खुषखबर… म्हाडा लॉटरीला मुदतवाढ, १०० घरेही वाढली – Mhada Bharti 2024

Mhada Bharti 2024 Exam Fees

Good news… MHADA lottery extended, 100 houses also increased – The Pune board of the Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) had last month announced a lottery for houses in various income groups. However, as per the demand of the citizens, MHADA has extended the deadline for citizens to apply for houses. The number of houses in Pune and Pimpri-Chinchwad has also been increased by 100.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Applications for the lottery began on March 8 last month. The deadline for registration of online applications was 5 pm on April 8. Residents can now apply for housing until 11:59 p.m. on May 30. The MHADA Pune Board has appealed to the applicants to first visit the website http://www.mhada.gov.in https ://mhada.gov.in to fill the online application for the draw of lots of mhada houses, while they should register at the website lottery.mhada.gov.in for flats of schemes on ‘first come first priority’ basis.

म्हाडा लॉटरी स्कीम २०१४ – सविस्तर माहिती येथे पहा

खुषखबर… म्हाडा लॉटरीला मुदतवाढ, १०० घरेही वाढली

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने विविध उत्पन्न गटातील घरांसाठी गेल्या महिन्यात लॉटरी जाहीर केली होती. मात्र, नागरिकांच्या मागणीनुसार म्हाडाने नागरिकांना घरांसाठी अर्ज करण्याला मुदतवाढ दिली आहे. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांची संख्या १०० ने वाढविली आहे.

गेल्या महिन्यात ८ मार्चपासून या लॉटरीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली. ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत ८ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती. आता ३० मे रोजी रात्री ११:५९ पर्यंत नागरिकांना घरांसाठी अर्ज करता येणार आहेत. म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी प्रथम http://www.mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, तर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन म्हाडा पुणे मंडळाकडून करण्यात आले.

सोडतीचा तपशील योजना आणि सदनिका याप्रमाणे

  • म्हाडा योजनेंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य – २४१६
  • म्हाडाच्या विविध योजना – १८
  • म्हाडा पंतप्रधान आवास (पीएमएवाय) योजना – ५९
  • पंतप्रधान आवास (पीएमएवाय) खासगी भागीदारी योजना (पीपीपी) – ९७८
  • २० टक्के योजना पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड १४०६

As per the news in MHADA recruitment 2023, open category candidates had to pay a fee of Rs.1000 along with GST amount of Rs.180. Whereas candidates from other categories had to pay Rs 900 fee along with Rs 162 GST fee. The circular said that these candidates will now get the GST fee refunded and the additional fee will be refunded as per the rules of the government. This amount will be deposited in the candidate’s bank account.

म्हाडा अतिरिक्त शुल्क करणार परत – म्हाडा भरतीमध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी एक हजार रुपये शुल्काबरोबरच १८० रुपये जीएसटी रक्कम भरली होती. तर इतर प्रवर्गातील उमेदवारांनी ९०० रुपये शुल्काबरोबर १६२ रुपये जीएसटी शुल्क भरले होते. या उमेदवारांना आता जीएसटी शुल्क परत मिळणार असून, शासनाच्या नियमानुसार अतिरिक्त शुल्क परत करणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. उमेदवाराच्या बॅंक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे.


Mhada Bharti- Document Verification Round 2

Mhada Recruitment 2022- Mhada has recently released the dates for documents verification. Maharashtra Housing and Regional Development Authority (MHADA) invited Eligible candidates for documents verification for the posts of Assistant, Civil Engineer Assistant, Junior Clerk cum Typist, Senior Clerk, Steno Typist Posts on 22nd November 2022  at mentioned address along with all essential documents and certificates.

Assistant Posts 2nd Phase DV List Click Here

Civil Engineer Assistant 2nd Phase DV List: Click Here

Junior Clerk cum Typist 2nd Phase DV List: Click Here

Senior Clerk Posts 2nd Phase DV List: Click Here

Steno-Typist Documents Verification Round Two List: Click Here


Mhada Bharti 2022 Update: Appointment letters will be given to 421 people through MHADA. The successful candidates in the final selection list will be given appointment letters by Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis on November 3.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सरळ सेवा भरती २०२१ मधील पात्र, नियुक्त उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील ४२१ जणांना सेवेत रुजू करण्यात येणार आहे. यासाठीच्या नियुक्ती पत्राचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ही पत्रे वितरित करण्यात येणार आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्याप्रमाणे तरुणांना/उमेदवारांना नियुक्ती पत्र वितरित करण्यात आले त्याप्रमाणे म्हाडा भरती परीक्षेतील ५३३ पैकी ९ संवर्गातील ४२१ पात्र उमेदवारांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्याचा घाट घालण्यात आला आहे. दरम्यान, म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी कार्यक्रम होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र अधिक माहिती देणे टाळले.


Mhada Recruitment 2022- Mhada has recently released Selection and Waiting List for the posts of Assistant Engineer, Assistant, Deputy Engineer and various Posts. Online examination was conducted between January 31 to February 9 for 565 posts in various cadres in MHADA Authority. Mhada has recently released the list of various Posts. Applicants who applied for these posts may check their selection and waiting list from the given link.

Mhada Bharti 2022


Mhada Recruitment 2022- Mhada has recently released the dates for documents verification. Maharashtra Housing and Regional Development Authority (MHADA) invited Eligible candidates for documents verification for the posts of Assistant Legal Adviser, Property Manager / Administrative Officer, Assistant Architect, Civil Engineering Assistant, Surveyor, Tracer, Shorthand Writer Assistant, Senior Clerk, Junior Clerk.  Eligible applicants present for document Verification for Assistant Legal Adviser, Property Manager / Administrative Officer, Assistant Architect, Civil Engineering Assistant, Surveyor, Tracer, Shorthand Writer Assistant Posts on 9th and 10th June 2022 and For Assistant, Senior Clerk and Junior Clerk Posts applicants need to present on 14th June to 17th June 2022 at mentioned address alogn with all essential documents and certificates.

नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण मध्ये या रिक्त पदांची भरती-नवीन जाहिरात प्रकाशित

Pune Mhada Lottery 2022 Online Registration

म्हाडा  सरळ सेवा भरती २०२१ कागदपत्रांची पडताळणी

  1. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे म्हाडा  सरळ सेवा भरती-२०२१ अंतर्गत आयोजित ऑनलाईन परीक्षेतील यशस्वी उमेदवारांची कागदपत्र पडताळणीकरिता संवर्गनिहाय सूची म्हाडाच्या  संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे दुसऱ्या टप्प्याअंतर्गत सदर जाहीर सूचीतील सहायक विधी सल्लागार, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी, सहायक वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, भूमापक, अनुरेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी दिनांक ०९ जून व १० जून, २०२२ या दोन दिवसांच्या कालावधीत म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात केली जाणार आहे.
  2. तसेच कागदपत्र पडताळणीच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत सहायक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक या संवर्गातील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी दिनांक १४ जून ते १७ जून, २०२२ या चार दिवसांच्या कालावधीत म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात केली जाणार आहे. कागदपत्र पडताळणीच्या सूचीमध्ये नाव असलेल्या सहायक विधी सल्लागार, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी, सहायक वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, भूमापक, अनुरेखक, लघुटंकलेखक सहायक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक या  संवर्गातील यशस्वी उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी विहित केलेल्या दिवशी कक्ष क्रमांक २१५, पहिला मजला, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, गृहनिर्माण भवन, वांद्रे पूर्व, मुंबई येथे उपस्थित राहावे, असे आवाहनही म्हाडा प्रशासनाने केले आहे.
  3.  वरील नमूद संवर्गातील सूचीमध्ये एकापेक्षा जास्त संवर्गाच्या सूचीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांनी एकाचवेळी कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करावीत, असे आवाहन ‘म्हाडा’चे सचिव राजकुमार सागर यांनी केले आहे.;सरळ सेवा भरतीतील यशस्वी उमेदवारांची कागदपत्र पडताळणीसाठीचे संवर्गनिहाय वेळापत्रक म्हाडाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले असून यशस्वी उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे

Mhada Bharti

DOCUMENT VERIFICATION FOR CLERICAL CADRE(14th June to 17th June)

DOCUMENT VERIFICATION FOR OTHER POSTS (9th June to 10th June)


Mhada Bharti 2022 Required Documents List is given here for those who are invited for document verification on 6th June and 7 June 2022. See the below given list and keep ready all relevant documents with us while attending interview. Read the complete details given here and keep visit us for the further updates.

Mhada Bharti Required Documents List

Mhada Recruitment 2022: Maharashtra Housing and Regional Development Authority (MHADA) invited candidates for documents verification which is conduct on 6th and 7th June at the given address. Applicants who applied for Executive Engineer, Deputy Engineer, Assistant Engineer and Junior Engineer may attend for documents verification along with all essential documents and certificates. More details about Mhada Recruitment 2022 Document verification are given below.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (MHADA) सरळ सेवा भरती-2021 अंतर्गत आयोजित ऑनलाईन परीक्षेतील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीकरिता संवर्गनिहाय सूची म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून पहिल्या टप्प्याअंतर्गत कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता तसेच कनिष्ठ अभियंता या संवर्गातील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी 6 व 7 जून 2022 या दोन दिवसांच्या कालावधीत म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात केली जाणार आहे.

म्हाडा भरती परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी आणि कागतपत्र पडताळणी शेड्युल

Mhada Recruitment Exam Selected Candidate Lists:

  1. सहाय्यक अभियंता (स्थापत्य)
  2. सहाय्यक
  3. सहाय्यक विधी सल्लागार
  4. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
  5. उपअभियंता (स्थापत्य)
  6. मिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी
  7. कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
  8. कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक
  9. कनिष्ठ लिपिक – टंकलेखक
  10. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  11. वरिष्ठ लिपिक
  12. लघुटंकलेखक
  13. भूमापक
  14. अनुरेखक

म्हाडा भरती परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी आणि कागतपत्र पडताळणी शेड्युल

  • भरती प्रक्रियेअंतर्गत उर्वरित संवर्गातील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी  टप्प्याटप्प्याने बोलावण्यात येणार असून संबंधित यशस्वी उमेदवारांनी म्हाडाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन म्हाडा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
  • कागदपत्र पडताळणीच्या सूचीमध्ये नाव असलेल्या कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता तसेच कनिष्ठ अभियंता या संवर्गातील यशस्वी उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी कक्ष क्रमांक 215, पहिला मजला, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, गृहनिर्माण भवन, वांद्रे पूर्व, मुंबई येथे उपस्थित राहावे, असे आवाहनही  म्हाडा प्रशासनाने केले आहे.
  • म्हाडाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले यांनी जाहीर केलेल्या पत्रात ही माहिती देण्यात आली आहे. 6 जून रोजी पहिल्या सत्रात सकाळी 10 वाजता कार्यकारी अभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 1 ते 10 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे.
  • तसेच याच वेळेत उपअभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 1 ते 14 उमेदवार, तसेच सहायक अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 1 ते 24 उमेदवार, कनिष्ठ अभियंता संवर्गातील उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 1 ते 75 उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
  • तसेच दुसऱ्या सत्रात दुपारी 2 वाजता कार्यकारी अभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 11 ते 20 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार असून याच वेळेत  उपअभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 15 ते 27 उमेदवार, सहायक अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 25 ते 48, कनिष्ठ अभियंता संवर्गातील उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 76 ते 150 उमेदवार यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
  • 7 जून रोजी सकाळी 10 वाजता कार्यकारी अभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 21 ते 30 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. याच सत्रात उपअभियंता संवर्गातील उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 28 ते 41 उमेदवार, सहायक अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 49 ते 72 उमेदवार, कनिष्ठ अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 151 ते 225 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
  • तसेच दुसऱ्या सत्रात दुपारी 2 वाजता कार्यकारी अभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 31 ते 40 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. तसेच याच वेळेत उपअभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 42 ते 54 उमेदवार, सहायक अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 73 ते 95 उमेदवार, कनिष्ठ अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 226 ते 297 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
  • कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता या संवर्गातील सूचीमध्ये एकापेक्षा जास्त संवर्गाच्या सूचीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांनी एकाचवेळी कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करावीत, असे आवाहन म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी केले आहे

CHECK NMAE FOR  FOR DOCUMENT VERTIFICATION


  1. The state government had announced that the examination fee would be refunded immediately after the cancellation of the MHADA’s 565 vacancies in December. Finally, after four and a half months, MHADA has started refunding the examination fees and one lakh two thousand candidates have been relieved.
  2. म्हाडा’च्या ५६५ रिक्त पदांसाठी डिसेंबरमध्ये घेण्यात येणारी परीक्षा रद्द केल्यानंतर तात्काळ परीक्षार्थीचे परीक्षा शुल्क परत करण्यात येईल, असे राज्य सरकारने जाहीर केले होते. अखेर साडेचार महिन्यांनंतर ‘म्हाडा’ने परीक्षा शुल्क परत करण्यास सुरुवात केली असून एक लाख दोन हजार परीक्षार्थीना दिलासा मिळाला आहे.
  3. म्हाडा’मधील ५६५ पदांसाठी सुमारे अडीच लाख अर्ज दाखल झाले होते. या भरतीसाठीच्या परीक्षेला सुरुवात होण्यासाठी काही तास शिल्लक असतानाच अचानक परीक्षा रद्द करण्यात आली होती. परीक्षेत गैरप्रकार करण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर आणि त्यापुढे झालेल्या पोलीस कारवाईनंतर परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. अचानक परीक्षा रद्द झाल्याने त्याचा त्रास परीक्षार्थीना झाला. त्यामुळे नुकसानभरपाई म्हणून परीक्षार्थीचे परीक्षा शुल्क परत करण्याची घोषणाही त्यावेळी करण्यात आली. मात्र या घोषणेची अंमलबजावणी आतापर्यंत झाली नव्हती. आता मात्र ‘म्हाडा’ने शुल्क परतावा करण्यास सुरुवात केली आहे. परीक्षार्थीच्या बँक खात्यात याप्रमाणे रक्कम जमा केली जात आहे.
  4. परताव्याची रक्कम ३.६४ कोटी ‘म्हाडा’चे सचिव राजकुमार सागर यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व परीक्षार्थीना शुल्क परतावा केला जात नसून परीक्षा रद्द झाल्यानंतर पहिल्या दिवशी ज्यांची परीक्षा होती, त्यांनाच शुल्क परत करण्यात येत आहे. या परीक्षार्थीची संख्या एक लाख दोन हजार आहे. परताव्याची एकूण रक्कम तीन कोटी ६४ लाख रुपये आहे.
  5. म्हाडा’च्या ५६५ रिक्त पदांसाठी डिसेंबरमध्ये घेण्यात येणारी परीक्षा रद्द केल्यानंतर तात्काळ परीक्षार्थीचे परीक्षा शुल्क परत करण्यात येईल, असे राज्य सरकारने जाहीर केले होते

Mhada Exam Results 2022

Maharashtra Housing and Regional Development Authority (MHADA) has announced the results of the direct service recruitment test. The results of three candidates who misbehaved in the examination have been withheld. To make the recruitment process transparent, MHADA has decided to check the examination log details of all the candidates who are called for document verification. Based on that, the behavior of the candidates will be checked

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) घेण्यात आलेल्या सरळसेवा भरती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या तीन उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत. भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी म्हाडाने कागदपत्र तपासणीकरिता बोलावण्यात येणाऱ्या सर्व उमेदवारांच्या परीक्षेचे लॉग डिटेल्स तपासण्याचा निर्णय घेतला आहे. त्या आधारे उमेदवारांची वर्तणूक तपासली जाणार आहे. संशयास्पद उमेदवारांची चौकशी करण्याचा निर्णयही म्हाडाने घेतला आहे.

म्हाडा प्राधिकरणामधील विविध संवर्गांतील ५६५ पदांसाठी ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारीदरम्यान ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. त्याचा निकाल म्हाडाने जाहीर केला आहे. भरतीमध्ये कोणत्याही गैरप्रकाराबाबत म्हाडाने असहिष्णू धोरण अवलंबिले आहे. त्यानुसार परीक्षेच्या वेळी गैरप्रकार केलेल्या उमेदवारांविरोधात कायदेशीर कारवाई केली गेली आहे. तपासात ज्या उमेदवारांची नावे समोर येत आहेत त्यांची माहिती पोलिसांना पुरवण्यात येत आहे.

कागदपत्र तपासणीकरता येणाऱ्या उमेदवारांची छायाचित्रे आणि दोन्ही हातांचे ठसे घेण्यात येईल. अर्ज भरताना अपलोड करण्यात आलेले आणि परीक्षा केंद्रावर काढलेले छायाचित्र व स्वाक्षरी जुळवून पाहण्यात येणार आहे. छायाचित्र-स्वाक्षरी जुळत नसेल तर अशा उमेदवारास संशयास्पद यादीत ठेवून चौकशी करण्यात येणार आहे. अशाच प्रकारची कार्यवाही उमेदवार प्रत्यक्ष रुजू होण्याकरिता येईल त्या वेळीही करण्यात येणार आहे.

उमेदवारांनी सहकार्य करावे
गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या उमेदवारांना योग्य ती शिक्षा व्हावी. गुणवान उमेदवारांवर अन्याय होऊ नये याकरिता अशी कार्यवाही करण्यात येणार आहे. उमेदवारांनी म्हाडा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी केले आहे.


Maharashtra Housing and Regional Development Authority i.e. MHADA has published results for the posts of Executive Engineer [Architecture], Deputy Engineer [Architecture], Administrative Officer, Assistant Engineer [Architecture], Assistant Legal Advisor, Junior Engineer [Architecture], Junior Architect Assistant, Architectural Engineering Assistant, Assistant, Senior Clerk, Junior Clerk, Shorthand Writer, Surveyor , Tracer. Its examination was condcuted from 29th January to 9th February 2022. Applicants who applied for these posts may check their results form the given link.


Mhada Recruitment 2022: The government has decided to suspend the panel of OMR vendor companies considering the loss of candidates due to paperfooty. The General Administration Department has issued a ruling in this regard on January 18, 2022 and has decided to conduct the next examination through TCS, IBPS and MKCL.

सरळ सेवा भरती परीक्षा आता IBPS, TCS आणि MKCL मार्फत

पेपरफुटीमुळे उमेदवारांचे होणारे नुकसान लक्षात घेत शासनाने ओएमआर व्हेंडर कंपन्यांचे पॅनल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय १८ जानेवारी २०२२ रोजी निर्गमित केला असून यापुढील परिक्षा ह्या टीसीएस, आयबीपीएस व एमकेसीएल यांच्यामार्फत घेण्याचा निर्णय घेतला आहे

राज्यातील  म्हाडा परिक्षा प्राधिकरणातील तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील सरळसेवा भरती परिक्षा पेपर फुटल्याने शेकडो उमेदवारांचे मोठे नुकसान झाले. या परिक्षा घेणाऱ्या संस्था एका विशिष्ट मानसिकतेच्या होत्या व त्या संस्थांमध्ये भ्रष्टाचार होत होता अशा संस्थांना ब्लॅकलिस्ट करावे व शासकीय भरती प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून राबवावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानसभेत केली

या परीक्षा ३१ जानेवारी २०२२ ते ९ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत टीसीएस कंपनीमार्फत ऑनलाईन घेण्यात आल्या आहेत. पेपरफुटीमुळे उमेदवारांचे होणारे नुकसान लक्षात घेत शासनाने ओएमआर व्हेंडर कंपन्यांचे पॅनल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय १८ जानेवारी २०२२ रोजी निर्गमित केला असून यापुढील परिक्षा ह्या टीसीएस, आयबीपीएस व एमकेसीएल यांच्यामार्फत घेण्याचा निर्णय घेतला आहे.


Mhada Exam 2022 Results

Mhada Exam Results

For Maharashtra Housing and Regional Development Authority i.e. MHADA 936 candidates has enroll their Objection. As Per Below Notice Mhada Result can be Published in Second Week Of March. Candidates can visit our page for regular update.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) घेण्यात आलेल्या सरळसेवा भरती परीक्षेचा निकाल मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षा दिलेल्या सुमारे ९३६ उमेदवारांनी प्रश्न आणि उत्तराबाबत हरकती नोंदविल्या आहेत. उमेदवारांच्या तक्रारींचे निरसन होताच निकाल जाहीर करण्यात येईल, असे म्हाडातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

म्हाडाच्या ९३६ उमेदवारांनी हरकती नोंदवल्या आहेत. खालील सूचनेनुसार म्हाडाचा निकाल मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात प्रकाशित केला जाऊ शकतो. 

म्हाडा प्राधिकरणातील ५६५ पदांसाठी सरळ सेवा परीक्षा घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्याने पेपर फोडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस येताच प्रशासनाने परीक्षा पुढे ढकलली होती. त्यानंतर म्हाडाने परीक्षेसाठी टीसीएस कंपनीची नेमणूक केली. परीक्षेसाठी दोन लाख ७४ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी दोन लाख ५८ हजार उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरले होते. म्हाडामार्फत ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत एक लाख ८० हजार उमेदवारांनी सहभाग घेतला. परीक्षार्थींना लिहिलेले उत्तर किंवा प्रश्नपत्रिकेतील उत्तरांचे पर्याय याबाबत आक्षेप नोंदविण्यासाठी १५ फेब्रुवारी रात्री ११.५९ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत ९३६ उमेदवारांनी आक्षेप नोंदवले आहेत. त्यांच्या हरकती तज्ज्ञांकडे पाठविण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून उत्तर मिळताच याचा अहवाल म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी मांडण्यात येणार आहे. त्यांच्याकडून मान्यता मिळताच आरक्षणानुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता म्हाडा अधिकाऱ्याने व्यक्त केली.


Mhada Exam 2023 Answer key

Mhada Recruitment 2023 Examine Paper and Answer key link will be send to candidates on 10th February 2022. Candidates has to check their Email ID for that particular link. All Question paper and their Answer Key will be available their. Objection Window will be open from 11th February 2022 to 15th February 2022. Candidates who having any problem or query regarding the Question Paper and Answer key they can submit the fees and their objection regarding any question. Read the below given details carefully.

उत्तर तालिकेवर आक्षेप नोंदवण्याची संधी

म्हाडाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेसंबंधी, त्यांनी दिलेले उत्तर किंवा प्रश्नपत्रिकेतील उत्तरांचे पर्याय याबाबत काही आक्षेप असतील 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान नोंदवता येतील. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mhada.gov.in) दिलेल्या लिंकद्वारे निश्चित केलेले शुल्क भरून आक्षेप (Objection) नोंदविता येतील. एका प्रश्नपत्रिके संबंधी आक्षेपाकरीता उमेदवारांना पाचशे रुपये एवढे शुल्क भरावे लागेल.

या थेट लिंक व्दारे आक्षेप नोंदवा 


Mhada Recruitment 2023 Examine Paper and Answer key link will be send to candidates on 10th February 2022. Candidates has to check their Email ID for that particular link. All Question paper and their Answer Key will be available their. Objection Window will be open from 11th February 2022 to 15th February 2022. Candidates who having any problem or query regarding the Question Paper and Answer key they can submit the fees and their objection regarding any question. Read the below given details carefully.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाकडून (Mhada) आयोजित करण्यात आलेली विविध पदांसाठीची ऑनलाईन परीक्षा पार पडलीय. म्हाडाकडील पदभरती (Mhada Recruitment 2021) ही सरळसेवा पद्धतीनं राबवली जात आहे. म्हाडामध्ये एकूण 565 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. आफलाईन परीक्षेत गैरप्रकार होण्याची शक्यता असल्यानं म्हाडानं त्यानंतर परीक्षा आयोजन करण्यासाठी टीसीएसची मदत घेत परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेतली. 31 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 3, 7 , 8 ,9 फेब्रुवारी या 7 दिवशी परीक्षांचं आयोजन करण्यात आलं आहे. म्हाडाकडून आता उत्तरतालिकेविषयी महत्त्वाची माहिती कळवली आहे. म्हाडा सरळसेवा भरतीची परीक्षा दिलेल्या उमदेवारांना उत्तरतालिका (Mhada Recruitment exam Answer Key) आजपासून पाहायला मिळतील. म्हाडाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेसंबंधी, त्यांनी दिलेले उत्तर किंवा प्रश्नपत्रिकेतील उत्तरांचे पर्याय याबाबत काही आक्षेप असतील 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान नोंदवता येतील.

म्हाडा भरती परीक्षा २०२१ प्रश्न व आन्सर कि आक्षेपाबाबत सूचना

Mhada Exam 2022 Objection window

विद्यार्थ्यांना त्यांच्या खात्यात लिंक उपलब्ध होणार

म्हाडा सरळसेवा भरती 2021 अंतर्गत परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या ई-मेल आयडीवर आज लिंक पाठविली जाईल. सर्व उमेदवारांना त्या लिंकवर त्यांनी दिलेल्या परीक्षेचा पेपर त्यांच्या उत्तरासह पाहता येईल. तसेच त्यांना उत्तरतालिका देखील पाहता येईल, असं महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणचे सचिव यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.


Mhada Exam 2022: As per the schedule for the posts of Assistant, Senior Clerk, Junior Clerk-Typist in the internal cadre under MHADA Saralseva Recruitment Process on Monday. The examination will be held on February 7, 2022 from 09.00 am to 11.00 am, 12.30 pm to 2.30 pm and from 4 pm to 6 pm in three sessions. Read More details as given below.

MHADA Bharti – म्हाडा 565 भरती परीक्षेचे प्रवेश पत्र जाहीर

गेल्या अनेक दिवसांपासून पेपर लीक प्रकरणामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले. त्यामुळे ऐनवेळी म्हाडाच्या परीक्षा (mhada recruitment 2021 exam)  पुढे ढकलण्यात आल्या होत्या. म्हाडाची परीक्षाही पुढे ढकली होती. पण, म्हाडा सरळसेवा भरती २०२१ परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) सरळसेवा भरतीअंतर्गत  अतांत्रिक पदासाठी सोमवार, दि. ०७ फेब्रुवारी, २०२२ रोजी आयोजित परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होईल, अशी माहिती ‘म्हाडा’चे सचिव  राजकुमार सागर यांनी दिली.

म्हाडा सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत अतांत्रिक संवर्गातील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या पदांसाठी नियोजित केलेल्या वेळापत्रकानुसार सोमवार दि. ७ फेब्रुवारी, २०२२ रोजी सकाळी ०९.०० वाजेपासून ते ११.०० वाजेपर्यंत, दुपारी १२.३० वाजेपासून ते २.३० वाजेपर्यंत तर दुपारी ४ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अशा तीन सत्रांत परीक्षा होणार आहे, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी असे आवाहन मंडळाचे राजकुमार सागर यांनी केले आहे.

मध्यंतरी, आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरण राज्यभर गाजलं. हे प्रकरण ताजं असतानाच जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक आणि मुख्य आरोपी देशमुख यानं म्हाडा पेपर फोडण्याचं धाडस केलं. त्यासाठी राज्यभरातील 10 एजंट्सकडून त्याला कोट्यवधी रूपये मिळणार होते. एजंट्सकडून म्हाडाच्या परिक्षेत बसलेल्या परीक्षार्थींना उत्तरपत्रिका चक्क कोरी ठेवण्याचा सल्ला देशमुख यांच्याकडून देण्यात आला होता.

उत्तरपत्रिका तपासणी करत असताना एजंट्समार्फत आलेल्या परिक्षार्थींना ओएमआरशीटमध्ये (उत्तरपत्रिका) थेट गुण देऊन त्यांना पास करण्यात येणार होतं. याप्रकरणी डॉ. प्रितीश देशमुख याच्यासह अंकुश रामभाऊ हरकळ (रा. किनगावराजा, ता. सिंधखेडराजा,जि. बुलढाणा) आणि संतोष लक्ष्मण हरकळ (रा. मिलेनियम पार्क, औरंगाबाद) याला अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.


Mhada Exam Date

Mhada New Exam Date: The timetable of Mhada Exam has been changed once again. The exams, which started on February 7, will now start online on January 31. The exams will be held on January 31, 2, 3, 7, 8 and 9 in these six days. The offline examination for 565 posts will now be conducted online.

MHADA Exam Latest Update : म्हाडाच्या भरती परीक्षेचं (Mhada Exam) वेळापत्रक (Timetable)पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. 7 फेब्रुवारी पासून सुरु होणा-या परिक्षा आता 31 जानेवापासून ऑनलाईन सुरु होणार आहे.  31 जानेवारी, 2, 3, 7, 8, 9 फेब्रुवारी या सहा दिवसांत परीक्षा घेण्यात येणार  आहे. 565 पदांसाठी ऑफलाईन (Offline)होणारी परीक्षा आता ऑनलाईन होणार आहे.

म्हाडाच्या परीक्षेची जबाबदारी टीसीएस (TCS)कंपनीवर सोपवण्यात आली आहे.  टीसीएस कंपनीला विविध परीक्षा घेण्याचा अनुभव आहे. याआधी जीए सॉफ्टवेअर (GA Software) कंपनीकडे परीक्षेची जबाबदारी होती. पण या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं गोपनीयतेचा भंग करून पेपर फोडण्याचा कट रचल्याचा भांडाफोड झाला. त्यामुळे तातडीने म्हाडाकडून परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर विविध परीक्षांचा अनुभव असलेल्या टीसीएस (TCS) कंपनीमार्फत ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक (Full TimeTable) आणि इतर सूचना म्हाडाच्या संकेतस्थळावर  (Mhada Website) जाहीर करण्यात येणार आहे.

हॉल तिकीट इथून डाऊलोड करा 

ऑनलाइन परीक्षेचे प्रवेशपत्र (hall Ticket ) डाऊनलोड करण्यासाठी म्हाडाच्या https.mhada.gov. in  या संकेतस्थळावर (Website)  22 जानेवारी पासून   https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/31659/75245/login.html  लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा प्रक्रिया (Online Exam) समजणे सोपे जावे यासाठी  म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर 26 जानेवारी पासून मॉक लिंक (Mock link) उपलब्ध करुन देण्यात आली आहे. https://g06.tcsion.com:443//OnlineAssessment/index.html?31659@@M211 या मॉक लिंकद्वारे उमेदवारांना परीक्षा कशी असेल याचा अंदाज येणार आहे. तसेच ऑनलाइन परीक्षा कशी द्यावी याबाबत माहिती देण्यात आली आहे.


Mhada Exam -Important Instruction

This is important news for the students who are going to take the MHADA exam. You Known that, MHADA has made a big announcement regarding the MHADA Recruitment exam new dates. Mhada Conduct exam for the posts of Assistant, Senior Clerk, Junior Clerk, Typist in Cluster 6 from 7th Feb to 9th Feb 2022. A mock link has been provided for the students to understand the online examination method and its format.

FOR MOCK TEST CLICK HERE

FOR MORE DETAILS CLICK HERE 


Mhada Exam Fee Return

Housing Minister Jitendra Awhad has instructed the candidates to return the examination fee. But now the MHADA authority is considering refunding the fee only to the candidates on the first day of the examination. A final decision on the decision will be taken soon, sources said.

MHADA Bharti – म्हाडा 565 भरती परीक्षेचे प्रवेश पत्र जाहीर

म्हाडा भरती  परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानेच पेपर फोडण्याचा डाव रचल्याचे उघड होताच म्हाडा प्राधिकरणाने ऐन वेळी परीक्षा रद्द केली. यामुळे उमेदवारांना त्रास सहन करावा लागला. उमेदवारांना परीक्षा शुल्क  परत (Return) देण्याचे निर्देश गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड  यांनी दिले आहेत. मात्र आता केवळ परीक्षेच्या पहिल्या दिवशीच्या उमेदवारांना शुल्क परत देण्याचा विचार म्हाडा प्राधिकरणाकडून सुरू आहे. या निर्णयावर लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

MHADA Bharti – म्हाडा परीक्षेचे गुणांकन Mean Standard Deviation Method पद्धतीने

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) आस्थापनेवरील विविध 14 संवर्गातील 565 रिक्त पदे भरण्यासाठी जीएस सॉफ्टवेअर या कंपनीची निवड करण्यात आली होती. या पदांसाठी पावणे तीन लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या पदांसाठी 12, 15, 19 आणि 20 डिसेंबर रोजी दोन सत्रात परीक्षा आयोजित केली होती.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) आस्थापनेवरील विविध 14 संवर्गातील 565 रिक्त पदे भरण्यासाठी जीएस सॉफ्टवेअर या कंपनीची निवड करण्यात आली होती. या पदांसाठी पावणे तीन लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या पदांसाठी 12, 15, 19 आणि 20 डिसेंबर रोजी दोन सत्रात परीक्षा आयोजित केली होती.

रविवारी (ता.12) आयोजित करण्यात आलेल्या दोन्ही सत्रातील परीक्षेला एक लाख 2 हजार 400 उमेदवार बसणार होते. म्हाडाने जाहीर केलेल्या परीक्षा वेळापत्रकानुसार उमेदवार दूरवरून हालअपेष्टा सहन करत परीक्षा केंद्रांवर पोहचले. मात्र पेपर फोडण्याचे प्रकरण समोर येताच म्हाडाने परीक्षा रद्द केली. यामुळे परीक्षा केंद्रांवर दूरवरून पोचलेल्या उमेदवारांनी संतप्त व्यक्त केला.

उमेदवार आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका करताच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सर्व उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच ही परीक्षा म्हाडामार्फत आयोजित करण्यात येईल, असेही सांगितले होते. मात्र आता ऑनलाइन परीक्षेसाठी टीसीएस कंपनीची निवड करण्यात आली आहे. तसेच केवळ पहिल्या दिवशी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. या निर्णयावर येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे म्हाडातील सूत्रांनी सांगितले.

Mhada Exam New Date

म्हाडा ५६५ भरती परीक्षेचे सुधारित तारखा जाहीर

MHADA has made a big announcement regarding the MHADA Recruitment exam new dates. Mhada Conduct exam for the posts of Assistant, Senior Clerk, Junior Clerk, Typist in Cluster 6 from 7th Feb to 9th Feb 2022. TCS Conducted this examination Online. Complete Mhahd Recruitment 2022 timetable is given below. Candidates keep visit on our website www.govnokri.in for any updates of Mhada Recruitment 2022.

Mhada Recruitment 2023 Exam Postponed

MHADA Authority’s examination for the posts of Assistant, Senior Clerk, Junior Clerk, Typist in Cluster 6, which will be held on January 29 and 30 in six sessions, has been postponed. The revised examination schedule will be announced on the MHADA website soon

29 आणि 30 जानेवारी 2022 रोजी घेण्यात येणारी नियोजित म्हाडा (Mhada Exam) सरळ सेवा भरती परीक्षा 2021-22 पुढे ढकलण्यात आली आहे. आज एमपीएससीमार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या जानेवारी महिन्यातील तीन परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात अनेक उमेदवारांना एमपीएससी आणि म्हाडा प्राधिकरणाच्या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

उर्वरित क्लस्टर मधील परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार होतील

म्हाडा प्राधिकरणाची क्लस्टर 6 मधील सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक या संवर्गासाठी 29 आणि 30 जानेवारी या दिवशी सहा सत्रांमध्ये परीक्षा होणार होती. परंतु, एमपीएससी आणि म्हाडा प्राधिकरणाच्या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने म्हाडा ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक लवकरच म्हाडा संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. शिवाय उर्वरित क्लस्टर मधील परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार होतील. 

Mhada Recruitment 2022 examine new time table release today. Mhada Recruitment Exam 2022 is now conducted through Tata Consultancy Services (TCS) from 29th January 2022 to 3rd February 2022. TCS Conduct this examine Online. Complete Mhahd Recruitment 2022 time table are given below. Candidates keep visit on our website www.govnokri.in for any updates of Mhada Recruitment 2022.

MHADA RECRUITMENT 2021 Examination Time Table.

Mhada Online Exam Time Table 2022


Mhada Recruitment 2021 New Exam Date Declared. MHADA has made a big announcement regarding the MHADA Recruitment exam new dates. MHADA has already announced that it will conduct the exam through TCS. Accordingly, the examination will be held in February 2022. TCS has been selected for the exam and MHADA has announced that it will conduct the exam online from 1st February 2022 to 15th February 2022. Read More details as given below.

म्हाडा सरळसेवा भरती परीक्षेचा (MHADA Exam) पेपर फोडण्याचा कट उघड झाल्याने म्हाडाने ऐनवेळी परीक्षा रद्द केली. यानंतर विविध परीक्षा घेण्याचा अनुभव असलेल्या टीसीएस कंपनीची या परीक्षेसाठी निवड करण्यात आली असून या कंपनीमार्फत 1 ते 15 फेब्रुवारी दरम्यान ऑनलाइन पध्दतीने परीक्षा घेण्यात येणार असल्याचे म्हाडाने जाहीर केले आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सरळ भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणानंतर म्हाडाने आता सावध पवित्रा घेतला आहे. ‘म्हाडा’ने ही परीक्षा ‘टीसीएस’ कंपनीमार्फत घेण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. त्यानुसार ही परीक्षा येत्या फेब्रुवारीमध्ये घेतली जाणार आहे; तसेच परीक्षा केंद्रांची संख्याही वाढविण्यात येणार आहे म्हाडा भरती परीक्षा आता ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. भरती परीक्षेतील गैरप्रकारानंतर म्हाडा प्राधिकरणाने गैरप्रकार रोखण्यासाठी तसेच परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्याविषयीची अधिकृत घोषणा आज, शुक्रवारी होण्याची शक्यता आहे.

Mhada Recruitment 2021-2022 New Time Table

.

म्हाडा’तील वेगवेगळ्या १४ संवर्गातील ५६५ रिक्त पदे भरण्यासाठी जीए सॉफ्टवेअर कंपनीची निवड वादग्रस्त ठरली. या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हा पेपर फोडल्याचे कारस्थान रचल्याचे उघड होताच म्हाडाने ही परीक्षा रद्द केली. त्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळानंतर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही परीक्षा टीसीएस कंपनीकडून घेण्यात येईल, अशी घोषणा केली.

फेब्रुवारीमध्ये परीक्षा

ऐन परीक्षेच्या दिवशीच परीक्षा रद्द झाल्याने ही परीक्षा देणाऱ्या पावणेतीन लाख उमेदवारांची मोठी गैरसोय झाली. त्यांना आता परीक्षेसाठी नव्याने तयारी करावी लागणार आहे; तसेच त्याप्रमाणे ‘म्हाडा’ अधिकाऱ्यांकडून परीक्षेच्या आयोजनासंदर्भात तयारी केली जाणार आहे. ही परीक्षा आता फेब्रुवारीमध्ये घेण्यात येईल, असे ‘म्हाडा’तील सूत्रांनी सांगितले. या परीक्षेत पारदर्शकता जपली जावी, यावरही विशेष लक्ष दिले जाणार आहे.


Maharashtra Housing and Regional Development Authority is informing all the candidates through this public statement Simple service recruitment process is being implemented to fill 565 posts in technical and non-technical cadres. All precautionary measures are being taken by the authority to make the process transparent and smooth as well as to appoint candidates in the recruitment process who meet the criteria of pure quality and fulfillment of documents.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील ५६५ पदे भरण्याकरिता सरळसेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर प्रक्रिया पारदर्शी व सुरळीतपणे व्हावी तसेच पदभरतीमध्ये निव्वळ गुणवत्ताधारक व कागदपत्रे पूर्तता निकषांच्या अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची नेमणूक व्हावी याकरिता सर्व खबरदारी प्राधिकरणातर्फे घेण्यात येत आहे.

प्राधिकरण या जाहीर निवेदनाव्दारे सर्व उमदेवारांना कळवित आहे कि, त्यांनी गैर मार्गांचा अवलंब करू नये तसेच कोणत्याची व्यक्तीचा भूल थापांना बळी पडू नये.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
8 Comments
  1. Mayur Hanmantrao Rathod says

    I knw that…Bt Apne form fill kiya he.? Apka hall ticket release date kya hai.?

  2. Rohit pal says

    I have done diploma in civil engineering and applied for junior engineer,will it work

  3. Pradip says

    9623871339 sarvyor add masjid city

  4. Pradnya prashant Gurav says

    I want to join

  5. Prasad Pawar says

    Pune visit official

  6. Prasad Pawar says

    Prasad Pawar

  7. Anand gajbhiye says

    Plese upload mhada junior clerk 2015 question paper

  8. Hivraj yadav says

    Hivraj yadav drives me crazy and you are so cute together for 9021984172

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!