वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

Medical Exam 2020

वैद्यकीय (एमबीबीएस) आणि दंतवैद्यकीय (बीडीएस) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्रक्रियेत यंदा करण्यात आलेल्या बदलांनी विद्यार्थी गोंधळले आहेत. अखिल भारतीय कोटय़ातील पहिली फेरी झाल्यानंतर राज्याची गुणवत्ता यादी जाहीर होणार असल्यामुळे कोणत्या प्रक्रियेला प्राधान्य द्यायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल १६ ऑक्टोबरला जाहीर झाला. त्यानंतर देशपातळीवरील प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली. मात्र, राज्यातील प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही किंवा राज्याची गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात आली नाही. आता प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. गुणवत्ता यादी १३ नोव्हेंबरला जाहीर करण्यात येईल, तर पहिली प्रवेश यादी १५ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. राज्यातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असली तरी त्याच्या वेळापत्रकामुळे विद्यार्थी पेचात सापडले आहेत.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

*   प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी – १२ नोव्हेंबर, सायं. ५ वाजेपर्यंत

*   महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम देणे – ६ ते १३ नोव्हेंबर

*   पहिली गुणवत्ता यादी – १३ नोव्हेंबर, सकाळी ८

*   पहिली प्रवेश यादी – १५ नोव्हेंबर, सायंकाळी ५

*   पहिल्या यादीनुसार प्रवेश घेणे – २० नोव्हेंबर, सायंकाळी ५ वाजेपर्यंत

पेच काय?

यंदा नीटचा निकाल वाढल्यामुळे राज्याच्या यादीत नेमके स्थान कसे आहे याबाबत विद्यार्थ्यांमध्ये मुळातच गोंधळ आहे. महाविद्यालयांमध्ये राखीव असलेल्या १५ टक्के जागांवरील प्रवेश अखिल भारतीय कोटय़ातून करण्यात येतात. या कोटय़ाची प्रवेश यादी जाहीर झाल्यानंतर राज्याची गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे अखिल भारतीय कोटय़ातून प्रवेश घ्यायचा की राज्याच्या कोटय़ातून प्रवेश घ्यायचा याचा निर्णय घेता येणे शक्य नाही, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. राज्याने गुणवत्ता यादी अखिल भारतीय कोटय़ाच्या यादीपूर्वी जाहीर करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

महाविद्यालयांचे पर्याय भरण्यासाठी काही तास..

सध्याच्या वेळापत्रकानुसार १२ नोव्हेंबपर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज भरायचे आहेत, तर १३ नोव्हेंबरला रात्री १२ वाजेपर्यंत महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. राज्याची गुणवत्ता यादी १३ नोव्हेंबरला सकाळी जाहीर करण्यात येणार आहे. कोणत्या महाविद्यालयातील उपलब्ध जागा किती आहेत, राज्याच्या यादीतील स्थान काय आहे यानुसार कोणत्या महाविद्यालयाचे प्राधान्यक्रम द्यायचे याचा अंदाज विद्यार्थी घेतात. त्यानुसार गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही तासांत विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम द्यावे लागणार आहेत.

Maharashtra University of Health Sciences is preparing to conduct the final year examination of BDS from 17th August and the postgraduate medical examination from 25th August. However, as Karona’s condition is still critical in Maharashtra, including Mumbai, the university’s decision on the exam should be canceled or postponed immediately, a public interest petition was filed by Akash Rajput and some other students. It was done by Kuldeep Nikam.

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा परीक्षा १७ ऑगस्टपासून

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा १७ ऑगस्टपासून सुरू होत आहेत..

‘परीक्षेची तयारी पूर्ण झालेली असताना आणि इच्छुक विद्यार्थ्यांनी त्याकरिता तयारी केली असताना, या टप्प्यावर स्थगिती देऊन त्यांच्या हिताला बाधा पोहचवता येणार नाही’, असे निरीक्षण नोंदवून मेडिकल अभ्यासक्रमाच्या १७ ऑगस्टपासूनच्या परीक्षांना स्थगिती देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने बीडीएसच्या अंतिम वर्षाची परीक्षा १७ ऑगस्टपासून तर, पदव्युत्तर मेडिकलच्या परीक्षा २५ ऑगस्टपासून घेण्याची तयारी केली आहे. मात्र, मुंबईसह महाराष्ट्रात करोनाची स्थिती आजही गंभीर असल्याने परीक्षेचा विद्यापीठाचा निर्णय रद्द करावा किंवा तूर्तास त्याला स्थगिती द्यावी, अशा विनंतीची जनहित याचिका आकाश राजपूत व अन्य काही विद्यार्थ्यांनी अॅड. कुलदीप निकम यांच्यामार्फत केली होती.

‘परीक्षा घेण्यास आमचा विरोध नाही. मात्र, परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा देणे हे विद्यार्थ्यांसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे विद्यापीठाला ऑनलाइन परीक्षा घेण्याचे निर्देश द्यावेत’, अशी विनंती अॅड. निकम यांनी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे झालेल्या सुनावणीत केली.

तेव्हा विद्यापीठातर्फे अॅड. राजशेखर गोविलकर यांनी या विनंतीला तीव्र विरोध केला. ‘देशभरातील अभिमत विद्यापीठे व अन्य विद्यापीठांनी आधीच परीक्षा घेतल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील या विद्यार्थ्यांची परीक्षा होऊन त्यांना निकालपत्रे मिळाली नाही, तर करिअरच्या बाबतीत त्यांचे मोठे नुकसान होण्याचा धोका आहे. उच्च शिक्षण व विशेष शिक्षणात त्यांना अडचणी निर्माण होऊ शकतात. शिवाय पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा होऊन संबंधित विद्यार्थी पदवीधर होणेही सध्या गरजेचे असून करोनाविरुद्धच्या लढ्यात त्यांची मदत होईल. म्हणून या परीक्षा होणे गरजेचे आहे. विद्यापीठाने त्या संदर्भात सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. शिवाय हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयातही प्रलंबित आहे’, असे म्हणणे अॅड. गोविलकर यांनी मांडले.

दोन्ही बाजू ऐकल्यानंतर खंडपीठाने स्थगितीची विनंती फेटाळली. ‘परीक्षांच्या प्रश्नावर दोन्ही बाजूंनी विद्यार्थ्यांनी याचिका केल्या आहेत. त्यामुळे परीक्षेसाठी इच्छुक असलेल्या आणि तयारी केलेल्या विद्यार्थ्यांचा विचार न करता या टप्प्यावर संपूर्ण परीक्षा स्थगित करणे योग्य होणार नाही. ज्यांची परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा देण्याची तयारी नसेल त्यांनी परीक्षा न देण्यामागे ठोस कारणे भविष्यात मांडली आणि ती न्यायालयाला पटली, तर त्यांच्या बाबतीत स्वतंत्र परीक्षा घेण्याचे निर्देश न्यायालय देऊ शकते. त्यामुळे तूर्तास स्थगितीची विनंती फेटाळण्यात येत आहे’, असे खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले.

रुग्णांवर उपचार कसे करणार?

‘तुम्ही करोनाच्या भीतीमुळे परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा देण्यासाठी घाबरत असाल, तर मग रुग्णालयात रुग्णांवर उपचार तरी कसे करणार‌?’‌ असा प्रश्नही मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी याचिकादार विद्यार्थ्यांसमोर सुनावणीदरम्यान उपस्थित केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!