राज्यात शिक्षकांच्या १०,२१३ जागा रिक्त – MCGM Shikshak Bharti 2023
MCGM Shikshak Bharti 2023
Brihnmumbai Mahanagarpalika Shikshak Bharti 2023
BMC Teachers Bharti 2023 – In the State there were 10 non-agricultural universities and 1,177 colleges of the state, as many as 10,213 posts are vacant in the last eight years in the recruitment of teachers in the mentioned categories of Exempt Castes (A), Nomadic Tribes (B, C, D), Special Backward Classes, Other Backward Classes and Economically Weaker. A shocking report has been submitted by the sub-committee of the State Backward Classes Commission to the government and the governor. Candidates Read the complete details given below on this page regarding the BMC Teachers Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
राज्यात शिक्षकांच्या १०,२१३ जागा रिक्त
- आरक्षित समाजातील जागा : – राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर – राज्यातील १० अकृषिक विद्यापीठे आणि १,१७७ महाविद्यालयांत मागील आठ वर्षांपासून शिक्षक पदभरतीत विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब, क, ड), विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल या नमूद प्रवर्गातील तब्बल १०, २१३ पदे रिक्त असल्याचा धक्कादायक अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाच्या उपसमितीने सरकार आणि राज्यपालांना सादर केला आहे.
- दहा विद्यापीठांमध्ये क्षेत्र पाहणी : – उपसमितीने दहा विद्यापीठांमध्ये सुनावणी व क्षेत्र पाहणी केली. संबंधित विद्यापीठाचे आरक्षण कक्ष, सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष व विभागीय सहसंचालक यांच्याकडून प्रमाणित माहिती घेतल्यानंतर उपसमितीने अहवाल तयार केला. तो राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी स्वीकारला असून संबंधित संवर्गातील पदभरतीचा अनुशेष दूर करण्यासाठी विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल, मुख्य सचिव यांच्याकडे सादर केला आहे.
- उपसमितीने १ ऑगस्ट २०१७ अखेरची विद्यार्थी संख्या ग्राह्य धरली. महाराष्ट्रातील १० अकृषिक विद्यापीठांतर्गत एकूण १,१७७ महाविद्यालयांतील ३४,४३९ पदे मंजूर असून या पदांपैकी १०,२१३ पदे रिक्त असल्याचा अहवाल दिला आहे. हा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने राज्यपालांसह सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करून या रिक्त पदभरतीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची शिफारस केली आहे. आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद हरिबा काळे व प्रा. डॉ. श्रीमती नीलिमा सरप (लखाडे) यांच्या उपसमितीने हा अहवाल तयार केला. राज्य सरकारच्या आदेशानुसार विद्यापीठ परिसर, संस्था अथवा महाविद्यालय एकक मानून १० अकृषिक विद्यापीठे व १,१७७ महाविद्यालयांतील विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती ( ब, क, ड ), विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल या प्रवर्गातील अनुशेषाचा आढावा घेतला.
MCGM Shikshak Bharti 2023 : – Mumbai Mahanagarpaltika Teachers Vacancies Details are given on this page. As per the latest news there are currently 810 vacant posts of Shikshak (Teachers) in the schools of MCGM – Brihanmumbai Municipal Corporation, so it is seen that there are not enough teachers available in many schools. As a result, students are suffering. Read More details regarding this news below on this page.
- BMC Schools Teacher Recruitment 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये पुरेसे शिक्षक उपलब्ध नसल्याचं दिसून येत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. कोरोना काळात एकूणच शिक्षणावर परिणाम झालेला असताना आता शिक्षकांच्या कमतरतेमुळे एक नवी समस्या बीएमसी शाळांमध्ये निर्माण झाल्याचं चित्र आहे.
- उपलब्ध आकडेवारीनुसार, या शाळांमध्ये सध्या शिक्षकांची 810 पदं रिक्त आहेत, असं `मिड-डे`च्या वृत्तात म्हटलं आहे. 810 ही संख्या एकूण रिक्त पदांच्या केवळ 11 टक्के एवढी आहे. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये तब्बल 259 जागा रिक्त आहेत. तसंच मुंबई पब्लिक स्कूलमध्ये (एमपीएस) 222 जागा रिक्त आहेत. `बीएमसी`ने तीन वर्षांपूर्वी शिक्षक भरतीतील चांगल्या उमेदवारांनी मूळ शिक्षण मराठी माध्यमातून घेतलं होतं या कारणामुळे नोकरी नाकारली होती त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.
- MCGM Bharti – मुंबई महापालिकेत तब्बल २३ हजार पदे रिक्त
- बृहन्मुंबई महानगरपालिका येथे नोकरीची संधी -नवीन जाहिरात प्रकाशित
MCGM Teachers Recruitment 2023
- या पूर्वी जुलै महिन्यात बीएमसीने कंत्राटी पद्धतीनं शिक्षकांची भरती केली होती. शिक्षकांच्या कमतरतेची झळ विद्यार्थ्यांना बसू नये म्हणून हा तात्पुरता उपाय करण्यात आला होता.
- कायमस्वरुपी नियुक्त्यांना वेळ लागू शकतो हे लक्षात घेऊन, आम्ही जुलैमध्ये एक परिपत्रक जारी करून कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्याचे आदेश दिले होते. या परिपत्रकात मुख्याध्यापकांना तासिका-वेतन आधारावर कंत्राटी पद्धतीनं शिक्षकांची नियुक्ती करण्यास परवानगी दिली होती, अशी माहिती `बीएमसी`चे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली.
- कंकाळ म्हणाले,“शिक्षकांना जाणं सोयीचं असलेल्या म्हणजे घराजवळच्या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या पुरेशी आहे असं लक्षात आल्यानंतर प्रत्येक शाळेला चांगले शिक्षक उपलब्ध व्हावेत म्हणून सर्व शाळांतील 20 टक्के पदं रिक्त ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला. गुजराथी आणि तमिळ माध्यमांच्या पालिका शाळांमध्ये (Civic Schools) पुरेसे शिक्षक कर्मचारी आहेत.
- ते पुढे म्हणाले, आम्हाला नुकतीच मुंबई येथील शालेय शिक्षण विभागाच्या उपसंचालकांकडून माध्यमिक शाळांमधून 550 अतिरिक्त शिक्षकांच्या बदलीची परवानगी मिळाली आहे. जर त्यांनी पालिका शाळांमधली रिक्त पदं भरली तर आम्हाला कंत्राटी शिक्षकांवर अवलंबून राहावं लागणार नाही आणि समस्या सुटेल. आम्ही शिक्षकांचा तुटवडा भरून काढण्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून (NGO) शिक्षकांची भरती करणार आहोत, असं त्यांनी सांगितले.
MCGM Shikshak Bharti 2023 : Latest updates regarding Teachers Bharti 2022 is that Teachers will be recruited for municipal schools through outsourcing. Teachers with BEd, D.Ed through English will be recruited through this medium. The teachers are to be appointed on emoluments by the agency through a trust. An average of 100 teachers will be appointed. Read More details about MCGM Shikshak Bharti 2023 is given below.
- Teachers Recruitment – शिक्षकांची भरतीसुद्धा MPSC मार्फत होणार?
- Shikshak Bharti बच्चू कडू – शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!
- Shikshak Bharti -राज्यात शिक्षण विभागात ३०४६ पदे रिक्त
- जिल्हा परिषद मार्फत 50 कंत्राटी शिक्षक पदांची भरती लवरकरच
- MPSC Bharti -महाराष्ट्र दुय्यम सेवागट ब मुख्य परीक्षा 2021 प्रवेश प्रमाणपत्र संदर्भात अपडेट
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने मराठी माध्यमासह इंग्रजी माध्यमाच्या आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळाही चालवल्या जातात. मात्र या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिवाय, कार्यरत असलेल्या शिक्षकांवरही अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे या शाळांसाठी आऊटसोर्सिंग पद्धतीने शिक्षकभरती करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. यासाठी निविदाही मागवण्यात आल्या आहेत.
- नवी मुंबई महापालिकेच्या वतीने पालिका हद्दीत पहिली ते दहावीपर्यंत मराठी माध्यमाच्या शाळा चालवल्या जातात. तिथे सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच, शहरात दोन सीबीएसई बोर्डाच्या तर तीन इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत.
- सीबीएसई बोर्डाची शाळा सीवूड आणि कोपरखैरणे सेक्टर १२ येथे आहे. तर, इंग्रजी माध्यमाची शाळा नेरूळमधील कुकशेत गाव आणि ऐरोलीतील काचेच्या शाळेत भरते. यावर्षी म्हणजे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून तुर्भे येथेही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली आहे.
- मात्र या शाळेमध्ये सध्या शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एकाच शिक्षकावर दोन वर्गांची जबाबदारी येत आहे. त्यामुळे शिक्षकही योग्य पद्धतीने प्रत्येक वर्गाला न्याय देऊ शकत नाहीत. त्यामुळे शिक्षकांची भरती करण्याची मागणी पालकांकडून केली जात होती.
- थेट भरती प्रक्रिया राबवण्यात बराच वेळ जाणार आहे. त्यामुळे त्यासाठी न थांबता मानधनावर शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळणे, हा मुख्य हेतू आहे, असे पालिकेने म्हटले आहे. त्यानुसार आता शिक्षण मंडळाने ही शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
Maharashtra Teachers Recruitment 2023
इंग्रजी माध्यमातून बीएड, डीएड असलेल्या शिक्षकांची या माध्यमातून नेमणूक केली जाणार आहे. मात्र ही भरती थेट केली जाणार नसून आऊटसोर्सिंग पद्धतीने केली जाणार आहे. एका ट्रस्टच्या माध्यमातून एजन्सीद्वारे शिक्षकांची मानधनावर नेमणूक केली जाणार आहे. सरासरी १०० शिक्षकांची नेमणूक केली जाणार असल्याची प्रतिक्रिया शिक्षण विभाग उपायुक्त जयदीप पवार यांनी दिली .
शिक्षक हा काही कामगार नाही. एक पिढी घडवण्याचे काम तो करत असतो. त्यामुळे शाळेत शिक्षकांची भरती थेट महापालिकेच्या माध्यमातूनच व्हायला हवी. मानधनावर किंवा कुठल्याही संस्थेच्या माध्यमातून आऊटसोर्सिंग पद्धतीने शिक्षकांची भरतीप्रक्रिया करू नये आणि शिक्षक या पदाचा अपमानही करू नये अशी प्रतिक्रिया शिक्षक प्रतिनिधी सिद्दराम शिलवंत यांनी दिली
MCGM Shikshak Bharti 2023 – Mumbai Mahanagarpalika Teachers Vacancies Details are given below. As per the latest news there are 20% vacancies of teachers in Marathi medium schools of MCGM. Mumbai Mahanagarpalika (BMC) has issued an order for adjustment of teachers on 4th July 2022. Due to this order, the posts of teachers in MCGM schools will remain vacant. Therefore, teachers have asked how to guarantee children’s right to education. A total of 7,223 teacher posts are required in the Municipal Corporation in Mumbai for Marathi 1369, Hindi 1895, Urdu 1876, Gujarati 110, Tamil 104, Telugu 29, Kannada 105 and English 980 and MPS ie 755 in Mumbai Public Schools. Read the complete details given below and keep visit us for the further updates.
मुंबई महानगरपालिका शिक्षक भरती अपडेट्स
MCGM Shikshak Bharti 2023
मुंबई महापालिका मराठी भाषिक शाळेत शिक्षकांच्या 20 टक्के जागा रिक्त. मुंबई महापालिकेने ४ जुलै २०२२ रोजी शिक्षकांचे समायोजन करण्याचा आदेश जारी केला आहे. या आदेशाने मनपा शाळेत शिक्षकांची जागा रिकामी होणार आहे. त्यामुळे बालकांना शिक्षणाच्या हक्काची हमी कशी मिळणार, असा सवाल शिक्षकांनी केला आहे.?
MCGM Shikshak Vacancy Details
- मराठी १३६९,
- हिंदी १८९५,
- उर्दू १८७६,
- गुजराती ११०,
- तामिळ १०४,
- तेलगू २९,
- कन्नड १०५
- इंग्रजी ९८०
- एमपीएस अर्थात मुंबई पब्लिक स्कुल मध्ये ७५५
- एकूण महापलिकेत ७,२२३ शिक्षक पदे आवश्यक आहेत.
उक्त आदेशात मराठीसाठी २० टक्के शिक्षकांची पदे रिकामी ठेवावीत. एमपीएस अर्थात मुंबई पब्लिक स्कुल मधील जिथे मनपा गाजावाजा करून इंग्रजीचे शिक्षण दर्जदार देते, असं सांगते. त्या शाळांमध्ये ३० टक्के शिक्षणाच्या जागा रिकाम्या ठेवा सांगत आहेत. तर मायबोली मराठीच्या शाळांमध्ये २० टक्के शिक्षकांची पदे रिकामी राहणार मग प्रश्न, असं उपस्थित होतो. एका मराठी शाळांमध्ये १० शिक्षक असतील तर २० टक्के प्रमाणाने त्यातील दोन शिक्षकांना दुसऱ्या कुठल्या तरी शाळेत पाठविले जाईल. मग या शाळेतील विद्यार्थ्यांना कोणी शिकवायचे?, असा तर्कसंगत सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे. तो दुर्लक्षित करता येण्याजोगा नाही.
- मुंबई महापालिकेने मराठी भाषिक शाळेत २० टक्के
- इंग्रजी भाषिक शाळेत ३० टक्के आणि
- कन्नड भाषिक शाळेत २५ टक्के शिक्षक पदे रिक्त ताज्या आदेशात म्हटले आहे.
MCGM महापालिकेने दिलेल्या माहितीमध्ये, यंदा सुमारे ३ लाख ५० हजार विद्यार्थी पटावर आहेत. आर टी ई नुसार एका तुकडीसाठी ३० विद्यार्थी एक शिक्षक असे प्रमाण नमूद केले आहे. त्यानुसार ३ लाख ५० हजार विद्यार्थी करिता ११,१६६ शिक्षकांची गरज महापालिकेला आहे. सध्या महापालिकेत कार्यरत शिक्षक संख्या ६४३५ इतकी आहे. पटसंख्या वाढल्याने शिक्षक भरतीची नितांत आवश्यकता असल्याने महापालिका यावर किती गांभीर्याने निर्णय घेते ते येत्या काळात समजेल.
MCGM Shikshak Bharti 2023 – 400 Posts: Brihanmumbai Municipal Education Department currently has more than 400 vacant posts in Marathi, Hindi and English medium schools of the municipality. Many teachers are on the verge of retirement by 2027. So there are likely to be hundreds of vacancies in the future. President Vijay Patil has demanded that teachers should be adjusted permanently. Read More details as given below.
बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या समायोजन कृती आराखड्यानुसार मनपाच्या मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सद्यस्थितीत सुमारे ४०० च्या वर पदे रिक्त आहेत. या पदांवर मुंबई महापालिकेच्या शाळांत खासगी अनुदानित शिक्षकांचे कायमस्वरूपी समायोजन करा, अशी मागणी जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेने पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे. २०२७ पर्यंत अनेक शिक्षक सेवानिवृत्तीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे भविष्यात शेकडो जागा रिक्त होण्याची शक्यता आहे.
अशातच मनपाच्या खासगी अनुदानित प्राथमिक शाळांतील शेकडो शिक्षक प्रतिवर्षी अतिरिक्त ठरत असल्याने भविष्यात ही संख्याही वाढणारी आहे. अशातच खासगी शाळांमध्ये प्रतिवर्षी रिक्त जागांचे प्रमाण अत्यल्प असल्याने सर्वच अतिरिक्त शिक्षकांचे अनुदानित शाळांमध्ये समायोजन होत नाही. परिणामी, अनेक अतिरिक्त शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात मनपाच्या विविध आस्थापनांवर समायोजित करण्यात येते. ही बाब जरी शिक्षकांच्या फायद्याची असली तरी हे समायोजन तात्पुरत्या स्वरूपातील असल्यामुळे शिक्षकांना दडपणाखालीच कार्यरत राहावे लागत असल्याने, अशा शिक्षकांचे कायमस्वरूपी समायोजन करा, अशी मागणी अध्यक्ष विजय पाटील यांनी केली आहे.
शिक्षक संघटनेची मागणी
मनपा खासगी अनुदानित प्राथमिक शाळांना मनपाकडून वेतन अनुदान दिले जाते. तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याला मनपाचा कर्मचारी सांकेतिक दिला जातो. वेळोवेळी वेतनवाढ व इतर काही भत्तेही दिले जातात. १२ मे २०१७ च्या परिपत्रकातील मुद्दा क्र. ११ मध्ये अशा शिक्षकांनी एका वर्षापेक्षा जास्त काळ मनपाच्या आस्थापनेवर काम केले आहे, अशा शिक्षकांना मनपाच्या सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करावा.
दरवर्षी मनपा शाळांमध्ये दीर्घकाळ रिक्त पदे राहणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान टळेल आणि मनपावरील आर्थिक भारही वाढणार नाही. तूर्तास तरी मनपाने घड्याळी तासिका शिक्षकांची नियुक्ती आणि पोर्टलद्वारे नवीन शिक्षक भरती न करता खासगी अनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षकांचे मनपा शाळेत कायमस्वरूपी समायोजन करून मनपा सेवेत कायम करावे.
– संदीप परब, सरचिटणीस, जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेना
MCGM Shikshak Bharti 2023 – 800 Posts: The number of teachers in Mumbai Municipal Corporation schools is low. Therefore, BMC has decided to fill 800 vacancies on contract basis. 800 vacancies of teachers in Mumbai Municipal Corporation schools will be filled on Clock Hour basis. Eligible candidates under the authority of the headmaster will be appointed after direct interview. Teachers will be paid Rs. 900 per day. The appointment will be for at least six months. Thereafter, extensions will be given as per the required. Other important details are given below:
- मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये रिक्त असणाऱ्या शिक्षकांच्या ८०० जागा तासिका पद्धतीने भरल्या जाणार आहेत. मुख्याध्यापकांच्या अधिकाराखाली पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीनंतर नियुक्ती केली जाणार आहे. याबाबतची प्रक्रिया आजपासून सुरू झाल्याची माहिती पालिका शिक्षण विभागाचे सहआयुक्त अजित कुंभार यांनी दिली.
- मुंबई महापालिका शाळांतील गळतीचे प्रमाण कमी झाले असून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे ८०० जागा कंत्राटी (तासिका) पद्धतीवर भरण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या जागा भरण्याचे अधिकार शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले असून संबंधित शाळांच्या नोटीस बोर्डवर शिक्षकांच्या नियुक्त्यांबाबत आवाहन केले जात आहे.
- सोमवारपासून याबाबतची प्रक्रिया सुरू झाली असून पात्र शिक्षकांना थेट मुलाखतीद्वारे तात्काळ नियुक्त केली जाणार आहे. तासिका पद्धतीवरील या नियुक्त्या असून प्रत्येक तासासाठी १५० रुपये मानधन दिले जाणार आहे. दिवसभरात सहा तास शिकवावे लागणार असून दररोज ९०० रुपये मानधन दिले जाणार आहे. त्यामुळे दरमहा २४ किंवा २५ दिवस काम केल्यास २२ ते २३ हजार रुपये शिक्षकांना मानधन दिले जाणार आहे. किमान सहा महिन्यांसाठी ही नियुक्ती असणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार मुदतवाढ दिली जाईल, असेही कुंभार यांनी सांगितले.
MCGM Shikshak Bharti 2023 : There are 800 vacancies for teachers in Mumbai Municipal Corporation. A total of 800 teaching posts are vacant in 8 medium schools of Mumbai Corporation School and in Mumbai Public School. Read More details as given below.
या महानगरपालिका मध्ये जवळपास शिक्षकांची 800 पदे रिक्त
मुंबई : चालू शैक्षणिक वर्षासाठी मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या समायोजनेसाठी कृती आराखडा जाहीर केला असून, पालिकेच्या ८ माध्यमांच्या शाळांमध्ये आणि मुंबई पब्लिक स्कूलमध्ये मिळून जवळपास -८00 शिक्षक पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.
BMC Shikshak Bharti 2023
मुंबईतील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सर्वाधिक म्हणजे २५९ पदे रिक्त असून समायोजनेच्या कार्यक्रमात ही २० टक्के पदे कायम रिक्त ठेवण्याचा निर्णय पालिका शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. मुंबईतील मराठी शाळा संपवण्याच्या दृष्टीने टाकण्यात आलेले हे आणखी पाऊल असल्याची टीका शिक्षक संघटना आणि मराठी भाषा प्रेमींकडून होत आहे.
एकीकडे सीबीएसई, आयसीएसई, आयबी मंडळाच्या शाळा उघडून आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना चांगलेव दर्जेदार शिक्षण देण्याचा दावा पालिका शिक्षण विभागाकडून केला जात असताना तेथे ३० टक्के कायमस्वरूपी पदे रिक्त ठेवून त्यांची फसवणूक केली जात असल्याचा दावा राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केला आहे.
MCGM Shikshak Recruitment 2023 – Vacancy Details
दुसरीकडे, मराठी शाळांमध्ये सर्वाधिक शिक्षक संख्या आवश्यक असूनही २० टक्के रिक्त पदे कायम ठेवून मराठी शाळा संपवण्याचा घाट घेतला जात असल्याचीही टीका त्यांनी केली आहे. मुंबईमध्ये सुरू केलेल्या खासगी मराठी प्राथमिक शाळांना १५ वर्षे अनुदान दिले जात नाही आणि मनपाने सुरू केलेल्या मराठी शाळांना शिक्षकच दिले जात नाहीत अशी परिस्थिती पालिका शिक्षण विभागात आहे. त्यामुळे मराठी शाळा टिकणार तरी कशा, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
Pre primary teacher vacancy
MCGM Bharti 2022 for Shikshak complete details are given here.
How to register for a job
shala list kuthe aahe
Post of primary teacher
सर कुटे mulakathi sati यायचा आहे