MEA Internship -पदवीधर उमेदवारांसाठी महत्वाची बातमी; परराष्ट्र मंत्रालया अंतर्गत इंटर्नशिप संधीं

MEA Internship 2022

MEA Internship 2022: This is important news for candidates looking for internship opportunities in Central Government Ministries. On the occasion of the 75th anniversary of Independence, the Ministry of External Affairs of the Government of India has started the first session of the MEA Internship Program this year under the Amrut Mahotsav of Independence. The duration of this internship will be from one to three months. Candidates will be given a stipend of Rs. 10,000 per month for this. Read More details as given below.

पदवीधर उमेदवारांसाठी महत्वाची बातमी; परराष्ट्र मंत्रालया अंतर्गत इंटर्नशिप संधीं

MEA Internship 2022: केंद्र सरकारच्या मंत्रालयांमध्ये इंटर्नशिप संधींच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्ताने भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (Ministry of Foreign Affairs) यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत एमईए इंटर्नशिप कार्यक्रमाचे (MEA Internship Program) पहिले सत्र सुरू केले आहे. मंत्रालयाच्या एमईए इंटर्नशिप धोरण २०२२ (MEA Internship Policy 2022) नुसार, उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सामान्य लोकांमध्ये आणि इतर हेतूंसाठी परराष्ट्र धोरणाची समज विकसित करण्यासाठी इंटर्न म्हणून काम करण्याची संधी दिली जाणार आहे. या इंटर्नशिपचा कालावधी एक ते तीन महिन्यांपर्यंत असेल. उमेदवारांना यासाठी दरमहा १० हजार रुपये स्टायपेंड दिला जाणार आहे.

MEA Internship 2022

MEA द्वारे इंटर्नशिप अंतर्गत ७५ रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार इंटर्नशिप पोर्टलची अधिकृत वेबसाइट internship.mea.gov.in वर उपलब्ध केलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया १ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून उमेदवारांना १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.

एमईए इंटर्नशिप २०२२ साठी पात्रता- IME Internship 2022- Eligibility Criteria 

मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतील कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार एमईए इंटर्नशिप २०२२ साठी अर्ज करता येणार आहे. पदवी पूर्ण करण्यासाठी इंटर्नशिप अनिवार्य असलेले अंतिम वर्षाचे पदवीधर विद्यार्थी देखील यासाठी अर्ज करू शकतात. इंटर्नशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३१ डिसेंबर रोजी २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

एमईए इंटर्नशिप २०२२ साठी निवड प्रक्रिया- Selection Process 

आलेल्या अर्जातून परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत इंटर्नशिपसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर, मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी १८ फेब्रुवारी रोजी इंटर्नशिप पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना २२ ते २४ फेब्रुवारी दरम्यान मुलाखतीसाठी बोलावले जाईल. यानंतर २८ फेब्रुवारी रोजी मंत्रालयाकडून निवडलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. या उमेदवारांची इंटर्नशिप १ एप्रिल २०२२ पासून सुरू होणार आहे. १५ फेब्रुवाारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

MEA इंटर्नशिपला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!