळपास २४२३ अंगणवाडी केंद्रातून ६ वर्षे वयोगटातील बालक, गरोदर माता व स्तनदा माता यांना सेवा पुरविण्यात येतात. आजच्या परिस्थितीत नागपूर जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यातच दिवसेंदिवस कुपोषित बालकांतील चढ-उतार कायमच आहे.

अधिकाऱ्यांचा कार्यभार प्रकल्पातील काही पर्यवेक्षिकांवर आहे. पर्यवेक्षिकाकडे त्यांच्या कार्यक्षेत्रातील व इतर क्षेत्रातीलही अंगणवाड्यांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य असून प्रकल्प कार्यालयाचेही काम आल्याने त्यांना अंगणवाडीवर नियंत्रण ठेवता येत नाही. शासन मोठ-मोठी उद्दिष्ट ठेवून कार्य करते. परंतु रिक्त पदांमुळे त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही.

संवर्गनिहाय रिक्तपदेसंवर्ग मंजूर पदे रिक्त पदे
बाल विकास प्रकल्प अधिकारी १३ ७
पर्यवेक्षिका ८७ ३१
अंगणवाडी सेविका २१६१ ७३
अंगणवाडी मदतनीस २१६१ १२८
मिनी अंगणवाडी सेविका २६४ ९

सौर्स: लोकमत

2 Comments
  1. Anjali Uttam Lokare says

    How to apply?

  2. युवराज बोर्डे says

    ही भरती प्रतेक जिल्हा वैज आहेका असेलतर कळवा

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!